Home Blog Page 309

हिंगणघाट सम्यक बुद्ध विहाराचा दोन गटात वाद

0

 

हिंगणघाट :- सम्यक बुद्ध विहार,प्रबुद्ध नगर राम नगर वॉर्ड येथील वाद गेला हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये, तर एकाच जागेचे दोन नोंदणी क्रमांक कसे….?असा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे.
तर दोन गट आमने सामने,२००५ मध्ये स्थापन केलेल्या नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सध्याचे अध्यक्ष मंगला पुरुषोत्तम थुल असुन २०१९ मध्ये स्थापन केलेल्या सम्यक बुद्ध विहार,बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाऊराव तेलंग आहे

रामनगर वार्ड,प्रबुद्ध नगर येथील सम्यक बुद्ध विहाराचा वाद आता थेट हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोहोचला आहे मागील तीन ते साडेतीन वर्षापासून विहाराचा वाद सुरू असुन,दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे २००५ मध्ये नोंदणीकृत संस्था असून सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे नोंदणी क्रमांक एफ ५५७० देण्यात आला होता.सदर संस्थेचे लोक वर्गणीतून सम्यक बुद्ध विहार रामनगर वार्ड,प्रबुद्ध नगर जिल्हा वर्धा यांचे बांधकाम केले असून २०११ ते २०१३ या कालावधीत विहाराचे बांधकाम पूर्ण झाले होते व त्यावेळी सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापनेवेळी संगमवरी फलक बुद्धविहारात बसविण्यात आले होते.
परंतु सन २०१९ ला सम्यक बुद्ध विहार,बोद्ध पंचकमिटी या नावाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे नोंदणी करण्यात आली तर नोंदनी क्र. ए.७३७ वर्धा असुन या बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाउराव तेलंग,सचिव अमित देवानंद झांबरे असुन इतर सदस्यांनी बळजबरीने प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांना कोणातीही माहिती न होऊ देता संस्थेची स्थापना कली व विहारात लावलेल्या सदर फलकाची विटंबना केली या बाबत हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अशी लेखी तक्रार प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांच्यावतीने देण्यात आली असुन सदर प्रकरण चौकशी मध्ये घेण्यात आले आहे.
सम्यक बुध्द विहार बौद्ध पंचकमिटीने कोणतीही कल्पना दिली नाही व प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांना विश्वासात न घेता कोणताही ठराव संमत करून न घेता २०१९ मध्ये नव्याने सम्यक बुध्द विहार बौध्द पंचकमिटी नोंदणी क्र.ए.७३७ या नावाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा येथे या नावानी नोंदणी केल्या गेली असे २००५ नोंदणीकृत असलेल्या प्रबुद्ध नगर बहुद्देशीय महिला समिती यांच्या वतीने सांगण्यात येत आहे,तर आता एकाच विहाराच्या जागेचे दोन नोंदणी क्रमांक झाले असून एकाच जागेचे दोन नोंदणी क्रमांक कसे….?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे व कोणत्या आधारे सम्यक बुद्ध विहार बोद्ध पंचकमिटी नोंदणी क्र.ए.७३७ यांना देण्यात आला आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
२००५ मध्ये स्थापन केलेल्या नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सध्याचे अध्यक्ष मंगला पुरुषोत्तम थुल,सचिव शांता खेडकर व सहसचिव सिंधू दखणे असुन २०१९ मध्ये स्थापन केलेल्या सम्यक बुद्ध विहार,बौद्ध पंच कमिटीचे अध्यक्ष प्रलय भाऊराव तेलंग असुन,सचिव अमित झांबरे आहे.
२००५ मधील नोंदणीकृत प्रबुद्ध नगर बहुद्देशीय महिला समिती यांने सम्यक बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापनेवेळी संगमवरी फलक बुद्धविहारात बसविण्यात आले परंतू ११ ते १३ एप्रिल २०२२ रोजी विहारामधील संगमवरी काळ्या फलकाला त्यावर नाव कोरून असलेल्या त्यावर पांढरा रंग फासून विटंबना केली या कृत्यामुळे प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समितीचे सभासद आणि समर्थकांचे भावना दुखावल्या गेल्या आहेत,सदर कृत्य वार्डातील दोन गटांमध्ये संघर्षास चिथावणी दिल्यासारखे आहे तरी आपण योग्यशीर कार्यवाही करून जसा पूर्वी फलक लावण्यात आला होता तसेच पूर्वीप्रमाणे करण्यात यावे आणि बुद्ध विहारा वरील नोंदणी क्र.मिटवून सम्यक बुद्ध विहार,बोद्ध पंचकमिटी च्या सर्व सदस्यांवर योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार प्रबुद्ध नगर बहुउद्देशीय महिला समिती यांच्या वतीने हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे देण्यात आली.
सूर्या मराठी न्यूज सचीन वाघे वर्धा

हिंगणघाट डीबी पथकाच्या कारवाईत गाडी चोरीचे प्रकरण उघडीस

0

 

हिंगणघाट :- दि. 17/09/2021 रोजी दुपारी 3.15 दरम्यान यातील फिर्यादी राजु माणीक चौधरी रा. चरुळ घारफळ, त. भद्रावती जि. चंद्रपूर यांनी त्यांची एक जुनी वापरती मोटार सायकल सि.डी. 110 ड्रिम होंडा कंपनीची काळे रंगाची व निळा पटटा असलेली जीचा क्रमांक एम.एच.34/बी.डब्लु/8264 किंमत 40,000/- रू. किंमतीची नंदोरी चौकात चाबी लावुन उभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात ईसमाने मोटारसायकल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेषन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 858/2021 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
पो.स्टे. परीसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीसंबंधाने तसेच झालेल्या चोरीबाबतची कार्यपदधती हेरून पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांनी तात्काळ दखल घेवुन गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांचे पथकास योग्य मार्गदर्शन करून अनोळखी आरोपीचा शोध घेवुन मोटारसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने पो.स्टे परीसरात कसोशीने प्रयत्न करत प्रभावी मुखबीर नेमुन व मागील दाखल गुन्हयांचा मार्ग काढत आरोपी आकाश अशोकराव वानखेडे वय 33 वर्षे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यास निश्प्ण्ण केले. आरोपीचे ताब्यातुन 1) अप. क्रमांक 858/2021 कलम 379 भादवि मधील सि.डी. 110 ड्रिम होंडा कंपनीची काळे रंगाची व निळा पटटा असलेली जीचा क्रमांक एम.एच.34/बी.डब्लु/8264 किंमत 40,000/- रूपये
2) अप. क्रमांक 472/2022 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एम.एच. 32/एन/7232 किंमत 20,000/- रूपये असा एकुण 60,000/- रू असा मुददेमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले. पुढील तपास नापोकाॅ प्रशांत वाटखेडे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, उमेश बेले यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

जे.सि.बि. चोरणा-या चोरट्यास अल्लीपुर पोलीसांनी केली अटक

0

 

अल्लीपुर :- दि. 21 मार्च
फिर्यादी अशोक पांडुरंग डगे, वय 60 वर्ष, रा. भवानी वार्ड, अलीपुर यांचे मुलाचे लग्र असल्याने ते लग्नाचे कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांचेकडे जे.सि.बि. चालविण्याचे काम मागण्यास आलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादीचा मुलगा अतुल पांडुरंग ढगे यांचे मालकीचा रुपये 18,00,000/ किंमती जे.सि.बि. क. MH-32-AH 1923 हा चोरुन नेला अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन दि. 22 मार्च रोजी पोस्टे. अल्लीपुर येथे अप क्र. 236/22 कलम 379 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी अल्लीपुर पोलीस पथकाला सुचना देण्यात आल्या. पोलीस पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवुन सदर आरोपी बाबत बोरखेडी नागपुर येथील टोलनाक्यावरून अनोळखी आरोपी बाबत माहीती गोळा केली. सदर माहीती वरून पोलीस पथकाने प्रथम नागपुर त्यानंतर भंडारा गाठले तेथे मिळालेल्या गुप्त माहीती वरून अखेर पोलीस पथकाला आरोपी संतलाल देवचरन टंडन वय 36 वर्ष रा. रामपुरा तह. साजा जि. बेमेतरा राज्य छत्तीसगड यास भंडारा ते राजनांदगाव रोडवर चीचोली. छत्तीसगढ जवळुन चोरलेल्या जे.सी.बी. सह ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव थी. आबुराव सोनवने व श्री. गोकुलसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल गाडे यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्रील भोजगुडे, पो.हवा. अजय रिठे , विनोद बुरीले ना.पो.हवा. शंकर पोहाणे , संदीप झिले ,अभय वानखेडे , यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

काँग्रेस पक्षाची बदनामी करणाऱ्या “घुग्घुस का सत्या” गब्बर जाग जायेगा फेसबुक आय डी वर गुन्हा दाखल

0

 

काँग्रेसचे ठाणेदारांना निवेदन

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजुरेडडी यांनी आपल्या सामाजिक कार्याने जनमाणसात स्वच्छ प्रतिमा निर्माण करून काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात यश मिळविले आहे.
मात्र त्यांच्या वाढती लोकप्रियता विरोधकांना सहन होत नसल्याने
फेसबुकवर ‘घुग्घुस का सत्या” या फेक आय.डी.च्या माध्यमातून बदनामीकारक बातम्या पेरल्या जात आहेत.
हनुमान जंयतीच्या दिनी 16 फेब्रुवारीला रेड्डी यांना सकाळी 07 वाजता पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील डॉ. शिरीष चौधरी यांच्या रुग्णालयात भरती केले असता शहर अध्यक्षाने पत्नी सोबत झालेल्या भांडणात विष पिवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा खोटा व बदनामी कारक पोस्ट प्रसारित केली यानंतर पत्नीने अध्यक्षाला व प्रेयसीला चपलेने मारहाण केल्याची खोट्या चरित्र हनन करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या या सोबतच गब्बर जाग जायेगा या फेक आय. डी. च्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी संविधान विरोधात चुकीची पोस्ट करून शहरातील शांती भंग करण्याचे प्रयत्न केला होता व नंतर पोस्ट डीलेट केली.
या फेक अकाउंट्वरून ही जाती धर्मात तेढ निर्माण करणारे पोस्ट टाकून गावातील शांती व सुव्यवस्था बाधीत करण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे.
शहरात अश्या प्रकारच्या ज्या काही फेक आय. डी. ची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाईच्या मागणी करिता आज काँग्रेस अध्यक्ष राजुरेडडी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन येथे ठाणेदार श्री.बबनराव पुसाटे यांना निवेदाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली होती
मागणीची तातडीने दखल घेत पोलीस उप – निरीक्षक मेघा गोखरे यांच्या तर्फे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले
सायबर सेलच्या माध्यमातून फेक अकाउंट वरून बदनामी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहेत.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शामराव बोबडे,अलीम शेख,मोसिम शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी,भैय्या भाई,दीपक पेंदोर,देव भंडारी,विजय माटला, रोहित डाकुर, साहिल सैय्यद,अय्युब कुरेशी,प्रणय कनकुटला,रफिक शेख
बालकिशन कूळसंगे,कुमार रुद्रारप, कपिल गोगला,राकेश डाकुर, खादिम शेख, रंजीत राखुंडे,संजय कोवे,दानिश शेख,
व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरण पथकाची कारवाई 686000 रुपयाचा चोरीचा माल जप्त

0

 

हिंगणघाट :- फिर्यादी आशिष अर्जुनलाल नागरवाळे वय 29 वर्ष हे रेल्वे ठेकेदाराचे साईड अभियंता असुन त्यांनी ते काम करीत असलेल्या येनोरा रेल्वे स्टेशन हाउसचे नवनिर्माणाधीन बांधकामासाठी आणलेल्या एकुण लोखंडी सळाखींपैकी 16 एम.एम. चे 19 सळाखींचे बंडल वजन अंदाजे 02 टन किंमत प्रति टन 43,000/- रूपये प्रमाणे एकुण 86,000/- रूपयांचा माल दिनांक 20/04/22 चे 16.00 ते दिनांक 22/04/22 चे 11.00 वा दरम्यान अज्ञात आरोपीने चोरून नेल्याबाबतची तक्रार दिल्याने सदर रिपोर्ट वर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 503/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांना गुन्हयासंबंधाने मार्गदर्शन करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने तात्काळ शोध मोहीम व तपास सुरू करून आरोपी 1) आकाश सुरेष राउत वय 24 वर्ष रा. येनोरा
2) गौतम गोपाल आत्राम वय 19 वर्ष रा. येनोरा यांना निष्पण्ण करून त्यांचे ताब्यातुन 19 बंडल असलेल्या 2 टन लोखडी सळाखी किंमत 86,000/- रूपये , एक बलेरो पिकअप मालवाहु गाडी क्रमांक एम.एच. 30/ए.बी./3979 किंमत 6,00,000/- रूपये असा एकुण 6,86,000/- रूपयांचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास विवेक बनसोड करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्षनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार पोउपनि सोमनाथ टापरे व पोउपनि बी.एस. मुंढे यांचे सह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, उमेश बेले यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट येथील दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड, डी. बी. पथकाची कार्यवाही

0

 

हिंगणघाट :- दिनांक 22 मार्च रोजी फिर्यादीने त्याचे मालकीची होंडा कंपनीची सीबी व्टिस्टर मोटरसायकल क्र. एम. एच.- 32 / यु – 7547 ही दुकानाचे बाहेर उभी करून दुकानात गेले दिवसभर दुकानात काम करून रात्री 7 वा. दरम्याण घरी जाण्याकरीता ज्या जागेवर मोटरसायकल ठेवली होती तेथे मोटरसायकल दिसुन आली नाही. फिर्यादीची मोटरसायकल ही दुकानाचे समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची माहिती पो.नि. संपत चव्हाण यांनी पोहवा शेखर डोंगरे यांचे डी.बी. पथकाला सदरचा गुन्हा उघड आणण्याबाबतच्या सुचना दिल्या. सदरची माहीती मिळताच लागलीच पोहवा शेखर डोंगरे व त्यांच्या पथकांनी आपले नेटवर्क चा फायदा व माहीती घेत सदर गुन्हयातील आरोपी अमोल प्रभाकर पुलकंठवार वय 29 वर्षे रा. सेन्ट्रल वार्ड, हिंगणघाट याच्या ताब्यातुन चोरीस गेलेली मोटरसायकल किमंत 20,000 रू. ची जप्त करून गुन्हा उघडकिस आनला. तसेच त्याचे ताब्यातुन पोस्टे अप क्र. 494/2022 कलम 379 भादंवि च्या गुन्हयातील चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल किमंत 20,000 रू. असा एकुण जु.कि. 40,000 रू. च्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट, यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट ब्राह्मण समाजा तर्फे आमदार अमोल मिटकर याच्या बेताल वक्तव्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

0

 

हिंगणघाट
हिंगणघाट ब्राह्मण समाजाचे वतीने आज दि 23 एप्रिलला रा का आमदार मिटकरी यांनी एका भाषणात हिंदुधर्माच्या बाबतीत चुकीची माहिती देऊन हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा या मागणीचे निवेदन ठाणेदार संपत चव्हाण यांना देण्यात आले.
पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाच्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या अमोल रामकृष्ण मिटकरी या राजकीय व्यक्तीने दि. १९ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेच्या कार्यक्रमात हजारोंच्या जनतेसमोर जाहीर भाषण करताना ब्राह्मण समाजाबद्दल आणि एकूण हिंदू धर्मातील धार्मिक संस्कारांबद्दल अत्यंत प्रक्षोभक आणि जातीयवादी तेढ निर्माण करणारी विधाने केलेली आहेत. आमदार अमोल मिटकरी यानी याआधीही आपल्या वाचाळ वाणीतून भारतीयांच्या भावना दुखावण्याचे आणि विविध धर्माच्या आणि जातींच्या बाबतीत चुकीची आणि पुरावाशून्य वक्तव्य करून भारतीय समाजात तेढ आणि दुजाभाव निर्माण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मिटकरी यांचे भाषण भारत देशातील नव्हे तर जगाच्या कानकोपयातील ब्राह्मण समाजातील आणि सकल हिंदू धर्मातील भारतीय
नागरिका पर्यंत प्रसारमाध्यमांच्याद्वारे पोहोचले आहे . सदर भाषण आमचे राहते घरी पाहताना आमच्यासारखे तमाम हिंदू देशप्रेमी भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या आहे त्यामुळे अमोल मिटकरी याच्यावर भारतीय दंड साहित्याच्या कलम 34 ,953, 153 ,166, 268, 295, 198 504 ,505 दाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंगणघाट ब्राह्मण समाजा तर्फे करण्यात आली.यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विजय बाकरे,अरविद घरोटे,शरद ढोक चंद्रशेखर खापरे,प्रकाश तांबोळी,सचिन थारकर,राकेश शर्मा,गोविंद जोशी,स्वप्नील वाघे,जयंत वखरे,प्रसाद पचखेडे,गौरव तांबोळी व मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना निवेदन देऊन अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

0

 

स्वनियमन संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा समावेश

नवीदिल्ली (प्रतिनिधी)
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी धोरण आखले आहे. त्यानुसार “डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा मान्यता यादीत समावेश आहे.

भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना) नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले. यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आली. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. त्यात डिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर स्व-नियमन संस्थ आहे. तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे स्वरुप आहे. प्रकाशकांनी मिळून स्व-नियमन संस्था उभी करायची होती. ज्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष व्यक्ती असावा. यातील सभासद विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत. न्यूज पोर्टल चा प्रकाशक हा या स्वनियमन संस्थेचा सभासद असणे अनिवार्य आहे. न्यूज पोर्टल प्रकाशकांकडून बातम्यांमध्ये चुका झाल्यास किंवा एखाद्या व्यक्तीने, संस्थेने तक्रार केल्यास कायद्याने चौकशीसाठी स्वनियमन संस्था कार्य करेल. पुढील कारवाईची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालय घेईल, असे केंद्र शासनाच्या धोरणात सांगितले आहे.

या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील पोर्टलधारकांनी (प्रकाशकांनी) मिळून स्व-नियमन संस्था उभी केली. त्यास केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मंत्रालयाने 20 एप्रिल 2022 च्या पत्राद्वारे मान्यता दिलेली आहे. तशी माहिती माहिती व प्रसारण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे ख्यातनाम व ज्येष्ठ अधिवक्ता श्री. फिरदोस मिर्झा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या स्वनियमन संस्थेचे सदस्य म्हणून श्री ई. झेड. खोब्रागडे (निवृत्त सनदी अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा) श्री. विनायक देशपांडे, (कुलगुरू जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती, महाराष्ट्र), श्री. डॉ. विकास पाठक, (माजी प्राध्यापक, एशियन स्कूल ऑफ जर्नलिझम आणि उपराजकीय संपादक, आउटलुक मासिक, नवी दिल्ली), श्री. आनंद देशपांडे, (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), डॉ. कल्याण कुमार, (सचिव, एल्गार प्रतिष्ठान तथा अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ), श्री. देवनाथ गंडाटे, (पत्रकार तथा डिजिटल मीडिया अभ्यासक) यांचा समावेश आहे.

▪️मान्यता प्राप्त अधिकृत न्यूज पोर्टल यादी

1. khabarbat.in
2 . bramhawarta.in
3. thevidarbhagazette.com
4. news34.in
5. aatmnirbharkhabar.com
6. publicpanchanama.com
7. dakhalnewsbharat.com
8. policewalaa.com
9. purogamisandesh.in
10. yuvamarathanews.com 11. politicsspeciallive.com 12. varhaddoot.com
13. mybhuminews.com
14. suryamarathinews.com 15. chandradhun.com
16. indiadastaknewstv.com 17. loktantrakiawaaz.co.in 18. chandrapurvarta.in
19. vidarbhaathawadi.in
20. adharnewsnetwork.com 21. mh34updatenews.com
22. impact24news.com
23. abhivrutta.com
24. khabarbatchikhalichi.com 25. mbnews24taas.in
26. bhumiputrachihak.com
27. wazir.org.in
28. chandrapurkranti.in
29. mahadarpannews.com 30. rashtrahitnews.in
31. purogamiekta.in
32. safarkikhabar.com
33. chandrapurexpress.in
34. lokwachaknews.com
35. rokhthok.com
36. maharashtra24marathi.in
37. jwalasamachar.in
38. hasariduniya.com
39. aamchavidarbha.com
40. janlakshya.com
41. khabardarmaharashtra.com
42. kasamadetimes.in
43. pratikarnews.com
44. chandabusiness.in
45. vadgaonnews.in
46. pmdigitalnews.in
47. marathienewsnetwork .com
48. globalmaharashtranews.com
49. exposedbylimeshkumar.com
50. theonlinereporter.com
51. vansamachar.in
52. crimetapasdiary.in
53. Lokbatmidar.com
54. vidarbhawatan.com
55. dincharyanews.in
56. Lokdarshan.in
57. thegdv.com
58. godavaritimes.live
59. vruttwani.com
60. vidarbhakrantinews.com
61. dedhakkaexpress.com
62. patrakarshakti.com
63. thechandrapurtimes.com
64. Gondwanadarpan.com
65. Publicsamachar.in
66. policepatrakar.in
67. bsmews24.com
68. shivshaktitimesnews.com
69. Politicaltadka.com
70. whnews.in
71. ibmtv9.in
72. crimeoperation.com

घुग्घुस परिसरात पाण्याची टाकी बनवा एआयएमआयएमची मागणी.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस परिसरात पाण्याची टाकी बनवा अशी मागणी एआयएमआयएम पार्टीतर्फे आमदार किशोर जोरगेवार यांना निवेदन देऊन केली आहे.

घुग्घुस येथील शिवनगर, शास्त्रीनगर, आंबेडकर नगर येथे पिण्याच्या पाण्याची टाकी नाही या वार्डातील लोकसंख्या हि 10 ते 15 हजार आहे. तसेच आठवडी बाजार व तलाव परिसरात पाण्याची टाकी नाही या वार्डातील लोकसंख्या हि 15 हजाराच्या जवळपास आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरु असल्याने या वार्डात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील वार्डातील लोकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे वार्डातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे घुग्घुस येथील एआयएमआयएम पार्टीतर्फे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांनी मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहर अध्यक्ष सानु सिद्दीकी, कौसर शेख, मानु सिद्दीकी, मोशिम शेख, सोनू किंग, हसनैन शेख, मुन्ना शेख, फैज़ान सिद्दीकी उपस्थित होते.

पूर्णा नगर ते येलकी रस्तावर दूर्रलक्ष बीस वर्षा पासून पूर्णा ते येलकी रस्तावरील प्रशासन चे दूर्रलक्ष

0

 

उषा पानसरे असदपूर मू. का. संपादक मो.9921400542

दिनाक 23 एप्रिल पूर्णानगर

पूर्णा नगर ते येलकी पर्यत्य दोन किलोमीटर रस्तांवरिल जनते कडे लक्ष न देत प्रशासन का? दूर्रलक्ष करत आहे बीस वर्षा पासून हेलेदावे यात फसलेल्या पूर्णा येलकी रोड दोन किलोमीटर अतिषय गंभीर व्यवस्ता मधे असून रोड दूरूस्ती करता काही वेळ्या प्रशासना कडे निवेदन देण्यात आले पुर्णा नदीच्या पूला वरून अनेक दा अपघात घडून नूकसान झालेले असून नागरिक तस्त समोरही दूर्रघटना कधी ही होवु शकतो कधी ही मोठी दूर्रघटना या रस्तावर घडू शकतो जेने करूण नागरिचा जिव धोक्यात ! अनेक वेळ्या जि. परिषद कडे तथा जिल्हा अधिकारी व पालक मंत्री अमरावती जिल्हा अध्यक्ष कडे अली हेल्प ग्रूप नी निवेदन देवून मागनी केली असून सूध्दा कूणी ही लक्ष न देता जनू वाट पाहत आहे कि खूप मोठा हादसा दूर्रघटना व्हावी नागरिकांचा जिवाचा बळी दयावा दिनांक दोन एप्रिल रोजी दूपारी एक वाजता या रोड वर वरूण पूर्णा नदीच्या पूलावरून इटानी भरलेला टाॅक्टर जात असतांना पूर्णा नदीत खाली पडला देवाच्या कृपेने जिवीत हानी झालेली नाही प्रशासनाच्या हलगडजी पणामूळे जनेतेला त्रास सहन करावा लागत आहे अलीम शेख

न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती