Hingnghat:-Duplicate Police/पोलीस असल्याचे सांगून एका वृद्ध व्यक्तीस थांबविले व पन्नास हजार रुपये घेत दुचाकीने पळाले

 

हिंगणघाट :- बबन माधव जवादे (वय ६५) राहणार नारायणपूर तालुका समुद्रपूर हिंगणघाट येथे 15 सप्टेंबर गुरुवार ला प्रकृती खराब असल्याने ते हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आले होते. पैसे काढण्यासाठी ते पोस्ट ऑफीस कार्यालयात गेले तेथून रुपये काढले. त्यानंतर ते पोस्टातून बाहेर पडत रस्त्याने चालत निघाले. महावीर भवन समोर आले असता सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून थांबवले. दोघांनी हातचलाखीने त्यांच्याजवळील पिशवीत असलेली ५० हजार रुपयांची रक्कम घेत दुचाकीने पळून गेले बबन जवादे यांनी पिशवी पाहिली असता त्यांना पैसे दिसून आले नाही त्यांच्या लक्षात आले पोलीस सांगून फसवणूक केली त्यामुळे त्यांनी हिंगणघाट पोलीस इथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Leave a Comment