Home Blog Page 11

Hingnghatnews/प्रगत पंचशील युवा मंचतर्फे समाजप्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे० आयोजन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर :-६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समुद्रपूर येथे प्रगत पंचशील युवा मंचतर्फे भव्य समाजप्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घघाटन आयु. रंगारी सचिन तुळणकर, प्रा. मेघश्याम ढाकरे, राजू गणवीर, शेखर तेलतुंबडे आणि अजय पाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून समाजातील ऐक्य, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

जाहिरात 👆🏻👆🏻

‘भीम का संविधान’ फेम फेजान ताज (नागपूर) यांनी समाजजागृतीपर गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले. त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदु मुन, हर्षल उमरे, श्रीकांत पानेकर, प्रज्वल रंगारी, अक्षय गजभिये, पंकज अलोणे, सौरभ तुपे, प्रतिक गनविर, प्रशांत अंबागडे, विशाल ढोणे, यष रंगारी, सुभाष भगत, पाटिल, रामटेके, शिकु नगराळे, राकेश गजभिये, ईद्रपाल ढोरे आणि सोनकुवर यांनी अथक परिश्रम घेतले.

Hingnghatnews /या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर नागरिक, युवक व बौद्ध अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला

Banknews /अजब अर्बन बँकचा गजब कारभार..80 लाखांचा घोटाळा.

0

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

ह्या अजब अर्बनने हा घोटाळा करताच. पैसे काढण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी. ]

ह्या अजब अर्बनच्याच एका शाखेचा गजब प्रकार .
ग्राहकांच्या घामाच्या पैशावर हा 80 लाखांचा डल्ला या अजब अर्बनने मारल्याचे समजते . संबंधित झालेला प्रकार हा दोन वर्षा अगोदरचा जरी असला तरी आज सुद्धा लोक भयभीत आहेत. एक मोठी नामांकित पतसंस्था असे करेल यांवर जनता अनभिन्न होती.

हा प्रकार 17 /जुलै /2023 मधील असल्याचे समजते. संबंधित गुन्ह्यातील रक्कम वाढण्याचीच शक्यता होती. पण पुढील काय आहे हे अजुन समजलं नाही . यामध्ये काही आरोपीना विभागीय व्यवस्थापक यांच्या तक्रारीने अटक सुद्धा झाली होती.काही आरोपी फरार झाले होते.

विषय हा अजब गजब अर्बनचा…शेतकरी,कर्मचारी, गुंतवदार यांचा , आणि व्हिकल फायनान्स वाल्यांचा सुद्धा आहे. शिवाय या अजब अर्बनने किती ठिकाणी संकट काळात मदत केली?

Banknews /आणि मागास वर्गासाठी किती उपक्रम राबविले हे पण अधिकृत स्पष्ट होत नाही. जरा विचार करावा की, ही सात खंडातील नामांकित सहपत संस्था आहे. 80 लाखांच्या लुटीचा प्रकार दोन वर्षा अगोदर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात घडला हे सविस्तर हे ब्रेक नंतर पुढील भागामध्ये सविस्तर…

Bacchukadu/“शेतकर्याच्या – कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रॅली; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून पाठिंबा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात “चलो नागपूर महाएल्गार” या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य प्रमाणावर होणार असून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ने देखील जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणे ही काळाची गरज आहे.

Bachhukadu/कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकत नाही.”रॅलीत प्रहार जनशक्ति पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या उत्साहात सहभागी होणार असून नागपूर येथे होणारा हा ‘महाएल्गार’ राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याचा इशारा देणारा ठरणार आहे.

Farmernews /नापिकीने खचलेल्या शेतकऱ्याने केली आत्महत्या

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

सिंदीरेल्वे— यंदाच्या खरीप हंगामात १४ एकरात दीड क्विंटल सोयाबीन हाती लागलेल्या ज्ञानेश्वर वाघमारे नामक शेतकऱ्याने विष प्राशन करुन शनिवारी आत्महत्या केली. हरदुलालपुरा भागात राहणारे ज्ञानेश्वर वामन वाघमारे(६३) यांना 14 एकरात दीड पोते सोयाबीन झाले. डोक्यावर कर्जाच्या डोंगर असल्यामुळे व्यथित ज्ञानेश्वरने शनिवारी सायंकाळी घरी विष प्राशन केले.

माहिती मिळताच त्यांना सेवाग्रामला हलवण्यात आले पण उपचारा दरम्यान वैद्यकीय मंडळींनी त्यांना मृत घोषित केले.

Farmernews /त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले,एक मुलगी ,सुना, नातवंड आणि मोठा परिवार आहे.

Rainnews/अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा ‘सोने’सारखा शेतमाल ओला – हिंगणघाट बाजार समितीत दुर्दैवी चित्र

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

हिंगणघाट –
आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. शेतकरी आपला कष्टाचा शेतमाल — सोयाबीनसह इतर धान्य — दोन पैसे मिळावेत या आशेने बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, अवकाळी पावसाने या सर्वांची आशा अक्षरशः पाण्यात गेली.

पावसाच्या जोरदार सरींनी बाजार समितीच्या खुल्या आवारात ठेवलेला शेतमाल पूर्णपणे ओला झाला. शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला माल वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या धारांमध्ये त्यांचा कष्टाचा घाम आणि अश्रू दोन्ही वाहून गेले.
बाजार समितीकडून कोणतीही योग्य सुविधा किंवा तात्पुरती संरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नावाजलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही शासन आणि प्रशासन दोघांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, “आमचा माल ओला झाला, मेहनत वाया गेली – आता नुकसान भरपाई कोण देणार?”

Rainnews /सरकार आणि प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

revenuenews/रेती माफियावर उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांची धडक कारवाई — ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. २४ ऑक्टोबर २०२५
लाडकी नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत एक ट्रॅक्टर, ट्रॉली व सुमारे १ ब्रास काळी रेती असा एकूण ८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुखबीरकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, आरोपी प्रवीण प्रोफेश्वर मरापे (रा. पिंपळगाव) हा ट्रॅक्टर मालक योगेश देवराव सातपुते (रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट) यांच्या सांगण्यावरून लाल रंगाच्या महिंद्रा ट्रॅक्टर (क्र. MH 32 P 545) मधून लाडकी नदी घाटातून काळी रेती चोरी करून मौजा बुरकोणीकडे वाहतूक करीत होता.

ही माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत सदर ट्रॅक्टरला थांबवून तपासणी केली असता, रॉयल्टीविना रेतीची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळीच सविस्तर मौक्का पंचनामा करून रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, उमेश लडके, राहुल साठे, सतीश घवघवे तसेच पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.
सदर प्रकरणात हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Sivshenanews /शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगणघाटतर्फे नगराध्यक्ष पदासाठी नीता सतीश धोबे उमेदवार निवड

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (दि. २३ ऑक्टोबर २०२५) :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंगणघाट नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदासाठी (महिला सर्वसाधारण) उमेदवार निवड करण्याकरिता आढावा बैठक आज पक्ष कार्यालयात दुपारी ३ वाजता संपन्न झाली.

या बैठकीस माजी उद्योगराज्यमंत्री तथा माजी आमदार आणि हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख मा. अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुकाप्रमुख मनीष देवडे, तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, शहरप्रमुख चंदू भुते यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी सर्व शिवसैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच हिंगणघाट विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अशोक शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीत तालुकाप्रमुख मनीष देवडे यांनी पक्षाकडून लोकशाही मार्गाने उमेदवार निवड करण्याचे आवाहन केले. उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे यांनी येणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने काम करून नगरपरिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी हिंगणघाट नगरपरिषद भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करावे, असे सांगत पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.

बैठकीत उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या एकमताने निता सतीश धोबे (माजी नगरसेविका) यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे नाव वरिष्ठांकडे शिफारसीसाठी पाठविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अशोक शिंदे यांनी सांगितले की, “आपण सारे शिवसैनिक एकत्र राहिलो तर विजय निश्चित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी शिवसेना आहे.”

या बैठकीस अनेक मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Yavalnews /सत्कार विद्या मंदिर, अट्रावल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा २४ रोजी होणार स्नेहमेळावा

0

 

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

अट्रावल । येथील सत्कार विद्या मंदिर, अट्रावल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी सुटीत माजी विद्यार्थी संयुक्त १० वी ʼअʼ व ʼबʼ वर्ग (२००७) विद्यार्थ्यांचा “स्मृतिगंध”nस्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे.

गाव, परिसरात सध्या राहत असलेले व नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी विद्यार्थी संयुक्त १० वी ʼअʼ व ʼबʼ वर्ग (२००७)यांनी केले आहे.

Yavalnews /या मेळाव्यात संचालक व शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थी तथा संस्था चालकांचे मनोगत, माजी विद्यार्थी संघाची स्थापना तसेच इतर कार्यक्रम होतील. स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.

Amarkale /शॉर्टसर्किटमुळे दांडेकर कुटुंबाचे घर जळून खाक – खासदार अमर काळेंनी केली पाहणी, तातडीने मदतीचे निर्देश

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – तालुक्यातील वडनेर गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या शॉर्टसर्किटच्या भीषण घटनेत दांडेकर कुटुंबाचे घर पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत घरातील फर्निचर, कपडे, धान्य, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे, वीज उपकरणे यासह सर्व घरगुती साहित्य जळून गेले असून कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी तातडीने दांडेकर कुटुंबाच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या आणि आवश्यक ती आर्थिक मदत तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

Amarkale /यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, युवक प्रदेश संघटक संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, मिलिंद कोपुलवार, अनिल कोंबे, नामदेव राऊत, युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, प्रवीण कलोडे, गुरुद्याल सिंग जुनी, पंकज मानकर आदी उपस्थित होते.

Hingnghatnews /आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय मार्ग उजळला

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सुविधेसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर नवीन स्ट्रिट लाईट बसवण्यात आले.

या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्ट्रिट लाईटच्या बसवणीमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर झाले.

Hingnghatnews / यावेळी आमदार समीर कुणावार यांनी समस्त नागरिकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.