Lonar Lake लोणार येथे आलेल्या पर्यटकाची कार पलटली; त्यात एक ठार, तर तीन गंभीर जखमी.

 

Buldhana लोणार सराेवर पाहून आपल्या गावाकडे जात असलेल्या पर्यटकांची अचानक कार उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाेणार सराेवराजवळ किन्ही रस्त्यावर १८ नाेव्हेंबर राेजी घडली. आहे.

या अपघातानंतर कार तीन ते चार वेळा उलटली. सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) असे मृतकाचे नाव आहे.

मुंबई व ठाणे येथील पर्यटक इनाेव्हा कार (एमएच ०१ एएक्स ९८९८)ने सकाळी शेगाव येथे दर्शन घेऊन लाेणार सराेवर पाहण्यासाठी आले हाेते. अचानक सराेवर पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परत जात हाेते. या दरम्यान, मध्ये लाेणारवरून समृद्धी महामार्गाकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरली आणि ती कार दाेन ते तीन वेळा पलटी झाली .Lonar Lake

या अपघातामध्ये सूरज शिवाजी गुडवे यांचा जागीच मृत्यू झाला तर सूर्यकांत शिवाजी गुडवे (२७), निहाल संदीप सुर्वे (१ वर्ष), साहिल संजय गुडवे (२०), नीता संदीप सुर्वे (३३) हे गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

https://www.suryamarathinews.com/बाईक-वर-जात-असताना-अचानक-म/

या घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनास्थळावर पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, संतोष प. चव्हाण, पाठवण्यात आले आहे राजेश घोगरे आदींनी भेट देऊन जखमींना तातडीने जालना येथे उपचारार्थ पाठवण्यात आले आहे
Lonar Lake

Leave a Comment