lराजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चे जन्मस्थळ अंधारात

 

राजवाड्यातील लाईट 20 दिवसापासून तर सीसीटीव्ही कॅमेरे 1 महिन्यापासून बंद#sindkhedraja #rajmata

*सिंदखेड राजा सुरेश हुसे*

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ युगपुरुष राजे लखुजीराव जाधव यांची कर्मभूमी व राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या महाराष्ट्राचे अस्मिता असणाऱ्या सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ गेल्या 20 दिवसापासून अंधारात आहे तर सीसीटीव्ही कॅमेरे तब्बल 1 महिन्यापासून बंद आहे देशाला व राज्याला दिशा देण्याचे काम करणाऱ्या स्वराज्यास संकल्पिका राजमाता जिजाऊ यांनी केले त्यांचे जन्मस्थळ आहे ही वास्तु राज्य पुरवतात खात्याच्या ताब्यात असून जन माणसातून लाईट बंद असल्यामुळे रोष व्यक्त होत आहे

 

. राजमाता जिजाऊ चे जन्मस्थळ असलेला ऐतिहासिक राजवाडा राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे राजवाड्यातील स्वच्छता दिवाबत्ती यासह अन्य सुविधा देण्याची जबाबदारी राज्य पुरातत्त्व खात्याची आहे कारण या कामाचे पैसे बिल सुद्धा त्यांना भेटत असते असे असताना सुद्धा राजवाड्यातील कर्मचारी या विषयाकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाआहे

राजवाड्यातील लाईट बंद का पडली ती तात्काळ का सुरू करण्यात आली नाही कशामुळे बंद पडली लाईनचे बिल थकले का यासह विविध प्रश्न निर्माण झाले आहे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजवाड्याच्या बाहेरील स्थानिक शहरातील रहिवाशांच्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली नागरिकांना वाटली लाईट बंद पडली असेल काही दिवस नंतर सुरू होईल.

परंतु आज उद्या परवा असे अनेक दिवस गेल्यानंतर तब्बल वीस दिवस नंतर सुद्धा लाईट बंद पडली आहे रात्रीचा अंधार पाहून याकडे लक्ष वेधले गेले राज्यपुरातत्व खात्याची उदासीनता पाहून जनतेमध्ये रोष व्यक्त होत आहे तसेच गेल्या एक महिन्यापासून राजवाडीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत दिवसभर पर्यटक शिवभक्त राजवाड्यात येत असतात या पवित्र जिजाऊ जन्मस्थळ परिसरात दिवसभरात काय काय घडामोडी घडते.

हे टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे गरजेचे आहे मात्र हे कॅमेरे बंद का पडले ते समजू शकले नाही राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यात काही भुयारी मार्ग आहेत धान्य ठेवण्याचे कोठार जागा आहे तिथे दिवसा सुद्धा अंधार असतो तेथील घडामोडी टिपण्यासाठी मुद्दाम त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत मात्र हे कॅमेरे बंद आहेत ही सर्व जबाबदारी राज्य पुरातत्व खात्याची आहे मात्र त्यांनी स्पेशल याकडे दुर्लक्ष केलेले आहे

Leave a Comment