बुलडाणा उपजिल्हाधिकारी, भिकाजी घुगे लिपिकसह एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबीने केली अटक

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची शेतजमिनी प्रकल्पात जाते अश्या बाधित शेतकऱ्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून मोबदला दिला जातो.

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात हिंगणा ईसापूर ता नांदुरा येथील एका शेतकऱ्याची जमीन गेली होती त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली बुलडाणा मध्यम प्रकल्प कार्यालयच्या उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे 10 टक्के अर्थात 2 लाखाची मागणी केली होती व त्याला कार्यालयात कार्यरत लिपिक खरात यांनी प्रोत्साहन दिलं होतं.

तसेच एडव्होकेट अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती.

त्या शेतकऱ्याने याची तक्रार बुलडाणा एसीबी कडे केली असता दिनांक 28 डिसेंबर रोजी सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,लिपिक नागेश खरात यांच्यासाठी 1 लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना एडव्होकेट अनंता देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आले.या कारवाई नंतर एसीबी पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात व एडव्होकेट देशमुख यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ बुलढाणा.

Leave a Comment