Home Blog Page 269

यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली .

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत अंतर्गत आणी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या चौकशीची मागणी करण्याबाबत वड्री येथील बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली . यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी वड्री ग्रामपंचायत अंतर्गत त्याच प्रमाणे सावखेडा सिम हिंगोणा जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षेतात झालेली निकृष्ठ कामांची चौकशी तात्काळ चौकशी करण्यात यावी याशिवाय विविध समस्याकडे ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराज झालेले कॉंग्रेसच्या आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी आपले आमरण उपोषणास सुरूवात केली होती. आदीवासी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने संत्पत गावातील समाज बांधवांनी व आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी संघटनेचे जिल्हा रबील तडवी देखील या आमरण उपोषणास आपला जाहीर पाठींबा दिला होता . तत्तपुर्वी दुपारी वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव यांच्या महाराष्ट्र सरपंच परिषदचे अध्यक्ष संदीप सोनवणे , दहिगावचे सरपंच अजय अडकमोल ,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी आदीवासी बांधवांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले , सायंकाळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे , पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी , आदीवासी नेते एम बी तडवी, अहमद बुऱ्हाण तडवी, वड्रीचे ग्रामसेवक डी एस तिडके, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्या प्रमुख उपस्थित संपुर्ण मागण्या विषयी उपोषणकर्त यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी चौकशी करून योग्य ते कार्यवाही करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांना प्रभाकर सोनवणे व शेखर पाटील यांच्या हस्ते ज्युस पाजुन या आमरण उपोषणाची सांगता झाली.

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी हिंगणघाट नगर परिषदे द्वारा तयार करण्यात येणार ५ ठिकाणी कुत्रिम विसर्जन कुंड

0

 

हिंगणघाट। मलक नईम

कोविड संकटामुळे मागील दोन वर्षे गणेशोत्सव भाविकांना साधेपणाने साजरा करावा लागला या वेळी निर्बंध नसल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, हिंगणघाट शहरातील सर्व गणेश भक्तांना सुविधा व्हावी या करिता नगर परिषद प्रशासना मार्फत ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत शहरातील एकूण ५ ठिकाणी कुत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.संभाव्य प्रदूषणाला आळा बसून पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणेश मूर्तींचे विसर्जन व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. सर्व विसर्जन ठिकाणी निर्माल्य जमा करण्याकरिता निर्माल्य कुंडाची व्यवस्था नगर परिषदे मार्फत केली असून सर्व भाविकांनी या कुंडा मध्येच निर्माल्य देण्याचे आवाहन नगर प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.नगर परिषद प्रशासना मार्फत खालील ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
१) गोकुळधाम मैदान,तहसील कार्यालया जवळ, २) संत गजानन महाराज मंदिर परिसर,तुकडोजी वार्ड
३) हनुमान मंदिर परिसर,इंदिरा गांधी वार्ड,ए.पी.एम.सी.मार्केट यार्ड जवळ, ४) पटवारी कॉलनी,सांबरे यांचे घर समोरच्या मोकळ्या जागेवर, ५) सेन्ट्रल वार्ड,चेपे चौक जवळ
वरील सर्व विसर्जन ठिकाणी भाविकांना सुविधा देणे साठी नगर परिषदेचे प्रत्येकी ३ कर्मचारी सेवा देणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या घरीच किवा नगर परिषदेने तयार केलेल्या कुत्रिम विसर्जन कुंडामध्ये करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.हर्शल गायकवाड यांनी केले आहे.

दारोडा येथे बसस्थानक परिसरात अज्ञात वाहनाची दुचाकीला जबर धडक: दुचाकीस्वार जागीच ठार

0

 

 

हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील दारोडा बसस्थानक परिसरातील पुला जवळ आज शुक्रवारी ९ सप्टेंबरला अज्ञात वाहनाने दुचाकी जबर धडक दिली या भिषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मृत्यक व्यक्तीचे नाव सुनिल भगत राहणार वडनेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू सुनिल भगत हे हिंगणघाट शहरातील गिमा टेक्सटाइल मध्ये काम करीत आहे.डिवटी संपल्यानंतर ते आपल्या वडनेर गावाकडे परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील दारोडा गावातील बसस्थानक परिसरातील पुलाजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने सुनिलच्या दुचाकी जबर धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

जयंत कातरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंगणघाट तालुकाध्यक्षपदी निवड

0

 

हिंगणघाट तालुक्यातील जयंत कारवटकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आज शुक्रवारी प्रशिध्दी पत्रातून देण्यात आली आहे.यावेळी वर्धा जिल्हा उपप्रमुख शंकर पोटफोडे विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर व जिल्हा उपप्रमुख रमेश घंगारे हिंगणघाट शहर अध्यक्ष श्याम ईडापवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रसंगी हेमंत गडकरी साहेब यांनी जयंतभाऊ कातरकर यांना हिंघणघाट शहरी व ग्रामीण तालुक्यातील राष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटन प्रबळ करण्याचे आदेश देऊन पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतन पर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगररात येत आहे

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या 14 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे यंदा या वाढदिवसाला अतिशय जंगी पद्धतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्या होते तथापि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश या दिवसाला पूर्वनियोजित कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे हा कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे आता निश्चित करण्यात या अनुषंगाने २० रोजी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवराची उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे या अनुषंगाने २०रोजी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या असुन याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवराची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाचे नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात असल्याचे दिसून आले आहे दरम्यान काल आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सहकार्यासह या मैदानाची पाहणी केली या प्रसंगी त्यांच्यासोबत छोटु भोई अफसर खान राजेंद्र हिवराळे पंकज राणे गोपाळ सोनवणे राजू टोंगे आदीची उपस्थिती होती

यावल पोलीस वसाहतीतील अनेक वर्षापासुन जप्त वाहनांमुळे पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पोलीस वसाहतच्या आवारात, गेल्या अनेक वर्षापासून महसूल विभागा कडून जप्त केलेली गौण खनिजाची वाहने अस्ताव्यस्त लावलेली असल्याने वाहनांचे आजूबाजू अनावश्य गवताची वाढ झाल्याने पोलीस वसाहतीतील कुटुंबीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने गुरुवारी पोलीस कुटुंबीयांनी येथील तहसीलदार महेश पवार व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन सादर करत परीसरातील वाहने व परिसराची स्वच्छता करून दिल्यास पोलीस कुटुंबीयांकडून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . आंदोलना पासून पोलीस अलिप्त असतात मात्र पोलीस वसाहतीच्या विविध नागरी समस्यांना कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत असल्याने महिलांनी समस्याला वाचा फोडण्यासाठी थेट तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन गाठत समस्यांचा पाढा वाचला.

येथील पोलीस वसाहतीत सुमारे २० कुटुंब वास्तव्यास आहेत पोलीस वसाहतीच्या समोर असलेल्या आवारात महसूल विभागाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून जप्त केलेली वाहने लावून ठेवलेली आहेत या वाहनांच्या आजूबाजूला अनावश्यक वनस्पतीसह गवताची वाढ झाल्याने व सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने रात्री अपरात्री पोलीस वसाहतीत जाण्यासाठी धोक्यात जीव घालवावा लागत असल्याची समस्या आहे वाहने असता व्यस्त लावली असल्याने या परिसराशी स्वच्छता होत नसल्याने तसेच परिसरात पावसाचे पाण्याची मोठ मोठे डबकी साचल्याने दुर्गंधी सुटत असून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आरोग्य धोक्यात आहे तसेच पोलीस वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने व वेळेवर गटारीची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा वसाहती त्रास वाढलेला आहे या सर्व समस्यांचे कथन वसाहतीतील महिलांनी गुरुवारी येथील तहसीलदार महेश पवार यांना केले.

अनेक वर्षापासून जप्त केलेली वाहने बेवारस पडलेली असल्याने व त्यांना नंबर प्लेट नसल्याने वाहनांचा लिलाव करण्यास अडचण होत असल्याची माहीती पत्रकारांशी बोलतांना तहसीलदार महेश पवार यांनी ही अडचण सांगत वाहनांचे चेसिस नंबर पोलिसांनी तपासून तहसील कार्यालयास पाठवावी जेणेकरून महसूल विभागाला जप्त केलेल्या या वाहनांची लिलाव प्रक्रिया पुर्ण करता येईल असे ही सांगितले. महिलांनी मात्र ही वाहने हटवली नाही तर पोलीस कुटुंबीयांकडून थेट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तहसीलदार पवार यांची भेट घेतल्यानंतर महिलावर्गांनी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची भेट घेत परिसरात लावलेल्या बेवारस वाहनांमुळे कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी तातडीने संबंधित विभागाशी व प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी पोलीस कुटुंबीयांना दिले.

बोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालते महाराष्ट्र एक्सप्रेस वर तासिका शिल्प निर्देशकांना काढले नोटीस न देता

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश. बावस्कर

बोदवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर न राहता आपल्या मनमानी पद्धतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते ,कर्मचारी मुख्यालय न राहता शासनाची फसवणूक करत आहे ,महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक केले आहे .यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राणे न राहण्याची सूट देण्यात येते का ?आ प्रश्न उपस्थित होत आहे शिल्प निर्देशक गट निर्देशक कार्यालयीन कर्मचारी वेळेत हजर होत नाही तसेच कंत्राटी तासिका शिल्प निर्देशक यांना कोणती सूचना किंवा पत्र न देता त्यांना शिल्प निर्देशक यांनी कमी करण्यात आले आहे या शिल्पनेदेशकांचे कालावधीतील विद्यार्थ्यांचे निकाल कमी लागेल का .?त्यांना या आधी सूचना किंवा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे का ? अशा प्रकारची कोणती सूचना पत्र न देता तासिका शिल्प निर्देशक यांना कमी करण्यात आले आहे नवीन भरती प्रक्रिया राबवली आहे किंवा नाही ? राबवली असेल तर वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केली आहे का असा? प्रश्न उपस्थित होत आहे काही कंत्राटी तासिका शिल्प निर्देशक यांनी अंतर्गत मनमानी हुकूमशाही पद्धतीला त्रासून निर्देशक पद सोडून दिले आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कामकाज नियमित वेळेवर चालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी उपक्रम लावणे आवश्यक आहे सदरची प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळीनुसार सुरु होणे व बंद होते हे कुठेतरी थांबले पाहिजे हा प्रकार कित्येक वर्षापासून सुरू आहे अशी जागृत नागरिकांकडून चर्चा होत आहे

बोदवड येथे शारदा कॉलनी गणेश मित्रमंडळाकडून गणेशोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न

0

 

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.

बोदवड येथील शारदा कॉलनी मधील गणेश उत्सव मित्रमंडळा कडून गणेशोत्सव कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.या कालावधीमध्ये महिला व मुलां-मुलींकडून दांडिया खेळण्यात आला.तसेच मुलांसाठी लिंबू,चमचा स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा,सामान्य ज्ञानावर इ.१ली ते १२वी च्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली.सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटात रोहित विवेक वखरे,प्रियल राजपूत,प्रणाली वखरे,प्रतीक्षा सपकाळ,साई अग्रवाल यांना सर्वाधिक गुण मिळाले.तसेच मोठ्या गटातून तुषार गंगतिरे,समृद्धी सपकाळ,कुणाली अग्रवाल यांना सर्वाधिक गुण मिळाले.गणेश मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना मंडळा कडून बक्षिसे देण्यात आली.व मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या गणेशोत्सवासाठी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल गंगतिरे,स्वप्नील गंगतिरे,शिवम अग्रवाल,आनंद गंगतिरे,अतुल हिवराळे,अतुल गंगतिरे,डीगंबर पाटील,ऋत्विक पाटील,सुभाष राजस्थानी यांनी परिश्रम घेतले तसेच बबन शेळके सर,पुरुषोत्तम गड्डम सर,विवेक वखरे सर ,सचिन राजपूत,तानाजी पाटील ,बी टी बावस्कर,डॉ.संजय कळसकर,वसंतराव सपकाळ,संजय नंदवे ,शांताराम शेळके, यांचे चांगले सहकार्य लाभले.दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला

ब्रिगेड सेना युती नंतर बुलढाणा जिल्ह्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी बैठक संपन्न

0

 

विठ्ठल अवताडे बुलढाणा

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडची पदाधिकारी बैठक संपन्न झाली.ही बैठक रेकाॕर्ड ब्रेक व ऐतिहासिक झाली.सतत ५ तास ही बैठक चालली.या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

शिवसेना-ब्रिगेड युती झाल्यानंतर पुढील वाटचालीचे सखोल व गांभीर्याने नियोजन करण्यात आले.१७ सप्टेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात भव्य प्रमाणात साजरा करण्याचे ठरले.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अॕड मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर,मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे सर,कोषाध्यक्ष संतोष गाजरे,कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,डाॕ.गजानन पारधी,डाॕ.शिवानंद भानुसे,डाॕ.बालाजी जाधव,डाॕ.सुदर्शन तारख,डाॕ दिलीप चौधरी,डाॕ.कडलग,डाॕ.तुपेरे,उमाकांत उफाडे,चंद्रकांत वैद्य,सुहास राणे,अभिमन्यू पवार,अभिजीत दळवी,गजानन भोयर,संतोष शिंदे यासह सर्व केंद्रिय कार्यकारिणी सदस्य,सर्व विभागीय अध्यक्ष,सर्व जिल्हाध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष,महानगर अध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन इंजि.तुषार उमाळे यांनी केले.

बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणुक संचालकातून न घेता मतदारातून घ्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

विविध सहकारी संस्थांचे, ग्रामपंचायत,अडते,व्यापारी व हमाल-मापारी या मतदारांना बाजार समितीचा सभापती निवडण्याचा अधिकार द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

हिंगणघाट:- ०८ सप्टेंबर २०२२
राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
आपणास बाजार समितीमधील संचालक निवडून देण्याच्या या दृष्टीकोनाने शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार देण्याबाबत निर्णय घेतला आहे व त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मिळालेल्या अधिकारामुळे आपले शेतकऱ्यांनी स्वागत केले.परंतु दी. ०६/०९/२२ ला राज्य सहकारी निवडणूक प्रादीकरणाद्वारे राज्यातील २८१ बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत,अडत्या/व्यापारी व हमाल-मापारी यांच्या मतदार यादीनुसार बाजार समितीवर त्यात्यामतदार संघातून निवडणूक लढण्याचा व मतदानाचा अधिकार दिला आहे. यावरून शेतकऱ्यांमध्ये परत निराशा दिसून येत आहे.
करिता शेतकरी प्रतिनिधी म्हणून माझी आपणास विनंती आहे की निवडणूक प्रधिकरणाद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवडणूक
कार्यक्रमाला स्थगिती देण्यात यावी व जर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे निवडणुकीचा खर्च वाढत असल्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी करू शकत नसाल तर सभापतीची निवडणूक किमान विविध
सहकारी संस्थांचे, ग्रामपंचायत,अडते,व्यापारी व हमाल-मापारी यांच्या मतदार संघात जेवढे मतदार आहे त्या मतदारांना सभापती करिता निवडून देण्याच्या दृष्टीने मतदान करण्याचे अधिकार द्यावे व त्या जनआधारावर सभापतीची निवडणूक करावी नाकी संचालक मधून त्यामुळे घोडेबाजार थांबेल व योग्य व्यक्तींची निवड मतदार मधून सभापती पदावर होईल त्यामुळे निवडणूक खर्चाचा भार सुद्धा बाजार समितीवर पडणार नाही व जन मतातून बाजार समितीवर नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रमाणे सभापती विराजमान होईल यांची कृपया नोंद घेऊन शेतकऱ्यांना हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्यात यावी निवेदनाद्वारे मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देऊन केली आहे.