Yaval News अरुण पाटील यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार बहाल Journalism Award

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

Journalism Award : श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार पुरस्कार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्तपत्र पत्रकारिताक्षेत्रातून यावल जिल्हा जळगाव येथील दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांना.

व त्यांची प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एसटी पाटील यांनी स्वीकारला येथील जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा व अण्णासाहेब पाटील अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्या हस्ते 5 जानेवारी 24 शुक्रवार रोजी नाशिक येथील जुना आग्रा रोडवरील श्री कालिका मंदिर सभागृहात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आला.

Murder News | आधी सोबत जेवले, मग त्या नंतर बाहेर पडताच शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या घातल्या; ही सर्व घटना सीसीटीव्हीतील थरार समोर

अरुण पाटील या कार्यक्रमाला पोचू शकणार नव्हते म्हणून त्यांनी त्यांची त्यांचे प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एस टी पाटील( राहणार तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हल्ली मुक्काम नाशिक )हे या पुरस्कार समारंभाला उपस्थित होते.

त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारला अरुण पाटील यांनी गेल्या 36 वर्षात यावल तालुक्यात विविध क्षेत्रात लिखाण करून सहकार क्षेत्र तालुक्यातील कारखानदारी पतसंस्था शेतकरी शेतमजूर व जनसामान्यांच्या प्रश्नावर जे सडेतोड लिखाण केले.

आणि 36 वर्षात वस्तुनिष्ठ अशी आणि जनसामान्याचे न्याय हक्कासाठी निष्कलंकीत पत्रकारिता केली त्या निमित्ताने त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार जाहीर झाला होता तू आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला

Journalism Award : अरुण पाटील यांना मिळालेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा संदर्भात वृत्तपत्र क्षेत्रातून तसेच राजकीय व अराजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या मित्रमंडळी परिवारांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे

Leave a Comment