Maratha News :’..तर दोन पाऊलं मागे येण्यास तयार’; मनोज जरांगे पाटील यांचं मोठं वक्तव्य ManojJarangePatil

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो

मुबई- मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार असल्याचा आरोप काही विरोधक करत आहेत. यावर जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.#jarange patil #sharadpawar

माझ्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास दोन पाऊलं मागे जाण्यास तयार आहे, असं ते म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.#andolan

सत्ताधाऱ्यांनीच हे आंदोलन बसवलं आहे असा आरोप होतोय. पण, सत्ताधारी कधी विरोधात आंदोलन उभं करु शकतात का? सर्वसामान्य मराठ्यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे. स्वत:ची भाकर खाऊन, दोन रुपये घेऊन ते आंदोलनाला येत असतात. स्व:ताच्या कुटुंबाला सोबत घेऊन मोठी ताकद उभी केली जात आहे. कोणाचा हात असेल तर सिद्ध करावा, मी दोन पाऊलं मागे जाईन, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.#maratha arkshan

आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाचं आंदोलन सरकारला झेपणार नाही. मी समाजाचा मुलगा म्हणून शेवटपर्यंत हटणार नाही. माझी अंत्ययांत्रा निघेल किंवा मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल. त्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. राज्यातील सर्वात मोठा आमचा समाज आहे. त्यापाठोपाठ धनगर समाज आहे. हे दोन समाज एकत्र आले तर सरकारला अवघड होईल, असंही जरांगे पाटील म्हणाले.#manojjarangepatil

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्याला आता काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. (SURYA Marathi News

Leave a Comment