श्री.गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर येथे काकड आरती समाप्ती सोहळा

 

गोरगरीब कुष्ठरोगी दिव्यांग वृध्दमायबापांचे अभ्यंगस्नान,अन्नदान व वस्त्रदान

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

अखिल विश्वाला दशसुत्रीच्या माध्यमातून महानतेचा संदेश देणारे, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमी असलेल्या,श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर येथे,गेल्या ४५ वर्षापासुन कोजागिरी पोर्णीमा ते कार्तीक पोर्णिमा पर्यंत संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिप्रेत सेवाभावी काकड आरतीचे संस्थेचे सर्वेसर्वा तथा नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार,बापुसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संचालक सागर देशमुख यांच्या वतीने विशेष आयोजन करण्यात येते.

प्रामुख्याने गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जोपासत सन १९७८ पासुन गोरक्षण संस्थेत स्व.डॉ.वासुदेवराव भुगूल यांच्या प्रेरणेतून आजतागयात सेवाव्रती बापुसाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून भजन-किर्तन-हरीनाम व जनता-जनार्दनाच्या सेवेचेकार्य काकड आरतीतून अविरतपणे सुरु आहे.दरम्यान संस्थेतर्फे पंचक्रोशीतील गोरगरीब दिव्यांग कुष्ठरोगी बाधवांचे सुंदर सुवासिक उटने लावून अभ्यंगस्नान घालून औक्षवण करत त्यांना नविन वस्त्र परिधान करत,मान्यवरांच्या हस्ते उबदार ब्लॅंकेट,महिलांना साड्या,टॉवेल,आदिंचे वितरण करत त्यांना सुंदर मिष्ठान्नाचे भोजन यावेळी देण्यात आले.

विशेषत: या सेवाभावी सोहळ्याकरीता आ.हरिषजी पिंपळे,दानवीर नितीन दळवी,प्रसिध्द दुग्ध व्यावसायिक प्रशांत हजारी,अशोक बठेजा,सच्चीदानंद मालाणी,सौरभ मालाणी,कमल कटलरीचे संचालक अग्रवाल शेठ,संचालक कुणाल देशमुख,आदि दानशुर मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.समाप्ती सोहळ्याला सेवाव्रती बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात भव्य मिरवणुकीचे आयोजन करत संपुर्ण गोरक्षण नगरीत ‟गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा” गजर करण्यात आला.यानंतर काकड आरतीत महिनाभर सातत्याने सेवा देणाऱ्या सेवकांना सुंदर उबदार ब्लॅंकेट,शर्ट पीस,टॉवेल,मिठाई सह जिवनावश्यक साहित्याचे दानशुर नितीन दळवी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तद्नंतर काकड आरतीच्या स्वागताकरीता गोरक्षणातील महिलांनी व मुलींनी आकर्षक अशा संदेशात्मक रांगोळ्या व दीपोत्सव साकारणाऱ्या मुलींना संस्थेतर्फे रोख पारितोषीक रक्कम देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रामुख्याने या कार्यक्रमाला आ.हरीषजी पिंपळे, आ.बळवंतराव वानखडे,समाजसेवी बबनराव दाभेराव,कमलाकर गावंडे,प्रशांत हजारी,अशोक बठेजा,संचालक गजानन देशमुख,व्यवस्थापक प्रशांत देशमुख,संचालक कुणाल देशमुख,ह.भ.प.सर्जेराव देशमुख,व्यवस्थापक प्रकाश महात्मे,सुखदेवशेठ भुतडा,प्रविण देशमुख,प्रा.रवीराज देशमुख, मुख्याध्यापक भुगूल,गजानन जवंजाळ, ऋणमोचन संस्थेचे विश्वस्त शरद पाटील, दिनेश पाटील आदिंसह श्री बाबांची भक्तमंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते.सरतेशेवटी संचालक सागर देशमुख यांनी आनंदमय सोहळ्याला उपस्थीत सर्व मान्यवर तसेच दानशुर मंडळी, विशेषत: पहाटे दररोज काकड आरतीमधील सहभागी भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत व अल्पोपहार देणाऱ्या मंडळींचे त्यांनी यावेळी आभार मानले.या सेवाभावी काकड आरतीच्या यशस्वीतेकरीता सागर देशमुख यांच्यासह मुर्तिजापुर व नागरवाडी येथील सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. Murtijapurnews

Leave a Comment