Home Blog Page 369

घरकुल योजनेबाबत महाराष्ट्र सरकार सुस्त-योजनेचे लाभार्थी मात्र त्रस्त-

0

 

उषा पानसरे  कार्यकारी सपादीका मो. 9921400542

खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा लोकसभेत घणाघात*

 

खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी लोकसभेत पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले, मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे 2022 पर्यंत प्रत्येकाला निवारा-हक्काचे घरकुल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेतील त्रुटी तातडीने दूर करून,गेल्या 3 वर्षापासुन राज्य सरकारने आपल्या हीश्याची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याची रक्कम अदा न केल्याने लाखो लाभार्थी या योजनेपासून वंचित,अनुदान न मिळाल्याने अनेकांची बांधकामे अर्धवट व अनेकांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे,उदासीनपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणे आवश्यक,घरकुल योजनेची मुदत 2022 ऐवजी 2025 अशी वाढवून द्यावी:खासदार सौ नवनीत रवी राणा यांची लोकसभेत मागणी*
8 अ किंवा पीआर कार्ड न मिळाल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित
*संसदेचे हिवाळी अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू झाले असून आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अमरावती च्या कर्तव्यदक्ष खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी लाखो लोकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न लोकसभेत उचलून धरला.आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असते, जे गोरगरीब लोक घर बांधू शकत नाहीत त्या लोकांसाठी केंद्र सरकारने *पंतप्रधानआवास योजना* सुरू केली असून 2022 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घरकुल मिळावे *हे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्नं आहे* परंतु महाराष्ट्र सरकारने गेल्या 3 वर्षापासून आपल्या हीश्याची रक्कम लाभार्थींना न दिल्याने अनेकांची बांधकामे रखडली असून,अनेक नागरिकांची घरे अर्धवट स्थितीत असल्याने त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे,त्यामुळे राज्यसरकारने आपला हिस्सा लवकरात लवकर देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश द्यावे अशी आग्रही मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी लोकसभेत केली.
*ग्रामीण भागात नमुना 8 (अ) व शहरी भागात पीआर कार्ड ही या योजनेची मुख्य अट असून अनेक नागरिकांना वर्षानुवर्षे या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ताटकळत बसावे लागते त्यामुळे ही कागदपत्रे 15 दिवसाचे आत मिळतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी सुद्धा यावेळी खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी केली*
*खासदार सौ नवनीत रवि राणा यांनी सभागृहात हा अत्यंत महत्वाचा प्रश्न पोटतिडकीने व प्रभावीपणे उपस्थित केल्यामुळे आता घरकुल च्या लाभार्थ्यांना व वंचित नागरिकांना न्याय मिळून त्यांचे स्वतःचे हक्काचे घराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्याची खात्री लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे*

ग्रामिण जिल्हात अवैध धंदे वरली , दारु, वाळू तस्करी ,जूगार, विक्री चालणार नाही ।पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादक मो.9921400542

स्थानिक गून्हे शाखा ,अमरावती ग्रामीण ची कार्यवाही ।परतवाडा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ अमरावती ग्रामीण यानी जिल्हात अवैध धंदे जूगार ,वरली दारू वाळू तस्करी गांजा गूटखा विक्री अवैध धंदे चालणार नाही त्यावर कठोर कार्यवाही करण्या करिता नियोजन बद वरली , आराखडा तयार करूण अवैध धंदे समूळ नस्ट करण्याचे उद्देशाने विशेष पथकाची स्थापणा मोहीम राबवविण्याकामी विशेष पथकाची स्थापना केली आहे? तसेच सराईल गून्हेगारा विरूध्द एम पी डी ए कायदा अंर्तगत स्थानबाद करणे महाराष्ट पोलीस कायदयांतर्गत हद्दपार करण्याची प्रत्र्किया सूरू करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्ग दर्शनात स्थापण करण्यात आलेल्या स्थानिक गून्हे शाखेचे विशेष पथक दिनाक 29 /11 /2021 रोजी पोलीस स्टेशन अचलपूर हद्दीत अवैध धंदयावर कारवाही करणे कामी पेट्रोलाँग करिता गोपनिय माहीती मिळताच अचलपूर
शहरातील पिरबावन पूरा मोहल्यात राहणारी हसिना बानो या महीले च्या घरूण चार किलो तिनसे ग्राम गांजा जप्त सदर माहीती वरून स्थानिक गून्हे शाखेचे पथक व पोलीस स्टेशन अचलपूर याचा पथकाने छापा आरोपी महीला हसिना बानो शेख अहमद याचा घरून चार कि. तिनसे ग्राम किमत 43000 / रूपये चा माल जप्त पोउपनी मंगेश भोयर ,स्थानिक गून्हे शाखा अमरावती ग्रामीण यानी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अचलपूर येथे अप. क्र. 330 /2021 कलम 8 (क) ,20 (ब ) द) ,( ब ) 25 एनडीपीएस अॅज्ञ्ट प्रमाणे आरोपी महीला नामे 1) फरजाना बानो शेख कदीर वय 45 हसिना बानो शेख अहमद वय 70 याच्या विरूध्द गून्हा दाखल करण्यात आला सदर ची कारवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ सा…मा. अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सावत सा.मा. उपविभागिय पोलीस अधिकारी अबदागीरे सा. याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वामूशा तपन कोल्हे पोलीस निरीक्षक पो.स्टे. अचलपुर माधव राव गरूड याचे नेतृत्वात स्थानिक गून्हे शाखेचे पोउपनि मंगेश भोयर ,सफी मूलचद भाबुरकर ,पोहना, अमित वानखडे नापको यूवराज मानमोठे नापीको मंगेश लकडे ,नापोका. निलेश डागोरे, नापोको स्वप्नील तंवर चालक नापोका निवेश तेलगोटे पोलीस स्टेशन अचलपूर चे सपोनि रविद्र बारड.पोहेका पूरूषोम बावणेर पोको श्रीकृष्णा अवसार शेख मूज्जफर महीला पोको वैशाली कल्हाणे यानी केली

ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे दिले आदेश..

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात न देणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणाऱ्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर कठोर कारवाई करत एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

यावल तालुक्यातील चुंचाळे येथी ग्रामसेविका बाविस्कर यांनी किन्ही येथून बदली झाली असून त्यांच्या कार्यालयात त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. प्रियंका बाविस्कर यांना वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला होता.

यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता. तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली. या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

नांदुरा तालुक्यात महात्मा फुले ई महासेवा केंद्राकडून विधवा महिलेची फसवणूक,

0

 

विधवा महिले ने केली पोलीस स्टेशनला तक्रार,

महात्मा फुले महा-ई-सेवा केंद्रावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बुलढाणा :- दिनांक 30/11/2021 रोजी नांदुरा तालुक्यातील महात्मा फुले ई महा सेवा केंद्रा कडून महिलेची फसवणूक केल्याचे उघड तालुक्यातील महिला सरस्वती राजकुमार चंदन या महिलेकडून ई महा सेवा केंद्रा कडून 5 हजार रुपये घेतले,असे त्या महिलेने व्हिडीओ द्वारे सांगितले, फसवणूक करणाऱ्या महात्मा फुले महा ई सेवा केंद्रावर नांदुरा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, फसवणूक करणाऱ्या महिलेचे पतीची कोरोना मध्ये निधन झाले त्या करिता संजय गांधी निराधार योजना काम करून देण्यासाठी प्रकरण एक वर्ष झाले,दिले आहे ईमहा सेवा केंद्राकडे १ वर्षापासून पासून चकरा मारत आहे ,आज ते महिला तहसिल कार्यालय मध्ये नायब तहसीलदार शैलेंद्र चव्हाण यांच्या समोर महिलेचे नाव सरस्वती चंदन यांनी ई महा सेवा केंद्राने माझी फसवणूक केली, असे नायब तहसीलदार यांच्याकडे तोंडी तक्रार दिली,असे प्रकार नांदुरा तालुक्यात होत आहे,ई महा सेवा केंद्रा कडे अधिकाऱ्यांचे वचक राहिलेले नाही, महात्मा फुले ई महा सेवा केंद्राच्या अनेक तक्रारी झालेले आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही, नायब तहसीलदार व पत्रकार यांच्या समोर ई महासेवा केंद्र संचालिका सौ.संध्या निनाजी तायडे व पती यांनी तक्रार करते महिलेला मारहाण करण्याचा प्रयन्त केला,आणि पत्रकारासोबत हुज्जतबाजी केली, या अगोदर बनावट प्रमाणपत्र वाटप केलेल्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना कडे तक्रार दिलेल्या होत्या अजून त्यांच्यावर त्याही महा ई सेवा केंद्रावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे दिसून येते तर या महिले ला कोणता न्याय भेटेल या गोष्टी कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे,.

मुदिता बहुद्देशीय महिला मंडळातर्फे संविधान दिन साजरा

0

 

उषा पानसरे  कार्यकारी
संपादिका मो.9921400542

अमरावती– मुदिता बहुउद्देशीय महिला मंडळ विश्वशांती नगर शेगाव ,रहाटगाव रोड अमरावती अंतर्गत 27 नोव्हेंबर रोजी संविधान सोहळा आणि महिलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मीनाक्षी कारवाडे, अँड. सुषमा बिसने,पावर ऑफ मिडियाच्या शहर अध्यक्ष मंजू ठाकरे, आकाशवाणीच्या निवेदिका अनिता बाजड, अँड. राजेश गवळी या कार्यक्रमाला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मीनाक्षी कारवाडे तसेच प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाबाबत आपापली मते मांडली. संविधानामध्ये महिलांचे हक्क व अधिकार यावर चर्चा करण्यात आली. विपिन तातड यांनी महिलांवर कशा प्रकारे अन्याय व अत्याचार होतात यावर एक rap सादर केला.
कार्यक्रमाचे संचालन रूपाताई वाघमारे यांनी तर आभारप्रदर्शन सीमा कोकाटे यांनी मानले.” हे भारत देशा ” या क्रांती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नगरसेविकेच्या निवासस्थानी तब्बल ८४ मतदारांची नोंदणी! निवडणुक विभागाकडे चौकशीची मागणी

0

 

हिंगणघाट दि.३० नोव्हेबर
स्थानिक नगरपालिका मतदारसंघाअंतर्गत असलेल्या बिडकर वार्ड,यादीचा भाग क्र.२०८ व २०९ प्रभाग क्र.७ मधील घर नं.७९ या एकाच निवासस्थानाच्या पत्त्यावर एकूण ८४ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. या निवासस्थानाचे पत्त्यावर तेथे राहणाऱ्या व्यतिरिक्त सुमारे ८४ इतर मतदारांची नोंद आहे, हे ८४ मतदार इतरत्र राहत असून हे बोगस मतदार असल्याची शंका निर्माण झाली आहे.
यामुळे या प्रभागातील मतदारांमधे संभ्रम निर्माण झाला असून या शंकेचे निरसन
करण्यासाठी सौ.वंदना दिनेश वाघ,रा.बिडकर वार्ड यांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला असून याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास आन्दोलनाचा इशारासुद्धा निवेदनाद्वारे दिला आहे.
आक्षेप घेणारी अर्जदार सन २०१६ मधील नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार होती.
हिंगणघाट पालिका मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या बिडकर वार्ड,यादी भाग क्र.२०८ व २०९ प्रभाग
क्र.७ मधील घर नं.७९ या एकमेव घराच्या पत्त्यावर एकूण ८४ मतदान कार्ड धारकांची नोंद आहे.तसेच या पत्त्यावर ८४
रहिवाशी असल्याची नोंद आहे,यासंदर्भात पुराव्या करिता मतदारयादीसुद्धा या निवेदना सोबत जोडण्यात आली आहे. परंतु या पत्त्यावर राहणारे जवळपास सर्वच मतदार ओळखपत्र धारक हे या पत्त्यावर रहात नसुन ते इतरत्र राहतात असा आक्षेपही यावेळी घेण्यात आला.या बाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली असून बोगस मतदान सिद्ध झाल्यास मागील सन २०१६ मधील नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत सदर तक्रारकर्त्यां महिलाउमेदवाराचा १०६ मतांनी पराभव झाला होता.
यास जबाबदार कोण? असा सवालही अर्जदाराने उपस्थित केला आहे.
उपरोक्त प्रकरणाची सखोल चौकशी करुन येत्या होणाऱ्या नगर पालिका सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक व्हाव्या अशी मागणी करण्यात आली आहे.
उपरोक्त प्रकरणी अधिक चौकशी केली असता तक्रारकर्त्यां सौ.वाघ यांनी दिलेला निवासस्थानाचा क्रमांक याच प्रभागातील कार्यरत नगरसेविकेचा असून तिने नुकताच पक्षबदल केलेला आहे.
या बोगस मतदारप्रकरणी निवडणुक यंत्रणा काय निर्णय घेते याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

करंज्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा भाजपा मद्ये प्रवेश..

0

 

कारंजा (घा):- वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करणारे मुस्लिम समाजाचे नेते शेख अकबर, शेख युनूस व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते राजू सोंनबरसे यांनी आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे व माजी सरपंच शिरीष भांगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत भारतीय जनता पक्षामद्ये आमदार दादाराव केचे व माजी सभापती मोरेश्वर भांगे यांच्या उपस्थिती मद्ये प्रवेश केला.

प्रवेशकर्त्यानी यावेळी सांगीतले की आर्वी विधानसभेचे नेतृत्व आमदार दादाराव केचे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील मोठया प्रमाणात विकास साध्य केला आहे. याउलट मागील पाच वर्षापासून कारंजा नगर पंचायत वर काँग्रेस ची सत्ता असताना काँग्रेस च्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या घोटाळ्यांना कंटाळून तसेच काँग्रेस च्या नेतृत्वाने कारंजा शहराला विकासापासून कोसो दूर ठेवत, मतदानाच्या वेळी भूलथापा देवून गावाची दिशाभूल करत मतपेट्या पुरताच विचार केला त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याकरिता आपण आज भाजपा मद्ये प्रवेश करीत असल्याचे सांगीतले.. शेख अकबर व शेख युनूस यांच्या प्रवेशाने नगर पंचायत निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठा उलटफेर पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

प्रवेश करतेवेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, तालुका अध्यक्ष मुकुंदा बारंगे, शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, कारंजा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शेख मेहबूब, माजी नगरसेवक शेख निसार, संजय कदम, राजू काळपांडे, अजय कावडकर, राजू वंजारी, बाबा मांनमोडे, अनिल वंजारी, सुदीप भांगे,राजू डोंगरे, सुधाकर दुर्गे किशोर भांगे, अरुण चाफले, युवा मोर्चा चे मंगेश सिडाम, वेदांत घिमे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

साकळी येथे जल्लोषात रंगणार क्रिकेटचा ‘महासंग्राम’ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन महिनाभर चालणार क्रिकेटचे सामने

0

 

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

जयभारत क्रिकेट क्लब,साकळी यांच्या वतीने साकळी ता.यावल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आलेले असून दि.२८ रोजी क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन जि.प.शिक्षण,क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील(छोटूभाऊ) तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी ग्रा.पं.सदस्य दिपक नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन या क्रिकेटच्या महासंग्रामस सुरुवात करण्यात आली आहे .याप्रसंगी यावल पंचायत समिती माजी उपसभापती तथा व पं.स.सदस्य दिपक पाटील,शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण सोनवणे( गोटूभाऊ )ग्रा.पं.सदस्य दिनकर माळी,जगदीश मराठे, सामाजिक कार्यकर्ते संदिप तायडे, नितीन फन्नाटे,सुरेश बडगुजर यांचेसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फलंदाजी करून उद्घाटन करण्यात आले.आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदरील क्रिकेट सामन्याचे आयोजन मनवेल रोडच्या लगतच्या मैदानावर करण्यात आलेले आहेत. या किक्रेट टूर्नामेंटमध्ये साकळी व परिसरातील जवळपास ४५ क्रिकेटच्या संघांनी सहभाग घेतलेला आहे. जवळपास एक महिनाभर क्रिकेटचे सामने चालणार आहे.प्रत्येक सामना हा बारा ओव्हरींचा खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होणाऱ्या संघास कै. अण्णासाहेब सूर्यभान हिरामण पाटील(साकळी) यांच्या स्मरणार्थ अकरा हजारांची रोख बक्षीस तर द्वितीय क्रमांकाने विजयी होणार या संघास कै.नागो श्यामजी पाटील(साकळी) यांच्या स्मरणार्थ पाच हजाराचे रोख बक्षीस जाणार आहे. सर्व सामने प्लास्टिक बॉल (विकीचा) ने खेळली जाणार आहे.एकुणच या क्रिकेट्च्या महासंग्रामात क्रिकेटप्रेमींना क्रिकेट खेळाचा मोठा आनंद घेता येणार आहे तर या खेळा दरम्यान तरुणाईचा मोठा जल्लोष असणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील पाटील यांनी केले.उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी तरूण क्रिकेट प्रेमी व गावातील नागरिक तसेच आयोजक उपस्थित होते.

तालुक्यातील हिंगोणा येथील ग्रामपंचायतीने अचानकपणे ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांनी नाराजीने ग्रामसभेला पाठ फिरवली आहे.

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

ग्रामसभेचे आयोजन करतांना दोन किंवा एक दिवसाअगोदर गावात दंवडी देवुन सूचना दिली जाते. मात्र आज दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन करतांना आज सकाळी ८ वाजेला त्यासंदर्भात गावात दंवंडी दिली. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त ग्रामसभेकडे पाठ फिरवली. ‘अचानक ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे ही ग्रामसभा कार्यकारी मंडळाच्या फायद्यासाठी आहे की गावकऱ्यांच्या हितासाठी’ असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

चार ग्रामसभेचे नियोजनाविषयी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हिंगोणा गावातील ग्रामपंचायतीने नियोजन केले नाही. ग्रामसभेत गावातील विविध समस्यांवर चर्चा केली जाते व समस्यांवर मार्ग काढला जातो परंतू आजपर्यंत गावातील ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीने कोणत्येही समस्या सोडविल्या नाही फक्त समस्या कागदोपत्रीच पूर्ण होताना दिसून येते.

“ग्रामसभेला मोजकेच ग्रा.प.सदस्य हजर राहतात तर मासिक सभेला सर्व कार्यकारी मंडळ हजर राहतात असे का ?” असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी या ग्रामसभेला पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे

अग्रसेन चौकात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एक संशयित आरोपी ताब्यात

0

 

रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रात्री २:३० वाजताच्या सुमारास शेगाव शहरातील अग्रसेन चौक परिसरातील दार्जिलिंग चहाच्या हॉटेलसमोरील पादचारी मार्गावर अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ,पोलीस उपनिरीक्षक गौतम इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक योगेशकुमार दंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र नारखेडे आणि अमोल परिहार यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला एका तासातच अटक केली आहे.
मृतक झालेला इसम मानसिक स्थिती ढासळलेला आणि भीक मागून उदरनिर्वाह करणारा होता अशी माहिती परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत असून मृतक इसमाला सईबाई मोटे रुग्णालय येथील सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्या घटनेचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू असून लवकरच या घटनेचा उलगडा होणार आहे.