प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट :-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र राज्य -मुंबई. यांना उपविभागीय अधिकारी ,उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांच्यामार्फत उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे माजी नगरसेवक मनीष देवढे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याकरिता निवेदन देण्यात आले.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
सविस्तर असे की, महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये मोठया प्रमाणात ईव्हीएम मशीन द्वारे घोळ करण्यात आला .बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षात मतदान झालेले व मशीन मध्ये यामध्ये तफावत दिसून येत आहे.
तसेच जनतेला या निकालाबद्दल संशय निर्माण झाला आहे .बरेच जण यावर न्यायालयात सुद्धा गेले. तरी काही राजकीय पक्ष या विरोधात आंदोलन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते डाॅ.श्री. आढाव साहेब यांनी या विरुद्ध आंदोलन छेडले. त्याचप्रमाणे शिवसेना हिंगणघाट च्या वतीने मा. मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना मा. उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत असे निवेदन करण्यात आले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात. तसेच झालेल्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट या मशीन मधून निघणारे प्रत ची संपूर्ण मशीनची मोजणी करावी. यासाठी निवेदन देण्यात आले.
Hingnghat :निवेदन देण्याकरिता उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, गजानन काटवले, अनंता गलांडे शंकर मोहम्मारे, फिरोज खान, नईम शेख ,नितीन वैद्य, अतिक बेग, प्रशांत सुपारे,प्रशांत कांबळे, नरेश तांमगाडगे, विवेक भोयर, नरेंद्र गुळकरी, अमोल वादाफळे, घनश्याम वाघमारे, गणेश कुमरे, अनिल कावडकर, पंकज ठाकरे, संजय खोंडे, निशिकांत नगोसे, सतीश लोणारे, संजय कर्डिले, विशाल माथनकर, भास्कर भिसे, दिनेश दुबे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.