प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा भगदाड पडलेले आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा भगदाड अपघातास निमंत्रण देतो आहे.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग भगदाड प्रकरणात समिति नेमून चौकशी करीत संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर तातडीने कारवाई करा याप्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात नांदगाव चौक येथिल उडानपुलावर भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)
कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंट पर्यंत उड्डाणपूल मागील चार वर्षापूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र, त्यानंतर अनेकदा बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली. अनेकदा पुलाची डागडुजी ही करण्यात आली. त्या खड्यात पडून तिथे जर अपघात झाले, त्याचे जबाबदार कोण राहणार, आम्ही जबाबदार कोणाला ठरवायचे ?
याबाबत आम्हाला ठोस आश्वासन देण्यात यावे. या आधी सुद्धा महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याकडे आपल्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यानी दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केल्यामुळे आता आणखी हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर नांदगाव चौक येथील उडानपुलावर दुसऱ्यांदा भगदाड पडले आहे. आज अनेक नागरिक अपघात होता होता वाचले. जर तिथे कोणत्याही नागरिकांचा अपघात झाला असता तर त्यांचे जबाबदार कोण राहले असते?
त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करावी व तातडीन या प्रकरणात समिती नेमन संबधीत अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नांदगाव चौक येथील उडानपुलावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी उपस्थित झाले.
महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे पूर्ण ऑडिट केले जाईल व संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहर अध्यक्ष बालू वानखेडे, मो.रफिक, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगरसेवक दिनेश देशकरी, अमोल बोरकर, जिल्हा महासचिव मिलिंद कोपुलवार, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,विजय तामगाडगे, श्रीकांत भगत, सुनील भुते, सिमा तिवारी, सुजाता जांभुळकर, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील,नितीन भुते, प्रवीण कलोडे,हेमंत घोडे, जितेंद्र रघाटाटे,नाना पुंड, जगदीश वांदिले,सुनिल घोडखांदे,मनोज मुरार, संजय गांभुळे, पप्पू आष्टीकर,समीर बाळसराफ,अन्सार शेख, विपुल थुल,सुशील घोडे,राहुल जाधव, राजू मुडे,प्रशांत मेश्राम,अमर धनविज,अमित रंगारी,अभिजित साबळे,नईम शेख,विपुल वाढई,छोटू वानखेडे,रवी बोरकर,मंगेश सातघरे, हुकेश ढोकपांडे,मयूर तपासे, राहुल बोरकर,मनीष मुडे, वैभव भुते,आदित्य तडस,सौरभ घोडखांदे आदी उपस्थित होते.