Home Breaking News Farmernews/आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र.

Farmernews/आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र.

 

[संग्रामपूर तहसील कार्यालयात खळबळ.]

संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज)ः- कोरडा दुष्काळ जाहीर करा, तातडीने आर्थिक मदत द्या.. पिकं हातातून गेल्याने बावणबीरच्या तरुण शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेले व्यथा पत्र मुख्यमंत्री यांचे नावे लिहून तहसील कार्यालयात ना.त.वसावे साहेब यांना आज दि.२२३/सप्टेंबर रोजी दिले आहे.त्यामुळे तहसिल कार्यालयात एकच खवबळ उडाली असल्याचे चित्र दिसून आले,

 

तालुक्यातील बावनबीर येथील विशाल मुरुख ह्या तरुण शेतकऱ्याने स्वतःचे रक्ताने लिहिलेल्या दिलेल्या नि वेदनात नमुद केले आहे की,बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असून, त्याच्या संतापाचा आणि हतबलतेचा टोकाचा प्रकार संग्रामपूर तालुक्यात समोर आला आहे..sangrampurnews

 

बावनबीर येथील तरुण शेतकरी विशाल मुरुख यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री यांना उद्देशून पत्र लिहिले असून ‘मला आत्महत्या करू द्या’ असा मजकूर या पत्रात लिहिला आहे.. कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

 

अशी मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात तहसिल कार्यालयात ना.तह.वसावे साहेब सादर केले आहे.. खरीप हंगामासाठी उसने आणि व्याजाने पैसे उभे करून शेतीची पेरणी केली.. मात्र पावसाने दडी मारल्याने हाताशी आलेली पिके करपून गेलीत.cmomaharashtra

शेतातून सोयाबीनचा एक दाणाही हातात येण्याची परिस्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.. त्यामुळे कर्जाचा डोंगर, उत्पादनाची चिंता आणि पुढील हंगामाची अनिश्चितता यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Farmernews/याच नैराश्यातून विशाल मुरुख यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.आतातरी सरकारने दुष्काळ जाहीर करीन आर्थिक दृष्टीने गरीब शेतकऱ्यांना तरी आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून जाहीर करुन मदत देणौयाची विनंती केली आहे.