Home Blog Page 219

लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी घेतली प्रतीज्ञा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद अंतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
दि. ६ जानेवारी रोज शुक्रवार ला शिवाजी पार्क हिंगणघाट येथे लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी विविध उपक्रम घेऊन प्रतीज्ञा घेतली.

सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करिता शीला बोरकर (व्ही. एम विकास संस्था), क्षमा सुटे (वकील), प्रतिभा दुधबडे ( पोलीस अधिकारी), श्री कुणाल दुर्गे (वकील), डॉ. गुजर सर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता जावळे (शहर अभियान व्यवस्थापक ) न. प. हिंगणघाट यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी कटारे व सुलभा इंदुरकर (समूह संघटिका ) न.प. हिंगणघाट यांनी केले
कार्यक्रमाला शक्ती शहर स्तर संघ च्या अध्यक्ष अनु मानकर, उपाध्यक्ष – निर्मला भोंगाडे

सचिव – शीला राजूरकर, सहसचिव कलावती इतनकर व इतर सदस्य उपस्थित होते . – कार्यक्रमाला एकूण ४६५ महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाची रॅली शिवाजी पार्क पासून ते नगर परिषद हिंगणघाट पर्यंत काढण्यात आली.

लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी घेतली प्रतीज्ञा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद अंतर्गत
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
दि. ६ जानेवारी रोज शुक्रवार ला शिवाजी पार्क हिंगणघाट येथे लिंग आधारित भेदभाव व हिंसा समाप्त करण्याची बचत गटाच्या महिलांनी विविध उपक्रम घेऊन प्रतीज्ञा घेतली.

सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करिता शीला बोरकर (व्ही. एम विकास संस्था), क्षमा सुटे (वकील), प्रतिभा दुधबडे ( पोलीस अधिकारी), श्री कुणाल दुर्गे (वकील), डॉ. गुजर सर उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता जावळे (शहर अभियान व्यवस्थापक ) न. प. हिंगणघाट यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी कटारे व सुलभा इंदुरकर (समूह संघटिका ) न.प. हिंगणघाट यांनी केले
कार्यक्रमाला शक्ती शहर स्तर संघ च्या अध्यक्ष अनु मानकर, उपाध्यक्ष – निर्मला भोंगाडे

सचिव – शीला राजूरकर, सहसचिव कलावती इतनकर व इतर सदस्य उपस्थित होते . – कार्यक्रमाला एकूण ४६५ महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाची रॅली शिवाजी पार्क पासून ते नगर परिषद हिंगणघाट पर्यंत काढण्यात आली.

पातुर्डा बु ग्रा.पं; नवनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांनी घेतला पदभार

0

 

राजकीय दुष्टीकोणातुन संपुर्ण तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांनी नुकताच पदभार स्विकारला.

राष्ट्रवादी चे नेते तथा बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल भोंगळ यांचे नेतृत्वात व मा.लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांचे उपस्थितीत हा पदभार पार पडल्या.या वेळी संगितराव भोंगळ आणि श्रीमती शैलजाताई भोंगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सौ नर्मदा गजानन पुंडे, प्रशांत मोतीराम अढाव,सौ गोकर्ना शेगोकार,दिनेश तानाजी वानखडे तसेच महाविकास आघाडीचे अविनाश अकोटकार,शरद तायडे,उकर्डा राऊत,गिऱ्हे गुरूजी,नारायण वानखडे रामदास गंगतिरे, गजानन ढोकणे,मुन्ना बोरखडे, ज्ञानेश्वर वानखडे,रमेश बोदडे,कुर्बान अली,लक्ष्मण कुरवाळे,नंदूभाऊ गुप्ता,अरुण वडे,सुनील तायडे,पप्पू पठाण,हरिभाऊ पुंडे,दिनकर इंगळे,रामेश्वर भड,मोहन सोनोने,भानुदास वाघमारे, मुरलीधर इंगळे,दिगंबर चोपडे, अंबादास उगले,जगन्नाथ धर्माळ,गोपाल चोपडे,दिगंबर वाघमारे,अनंतराव दसोरे, बिस्मिल्ला खान,दादा तायडे,गजानन रहाटे,अमीत पाटील,शरीफ मिस्त्री,मकसुद अली पत्रकार,रकिब मिस्त्री, जलाल खान,प्रकाश बोळे,एजाज भाई,नीलेश गंगतिरे,ईश्वर दिघे,अर्शद पठाण,किशोर शेगोकार, ओंकार वानखडे,सौ राजनंदनी गोपाल नुपणारायान व गावकरी मंडळी बहुसंख्यने उपस्थित होते.

ग्रामिण जनतेने दिलेल्या विश्वास प्रथमस्थानी ठेवुन राजकीय वाटचाल महत्वाचा राहील. मुलभुत व शास्वस्त विकासाला महत्व देत पुढील कार्यकाळ करण्यात येईल असा आशावाद व्यक्त करत गावाचा विकास महत्त्वाचा राहील अशी भुमिका संगितराव भोंगळ यांनी मांडली.
याप्रंसगी माजी लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांचे उपस्थितीत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे यांनी पदभार स्विकारला.

या प्रसंगी मा.लोकनियुक्त सरपंचा श्रीमती शैलजाताई भोंगळ यांनी आरोग्य,शिक्षण,पाणी,रस्ते, स्वच्छ्ता या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करुन विकास घडविला त्या अनुषंगाने या विकासाच्या मुद्यावर अधिक विकास कायम करण्यावर भर दिल्या जाहील अशी आशा श्रीमती भोंगळ यांनी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, पाण्याचे कायमस्वरुपी नियोजन, शिक्षण विभागात अमुलाग्र बदल घडवुन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवुन गावाच्या विकासासाठी विविध योजनांवर अधिक भर देण्यात येईल 2017 च्या निवडणुकीत गावकरी मंडळींनी दाखविलेला विश्वास कायम ठेवत 2022 मध्ये ही तो विश्वास कायम राहत विकासाच्या मुद्यावर राजकारण न करता निव्वळ समाजकारण करण्यावर भर दिला जाहील अशी भुमिका राहील.

व त्या स्वरुपाची शिकवण संगितराव भोंगळ यांनी दिली आहे.
नवनिर्वाचित सरपंच रणजित गंगतीरे यांनी जनतेने दाखविलेला विश्वास आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशी ग्वाही दिली.

यावल बस स्थानकावर चहा विक्री महाविद्यालयीन मुलींच पाठलाग करून छेड करणाऱ्यास पकडले पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा पाठलाग करून छेडछाळ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला यावल बसस्थानका आवारातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील काही विद्यार्थ्यांनी ह्या यावल महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. दररोजी यावल बसस्थानक येथून सर्व विद्यार्थीनी मनवेल येथे बसने जाण्यासाठी येत असतात.

बसस्थानक आवारातील पानटपरीजवळ अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ हा उभा राहून मनवेल येथील विद्यार्थीनीकडे एक टक पाहत होता. दरम्यान, याकडे विद्यार्थीनींनी दुर्लक्ष केले.तसेच मुली बसमध्ये बसल्यानंतर दुचाकीने बसचा पाठलाग करायला सुरूवात केली.

हा प्रकार गावातील एका विद्यार्थीनीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने गावातील काही तरूणांकडे महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा मोबाईल नंबर देखील मिळविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थीनींनी सकाळी १० वाजता विद्यार्थीनी यावल बसस्थानक येथे आल्यानंतर त्याला जाब विचारला.

जास्त मुलांचा घोळका पाहून त्यांनी सदर मुलींची माफी मागितली व त्यांला नागरीकांच्या मदतीने यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अशोक नानकराम दुधानी रा. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास स .पोलिस उपनिरिक्षक प्रदीप बोरूळे करीत आहे. यापुर्वी देखील या बसस्थानकावरील चहा विक्री करणाऱ्या दुधानी ने याच पध्दतीने मुलींच्या छेडखानी करण्याबाबत च्या तक्रारी आहेत.

लोकशाही दिनदर्शिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल येथे तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लोकशाही दिनदर्शिका चे आज प्रकाशन करण्यात आले

याप्रसंगी आरपी आय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश फेगडे यावल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार आर डी पाटील व निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते कोरपावली सरपंच विलास अडकमोल ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रुबाब तडवी भीम आर्मी भारत एकता मिशन पदाधिकारी सुपडू संदानशीव शांताराम तायडे हिंगोना सरपंच रुकसाना फिरोज तडवी भारत कृषी केंद्र संचालक मनोज भाऊ वायकोळे शांताराम तायडे.

यावल तालुक्यातील लोकशाही चे तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी लोकशाहीचा दिनदर्शिकेचे कौतुक केले व.

पुढील वाटचालीसाठी लोकशाही वर्तमानपत्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे यावल तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव यांनी आभार मानले

महिलांनी सक्षम बनवून निर्भीड जगा, प्रमोद बोबडे तालुका व्यवस्थापक

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर

शेगाव स्थानिक शेगाव येथील नगरपालिका टाऊन हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत ध्रुवतारा महिला प्रभाग यांची वार्षिक आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रभाग संघातील महिला समुहातील सीआरपी कृषीसखी मास्टर कृषी सखी समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मागील तीन वर्षापासून स्थापन झालेल्या ध्रुवतारा प्रभाग संघातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचे जीवनमान उंचावलेले आहे.

महिला समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करून आपली जीवन उपजीविका करत आहेत महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनवून जगावे असे प्रतिपादन शेगाव तालुका व्यवस्थापक प्रमोद जी बोबडे सर यांनी केले.

यावेळी बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक अभियान व्यवस्थापक नितीन जी मेश्राम साहेब शेगाव गट विकास अधिकारी सतीशजी देशमुख साहेब शेगाव तहसीलदार समाधानजी सोनवणे साहेब जिल्हा गट बांधणी व्यवस्थापक श्री तरेकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने तसेच शेगाव येथील समुह ब्लॉक मॅनेजर वंदना हिवाळे मॅडम दीपक गावंडे प्रशांत वैयतकार मॅडम दिव्या मॅडम हेरोडे आधी कर्मचारी उपस्थित होते

सरकार व वीज वितरण कर्मचारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे हाल ? शिवसेना आक्रमक

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा मार्फत मा.उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट यांना निवेदन देण्याचे मुख्य कारण की शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात वीज वितरण कर्मचाऱ्यांचा 72 तासाचा संपाबाबत शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले .

निवेदन देण्याचे कारण असे की, वीज वितरणनाच्या खाजगीकरणाला विरोध करणे खाजगीकरणाद्वारे राज्यात ठाणे, मुलुंड, भांडुप ,नवी मुंबई ,बेलापूर, पनवेल ,तळोजा व उरण या ठिकाणी अदाणी यांच्या खाजगी वीज वितरण कंपनीला सरकारद्वारे काम देणे हा प्रमुख विषय आहे.म्हणून राज्य संपूर्ण वीज वितरण कर्मचारी, अधिकारी, अभियंते ,कंत्राटी कामगार ,व इतर सर्व राज्यातील जवळपास 31 संघटना या 72 तासाच्या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत .वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणताही आर्थिक मागण्या नाहीत. असे दिसून येत आहे.

सदर मागणी फक्त अदानी यांना खाजगी काम वीज वितरण चालवण्यासाठी देण्याचे ठरले या विरोधात आहे. सदर संपामुळे असे लक्षात येते की अखंडित वीज पुरवठा सुरू राहणे शक्य होऊ शकत नाही. वीज वितरण कंपनीचे जवळपास 28 लक्ष ग्राहक या राज्यामध्ये आहेत आणि जवळजवळ 12:5 कोटी जनता या वीज वितरण च्या संपामुळे प्रभावित होऊ शकते. जर वीज खंडित झाली तर त्यांचा परिणाम शेती ,उद्योगधंदे, दवाखाने व इतर सर्व बाबी ज्या विजेच्या वर आधारित आहे .अशा सर्व जनतेला ज्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

उदा. काल सुरू झालेल्या रात्री 12:00 वाजता दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी आंदोलन सुरू झाल्याबरोबर रात्री जोराच्या वाऱ्यासह पाऊस या हिंगणघाट शहरात पडला त्यामुळे ज्ञानेश्वर वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, जुनी वस्ती चे काही भाग, तहसील कार्यालय चा परिसर इत्यादी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुरुस्ती करण्याकरीता कुठलीही कर्मचारी कामावर नाही. तसेच शेतात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील पिके चना ,गहू, सरसो, जवस इत्यादी पाण्या विना राहू शकत नाही .

पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दवाखान्यातील रोगी व्यक्तीला व्हेंटिलेटर व इतर साधनांची आवश्यकता आहे. रोग्याला जगण्याकरीता दवाखान्यात वीज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विजेच्या वर बरीचशी उपकरणे चालतात. या विषयावर सरकार व वीज वितरण कर्मचारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे हाल होऊ शकते. सर्व व्यवस्था कोलमडून जाऊ शकते. या विषयावर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेची बाजू मा. जिल्हाधिकारी यांना शासनाला जागी करावे याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे कळविण्यात याव्या .

अन्यथा शिवसेना जनतेकरीता रस्त्यावर उतरतील! निवेदन देण्याकरीता या तालुक्याचे तालुकाप्रमुख सतीश धोबे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, शहर संघटक मनोज मिसाळ, गजानन काटोले, युवा सेनेचे भूषण कापकर, उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, विभाग प्रमुख रुपेश काटकर, नितीन वैद्य, सचिन मुळे, शंकर झाडे ,शंकर मोहम्मारे ,अनंता गलांडे ,आशिष भांडे ,हिरामण आवारी, नरेश भजभूजे,वसीम शेख ,अतिक मिर्झा, कुमार चव्हाण ,निखिल झिबड,आशिष जयस्वाल, इत्यादी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते *

डॅा.भगवान बाबा आनंदगडकर यांना ‘वारकरी भुषन’पूरस्कार प्रदान:

0

 

प्रतिनिधी-(जालना)डोंगराळ भगात उच्च टेकडीवर भितीदायक ठिकाणी,हिरवी चादर असे निसर्ग रम्य सानिध्यात आनंदगड यांच गडांवर भुकेल्याची भुक भागवली जाते.ताहणल्याची ताहण भगावली जाते.याच गडांवर येणार प्रत्येक भाविक रडत येतो.परंतु जातानी हसत जातो.

व्यसनाधीन माणसाची व्यसन मुक्त करत वारकरी बनवले चोरी मारामारी करणाऱ्यांना पंढरीची ओढ लावली.तरुन मुलांना व्यवसाय मार्गदर्शनातुन व्यवसाय अधिन बनवले.

आई वडीलाची सेवा करा,स्वच्छता कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी बळकट बनवले.वाघरुळ-नंदापुर येथे यात्रेत पशु बळी थांबले.अंधश्रद्धा,हुडाबळी,शेतकरी अत्माहत्या थांबवली.

मातंग समाज हे माणसाच्या जन्म पासुन ते मुत्यु परंत सर्व कार्यात हजर असतो.अशा समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी बाबानी आनंदगड येथे वस्ताद लहुजी साळवे याचा पुतळा बसवण्यात आला.सर्व जाती धर्म समान हा संदेश नेहमीच वाणितुन देत असतात.

यांच सर्व कार्याची समाजप्रबोधनाच्या माध्यमातुन समजायचे हितगुज जाननारे सर्व पंचक्रोशितील श्रध्दा स्थान सर्व मार्ग बंद होते.तेव्हा आनंदगड आठवते अशीच ओळखले जानारे ह.भ.प डॅा.भगवान बाबा आनंदगडकर यांना संत ज्ञानेश्वर माऊली संप्रदाया संस्था जुई नगर नवी मुंबई यांच्या वतीने दिला जानारा वारकरी भुषन’पूरस्कार २०२२/२०२३ डॅा.भगवान बाबा आनंदगडकर नवी मुंबईचे महापौर जयंतरावजी सुतार,भाजपा महामंत्री राजेश पाटील,नगरसेवक काशिनाथ पाटील,राष्ट्रवादी नवी मुबई जिल्हाध्यक्ष नामदेवराव भगत,महीला जिल्हाध्यक्ष माधुरीताई सुतार,भगवान महाराज,सावंत संस्था अध्यक्ष सुरेश पाटील,सचिव हनुमंत रोडे, खजिनदार संतोष सोळुंके,महाराष्ट्र युवा क्रॅाग्रेस सचिव मनोज कायंदे,मा.सरन्यायाधीश मोहन पुरानिक,शिंदे अंबड,विलास टेकाळे,ज्ञानेश्वर घोलप अनेक मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेनेची शाखा स्थापन

0

 

संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथे किसान सेना शाखेचे प्रचंड उत्साहात आणि दणक्यात 2 जानेवारी रोजी उदघाटन झाले

निवाना या गावात शाखा उद्घाटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाले होते

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेंद्रजी खेडेकर संपर्क नेते हे होते तर अध्यक्ष दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख म्हणून होते तर देविदासजी उमाळे शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते किसान सेना शाखेची फलकाचे अनावरण करण्यात आले..

तर या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने तुकाराम जी काळपांडे उप जिल्हाप्रमुख, रवींद्र झाडोकार तालुका प्रमुख ,भीमराव पाटील जळगाव जा विधानसभा संघटक ,रविभाऊ महाले खामगाव वि.स.संपर्क प्रमुख यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तसेच या शाखा उद्घाटनाचे आयोजक अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख, रामदास मोहे उप.ता.प्रमुख हे होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी बुलढाणा जिल्हा शिवसेना तुमच्या सुख दुःखात नेहमी उभी असेल असे आश्वासन दिले
तसेच देविदासजी उमाळे शिवसेना किसान सेना जिल्हाप्रमुख यांचा संग्रामपूर तालुक्यात आगमनानिमित्त अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

तसेच या कार्यक्रमाला शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे, उप.ता.प्रमुख , कैलास कडाळे उप. ता. प्रमुख,
, राजू पाटील चांगेफळ, मुरली इंगळे, राहुल मेटांगे, धनंजय आवचार ,विशाल बांगर, सुनील मुकुंद निखिल जाधव
, शिवाजी अढाव, रामदास जंबीये, नितीन भिसे सुदाम गोतमारे, प्रकाश गोतमारे, गजानन गोतमारे, सागर उमरकर, शंभू देशमुख, गोलू पालीवाल, हरिभाऊ भटकर, प्रवीण मोहे ,सुरेश सोळंके, अरुण अवचार, रोशन गायकी, स्वप्निल दाते आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते

मसाकाच्या आवारातील बेकायदेशीर लाखो रूपयांच्या वृक्षांची कत्तल व्यवस्थापकावर कायद्याशीर कारवाईची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील न्हावी ( फैजपुर ) येथील मधुकर साखर कारखाना आवारातील लाखो रुपयांच्या वृक्षची बेकायद्याशीर तोड सावखेडा सिम येथील ऊस उत्पादक शेतकरी व सामाजीक कार्यकर्त विजय प्रेमचद पाटील यांनी फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग , यावलचे तहसीलदार महेश पवार आणी वनविभाग पूर्वचे विक्रम पदमोर यांना लिखित निवेदन देऊन देखील कोणतीही संबंधित व्यवस्थापक व ठेकेदारांवर कारवाई होत.

नसल्यामुळे फैजपूर चे माजी नगराध्यक्ष पिंटू भाऊ राणे व यावल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तुषार पाटील ( . मुन्ना भाऊ ) नावरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच समाधान पाटील, ललित चौधरी व अन्य कार्यकर्ते यांनी आज ३ जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार महेश पवार यांची भेट घेऊन संबंधितांवर आज पर्यंत कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला मधुकर सहकारी साखर कारखाना येथील चाळीस ते पन्नास वर्षापासून वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्षारोपणाद्वारे झाडे लावण्यात आली होती त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांना मोठे करण्यात आले होते.

मधुकर सहकारी कारखाना येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता ते ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष त्यांची परस्पर विल्हेवाट लावताना दिसत आहे यात शासनाचे व कारखान्याचे तसेच पर्यावरणाचे फार मोठे नुकसान झालेले आहेत यावल येथील तहसीलदार महेश पवार यांना माजी नगराध्यक्ष निलेश राणे ( पिन्टू राणे ) फैजपूर यांनी तहसीलदारांची भेट घेत त्यांना या विषयाशी अवगत केले ,

मधुकर कारखान्याच्या आवारातील सुमारे ४० ते ५० वर्षापासूनचे जुने व जिवंत वृक्ष असून, संबंधीत व्यवस्थापकाने कोणचीही परवानगी न घेता लाखो रुपयाच्या वनसंपत्तीची कत्तल करुन मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या अमुल्य वृक्ष संपत्तीचे नुकसान करीत कायद्याचे उल्लंघन करून बेशुमार जिवंत वृक्षांची तोड करण्यात आली असून ,

या संदर्भात तक्रारीचे निवेदन दिल्यावर देखील अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने दिसुन येत असुन, या वृक्षाच्या बेकाद्याशिर कतली मध्ये सहभागी व्यवस्थापकाला कुणाचे तरी राजकीय पाठबळ तर नाही ना असा प्रश्न वृक्षप्रेमी मध्ये उपस्थित करण्यात येत आहे .

मधुकर सहकारी साखर कारखाना येथील व्यवस्थापकावर व त्यांच्या सहकारी मित्रांवर वनकायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असुन , वृक्षांच्या बेकाद्याशीर कत्तलीमुळे तालुक्यातील पर्यावरणप्रेमी व शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे