इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव जानोरी रोडवरील भाग दोन मधिल गजानन माळी ६५ वर्ष रा. गजानन सोसायटी यांच्या शेतातुन २८ हजार रू चे शेतीपयोगी साहित्य कोण्यातरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.३०/१०/२०२३ रोजी सकाळी उघडकिस आली.
हकीकत अशा प्रकारे आहे की
जानोरी रोड वरील गजानन नागोराव माळी यांनी शेगाव भाग २ मधील गट क्र ४६३ शेत प्रदीप अवचार यांची आठ एकर शेती ठोक्यानी केलेली आहे त्यामध्ये हरभरा पिक पेरलेला असुन दि.२६/१० /२०२३ रोजी ५ वा त्याला पाणी देवुन घरी आलो.
या संधीचा फायदा घेऊन दि.२७/१०/२०२३ चे ७ वा दरम्यान कोणी तरी अज्ञात चौरटयाने शेतातील जैन कपंनीचे पाईप ४७ नग कि. १८ हजार ८०० रु स्पिंकलर १६ नग कि.६ हजार ४०० रु टि.२ नग कि.८०० रु जैन कंपनीचे रेडयुसर ३ कि. १ हजार ४०० रु बेंड २ नग कि. ८०० रु असा एकुन २८ हजार रुपयांचा मुदेमाल चोरुन नेला
.या प्रकरणी गजानन नागोराव माळी यांनी शहर पो.स्टे मध्ये तोंडी रिपोर्ट दिल्या वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध अप नं. ५५७ /२०२३ कलम ३७९ भा. द. वि.अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांचे आदेशानुसार पोहेका संजय करुटले हे करीत आहेत. Farming