मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढा,अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा, वंचित नेते (Lonar )

 

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar:शेगाव पंढरपूर पालखी मार्ग लगतच्या वार्ड क्रमांक १,२,५,६,व ईतर वार्डामध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्या कुटुंबाला उघड्यावर पाडणाऱ्या जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून,पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लाऊन,नुसकानग्रस्त कुटुंबीयांना तात्काळ मदत करण्यात यावी सध्या शासनाच्या वतीने बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये लाडके बहिण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे.

त्यामध्ये बँकेमध्ये केवायसी च्या नावाखाली बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याकडून महिलांची पिळवणूक होत आहे. त्यामध्ये महिलांना तूछपणाची वागणूक देण्यात येते.
कर्मचाऱ्याकडून होणारी पीळवनूक तत्काळ थांबवण्यात यावी. व सुलतानपूर तालुका लोणार येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये गावातील रहिवासी हे बँकेमध्ये कर्मचारी आहेत ते बँकेमध्ये येताना नशेमध्ये असतात त्यांची बँक ग्राहकांना बोलण्याची पद्धत वेगळी असते ते बॅक ग्रहाकाना उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना बँकेतून हाकलून देतात.

अश्या बेजबाबदार बँक कर्मचाऱ्यावर निलंबनाची करून कारवाई करण्यात यावी. तथा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणार येथील कर्मचारी सुद्धा अशाच पद्धतीने बँक ग्राहकांसोबत अरेरावी भाषा करतात करतात. असे ह्या मेहकर – लोणार मतदारसंघातील सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांची बैठक बोलवून त्यांना समज देण्यात यावा व चांगली सेवा देणारे कर्मचारी बँकेमध्ये देण्यात यावे.

सध्या मेहकर – लोणार तालुक्यामध्ये महावितरण चे प्लास्टिक केबल बंच चे काम सुरू आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार न करता अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे तत्काळ हे काम थांबून बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून अंदाजपत्रकानुसार काम करणाऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे व सध्या नवरात्र सन उत्सवाचे दिवस आहेत तथा ओहरलोड घ्या नावाखाली अनेक ठिकाणी लोड शेडिंग घेण्यात येते ती तत्काळ थांबवून वीज ग्राहकांच्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये फ्यूज जाणे,डिओ जाणे टाकण्यासाठी वायरमनला फोन करण्यात येतो परंतु फोन लागत नाही.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी गेल्या दोन ते तीन वर्षापासून शासनाच्या वतीने ई- पीक पाहणणीसाठी मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. परंतु ई-पिक पाणीही शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे.कारण की प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना मोबाईलची माहिती नसल्यामुळे ई- पीक पाहणी पासून हजारो शेतकरी मुकले आहेत.

म्हणून शासनाला विनंती असेल पूर्वीप्रमाणे तलाठ्या मार्फत पीक पेरा भरण्यात यावा ५ शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी अतिवृष्टी ग्रस्, आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येते. परंतु ई- केवायसी च्या नावाखाली शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकाची मुस्कटदाबी होते. त्यामुळे शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत ही उदात्त हेतूने देऊन, ई- केवायसी अट रद्द करण्यात यावी.

अनेक वर्षापासून मेहकर लोणार तालुक्यातील नागरिकांचे रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना या योजनेमध्ये नावे समाविष्ट असून मंजूर आहेत. परंतु उद्दिष्टे नसल्यामुळे ते लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत. करिता घरकुलाचे उद्दिष्ट तात्काळ देण्यात यावे व अनेक मंजूर काही लाभार्थ्यांना १५ हजाराचा पहिला हप्ता मिळाला परंतु उर्वरित अनुदान आज पर्यंत मिळाले नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, घरकुल धारकाच्या अनुदानामध्ये शासनाकडून दुजाभाव करण्यात येतो. तो म्हणजे शहरासाठी अडीच लाख व ग्रामीण साठी एक लाख २५ हजार हा दुजाभाव थांबून ग्रामीणसाठी व शहरासाठी सुद्धा ५ लाख अनुदान देण्यात यावे.

शेतकरी राजाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. यावर्षी शेतकरी राजाच्या पिकांवरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. तसेच परतीच्या पावसानेही अतोनात नुकसान केले त्यामुळे शेतकरी राजाला सरसकट कर्जमाफी देऊन, हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी
कृषी केंद्र मार्फत शेतकरी राजाचे होणारी आर्थिक लूट थांबून कृषी केंद्राच्या दर्शनी भागावर रेट बोर्ड लावण्यात यावे. व शेतकरी राजाची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.

लोणार सरोवरे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा निधी येतो परंतु विकास होताना दिसत नाही येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छतागृह,मुत्री घरे, राहण्याची व्यवस्था नाही. येजा करण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत,मेहरबान साहेब वरिष्ठ स्तरावरून सरोवराच्या कामाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन घेणाऱ्या निधीचा योग्य वापर करून पर्यटकाला चांगल्या सुविधा देण्यात याव्या व लोणार शहराचे मूळ रहिवासी यांना पाण्यासाठी आजही टँकरने पाणी विकत घ्यावे लागते व जे सर्वसाधारण गरीब कुटुंब आहेत त्यांना डोक्यावरती पाणी आणावे लागते नळाला येणारे पाणी हे दोन ते तीन महिन्यातून एकदा येते आणि तीही दूषित पाणी येते पाण्याचा विषय हा गांभीर्यपूर्वक घेऊन शहरवासीयाचे पाण्याची भटकंती थांबून शुद्ध पाणी देण्यात यावे.

लोणार येथील लोणार शहराला लागून २००८ पासून मंजुरात मिळाली परंतु कामाला सुरूवात झालेली नाही. शहरांमध्ये अनेक वाहनांची वर्दळ असते या शहरातून शेगाव पंढरपूर महामार्ग गेलेला आहे याच ठिकाणाहून पूर्णा नदी जवळ असल्यामुळे रेतीचे वाहने भरधाव वेगाने य जातात अनेक नागरिकांना रेतीच्या वाहनामुळे आपले प्राण गमावले लागले आहे. तरी बायपास रोडच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावी लोणार तालुक्याचे ग्रामीण भागाचे मुख्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालय हे कार्यालय अतिशय जिर्ण होऊन मोडकळीस आले आहे.

कार्यालयाच्या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांची वर्दळ असते त्यामुळे इमारत कोसळून जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. करिता पंचायत समिती कार्यालय लोणार सरोवरच्या काठावरून हलवून हिरडव रोड वर्ती असलेल्या ई क्लास गट नं १३७,१३८,१३९ नंबर वरती रिंग रोड ला लागून नगर पालिका डिपी प्लॅन रोडला लागून, तत्काळ पंचायत समिती कार्यालयाचे काम सुरू करण्यात यावे लोणार शहराला लागून लिंबी तलावाला करोड रुपयाचा सौंदर्यकरणासंदर्भात शासनाकडून निधी आला आहे. त्यामध्ये लोणार शहराची मान उंचवण्यासाठी सर्व महापुरुषांचे पुतळे तलावाच्या मध्यभागी बसवण्यात यावे. व लोणार शहरातील बेरोजगारांचा विचार करून तलावाच्या तिन्ही साईडला गाळे काढण्यात यावे सुरेश राणे ऊर्फ रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द बोलून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटकत करण्यात यावी.

समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप आर एस.एस चा नेता नितेश राणे मुस्लिम धर्मीयांच्या मस्जीदीबद्दल, धर्माबद्दल अपशब्द वापरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्याच्यावर भाषण बंदी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भाषण बंदी करण्यात यावी.
सर्व खरेदी विक्रीचे कागदपत्रे नियमानुसार असतानाही आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी जाणीवपूर्वक खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या व परवानगी च्या नावाखाली खरेदी विक्री अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून होत असलेली नागरिकांची लूट थांबवून दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सुलतानपूर ग्रामपंचायत तालुका लोणार अंतर्गत तांडा वस्ती अंतर्गत लाखो रुपयांचे काम शासनाच्या वतीने करण्यात आली परंतु तांडा वस्तीतले कामे तांडा वस्तीमध्ये न करता इतरत्र ओळवून अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आशा बेजबाबदार सरपंच अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करून तांडा वस्तीतीतिल कामे तांडा वस्तीत करण्यात यावे, व शासनाची दिशाभूल करून जे बिले काढण्यात आली ती बिले ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल‌, असा इशारा नागवंशी संघपाल पनाड होणार यांनी दिला.

Lonar:यावेळी निवेदन देताना नागवंशी संगपाल पनाड, मेहकर- लोणार विधानसभा वंचित नेते,दीपक अंभोरे,महेंद्र मोरे ,शे.अखतर भाई,शेख सरदार भाई, रंजीत मोरे, शेख जियाउल्ला, कैलास मोरे, दीपक पाडमक, राहुल पाडमुख, सिद्धार्थ अवसरमोल, ॲड ,बबन वानखेडे, शेख राजिक शेख सुभान, शेख अस्लम, गफार शाह भाई, शेख अमीर शेख अहमद, फिरोज भाई गवळी

Leave a Comment