Home Blog Page 105

शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात घुसून विनयभंग! वासनांध युवकाला पाच वर्षाची शिक्षा ( crimenews )

0

 

crimenews:बुलढाणा: शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावासाची
शिक्षा आज ७ जून रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी ठोठावली.

पोलिसांत पिडीत मुलीनी तक्रार दिली त्यावेळी ती १६ वर्षाची होती. याबाबत १४ मार्च २०१९ रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. १३ मार्च २०१९रोजी घराशेजारी राहणारा आरोपी प्रविण प्रल्हाद खिल्लारे (२७ वर्ष) हा रात्री १० वाजता पिडीत मुलीच्या घरात शिरला. आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली.

परंतु पिडीतेचा आवाज ऐकून पिडीतेची आई व शेजारील लोक धावत आले. तिच्या दोन बहिणी देखील झोपेतून जाग्या झाल्या तेव्हा आरोपी तेथून पळून गेला होता. दरम्यान, घटनेचे वेळी पिडीता ही रात्रीचे वेळी आपल्या घरामध्ये अभ्यास करत होती. तसेच आरोपी हा त्याचे लग्न झालेले असतांना देखील पिडीतेशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करीत असे व सतत तिचा पाठलाग करीत होता. असे पिडीतेने तकारीत नमुद केले होते.

तक्रारीवरून आरोपी विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ अन्वये नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपासाअंती आरोपीविरूध्द दोषारोपपत्र पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ यांनी बुलढाणा येथे विद्यमान न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र वि. न्यायालयात दाखल झाल्यानंतर प्रकरण बुलढाणा येथील विशेष न्यायाधीश आर.एन. मेहरे यांचे न्यायालयात वर्ग करण्यात आले.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. यामध्ये पिडीता, पिडीतेची बहिण, आई, पंच साक्षीदार अमोल बडगे, पिडीतेचे वयाबाबत संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक शंकर डुकरे, पिडीतेचे जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करणारे पोलीस शिपाई महादेव निनाजी इंगळे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष जंजाळ यांच्या साक्षींचा समावेश आहे. सर्व साक्षीदारांच्या साक्षी घटनेशी सुसंगत व एकमेकांना पुरक असल्याकारणाने महत्वपूर्ण ठरल्या. सदर प्रकरणात बचाव पक्षातर्फे देखील बचावाच्या दोन साक्षीदारांचे (आरोपी स्वतः व अन्य एक ) पुरावे विद्यमान न्यायालयात नोंदविण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येते क्लिक करा 

सरकार पक्षातर्फे नोंदविण्यात आलेल्या सदरहू साक्षीदारांच्या साक्षीपुराव्याच्या आधारे विद्यमान न्यायालयाने आरोपीला वरील सर्व कलमांअंतर्गत दोषी ठरवून कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सश्रम कारावास, कलम ८ अंतर्गत ४ वर्ष सश्रम कारावास व कलम ५०६ साठी २ वर्ष सश्रम कारावास व एकुण ६००० रू. दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीस सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायचे आहे. दंडाच्या रकमेपैकी ५ हजार पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याबाबत व अधिकच्या नुकसान भरपाईसाठी न्यायनिर्णयाची प्रत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे पाठवित असल्याचे विद्यमान न्यायालयाने न्यायनिर्णयात नमुद केले.

crimenews:सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे सांगड घालून सरकार पक्षाची बाजु न्यायालयासमोर मांडली. स. फौ. किशोर कांबळे, पो.स्टे. बुलढाणा शहर यांनी कोर्ट पैरवी म्हणून पुर्णपणे सहकार्य केले.

जगभरांतील आघाडीची फ्रेंच डिझाईन स्कूल रुबिका इंडिया ने डिझाईन स्कूलच्या निर्मितीसाठी केली युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बरोबर भागीदारी ( mumbainews )

0

 

mumbainews:जगभरांतील डिझाईन व्यावसायिकांमध्ये रुबिकाचे नाव हे एक आघाडीची डिझाईन स्कूल म्हणून प्रसिध्द असून त्यांचे कॅम्पसेस फ्रान्स, कॅनडा, भारत आणि रियूनियन येथे आहेत.

रुकीज कडून एक टॉप रेटेड स्कूल म्हणून मान्यताप्राप्त असलेल्या या संस्थेच नामांकन हे २०२९ मध्ये ॲनिमेशन करिअर रिव्ह्यू कडून २री बेस्ट इंटरनॅशनल ॲनिमेशन स्कूल इन द वर्ल्ड म्हणून तर ले फियाग्रो कडून २०१५ पासून व्हिडिओ गेम क्षेत्रातील १ली स्कूल म्हणून प्राप्त झाले आहे.

या स्कूलला औद्योगिक डिझाईन साठी १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. रुबिकाच्या माजी विद्यार्थ्यां मध्ये जवळजवळ ५० देशातील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी सुध्दा अनेक प्रतिथयश पुरस्कार मिळवले असून त्यांना विविध फिल्म फेस्टिव्हल्स तसेच गेम ‍डिझाईन स्पर्धांमध्ये ही पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आणि जगातील तिसरी एआय युनिव्हर्सिटी असून तिची स्थापना मुंबई जवळीत कर्जत येथे जगभरांतील अब्जावधी डॉलर्सच्या व्यवसायांचा अनुभव असणार्‍या सीईओं च्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ला जगभरांतील ६० हून अधिक सीईओज ने प्रमाणित केले आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम आणि अध्ययन पध्दती भारतात आणण्याच्या उद्देशाने या युनिव्हर्सिटी ची स्थापना करण्यात आली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात या भागीदारी अंतर्गत ४ वर्षाचा बॅचलर ऑफ डिझाईन (बी डेस) आणि ५ वर्षांचा इंटिग्रेटेड मास्टर ऑफ डिझाईन (एम.डेस) इन ट्रान्सपोर्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, यूएक्स/यूआय डिझाईन, ॲनिमेशन, व्हिडिओ गेम आर्ट आणि व्हिडिओ गेम डिझाईन असे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून त्यानंतर पुढील टप्प्यात डिजिटल डिझाईन, इंटॲक्शन डिझाईन आणि टेक आर्ट सारखे कोर्सेसही सुरु करण्यात येणार आहेत.

https://youtu.be/s4YjG2Cl5oQ?si=0Vi9AoWfUX0Zi8PX

रुबिका तर्फे या कोर्सेसना अभ्यासक्रम, अभ्यासक्रमशास्त्रातील मानके आणि अध्यापकांचे आदानप्रदान युनिव्हर्सल एआय डिझाईन प्रोग्राम करता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आता पुण्यातील रुबिका इंडियाचा अत्याधुनिक स्टुडिओ ९ महिन्यां करता वापरता येणार असून इंटर्नशिप दरम्यान १ल्या आणि ३र्‍या वर्षी २ सेमिस्टर्स मध्ये याचा वापर करता येणार आहे.

या कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रकल्पावर आधारीत शिक्षण, उद्योगाच्या मागणीनुसार अभ्यासक्रम, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि जगभरांतील आघाडीच्या डिझाईन तज्ञांकडून मिळणारे ज्ञान यांचा समावेश असून विद्यार्थ्यांना २४ x७ लॅब्सचा वापर करता येणार आहे.

या भागीदारी विषयी बोलतांना रुबिका इंडिया चे सीईओ आणि रुबिका फ्रान्सच्या संचालक मंडळाचे सदस्य मनोज सिंग यांनी सांगितले “युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी सारख्या भविष्याकडे पाहणार्‍या युनिव्हर्सिटी बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे.

आमचा असा विश्वास आहे की यामुळे डिझाईन शिक्षणाचे भविष्य बदलून भारतातील पध्दती बदलतील जेणेकरुन भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील प्रशिक्षक, शिक्षण सुविधा आणि डिझाईन शिक्षणातील सर्वोत्कृष्ट पध्दती प्राप्त होतील.”

जगभरांतील आघाडीची फ्रेंच डिझाईन स्कूल रुबिका इंडिया ने डिझाईन स्कूलच्या निर्मितीसाठी केली युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बरोबर भागीदारी ( mumbainews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी चे चान्सेलर तरुणदीप आनंद यांनी सांगितले “ रुबिका या जगभरांतील आघाडीच्या डिझाईन स्कूल बरोबर सहकार्य करुन आमच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाईन क्षेत्रातील आकर्षक करियर सह जगभरांतील आघाडीचे शिक्षक आणि शिक्षण सुविधा भारतातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देतांना आंम्हाला आनंद होत आहे. माझा असा विश्वास आहे की पाश्चिमात्य जगात कौशल्याचा खूपच अभाव आहे आणि युनिव्हर्सल एआय मधून पदवी घेतलेले विद्यार्थी जगभरात आपला ठसा उमटवतील.”

mumbainews:रुबिका फ्रान्स चे सीईओ स्टीफेन आंद्रे यांनी सांगितले “ युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी बरोबरची ही भागीदारी म्हणजे जागतिक शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा दगड आहे. आम्ही एकत्र येऊन डिझाईन क्षेत्रासाठी उज्ज्वल भविष्य घेऊन येत आहोत.”

आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

0

 

ग्रामस्थांनी एक झाड लावून झाड जगविण्याचा केला संकल्प.

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

ideal village:लोणार तालुक्यातील भुमराळा येथे ग्रामपंचायत भवन परिसरात “जागतिक पर्यावरण दिनाच्या” निमित्ताने दिनांक 5 जुन 2024 रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

सर्वच ठिकाणी सध्या वृक्षतोड जोरात चालू आहे. परंतु जितके झाडे तोडले जातात तेवढी झाडे लावल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे.

त्याचे परिणाम संपूर्ण जगच भोगत आहे. वाढणारे तापमान ,अवेळी पडणारा अवकाळी पाऊस , अचानक वातावरणात होणारे बदल हे त्याचे परिणाम आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

निसर्गाचा समतोल जर राखावयाचा असेल तर वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन करून जगवण्याचा संकल्प व निर्धार सुद्धा यावेळी करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
आदर्श गाव भुमराळा येथे प्रकल्प अंतर्गत “जनजागृती व ग्रामविकास अभियानांतर्गत “वृक्षारोपण.(ideal village )

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच संतोष प्रल्हाद मोरे ,सचिव एस एम राठोड ,ग्राम कार्यकर्ता लक्ष्मण मुकुंदा टेकाळे ,ग्रामपंचायत सदस्य आनंद डोळे ,भगवान मोरे ,ग्रामपंचायत कर्मचारी समाधान चौधरी ,अनिल मुळे, केशव सरवटे, पत्रकार देवानंद सानप ,अंगणवाडी सेविका सौ. मीना काळे ,सौ .संगीता चव्हाण बचत गटांच्या सीआरपी सौ. आनिसाबी शाहा,सौ .सुजाता म्हस्के ,ग्राम संघाचे लीपिका सौ. शितल टेकाळे ,

ideal village:जिजामाता क्रीडा व बहुउद्देशीय संस्था दगडवाडी देऊळगाव राजा चे अध्यक्ष गजानन जायभाये, उदय डोईफोडे ,प्रकाश बोंद्रे आधी प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर गावातील सुरेश बोरुडे ,राहुल मस्के ,अनिल मस्के ,राजु मस्के, गणेश सरकटे ,याकूब शहा आशा वर्कर अंजना टेकाळे ,उषा पैठणे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी (  prataprao jadhav )

0

 

prataprao jadhav:बुलढाणा, दि. 4 : बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 49 हजार 867 मते मिळाली आहेत.

त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना 3 लाख 20 हजार 388 मते मिळाली. 29 हजार 479 मतांनी श्री. जाधव विजयी झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते श्री. जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

गौतम मघाडे (बहुजन समाज पार्टी) -8 हजार 218
प्रतापराव जाधव (शिवसेना) – 3 लाख 49 हजार 867
नरेंद्र खेडेकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) -3 लाख 20 हजार 388

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव विजयी (  prataprao jadhav )

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

 

असलम शाह हसन शाह (महाराष्ट्र विकास आघाडी) – 6 हजार 153 मच्छिंद्र मघाडे (सोशालिस्ट पार्टी इंडिया) – 5 हजार 258 माधवराव बनसोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) – 2 हजार 455 मोहम्मद हसन इनामदार (मायनॉरिटीज डेमोक्रॅटक पार्टी) – 4 हजार 978

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वसंतराव मगर (वंचित बहुजन आघाडी) – 98 हजार 441
विकास नांदवे (भीम सेना) – 2 हजार 331
प्रा. सुमन तिरपुडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) – 1 हजार 511संतोष इंगळे (रिपब्ल‍िकन पार्टी ऑफ इंडिया) – 2 हजार 530अशोक हिवाळे (अपक्ष) – 15 हजार 436
उध्दव आटोळे (अपक्ष) – 1 हजार 968गजानन धांडे (अपक्ष) -4 हजार 854 दिनकर संबारे (अपक्ष) -4 हजार 564

prataprao jadhav:नंदु लवंगे (अपक्ष) – 5 हजार 713
प्रताप पाटील (अपक्ष) – 2 हजार 561
बाळासाहेब इंगळे (अपक्ष) – 3 हजार 931
रविकांत तुपकर (अपक्ष) – 2 लाख 49 हजार 963
रेखा पोफळकर (अपक्ष) – 1 हजार 540
संदीप शेळके (अपक्ष) – 13 हजार 050
नोटा – 3 हजार 786
एकूण वैध मते – 11 लाख 9 हजार 496
पोस्टल बॅलेटमधील अवैध मते – 110
000000

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी..! ( anup dhotre )

0

 

• अकोला लोकसभा मतदार संघाचे किल्लेदार अनुप धोत्रे.
——————————–
प्रतिक कुऱ्हेकर

anup dhotre:अकोला :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ०६ अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप संजय धोत्रे विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी अज‍ित कुंभार यांनी हा निकाल जाह‍ीर केला.

उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )

यावेळी मतमोजणी निरीक्षक रामप्रतापसिंह जाडोन व प्रतुलचंद्र सिन्‍हा उपस्थित होते. उमेदवार निहाय मतदान पुढीलप्रमाणे : अनूप धोत्रे (भारतीय जनता पार्टी) एकूण मते 4 लाख ५७ हजार ३० , अभय

पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ४ लाख १६ हजार ४०४ एकूण मते, काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी) २ हजार ७६० एकूण मते, रव‍िकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी) १ हजार ७३४ एकूण मते, प्रकाश आंबेडकर (वंच‍ित

https://youtu.be/LJfv-8fKRS0?si=qcRQ41G6uW8ZqIIS

बहुजन आघाडी) २ लाख ७६ हजार ७४७ एकूण मते, ॲङ नजीब शेख (इंडियन नॅशलन लिग) ३ हजार ३०० एकूण मते, प्रिती प्रमोद सदांशिव (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) ५३६ एकूण मते, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) ५३७ एकूण मते, मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना) ५६८ एकूण मते, अशोक थोरात (अपक्ष) ५८१ एकूण मते, आचार्यद‍िप गणोजे (अपक्ष) १ हजार ६१८ एकूण मते,

उज्वला राऊत (अपक्ष) १ हजार ३०६ एकूण मते, द‍िलीप म्हैसने (अपक्ष) ८६२ एकूण मते, धमेंद्र कोठारी (अपक्ष) १ हजार २४० एकूण मते, मुरलीधर पवार (अपक्ष) २ हजार ६६ एकूण मते, एकूण नोटा (५ हजार ७८३).

अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी..! ( anup dhotre )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी एका क्लिक  फक्त 

या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी महाराष्‍ट्र वखार महामंडळ येथे सकाळी 8 पासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला.

मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अकोट, बाळापूर व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्राकरिता रामप्रतापसिंह जाडोन तसेच अकोला (पूर्व), मुर्तिजापूर (अ.जा.) व रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरिता प्रतुलचंद्र सिन्‍हा यांनी काम पाहिले.

anup dhotre:मतमोजणीचे अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी १६ टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी १४ टेबल वर करण्‍यात येणार आली.
००००००

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )

0

 

वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा.

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

Gulabrao Patil:महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे यावल शहराच्या विविध विकास कामांसाठी यावल तालुका शेतकी संघाचे माजी व्हाईस चेअरमन,आणि विरावली ग्रा.पं.माजी सरपंच मुन्ना उर्फ तुषार पाटील यांनी सतत त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा भरगच्च असा निधी उपलब्ध करून दिला.

होता आणि आहे त्यामुळे मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त यावल शहरासह तालुक्यातून त्यांना सर्व स्तरातून भगव्या शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मा.ना.गुलावबराव पाटील हे मंत्री असुनही सामान्य
कार्यकत्याप्रमाणे त्याचे आचरण आहे तसेच ते आपल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सर्वसामान्य तळागळातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपुलकीची सहानुभूतीची वागणूक देत असल्याने जनसेवक म्हणून गुलाबभाऊ,भाऊंचे नांव घेताच डोळ्यासमोर उभी राहते.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

ती एक विकास पुरूषाची प्रतिमा,तसेच शब्द व मैत्री जपणारा एकमेव नेता म्हणजे गुलाबभाऊ,पक्षासाठी जनसेवेसाठी वाहून घेणारा व पुर्णवेळ कार्यकर्तारूपी नेता म्हणजे गुलाबभाऊ.तसेच यावल शहराच्या विविध विकास कामांसाठी यावल तालुका शेतकी संघाचे माजी व्हाईस चेअरमन तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी ३० लाख रुपयाचा भरगच्च निधी उपलब्ध करून दिला.

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि ती विकास कामे झाली.सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला त्यांनी शिवसेना उप जिल्हाप्रमुख,
बाजार समिती,

चॅनेल ला सबस्क्राईब करावं आताच 

Gulabrao Patil:यावल कृषी उत्पन्न समितीच्या सभापतीपदी यावल तालुका शेतकी संघात व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक,विरावली येथे सरपंच व विद्यामन सदस्य,विका सोसायटी येथे संचालक अश्या प्रमुख पदापर्यंत पोहचविणारे प्रमुख पाठीराखे म्हणजे भाऊ. गुलाबभाऊंची पक्षापलीकडे

Gulabrao Patil:चांगली राजकीय सुसंस्कृत व्यक्ती म्हणजे म्हणजे स्वर्गीय हरीभाऊ जावळे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे ते संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला परिचित असल्याने तालुक्यातून सर्वच स्तरातून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:यावल तालुक्यातील थोर पाणी या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला होता.

दरम्यान आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत येऊन नुकसानग्रस्त पीडित आदिवासी कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

 

या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्याकडे या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यावल पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती.

 

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

या मागणीला प्रतिसाद देत तात्काळ यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद जळगांव व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन तात्काळ त्या आपदाग्रस्त कुटुंबांना भरीव अशी मदत मिळवून देण्याचे आदेश ना. मंत्री महोदयांनी काल दिले.

त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन च्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी १ लाख अशी २० लाख रूपयांची मदत ही त्या पीडित कुटुंबियांच्या वारसांना देण्याबाबतच्या सुचना संबंधीत विभागाना आदेश देण्यात आले आहे.

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

 

या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अंमळनेर येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांची प्रत्यक्ष अमळनेर येथे भेट घेऊन पीडीत कुटुंबाला लवकर मदत देण्यासाठी विनंती केली,

Yavalnews:याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड.देवकांत पाटील राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुका अध्यक्ष विलास अडकमोल,चुचाळे तेथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील, वरडसीमचे ग्रा.प सदस्य विलास पाटील, राष्ट्रवादी भुसावळ माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थिती होते .

आ.संजय  गायकवाड यांनी,करवंट येथील रीना रवींद्र जाधव ह्या मुलीला बापाच्या उपचारासाठी 25 लाख पर्यंत मदत देण्याचे सांगितले व दहा हजार रुपये तत्काळ मदत केली ( sanjaygaikwad )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

sanjaygaikwad:दि. १ जून २०२४ रोजी मौजे करवंड येथील रीना रवींद्र जाधव ही मुलगी रडत रडत बुलढाणा आमदार माननीय श्री आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्याकडे मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे आली असता त्या मुलीने सर्व अडचण आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सांगितली..!

त्यावेळी तिने सांगितले की मला माझ्या वडिलां शिवाय कोणीच नाही आणि माझे वडील आजारी आहे ते मुंबईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे.

त्यांच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत यावेळी क्षणाचा ही विलंब न करता मुलीच्या वडिलांच्या उपचारा साठी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी १०,००० रू ची तत्काळ मदत केली.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आ.संजय  गायकवाड यांनी,करवंट येथील रीना रवींद्र जाधव ह्या मुलीला बापाच्या उपचारासाठी 25 लाख पर्यंत मदत देण्याचे सांगितले व दहा हजार रुपये तत्काळ मदत केली ( sanjaygaikwad )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि हॉस्पिटल मधल्या वैद्यकीय उपचाराची २५ लाखापर्यंतची मदत मिळून देण्याची हमी सुद्धा दिली.

sanjaygaikwad:असा मदतीचा हात तत्पर ठेवणारा आमदार बुलढाणा जिल्ह्याला कधी मिळणार ना कधी कोणी पाहणार बुलढाणा आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड मदत जनसेवेसाठी_सदैव_तत्पर

महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत…( msebnews )

0

 

msebnews:चिखली (बुलढाणा): महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत… साहेब…ग्रामीण भागात माणसं राहत नाही का?

महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील जनतेला जनावरे समजतात का? आधीच उष्णतेची लाट असून उष्मघाताचे प्रमाण वाढले आहे.

मात्र काही कारण नसताना चिखली विभागात(मंगरूळ नवघरे) परिसरात महावितरणकडून विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जातो..

महावितरण कडून दिवस रात्र 24 तासात कमीत कमी 100 वेळा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाडा सहन करावा लागत आहे.

सराफा गल्लीत भरदिवसा महिलेवर चाकूने हल्ला ( crimenews )

तर या वारंवार विद्युत पुरवठा खंडित केल्याने टिव्ही, पंखे, कुलर जळाली.. तर रात्री बेरात्री अचानक काही कारण नसताना किंवा वारा वादळ नसताना चिखली महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जातो.

महावितरण कडून ग्रामीण भागातील जनतेची थट्टा… अधिकारी एसीत तर जनता गर्मीत…( msebnews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या संधीचा फायदा चोरटे घेत असून अनेक ठिकाणी लाईट नसल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले आहे.

msebnews: तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेला जनावरे न समजता माणसं समजून तरी विद्युत पुरवठा विनाकारण खंडित न करता सुरळीत ठेवावा अशी मागणी होत आहे.

प्रतिनिधि मनिष जाधव चिखली बुलढाणा

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

0

 

shivsena:लोणार येथील भूमिगत गटार योजना विषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावनी

लोणार येथील भूमिगत गटार योजने विषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला नदेता सहा महिन्यापूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे.

या भूमिगत गटार योजनेची पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार कुठून कुठपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासाचे  पाईप वापरणार व सदरील गटारीचे घाण पाणी कोठे साठवणार हि योजना आताची लोकसंख्या व  भविष्यत १० वर्षाने किती लोकसंख्या वाढेल व हि भूमिगत गटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे.

याविषयीची माहिती कुणालाही नाही, त्याचबरोबर लोणार  सरोवर शेजारी माळीवाडा परिसर येथे खोदकाम करत आहात.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागा कडून  सरोवर परिसरात कोणतीही खोदकाम, कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोनमध्ये करू नये असा नियम असताना आपण 30–30 फूट खोल व 12–12 फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागाच्या नियमांचे  उल्लंघन कोणत्या आधारे केले.

लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्यानिशी माहिती द्या नाही तर आमरण उपोषणला बसणार? शिवसेना उ.बा.ठा. ( shivsena )

याची संपूर्ण माहिती  येत्या सात दिवसात लोणार येथील जनतेसमोर ऊजागर करण्यात यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात येईल देण्यात यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

येत्या सात दिवसात सदरील माहिती समाजास व आम्हास न मिळाल्यास आठव्या दिवशी म्हणजेच ०७  जून २०२४ ला  आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसूत याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी चेतावणी शिवसेना उभा ठाकरे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बशिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे

shivsena:यांनी दिली याप्रसंगी शिवसेनेचे परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, जीवन घायाळ तेजराव घायाळ, राजुभाऊ बुधवत,अमोल सुटे, असरुबा धारकर, गणेश पाठे, किरण कमडे, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते