गरजू लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ .? ( gharkulyojna )

 

पंचायत समिती लोणार अंतर्गत ग्रामपंचायतीचे मनमानी कारभार…

gharkulyojna:शासनाच्या विविध योजने अंतर्गत नागरिकांना वैयक्तिक लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

लोणार पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारडी सिरसाठ व बोरखेडी गट ग्रामपंचायत येथे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुलांना सुरुवात करण्यात आली परंतु या ठिकाणी सरपंच व सचिव यांनी गरजू लाभार्थ्यांना डाऊलून मर्जीतील लाभार्थी यांचे नावाने घरकुल मंजुर करून गरजु लाभार्थी यांना घरकुल लाभापासुन डावल्या बाबतची तक्रार लिला विजय मते,रा. बोरखेडी यांनी लोणार यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे दिली आहे.

दिलेल्या तक्रारी मध्ये नमुद आहे की,तक्रार करती महिला परितक्ता असुन मौलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे.गट ग्रामपंचायत पार्डी सिरसाट/बोरखेडी येथील ग्रामसेवक व सरपंच हे मनमानी कारभार करीत आहे.

भरारी पथकांच्या कार्यवाहीला गती अकोट तालुक्यात 75 हजार रू. चे बोगस बियाणे जप्त जिल्ह्यात दोन विक्रेत्यांविरूद्ध गुन्हा ( krushinews )

आज रोजी मंजुर झालेल्या घरकुल यादीमध्ये त्यांनी हेतु पुरस्कर तक्रार करत्यासह इतर गोरगरीब नागरीकांचे नावे काही कोणतेही कारण न सांगता वगळले आहे.

एकत्रीत कुटूंबातील,जमीनी असलेले श्रीमंत व्यक्ती तसेच आज रोजी पक्के घरे असलेल्या की जे नियमात बसत नाहीत अश्या नागरीकांना घरकुल मंजुर करण्यात आले असुन घरकुल हप्ते वितरीत करणे सुरू झाले असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

वास्तवीक पाहता ज्यांना घरकुलाची गरज आहे ज्यामध्ये बेघर,विधवा, परितक्ता,अपंग या नागरीकांना आज रोजी मंजुर असलेल्या घरकुल यादीतुन वंचीत ठेवण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आहे. यावरून घरकुल मंजुर करण्यासाठी आर्थीक व्यवहार करावा लागणार का ? सरपंच व उपसरपंच यांनी सांगीतलेले नावांची यादीच ग्रामसेवक यांनी पंचायत समितीकडे पाठविली असेल का ? ग्रामपंचायतीने घरकुल मंजुर करण्यासाठी पाठविलेली यादीतील लाभार्थी यांचे घराचा गाव नमुना आठ तसेच ते योजनेमध्ये बसतात किंवा कसे हे पंचायत समिती मधील अधिकारी बघत नसतील का ? जे लाभार्थी आर्थीक व्यवहार करीत आहे त्यांचेच नावे घरकुल मंजुर होणार का? असे एक नाही तर अनेक प्रश्न पडल्या बाबत नमुद केले आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने मंजुर असलेल्या घरकुल लाभार्थींच्या जागेची प्रत्यक्ष मोका पाहणी तसेच त्यांच्या गाव नमुना 8 व इतर आवश्यक कागदपत्रांची सविस्तर चौकशी सात दिवसाच्या तक्रारकरत्या समक्ष करण्यात यावी,कारण ग्रामपंचायत कार्यालय आर्थीक व्यवहार करून घरकुल मंजुर करीत असल्याचा संशय तक्रार कर्त्याला आहे.

एका क्लिक वर लाईव्ह बातमी 

तसेच पक्के घरे व नियमानुसार जे बसत नाही ते सुध्दा घरकुले मंजुर होत असल्याने माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने जो पर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत आज रोजी सुरू असलेल्या घरकुलाचे हप्ते वितरीत करण्यात येवु नये.

gharkulyojna:तसेच ग्रामपंचायती कडुन घरकुल मंजुर करण्या करीता आलेल्या यादया जागेची प्रत्यक्ष पाहणी तसेच नियमानुसार लाभार्थी घरकुल घेवु शकतो किंवा कसे याची पाहणी करूनच घरकुल मंजुर करण्यात यावे. दिलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा तक्रारी अंती दिला आहे.

Leave a Comment