Home Blog Page 271

बोदवड शहराचा विकास करण्यासाठी श्री आमदार चंद्रकांत पाटील व जनतेच्या मिळालेल्या आशीर्वादातून बोदवड नगरीचा विकास व्हावा

0

यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना निवेदन देऊन बोदवड नगरपंचायत ला निधी मिळावा

बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर

बोदवड शहराची कायापालट व्हावी यासाठी तालुक्यातील आमदार चंद्रकांत पाटील साहेबांचे बोदवड शहरातील सर्व जिवलग जनता जनार्दन यांची साथ व बोदवड नगरीचा विकास व्हावा या माध्यमातुन बोदवड नगरपंचायत तसेच शहरातील प्रभागासाठी आवश्यक असलेल्या कामांना निधी मिळावा

नगर सेवक हाजी सहीद बागवान / निलेश माळी/हर्षल बडगुजर/गोलू बरडिया नवी मुंबई येथे मंत्रालयात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले व निवेदनात विकास कामाना निधि मिळावा

रस्ते कॉंक्रिटीकरण करणे/बोदवड शहरातील मुस्लिम समाजाचे कब्रस्तान येथील वॉल कंपाऊंड बांधकाम करणे सुशोभीकरण करणे /म्हसोबा जवळील सार्वजनिक स्वच्छालय बांधकाम करणे / दोघी कडेला गटार बांधकाम करणे,
सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण, समाज मंदिर, व्यायामशाळा/ बगीचे व सुशोभिकरण, पथदिवे, चौकाचे सुशोभिकरण या कामासाठी निधी मिळावा या कामासाठी मागणी करण्यात आली

राम का नाम जपणा और माल अंदर करना

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- आई उर्फ माता मंदिर देवस्थाना व हिंगणघाट येथील श्रीराम देवस्थान करीता सुविधायुक्त सभागृह, मंदिरा समोरील सिमेंट रस्ता, विद्यार्थ्यांकरीता लायब्ररी इत्यादी कामांकरीता मंदिराच्या विश्वस्त मंडळा कडून निवेदन प्राप्त झाल्याने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत तिर्थक्षेत्र विकास योजने मधुन देवस्थानाला निधी उपलब्ध करुन दिला.
हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील माता मंदिर वार्ड येथील आई उर्फ माता मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर देवस्थान राम मंदिर वार्ड हिंगणघाट शहरातील प्रसिध्द देवस्थान असून नवरात्रीच्या वेळेस संपूर्ण शहरातील नागरीक तसेच आजू बाजूच्या परिसरातील नागरीक दर्शना करीता लाखोच्या संख्येने उपस्थित होतात. तसेच मंदिरा मध्ये वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतात. आई उर्फ माता मंदिर देवस्थान व श्रीराम मंदिर देवस्थानास आवश्यक मुलभुत सुविधा उपलब्ध झाल्या .
यापैकी किती सुविधा जनतेला मिळाल्या हिंगणघाट शहरात अनेक प्रभागात अनेक योजनेतून अर्धवट कामे झालेली आहे . याला सर्व जबाबदार आहे लोकप्रतिनिधी. प्रभागात अवैध धंदे बंद करण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून आणणे जनतेचे कर्तव्य आहे नाहीतर अच्छे दिन आयेंगे हे स्वप्न राहिल .

टिघ्रावडगांव या गावांमध्ये नारायण बाबा देवस्थान गावाच्या वतीने यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो

0

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

पंचकोशीतील नागरिकांच्या सहकार्यातून आज टिघ्रा वडगाव येथे नारायण बाबा संस्थान येथे पूजा आरती करुन सर्व गावकरी दर्शन घेण्यास गर्दी करतात नारायण बाबा संस्थान यांच्या वतीने पौर्णिमेला यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्या यात्रेत सर्व समाज बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व ज्येष्ठ आणि युवा वर्ग यांचा फार मोठा सहभाग लाभतो आणि अशा या आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्व टिघ्रा वाशी अतिशय आनंदाच्या वातावरणात नारायण बाबा यांचा यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणे बनवतो आणि ह्या यात्रेत्सवाला जवळपास 1980 पासून आम्ही ह्या यात्रा उत्सव बनवतो आणि यात्रेला आम्हाला पंचक्रोशीतील सर्व नागरिक सर्व दुकानदार यांचे अतिशय सहकार्य लाभते आणि हा यात्रा उत्सव अतिशय शांततेत व आनंदाच्या प्रसन्न वातावरणात पार पडतो आणि या यात्रा उत्सवाला गावातील मान्यवर प्रतिष्ठित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा शामराव पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि मुक्ताई संस्थान विश्वस्त माननीय राजू पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य बबलू पाटील राहुल गायकवाड माजी सरपंच गोकुळ पाटील राजेंद्र चौधरी बाळू पाटील ईश्वर मोरे ,पोलीस पाटिल, प्रमोद पाटील ,व संदीप कुचके नारायण बाबा यांच्या दर्शनाने सर्व भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात आणि प्रचंड असा युवा वर्ग तसेच सर्व नागरिक यांचे सहभाग लाभतो

पोलीस भरतीच्या तयारी करिता गेलेल्या हिंगणघाट येथील मुलीचा संशयास्पद मृत्यू

0

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- नितू बंडूजी सावध (२५) रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट जि. वर्धा ह.मु. यवतमाळ टिळकवाडी ती यवतमाळात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैत्रिणींसोबत राहात होती. नितू 4 सप्टेंबर पासून बेपत्ता होती .घाटंजी मार्गावर असलेल्या सावरगड शिवारात एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी दि. रात्री ९.३० वाजता उघड झाली. ग्रामीण पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी शासकीय रुग्णालयात ठेवला. दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार नोंद होती. नितू यवतमाळात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैत्रिणींसोबत राहात होती. नितू 4 सप्टेंबरला बेपत्ता झाली. याची माहिती मिळाल्यानंतर तिची आई शोभा सावध राहणार हिंगणघाट यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. अवधूतवाडी पोलिसांनी नितूचा शोध सुरू केला. मात्र ती मिळाली नाही. अखेर मंगळवारी रात्री ९.३० वाजता तिचा मृतदेह हाती लागला.
ग्रामीण पोलिसांनी नितूचा मृतदेह शवचिकित्सेसाठी ठेवला आहे. शवचिकित्सा अहवाल प्राप्त झालेला नाही. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला हे निश्चित झाले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

शोभा सावध (आई) :- आरिफ अली नावाचा व्यक्ती एक वर्षापासून माझ्या मुलीला त्रास देत होता. माझ्या मुलीने मला सांगितलं होतं व दाखविल सुद्धा होत ,पोलीस भरती मध्ये लागण्याकरिता पोलीस रेकॉर्ड चांगला पाहिजे त्यामुळे दुर्लक्ष केल. माझ्या मुलीने सांगितले की माझ्या जीवाला काही धोका झाल्यास हा इसम माझ्या मृत्यूला जबाबदार राहील . माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.

आ लताताई सोनवणे यांना दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ठेवला कायम

0

 

. जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर.

जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री शिंदे गटाच्या चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्र बाबत हायकोर्टाने दिलेल्या निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दिली जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात शुक्रवारी 9 सप्टेंबर सर्वोच्च न्यायालयाच्या द्विस सदस्यीय घटनापिठाचे सदस्य न्या के एम जोसेफ व न्या ऋषिकेश यांनी जिल्ह्यातील चोपडा मतदार संघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे दरम्यान जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात हायकोर्टाने आमदार सोनवणे यांची याचिका फेटाळून लावली होती आमदार लता सोनवणे यांच्या विरोधात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती आमदार लता सोनवणे यांच्या टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे केली होती लता सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते माजी आमदार जगदीचंद्र वळवी यांनी सांगितले की उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे ती जलद गतीने व्हावी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी शिफारस मागणी आहे तसेच विधानसभेत दोन नंबरच्या उमेदवाराला विजय घोषित करावे

मुंगळा येथील संत सावतामाळी मंडळाच्या वतीने गणरायाचे नामघोषात विसर्जन..

0

 

टाळमृदंगाच्या गजरात पार पडले विसर्जन ,

संत सावतामाळी मंडळाने मागील ५० वर्षाची डीजे बॅंडची परंपरा बंद करुन वारकरी सांप्रदायीक पद्धतीने गणरायांना निरोप दिला….

विठ्ठल भागवत, मालेगाव तालुका प्रतिनिधी

मालेगाव तालुकातील मुंगळा येथील मागील ५० वर्षाची बॅंड डिजेची परंपरेला फाटा देऊन वारकरी सांप्रदायाचे संस्कार बालमनावर व युवावर्गावर रूजविण्यासाठी गावातील प्रमुख मंडळ असलेल्या संत सावता माळी गणेश मंडळाने अनोख्या पद्धतीने गणेश विसर्जन केले…
महाराष्ट्रातील भजनसम्राट गोभणी येथील बाल भजनी मंडळ यांच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली….
वारकरी अभंग भजने गौळणी भारुडं फुगडी इत्यादींचे उत्कृष्ट सादरीकरण करत विसर्जन मिरवणूकीने सर्वांचीच मने जिंकली.
गणरायाची मिरवणुक काढुन एक नवा पायंडा व आदर्श संत सावता माळी मंडळाने युवा पिढीसमोर ठेवल्याने समाजाच्या सर्व स्तरातून संत सावतामाळी मंडळाचे कौतुक होत आहे…तसेच कार्यक्रमाला महीला मंडळीं व पुरूष मंडळी बहुसंख्येने मिरवणूकीत उपस्थित होती. तसेच कार्यक्रमासाठी संत सावतामाळी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच माळी समाजातील सर्वानी कार्यक्रमाला सहकार्य केले.

रोटरी क्लब व नगर परीषद हिंगणघाट च्या गणेश विसर्जन कुंडला भव्य प्रतिसाद

0

 

हिंगणघाट:-नगर परीषद व रोटरी क्लब हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुलधाम येथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार केले आहे.या विसर्जन कुंडाचे एस डी एम मा.शिल्पा सोनाले मॅडम यांचे हस्ते सकाळी उदघाटन करण्यात आले यावेळी न.पा चे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पी.आय कैलासजी फुंडकर, क्लब अध्यक्ष पराग कोचर प्रा.मिहानी मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.या गणेश विसर्जन कुंडाला क्लबच्या वतीने सुभोशित करण्यात आल्यामुळे भाविक भक्तांसाठी भावनिक वातावरण निर्माण झाले होते.या प्रसंगी एस.डी.एम सोनाले मॅडम यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की दहा दिवस गणेश उत्सवानंतर विसर्जनात नद्यांचे प्रदुषण होऊ नये यासाठी गणेश भक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन या निर्माण केलेल्या कुंडावर विसर्जन करुन समाजाला जो संदेश दिला त्याचे काैतुक करावे तेव्हढे कमीच आहे.या वर्षी गणेश विसर्जनासाठी कोणतेही निर्बंध नसुनसुध्दा या कु्ंडाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यासाठी क्लब अध्यक्ष पराग कोचर यांनी गावातील लोकांचे आभार मानले. प्रोजेक्ट डायरेक्टर सुरेश चाैधरी उदय शेंडे, रुपेश हिवरकर यांनी या कुंडाची सजावटी साठी परीश्रम घेतले. सदस्य प्रा.अशोक बोंगिरवार ,सचिव सतिष डांगरे, शाकिरखान पठाण प्रा.जितेंद्र केदार,,शशांक खांडरे,मितेश जोशी,क्रिष्णा जोशी, पुंडलिकजी बकाने, प्रभाकर साठवणे,राजु निखाडे,मुरली लाहोटी,मुकुंद मुधंडा,केदार जोगळेकर अतुल हुरकट, डाॅ.प्रकाशजी लाहोटी ,वैभव पटेलिया,डाॅ.संदिप मुडे, रवी नल्लावार ,जितेंद्र वर्मा,चेतन पारेख,यांनी तेथील व्यवस्था व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी दोन दिवस परीश्रम घेतले.

वन विभागाची जमीन हडप करून अतिक्रम केल्या प्रकरणी सहकार्य करणाऱ्या वर वनहक्क कायद्यानुसार कारवाई व्हावी.

0

 

वन जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी अन्यथा आंदोलन उपोषण करण्याचा इशारा.

-मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत कोथळी बीट वन विभागाची जमीन करून अतिक्रम करणे व शासनाची दिशाभूल करून खोटे गुन्हे दाखल करण्याप्रमाणे सहकार्य करणाऱ्या वनरक्षकावर वन हक्क अधिनियम असावा कारवाई व्हावी. अशा प्रकारचे निवेदन समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख शे.सईद शे.कदीर यांनी जिल्हाधिकारी तथा वन हक्क समिती अध्यक्ष बुलढाणा यांना दि.9/9/ 2022 रोजी दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद केले की तरोडा गाव बीट कोथळी मोताळा परिक्षेत्र प्रादेशिक अंतर्गत दावे दाखल केलेले आहेत त्यापैकी बहुतेक दावे खोटे आहेत. त्यापैकी गजानन सरदार सिंग मोरे यांनी शासनाची 0. 88 हेक्टर जमीन खोटे कागदपत्र देऊन बळकावली आहे. त्यामध्ये त्यांनी 21 /6 /88 चे प्रथम गुन्हा रिपोर्टमध्ये खोडतोड करून शासनाची दिशाभूल केली आहे. ह्याकरीता गजानन मोरे यांचे आधार कार्ड नुसार शहानिशा करावी. आरोपी अल्पवयीन कसे करून घेतले. न्यायालयीन कागदपत्रांमध्ये खोडतोडकरुन दिशाभूल करण्यात आली.व दिशाभूल माहिती पुरवून वन विभागाची जमीन हडप केली आहे त्यासाठी त्यांना त्यांचे भाऊ अनिल सरदार सिंग मोरे वनरक्षक वन विभाग मोताळा यांनी सहकार्य केले आहे .तसेच खोटे कागदपत्र शासनास दाखल करून प्रोत्साहित केले. याबाबत गजानन सरदार मोरे यांचे वन हक्क अधिनियम 2006, 2008 ,2012 अन्वये प्रकरण दाखल आहे. त्याची तपासणी केल्यास सर्व गैरप्रकार उघडकीस येईल कायद्याची कसलीही भीती न बाळगता फायद्यासाठी व जमिनीवर दरोडा घातला आहे .त्यामुळे त्यांचे सह इतर गुन्हेगारावर गुन्हे दाखल करावेत व शासकीय व जमीन ही तात्काळ ताब्यात घ्यावी .अन्यथा आमचा पक्ष राज्यस्तरीय आंदोलन उपोषण करेल सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना पाठवले आहेत,

गडचिरोली चिमूर लोकसभा शेत्राचे खासदार कर्नाटक राज्याच्या दौऱ्याप्रसंगी स्वागत

0

 

जावेद अली जी.प्र.गडचिरोली

 

भारतीय जनता पार्टी ने खा.अशोकजी नेते यांच्याकडे आठ राज्याच्या प्रभागाची जबाबदारी दिली असल्याने भाजपा पक्षाचे संघटनात्मक धोरण, पक्ष बळकटि व वाढविण्याकरिता खा.अशोकजी नेते यांचा कर्नाटक दौऱ्याप्रसंगी

भारतीय जनता पार्टीच्या बेंगलोर येथील कार्यालयात शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्याप्रसंगी खा‌.अशोकजी नेते. कर्नाटक राज्याचे संघटन सचिव मा. राजेश जे.व्ही. कार्यालय शाखाप्रमुख मा.राजेश अंबेकलो, गंगाधर नाईकजी, विक्रमजी सोशल मीडिया इन्चार्ज इत्यादी उपस्थित होते

यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली .

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत अंतर्गत आणी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या चौकशीची मागणी करण्याबाबत वड्री येथील बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणा चौकशीच्या लिखित आश्वासनाने सांगता झाली . यावल पंचायत समितीच्या कार्यालया समोर आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी वड्री ग्रामपंचायत अंतर्गत त्याच प्रमाणे सावखेडा सिम हिंगोणा जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षेतात झालेली निकृष्ठ कामांची चौकशी तात्काळ चौकशी करण्यात यावी याशिवाय विविध समस्याकडे ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे नाराज झालेले कॉंग्रेसच्या आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी आपले आमरण उपोषणास सुरूवात केली होती. आदीवासी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने संत्पत गावातील समाज बांधवांनी व आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी संघटनेचे जिल्हा रबील तडवी देखील या आमरण उपोषणास आपला जाहीर पाठींबा दिला होता . तत्तपुर्वी दुपारी वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव यांच्या महाराष्ट्र सरपंच परिषदचे अध्यक्ष संदीप सोनवणे , दहिगावचे सरपंच अजय अडकमोल ,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांनी आदीवासी बांधवांनी उपोषण सोडावे यासाठी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले , सायंकाळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे , पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी , आदीवासी नेते एम बी तडवी, अहमद बुऱ्हाण तडवी, वड्रीचे ग्रामसेवक डी एस तिडके, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्या प्रमुख उपस्थित संपुर्ण मागण्या विषयी उपोषणकर्त यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यावर सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी चौकशी करून योग्य ते कार्यवाही करण्यात येईल असे लिखित आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांना प्रभाकर सोनवणे व शेखर पाटील यांच्या हस्ते ज्युस पाजुन या आमरण उपोषणाची सांगता झाली.