Home Blog Page 20

Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट शाळेचा वर्षानुवर्षेचा इतिहास कायम. कॅरम स्पर्धेत मुला- मुलींची विभागीय स्तरावर झेप

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा :- दि.15/16 सप्टेंबर 2025 (सोमवार व मंगळवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्षांखालील मुलींच्या व मुलांच्या गटातील फाल्गुनी राऊत आणि तुषार झाडें या मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वयोगट 17 वर्ष मुली व मुलांमध्ये हुमेरा खान, यश बोदिले, स्पर्श भगत, ईशान सुरकार यांनी सुद्धा प्रथम क्रमांक पटकवत गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

Sameerkunavar/हिंगणघाट नगरपरिषदेला नवी शववाहिका सुपूर्द — आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांतून नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा..!

शिक्षणाबरोबरच क्रीडेला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे संस्थापक गिरधर राठी सतत प्रोत्साहन देतात. क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत, ही विशेष बाब आहे.

Hingnghatnews/खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधर राठी (संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट व वाघोली), अर्पना राठी (अध्यक्षा), रशेष राठी (सचिव), प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), अभिनव जैस्वाल (मुख्याध्यापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Sameerkunavar/हिंगणघाट नगरपरिषदेला नवी शववाहिका सुपूर्द — आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांतून नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा..!

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणाऱ्या गरजांचा विचार करता, अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या दोन शववाहिकांमध्ये भर म्हणून आता आणखी एक शववाहिका शहरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही नवी शववाहिका जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते नगरपरिषद, हिंगणघाटला सुपूर्द करण्यात आली.

Sangitraobhongal/महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो-संगितराव भोंगळ

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शववाहिका उपलब्ध झाल्याने अंत्यसंस्काराच्या प्रवासात दिलासा मिळणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली गरज पूर्ण होणार आहे.
या उपयुक्त सेवेसाठी आमदार समीर कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Sameerkunavar /नगरपरिषदेतर्फे ही शववाहिका आता नागरिकांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहणार असून शहरातील कुटुंबांना दिलासा देणारी ठरणार आहे.

Sangitraobhongal/महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो-संगितराव भोंगळ

0

 

पातुर्डा-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो तसेच अशा सभामधुन वर्तमान स्थिती सह भविष्यातील विकास बद्दल सकारात्मक हेतु साध्य होतो त्यामुळे अशा सभांची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणुन ते उपस्थित होते.

दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी क्रांती महिला प्रभागसंघ पातुर्डा यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे‌. संग्रामपुर तालुक्यातील वानखेड फाटा येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ज्योती संदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.

तर मा.तहसीलदार पाटील साहेब, सहायक गट विकास अधिकारी टाले साहेब मा.जि.प.सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे, जिल्हा व्यवस्थापक श्री. तऱ्हेकर साहेब, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष तसेच कर्मचारी राऊत साहेब,भगवान इंगळे, कृष्णा देशमुख, परशुराम लोखंडे,कृषी विभाग डी.आर.पी. विजय आस्वार, क्रांती महिला प्रभाग संघाच्या सचिव प्रतिभा पुंडे, कोषाध्यक्ष साधना दुगाणे, आय सी आर पी ताई सह मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. प्रभागाअंतर्गत ४५० स्वयंसहायता समुहातील सर्व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने मागिल वर्षात प्रभागसंघाने केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील वर्षाचे नियोजन या संबंधी चर्चा करण्यात आली, प्रभागसंघाचे धोरणात्मक निर्णय, उपसमितीने केलेल्या कामाचा आढावा घेणे, वार्षिक सभासदत्व अणि भाग भांडवल या बाबत निर्णय घेणे, प्रभागसंघाच्या काम सुरळीत चालण्यासाठी नियम,नियमावली,तयार करणे,
प्रभागसंघाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणे,

Sangitraobhongal/गावातील तालुक्यातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि त्या संबंधित उपाययोजनांसाठी नियोजन करणे, सदस्यांना प्रभाव संघाने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणे, यांसह महत्वाचे असे की, वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे तरतुदी सुचविणे यासह विविध विकासात्मक विषयावर चर्चो करण्यात आली

Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या मुलीने टायकांडो स्पर्धेत दणदणीत खेळ दाखवत जिल्हा स्तरावरून विजय मिळवत विभागीय स्तरावर निवड.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews/वर्धा, दि.13 सप्टेंबर 2025 (शनिवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हा स्तरीय टायकांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्षांखालील मुलींच्या गटातील तेजस्वी वानखेडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.वरोरा येथे होणाऱ्या विभागीय टायकांडो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

शिक्षणाबरोबरच क्रीडेला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे संस्थापक गिरधर राठी सतत प्रोत्साहन देतात. क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत,Hingnghatnews

ही विशेष बाब आहे.खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधर राठी (संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट व वाघोली), अर्पना राठी (अध्यक्षा), रशेष राठी (सचिव), प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), अभिनव जैस्वाल (मुख्याध्यापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Dharasivnews/वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याने रुग्ण त्रस्त!

0

आजारी काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा तज्ञांचा सल्ला

ऋषिकेश सुरवसे उमरगा/धाराशिव

उमरगा शहरासह तालुक्यात कधी ऊन तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असून, त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढल्याने दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसत आहे.

पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून लहान मुले व वृद्ध नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे डेंगू, मलेरिया, गॅस्ट्रो, वायरल फिवर, टायफाईड यासारख्या साथीच्या आजाराचे प्रमाण अधिक असते. सध्या सकाळी गार, दुपारी गरम आणि सायंकाळी ढगाळ अशा या बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या आजाराने त्रस्त रुग्ण दिसून येत आहेत.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर फिरत असताना नियमित मास्क वापरावे, ज्या रुग्णांना मधुमेहाचा किंवा दम्याचा त्रास आहे, अशा रुग्णांनी लसीकरण करून घ्यावे.
तर दुसरीकडे ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याची डबकी तसेच घराच्या परिसरात डासांची उत्पत्तीत मोठी भर पडली आहे.

त्यामुळे साथीच्या विविध आजाराने डोके वर काढले आहे. पावसाळ्याच्या दिवसात विषाणूजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.

संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी अशी घ्यावी काळजी
——————-
डॉ. सोमनाथ कवठे
आरोग्य नगर उमरगा,
————-
संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी लहान मुले आणि नागरिकांनी घराबाहेर जात असताना तोंडाला मास्क वापरावे. ज्या रुग्णांना मधुमेहाचा किंवा दम्याचा त्रास आहे‌, अशा रुग्णांनी लसीकरण करून घ्यावे. ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजार झाल्यानंतर घरातील वृद्धनागरिकांनी इतरांपासून अलिप्त राहावे‌. उकळलेले स्वच्छ पाणी प्यावे. जेवणात फळांचा आहार घ्यावा. यामध्ये संत्री, मोसंबी (विटामिन बी) युक्त यासारखी फळे घ्यावी. घरगुती उपचार करण्याऐवजी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

Drsanjaykute /जळगांव जामोद येथे आमदार डॉ. संजय कुटे यांचा वकील संघाच्या वतीने सत्कार..

0

 

Drsanjaykute/न्यायालयीन इमारतीच्या बांधकामास आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नामुळे प्रशासनाची मान्यता

जळगांव जामोद : जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व माजी कॅबिनेट मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांचा जळगांव जामोद बार असोसिएशनच्या वतीने आज शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. Drsanjaykute

शहरात जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्ट स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णय क्र. सीसीबी-1125/प्र.क्र.66/का-13 दि. 9/9/2025 नुसार जळगांव जामोद येथे न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट हॉल बांधण्यासाठी 1,16,92,443/- रुपये इतक्या अंदाजीत खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.Drsanjaykute

Drsanjaykute/या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पाठपुराव्यात डॉ. कुटे यांचा मोलाचा वाटा असून, त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून जळगांव जामोद वकील संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष अँड. मोहम्मद इरफान होते, तर कार्याध्यक्ष अँड. डी. जी. खेर्डेकर, सचिव अँड. आनंद जोशी यांसह जेष्ठ वकील आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अँड. बावने यांनी त्यांच्या समधुर आवाजात “एक उत्कृष्ट नेता, विश्वविजेता आहात आपण… जळगांव जामोद शहराची शान आहात आपण…” अशी कौतुकास्पद कविता सादर केली. कार्यक्रमाची प्रस्तावना अँड. दत्तात्रय गंगाराम खेर्डेकर यांनी केली, सूत्रसंचालन अँड. स्वप्नील राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन अँड. निशा वानखडे यांनी केले.

Drsanjaykute/डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वामुळे जळगाव जामोद शहरात न्यायालयीन सुविधांचा विकास होण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, यामुळे स्थानिक नागरिक व वकिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

Raipnews/गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी,

0

 

[निषाद पार्टीचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले निवेदन.]

संग्रामपूर (प्रतिनिधी)ः- अकोला शहरातील एका भागात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन दि.९./९/ २०२५ रोजी निषाद पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दि.6/9/2025 रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान अकोला शहरातील गुलजार पुरा भागात राहणाऱ्या भोई समाजाच्या गरीब कुटुंबातील ते १३ वर्षीय मुलीवर तोहित समीर नामक गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीने मुलीच्या घरचे लोक गणेश विसर्जना करता गेल्याचे पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केला.

असून सदर आरोपी हा फरार पासून तो गुलजारपुरा भागातील राहणार आहे, करीता त्याला लवकरात लवकर अटक करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. सदर आरोपीला दोन दिवसात अटक करण्यात यावी. अन्यथा निषाद पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Raipnews/सदर निवेदनावर निषाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवानंद आमझरे ,जिल्हा कार्याध्यक्ष विजय आमझरे ,प्रदेश युवा अध्यक्ष दिलीप घट्टे ,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शारदा भारसाकळे, युवा वाहिनी विदर्भ अध्यक्ष रमेश नांदणे यांच्या सह्या आहेत.

शिवसेना किसान सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी अमोल ठाकरे यांची नियुक्ती (sivshenanews)

0

 

संग्रामपुर /तालुका प्रतिनिधी

sivshenanews/शिवसेना किसान सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी अमोल ठाकरे यांची नियुक्ती केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांनी ही नियुक्ती एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे .

सदर नियुक्ती वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम भाऊ दाणे , शिवसेना तालुकाप्रमुख केशव भाऊ ढोकणे,संतोष भाऊ लिप्ते शिवसेना शहर प्रमुख शेगांव यावेळी उपस्थित होते .

अमोल ठाकरे हे शिवसेना पक्षात उत्कृष्ट शिवसैनिक म्हणून काम करीत असल्यामुळे याचीच दखल घेऊन शिवसेना किसान सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी ही नियुक्ती करण्यात आली आहे.sivshenanews

अमोल ठाकरे यांची शिवसेना किसान सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाणचे वातावरण पसरले आहे.

वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्पर्धाकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह वाटप..(Atulvandile)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहराच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला.
या गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

बक्षीस वितरण सोहळ्याला वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रथम बक्षीस शुभम राजू शेंडे, दृतीय बक्षीस स्वेता वसंतराव भलावी, तृतीय बक्षीस विनीत येलगंधेवार तर चौथे बक्षीस किरण देवगिरकर आणि पाचवे बक्षीस सौं. दिपाली सुरकार यांना देण्यात आले.

त्याचबरोबर प्रोत्साहन बक्षीस शरद लोणकर, शर्वरी निलेश वाघ, योगेश वाघमारे यांना देण्यात आले. सर्व स्पर्धकांनी खूप छान आणि सुंदर असे डेकोरेशन देखावे तयार केले. तसेच सर्व सहभागी स्पर्धेकानां सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी लहान बालगोपालामध्ये गणपती‌‌चे सजावट करण्याचे उत्साहाचे वातावरण असते. दहा दिवस मोठ्या भक्ती भावात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती सजावट बक्षीस वितरण सोहळ्याच्या माध्यमातून लहान गोपालांचे मनोबल वाढते असे मनोगत खासदार अमर काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाची रूपरेषा युवक जिल्हा महासचिव राजू मुडे यांनी मांडली, तर कार्यक्रमाचे संचालन वैभव साठोने यांनी केले तर या कार्यक्रमात आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे यांनी केले.

Atulvandile/यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक संदीप किटे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, माजी नगरसेवक दादा देशकरी, युवकजिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, किसान सेलचे किशोर चांभारे, उपसरपंच प्रवीण कलोडे, जगदीश वांदिले, संदीप चांफले, अजय पर्बत, सुनिल भुते, गजानन महाकाळकर, प्रवीण भूते, नितीन भुते, समीर बाळसराफ, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा उपाध्यक्षा मिना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हुकेश ढोकपांडे, पंकज भट,रवीकिरण कुटे, राहुल जाधव, आकाश हुरले, ओम वांदिले, गौरव तेल्हांडे, कुणाल भुते, मनीष मुडे, पप्पू आष्टीकर, योगेश देशमुख, आदित्य तडस, निखिल ठाकरे, प्रेम भडघरे, मो. शाहिद आदींनी सहकार्य केले.

हिंगणघाट शहरातील गणेश भक्तांनी गणेश विसर्जन कृत्रिम जलकुंडातच करावे – आधार फाउंडेशनचे आव्हान ( hingnghatnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- आधार फाऊंडेशन व हिंगणघाट नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण बचावासाठी कृत्रिम गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मीती स्थानिक न्यू म्युनिसिपल हायस्कृल, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी येथे करण्यात आली आहे.hingnghatnews

हिंगणघाट शहरामध्ये विविध सार्वजनिक व घरगुती गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा आपण मोठ्या भक्तीभावाने करीत असतो पण ह्या मुर्ती बनविण्यासाठी माती, विविध रासायनिक रंग, प्लॉस्टर ऑफ पॅरिस चा वापर अति प्रमाणात वापर होत आहे.त्यामुळे गणेश मुर्तीचे विसर्जन व निर्माल्याचे विसर्जन नदीमध्ये करून नदीचे पाणी दुषित करित आहेत. नदी है तो जल है, जल है तो जीवन है, हे उदिष्ठ समोर ठेवून आधार फाउंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून कृत्रिम जलकुंड गणेश विसर्जनाची निर्मिती करीत आहेत.

तसेच यावर्षी सुद्धा आधार फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण बचावासाठी कृत्रिम गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मीती करण्यात आली आहे.

विविध कारणांमुळे नदी, नाले प्रदुषणयुक्त झाले आहे. यात गणेश मूर्ती विसर्जनाचाही समावेश आहे. गणेश मूर्तीसह निर्माल्य थेट नदीत विसर्जित केले जाते. त्यामुळे पाणी प्रदुषित होते. यासाठी आधार फाउंडेशन व हिंगणघाट नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वतीने कृत्रिम जलकुंड गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिनांक ५, व ६ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांनी थेट नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन न करता या पर्यावरणपूरक कृत्रिम जलकुंडात गणपती विसर्जन करावे असे आवाहन आधार फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले व आयोजकांनी केले आहे.