Home Blog Page 2

revenuenews/अवैध धंदे जोमात प्रशासन मात्र कोमात

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

revenuenews/महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी भीष्णूर घाटात यांची पाहणी घरकुल धारकांसाठी राखीव असलेल्या भीष्णूर व नवाबपूर वाळू (रेती) घाटातून मशीनद्वारे रात्री व दिवसा होत.

असलेले अवैध उत्खनन तात्काळ थांबविण्याबाबात आष्टी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी घरकुल धारक यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय अस्तित्वात आहे. त्यानुसार आपण आपल्या स्तरावरून भीष्णूर व नवाबपूर या वाळू घाट घरकुल धारकांसाठी विशेषतः राखीव ठेवून रेती नेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.

परंतु दुर्दैवाने या दोन्ही घाटांमध्ये अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वीच चोरट्यांनी (तस्करांनी) मुबलक प्रमाणात रेती चोरून नेल्याने घाटात कोरड्या जमिनीत फक्त खडांगा रेतीमधील मोठे दगड उरलेले आहेत. तरीही सध्या पोकलॅंड मशीन, डोंगे इत्यादी यंत्रसामग्रीद्वारे रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सुरू आहे.

यामुळे घरकुल धारकांना आवश्यक रेती उपलब्ध होत नाही.आम्ही यापूर्वीही आपणास तोंडी माहिती दिलेली आहे. तालुक्यातील घरकुल धारकांना व्यवस्थित रेती उपलब्ध व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

परंतु रेती तस्करांमुळे घरकुल धारकांना तसेच त्यांच्यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे अवैध उत्खनन पर्यावरणाला हानी पोहोचवत असून, शासनाच्या घरकुल योजनेच्या उद्देशाला धक्का लावत आहे.

तरी आपण या गंभीर विषयाकडे विशेष गांभीर्याने लक्ष देऊन खालील मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, ही विनंती: भीष्णूर व नवाबपूर वाळू घाटात होणारे सर्व अवैध उत्खनन मशीनद्वारे रात्री-दिवसा तात्काळ थांबवावे.

रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी जप्ती, दंड, गुन्हे दाखल करणे घरकुल धारकांसाठी राखीव घाट सुरक्षित ठेवून रेती उपलब्धतेची व्यवस्था करावी.
आवश्यकतेनुसार पाहणी करून अहवाल तयार करावा व आम्हाला लेखी उत्तर द्यावे.

आपल्या त्वरित कारवाईमुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेल आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.revenuenews

revenuenews/तहसीलदार मॅडम यांना वारंवार लेखी मौखिक माहिती दिल्यानंतर सुद्धा लक्ष केंद्रित का करत नाही. या मध्ये काय साठ गाठ आहे हें समस्त गावकरी ग्रामस्थ विचार करत आहे.महसूल कर्मचारी जेव्हा येतात याची माहिती या लोकांना मिळते तरी कशी?

Yavalnews /यावल तालुका हादरला! हिंगोणात भरदिवसा चाकू हल्ला; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

0

 

यावल प्रतिनिधी : विकी वानखेडे

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडलेल्या रक्तरंजित चाकू हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच घडलेल्या या घटनेत प्रथमेश मुकेश महाले (वय अंदाजे २२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.

किरकोळ वादाचे भीषण रूप? प्राथमिक माहितीनुसार, एखाद्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका अल्पवयीन आरोपीने प्रथमेश महाले यांच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला केला. आरोपीने त्यांच्या छातीवर व पोटावर सपासप वार केल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

रुग्णालयात नेत असताना मृत्यू उपस्थित नागरिकांनी तात्काळ प्रथमेश यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र छाती व पोटावर खोल जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सावदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणी करून प्रथमेश महाले यांना मृत घोषित केले.

मध्यस्थी करणारेही जखमी दरम्यान, वाद सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या रीना रोहित गजरे, मोहित राजेंद्र गजरे व निखिल राजेंद्र गजरे यांनाही आरोपीने चाकूने जखमी केले. त्यांच्या हातावर व शरीराच्या इतर भागांवर वार झाल्याची माहिती आहे. तिघांवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांची धाव, तणावाचे वातावरण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून दिवसा ढवळ्या आरोग्य केंद्रासमोर अशी घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणी गुन्ह्याची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. अल्पवयीन आरोपी असल्याने पुढील कायदेशीर कारवाई किशोर न्याय कायद्यानुसार होण्याची शक्यता आहे.

Yavalnews /नेमके कारण अद्याप अस्पष्ट हल्ल्यामागील नेमके कारण काय, पूर्वीपासून काही वाद किंवा वैमनस्य होते का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे.

Tahsilnews /जगन्नाथ मंदिर जमीन प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निर्णय लवकरच मौका चौकशी अहवाल सादर फेरफार आदेशाबाबत अंतिम भूमिका ठरणार

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :

Hingnghatnews /हिंगणघाट येथील नझुल शिट क्र. १८, ब्लॉक क्र. ११ मधील भुखंड प्रकरणात महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या मौका चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

संबंधित जमीन पूर्वी “जगन्नाथ मंदिर” या धार्मिक संस्थेच्या नावे नोंद असताना २००७ मधील फेरफार आदेशाद्वारे खाजगी नावे कायम करण्यात आल्याचा वाद निर्माण झाला आहे. क्रमश

Vadnernews/प्रशासक कार्यकाळात व्यवहार कसे झाले? विस्तार अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

0

 

प्रतिनिधी :सचिन वाघे

Hingnghatnews /वडनेर :पोहणा येथील आनंदमेळा प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून ६ लाख रुपयांच्या कथित देयकापासून ते पार्किंग वसुलीपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वे नं. ३७८ व सर्वे नं. ३८० (बोहरा ले-आऊट) येथील शेतजमिनीच्या वापराबाबत तसेच संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वे नं. ३८० मधील काही प्लॉट बोहरा बंधू यांच्या नावावर असल्याचे ऑनलाईन नोंदीत दिसते. सूत्रांचा दावा आहे की, रोडलगतच्या प्लॉटधारकांना वगळता सुमारे ६ लाख रुपये विश्वनाथ बावणे यांनी बोहरा बंधूंना दिल्याची चर्चा आहे. इतर काही प्लॉटधारकांनाही पाच आकडी रक्कम देऊन जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतल्याचे सांगितले जाते.

यानंतर संबंधित जागेवर स्टॉल वाटप करून व्यावसायिकांकडून शुल्क आकारण्यात आल्याचे आरोप पुढे आले आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत प्लॉटधारकांची कायदेशीर जबाबदारी कितपत ठरते, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय, पोहणा यांनी दिनांक २९/०१/२०२६ रोजी प्राप्त अर्जानुसार विश्वनाथ अंबादास बावणे (रा. अकोला) यांना महाशिवरात्री उत्सवानिमित्त मौजा पोहणा येथील वेणूबाई रामदासजी कोंबे यांच्या शेत सर्वे क्र. ३७८ मध्ये भोईराज अम्युसमेंट पार्क (आनंदमेळा) व मिनी बाजार सुरू करण्यासाठी दिनांक १५/०२/२०२६ ते २१/०२/२०२६ या कालावधीत उत्सव साजरा करण्यास हरकत नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक ०७ (दि. ३०/०१/२०२६) नुसार हे प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच, दोन शेतजमिनी पार्किंगसाठी वापरून सुमारे १ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. पार्किंगच्या नावाखाली दुचाकींसाठी २० रुपये तर चारचाकींसाठी ५० रुपये वसुल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या वसुलीची अधिकृत परवानगी होती का, तसेच त्याची नोंद ग्रामपंचायत किंवा महसूल खात्यात आहे का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.hingnghatnews

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत असताना असे व्यवहार कसे झाले, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. विस्तार अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, तसेच संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.

Wardhanews /अधिकृत चौकशी अहवालानंतरच दोष व जबाबदारी निश्चित होणार असली तरी, सध्या मात्र गावात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले आहे. प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे पोहणा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Hingnghatnews /‘मुतारी बंद आहे, पुढे जा’; हिंगणघाट नगर परिषद शौचालयात नागरिकांची गैरसोय

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :हिंगणघाट येथील नगर परिषदेकडील सार्वजनिक स्वच्छतागृहात मुतारी (युरिनल) संदर्भात नागरिकांची सातत्याने गैरसोय होत असल्याची तक्रार पुढे येत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी नागरिकांना “मुतारी बंद आहे, पुढे जा” असे सांगितले जाते, तर काहीवेळा “मुतारीला समस्या आहे” असे कारण दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांकडून मुतारी सेवा मोफत असल्याचे सांगितले जात असले तरी जागेवर त्याबाबत कोणताही स्पष्ट सूचना फलक दिसत नाही. परिणामी, नागरिकांना टॉयलेटसाठी १० रुपये भरावे लागत असून मुतारीची सुविधा उपलब्ध आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, मुतारी खरोखरच तांत्रिक कारणाने बंद असल्यास त्याची लेखी सूचना फलकावर लावावी.

Hingnghatnews /दुरुस्ती तातडीने करून सुविधा सुरू करावी.
शुल्क व मोफत सेवांबाबत स्पष्ट दरपत्रक लावावे.
सार्वजनिक सुविधांमध्ये पारदर्शकता व नियमित देखभाल नसल्यास नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Breakingnews /हिंगणघाटमध्ये नझूल जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार उघड; नोटरी ताबापत्रांवर लाखोंची खरेदी-विक्री

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील नझूल (सरकारी) जमिनींच्या खाजगी खरेदी-विक्रीचे अनेक बेकायदेशीर व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. केवळ नोटरी ताबापत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याची चर्चा असून, अर्जनवीस व काही वकिलांकडे अशा व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

कायद्यानुसार नझूल जमिनीवरील मालकी हक्क शासनाकडे राखीव असतो. अशा जमिनींचे खाजगी स्वरूपात हस्तांतरण करण्यास स्पष्ट मनाई असताना, संबंधित जागा सरकारी असल्याची बाब जाणीवपूर्वक लपवून व्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कायदे तज्ज्ञांच्या मते, केवळ नोटरी केलेले ताबापत्र मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ग्राह्य धरले जात नाही. स्थावर मालमत्तेचे कायदेशीर हस्तांतरण करण्यासाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक असतो. त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार न्यायालयीन दृष्टीने शून्य (Void) ठरू शकतात.

दरम्यान, कारंजा चौक परिसरातील नझूल सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. काही दुकानांचे केवळ नोटरी ताबापत्र करून एकाच व्यक्तीकडून व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले असून, पहिला मजलाही चढविण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित दुकानांच्या व्यवहारांचे नोटरी पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.

ठोस पुरावे सादर झाल्यास महसूल विभागाकडून बेकायदेशीर ताबे त्वरित रद्द करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच फसवणूक (IPC 420), बनावट दस्तऐवज (IPC 467, 468, 471) आदी कलमांखाली गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित सावकार, मध्यस्थ तसेच दस्तऐवज तयार करणाऱ्यांची भूमिकाही चौकशीअंती तपासली जाणार असल्याचे संकेत आहेत.
शहरात नझूल जमिनींच्या वाढत्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे प्रशासनासमोर गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.

Breakingnews /महसूल विभाग व पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, या प्रकरणात लवकरच अधिकृत तक्रार दाखल होण्याची शक्यता असून, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tahsilnews /7/12 संचेतींच्या नावावर असताना ‘घुसखोर’ मोकाट, मालकांवर गुन्हा; हिंगणघाट पोलिसांचा कायदा कुणासाठी?

0

 

हिंगणघाट | प्रतिनिधी सचिन वाघे

मौजा मानोरा येथील शेतजमिनीच्या प्रकरणात हिंगणघाट पोलीस स्टेशनने कायद्याची अक्षरशः पायमल्ली केल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे.

सर्वे क्रमांक 113/1/ब व 113/2 ही शेतजमीन अधिकृत 7/12 उताऱ्यानुसार अभयकुमार अशोककुमार संचेती व सौ. अनिता अशोककुमार संचेती यांच्या नावावर असताना, कोणताही कायदेशीर हक्क नसलेल्या व्यक्तीला मोकळे रान देत थेट जमीनमालकांवरच नॉन-कॉग्निजेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिष सुरेशराव वाढई याने मजूर लावून शेतजमिनीवर बेकायदेशीर प्रवेश केल्याची तक्रार संचेती कुटुंबाने केली . मात्र, घटनास्थळी पाहणी न करता, महसूल नोंदी आणि न्यायालयीन आदेश डावलून, पोलिसांनी तक्रारदारांनाच आरोपी ठरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

“कायदा हातात घेणाऱ्याला संरक्षण आणि कायदेशीर मालकांनाच शिक्षा”—ही कोणती पोलीस व्यवस्था? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, याच मनिष वाढई याला यापूर्वी शेतात प्रवेश न करण्याची स्पष्ट समज पोलिसांनीच दिली होती. तरीही त्या आदेशाला हरताळ फासून केलेल्या घुसखोरीकडे पोलिसांनी कानाडोळा केला.

न्यायालयीन निकाल संचेती यांच्या बाजूने असतानाही पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असून, दबावाखाली किंवा आर्थिक हितसंबंधातून ही कारवाई झाली का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.hingnghatnews

या प्रकारामुळे हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये कायदा आणि न्याय हे शब्द केवळ कागदावरच उरले आहेत का, असा रोखठोक सवाल नागरिक विचारत आहेत. ‘चोर सोडून संन्याशावर कारवाई’ या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, दोषींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Policenews /दरम्यान, यापूर्वीही हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये दाखल काही प्रकरणांमध्ये FIR मधील तपशील व मोबाईल लोकेशन तपासात गंभीर विसंगती आढळल्याचे आरोप झाले असून, ही प्रकरणे सध्या न्यायालयात सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर हिंगणघाट पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आली असून, पोलीस अधीक्षक यावर मौन का बाळगून आहेत, असा थेट प्रश्न खुपिया पत्रकार सचिन वाघे यांनी उपस्थित केला आहे.

Yavalnews /स्वप्न साकारण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही; ग्रामीण विद्यार्थ्यांनी जिद्दीने कष्ट करावे: विश्वनाथ धनके

0

 

विकी वानखेडे यावल

चुंचाळे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; स्व. लतिका सोनवणे यांच्या स्मृतीनिमित्त उपक्रम

चुंचाळे (ता. यावल) | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा मिळवताना अनेक अडचणी येतात, मात्र या अडचणींवर मात करून योग्य पात्रता धारण करण्यासाठी केवळ अभ्यासाचाच मार्ग स्वीकारावा लागेल. प्रामाणिक कष्टाचे फळ नक्कीच मिळते, असे प्रतिपादन यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले.

येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

आईच्या स्मृती जपण्यासाठी अनोखा सन्मान

विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी आपल्या मातोश्री स्व. लतिका सुरेश सोनवणे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गातील प्रथम क्रमांक मिळवणारे आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या एकूण २५ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या आई-वडिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मोबाईलचा मोह टाळा; मान्यवरांचे मार्गदर्शन

• प्रमोद राणेराजपूत (समाज कल्याण उपायुक्त): “विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ध्येय निश्चित करावे. मोबाईलवरील रिल्स पाहण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा. मी पुस्तकांशी मैत्री केल्यामुळेच आज हे यश मिळवू शकलो.”

• प्रमोद वाघ (सपोनि, अडावद): “मुलांनी गट (Group) करून अभ्यास करावा. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबाबतही मार्गदर्शन केले.

• विनायक तेली (सेवानिवृत्त प्राचार्य): यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात शिस्तीचे महत्त्व किती मोठे आहे, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश चौधरी होते. यावेळी व्यासपीठावर सचिव जगन्नाथ कोळी, प्राचार्य देविदास मोरे, सेवानिवृत्त प्राचार्य विनायक तेली, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नवनियुक्त उपायुक्त प्रमोद राणेराजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.

Yavalnews /कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गोसावी यांनी केले, तर आभार सुनील पाटील यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वृदांने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला चुंचाळे परिसरातील पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nashiknews/सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर फसवणुकीचा आरोप नांदगावमधील कोट्यवधींचा गृहनिर्माण प्रकल्प वादात

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव (जि. नाशिक):नांदगाव शहरातील शांतीबाग कॉलनी येथील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणुकीचा गंभीर आरोप समोर आला असून, संबंधित बिल्डर हा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा नांदगाव तालुका अध्यक्ष असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

संजय बबनराव सानप यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सन २०११ मध्ये ३०० स्क्वेअर फूट घरे बांधून पाच वर्षांच्या आत ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र १५ वर्षे उलटूनही एकाही फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकल्पात गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचे नमूद आहे.
या प्रकरणात मजूर, शेतकरी, टपरीधारक तसेच घरकाम करणाऱ्या महिलांची आयुष्यभराची पुंजी अडकली असून, “संबंधित बिल्डरचा राजकीय प्रभाव असल्याने आजपर्यंत कारवाई टळत राहिली,” असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.त्यामुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, नांदगाव पोलिसांनी तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव न घेता निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]

0

 

सूर्या मराठी न्यूज साठी संपादक अनिलसिंग चव्हाण संग्रामपूर /बुलढाणा

संग्रामपूर )ः- शहरातील सध्या पीएम श्री जि.प. हायस्कूल मध्ये १ / फेब्रुवारी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला.

ह्या मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी जि.प. हायस्कूलचे से.नि.प्र. मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून याच हायस्कूलची विद्यार्थिनी ही शिक्षिका तथा से.नि प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर (सौ.निमकर्डे मॅडम) होत्या.प्रथम राष्ट्रगीत होऊन सरस्वती माता व संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन राष्ट्रगीत झाले.

 

त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे सर्व शिक्षकांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थी अनिलसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविकातून 2005 ते 2006 मध्ये दहाव्या वर्गात असतांना शाळेतील जुने अनुभव व आताचे अनुभव व्यक्त केले. तसेच इतर विद्यार्थी ,विद्यार्थिनींनी सुद्धा आताचे नागरिक यांनीही आपआपले अनुभव सांगून शालेय जीवन एका चौकटीत व शिस्तबद्ध होते.आम्हाला सर्व शिक्षकांनी चांगले आचार ,विचार व शिक्षण दिले. म्हणून आम्ही नागरिक घडल्याचे सांगितले.

पुन्हा २० वर्षानंतर जुन्या मित्रांची शाळा भरली अन् जुन्या गोड आठवणी एकदा पुन्हा ताज्या झाल्याचे नमूद केले.

SangrampurNews/ह्याचवेळी शाळेला स्पीकर भेट देण्यात आला. ह्या प्रसंगी मोरणकर सर, राठोड सर, इंगळे सर, मारोडे सर, मेहरकर सर सह सर्व शिक्षक, शिक्षिका ,कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी विद्यार्थी प्रवीण वानखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय आकोटकर यांनी केले.