Grampanchayat / कुकुटपालनाची (पोल्ट्रीफार्मची) परवानगी तात्काळ रद्द करा.

0
140

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Grampanchayat:हिंगणघाट: समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे.

या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती करू शकत नाही आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधीमुळे शेकडो लोकांना गंभीर आजार सुद्धा झाला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, लहान मुले दुर्गंधीमुळे बिमार होत आहे. त्यांचे जबाबदार कोण आहे ?

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गावातील गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेईल व मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Grampanchayat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर पोफळे, उमाकांत पोफळे, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजने, पुरुषोत्तम सालवटकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here