Home Blog Page 4

Yavalnews /चुंचाळे साकडी शिवारातील शेतामध्ये झाले बिबट्याचे दर्शन परिसरात भितीचे वातावरण

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चुंचाळे गाव शिवारात गेल्या काही दिवसापासुन बिबट्याचा वावर असल्याचे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांकडून बोलले जात असुन, बिबट्या परिसरात फिरत असल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी असे असतांना वन विभागाचे या विषयाकडे पुर्णपणे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .tigernews

यावल तालुक्यातील वनविभागा अंतर्गत पश्चिम क्षेत्रात येणाऱ्या चुंचाळे या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या शिवारातील म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला दोन दिवसापुर्वी हा बिबट्या वावरतांना दिसुन आला,

काही महीन्यां पुर्वी देखील हाच बिबट परिसरातील अनेक शेतकरी व शेतमजुरांना ग्रामस्थांना दिसुन आला होता,

Yavalnews /दरम्यान यावलच्या वनविभागा च्या वतीने या विषयाला गांर्भीयांने न घेतले गेले नसल्याने हा बिबट पुनश्च परिसरात वावरतांना दिसुन येत असल्याने आता तरी यावल पश्चिम क्षेत्राच्या वनविभागाने तात्काळ दक्षता घेवुन काही अप्रिय घटना होण्या आदीच नियोजन करून बिबटला आवर घालावा अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे .

Umrganews /आयएमए उमरगा शाखेच्या वतीने रुग्णांसाठी शुद्ध, फिल्टर पाणी सुविधा केंद्राचे शुभारंभ

0

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

Dharashivnews /उमरगा: शहरातील आरोग्य नगर येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उमरगा शाखेच्या वतीने पोफळे यांच्या रुग्णालयाच्या शेजारी रुग्णांकरिता शुद्ध, फिल्टर पाणी सुविधा केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. या केंद्राचे पत्रकार अविनाश काळे, पत्रकार नारायण गोस्वामी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जेष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन अध्यक्षस्थानी होते. आयएमए. चे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, सचिव डॉ. नामदेव बिराजदार, डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे, डॉ. सुभाष येळंबुरे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. डॉ. ए. ए. धिंडे, डॉ. बाबर, डॉ. विजय बेडरगे, डॉ. सतीश नरवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील आरोग्य नगरीत दररोज तपासणीसाठी शेकडो रुग्ण व नातेवाईक मोठ्या प्रमाणात येतात, त्यांना शुद्ध पाणी अत्यंत माफक दरात मिळावे याकरिता पाणी फिल्टर सुविधा केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. नामदेव बिराजदार यांनी प्रास्ताविकात सांगितली.dharashivnews

डॉ. मुगळे यांनी रुग्ण सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयएमए. ने फिल्टर पाण्याची सोय केल्याचे सांगून यापुढेही सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. जेष्ठ नेते डॉ. महाजन यांनी आयएमए च्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमात सातत्य असावे, रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची संख्या मोठी आहे. विविध कार्यक्रमासाठी एक सुसज्ज सभागृह कार्यान्वित व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Umrganews /आयएमएचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रशांत मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. कपिल महाजन, डॉ. दत्तात्रय खळगे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. राजकुमार कानडे, डॉ. अजींत शिंदे, डॉ. अभय शिंदे, डॉ. सिद्राम खाडे, डॉ. बुटुकगे, डॉ. सागर पतंगे, डॉ. निलेश महाजनी, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय मेनकुदळे, सचिव प्रा. जोशी, प्रा. सोमशंकर महाजन आदींची उपस्थिती होती.

Umrganews /भूकंपग्रस्त भागातील योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष “-सुनिता पावशेरे.

0

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : उमरगा आणि लोहारा या भूकंपग्रस्त तालुक्यातील १६ गावांना जल जीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळून तीन वर्षे होवून गेली. या योजनेचे कामही पूर्ण झाले असताना अद्यापही पाणीपुरवठा सुरू होत नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा कलदेव निंबाळच्या उपसरपंच सुनीता पावशेरे यांनी जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांना या संदर्भात ग्रामसभा ठरावासह (या.२४ )निवेदन देवून चर्चा केली.dharashivnews

व ही महत्वपूर्ण योजना त्वरीत चालू करण्याची यावेळी मागणी केली.
या महत्वाच्या योजनेअंतर्गत कलदेव निंबाळा गावासह बलसूर एकूरगा,पेठसांगवी जवळगा बेट, नारंगवाडी ,माडज, नाईचाकूर आदी उमरगा तालुक्यातील गावांचा समावेश आहे .तर लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तुर, होळी, तावशीगड, सालेगाव, जेवळी, दक्षिण जेवळी आदी गावाचा समावेश आहे.शासनाने १२५ कोटी पेक्षा जास्त निधी यावर खर्च करुनही केवळ महावितरणाच्या जुनी थकबाकीचे कारण देत याकडे अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे.

मागील महावितरणची थकबाकी शासनाने माफ करावी.स्थानिक आमदार व पालक मंत्री यांनी याबाबत जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता, महावितरण मुख्य अभियंता यांच्यासह त्वरित बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा .धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था भूकंपग्रस्तांची झाली आहे.त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावीत असे दोन्ही तालुक्यांतील सामान्य नागरिक बोलत आहेत. पावसाळा संपल्याने पाणी टंचाई जाणवण्या अगोदरच याचे नियोजन होणे आवश्यक आहे.

Umrganews /याबाबतीत अनेक वेळा भेटी घेवून, चर्चा ,ठरावास निवेदन दिले होते.आता योजना लवकर चालू नाही केल्यास दोन्ही तालुक्यांतील महिला,सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण करावे लागेल असा ईशाराही सुनिता पावशेरे यांनी निवेदनात दिला आहे.

Breakingnews /हिंगणघाटजवळ वना नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- तालुक्यातील वनी शिवारात वना नदीच्या पात्रात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पाण्यावर तरंगताना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. परिसरात काम करत असताना एका नागरिकाला हा मृतदेह दिसून आल्यानंतर त्याने तात्काळ संबंधितांना माहिती दिली.

माहिती मिळताच हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, एपीआय थूल यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल जगदीश चव्हाण, बावणे, सुटे व वैद्य हे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह वना नदीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ, थडग्याच्या परिसरात आढळून आला.

सदर इसमाच्या अंगावर टी-शर्ट, कोट व हाफ पॅन्ट होती. प्राथमिक पाहणीत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक चौकशी करून ओळख पटविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट येथे पाठविण्यात आला आहे.

Hingnghatnews /सदर मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून पुढील सखोल तपास हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू आहे.

patrakarnews/संग्रामपूर येथे पत्रकार दिन साध्या स्वरुपात साजरा करणार!

0

 

संग्रामपूर(अनिलसिंग चव्हाण )ः-मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची सभा दि.२५ / डिसेंबर/ २०२५ रोजी तालुका कार्यालय वरवट (बकाल) येथे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

सभेत आसे ठरविण्यात आले की,काही अपरिहार्य कारणास्तव ह्या वर्षी दि.६ /जानेवारी /२०२६ रोजी पत्रकार दिन हा कोणतेही उपक्रम व सत्कार समारंभ,बक्षिस वितरण इतर कार्यक्रम न घेता साध्या स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.

सभेमध्ये मागील सभेचा आढावा घेऊन केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.व विविध विषयावर चर्चा करण्यात येवून संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार सःघाचे अध्यक्ष स्व. केशव घाटे (अण्णा) यांचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात निधन झाल्याने येत्या ६ / जानेवारीला पत्रकार दिनी कोणत्याही प्रकारचे विविध उपक्रम व सत्कार समारंभ तसेच बक्षीस वितरण असे इतर कार्यक्रम न घेता फक्त पत्रकार दिनी स्व. केशव घाटे यांच्या बाबतीत दुखवटा व्यक्त करून त्यांना व इतर ठिकाणी निधन झालेल्या पत्रकारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून पत्रकार दिनाचा समारोप करण्यात येईल.

तरी तालुक्यातील आपल्या सर्व पत्रकारांनी पत्रकार दिनी उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात आले. ह्यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबईशी सलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

char sahib zada/चार साहेबजादे शहीद सप्ताहानिमित्त संग्रामपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

संग्रामपूर /— चार साहेबजादे शहीद सप्ताहानिमित्त संग्रामपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, देश व मानवतेसाठी बलिदान देणाऱ्या चार साहेबजाद्यांच्या शहीद सप्ताह निमित्त दिनांक 26 डिसेंम्बर 2025 रोजी संग्रामपूर पंचायत समिती चौक श्री हनुमान मंदिरसमोर शीख शिकलीकर मित्र मंडळ, वकील संघ संग्रामपूर व विश्व हिंदू परिषद बजरंग दल,व्हाईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश देण्याचा उद्देश आहे.

या रक्तदान शिबिरात संग्रामपूर तालुक्यातील युवक, सामाजिक संघटना, विविध समाजबांधव तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, गरजू रुग्णांच्या जीवितासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले जाणार आहे.

या उपक्रमातून चार साहेबजाद्यांच्या शौर्य, त्याग आणि मानवतेच्या मूल्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या पवित्र कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन वकील संघाचे ऍड.गणेश क्षीरसागर , बजरंग दल जिल्हासह संयोजक भारत बावसकर, व व्हाईस ऑफ मीडिया तसेच शिख सिकलकर मित्र मंडळकडून पत्रकार दयालसिंग चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.

शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंह महाराज यांच्या चार सुपुत्रांनी ज्यामध्ये साहिबजादा अजितसिंह,साहिबजादा जुजारसिंह, साहिबजादा जोरावर सिंह, व साहिबजादा फतेह सिंह या चार साहिबजादे म्हणून ओळखले जाते.धर्म, सत्य आणि मानवतेसाठी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील सुवर्णअध्याय मानले जाते.

char sahib zada/अल्पवय असूनही त्यांनी अन्याय, जुलूम आणि धर्मांतराच्या दबावासमोर न झुकता अपूर्व धैर्य दाखवले.इ.स. १७०५ मध्ये मुघल सत्तेच्या जुलमी कारभाराविरुद्ध उभे राहताना गुरु गोबिंदसिंह महाराजांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

Nivdnuknews /यावल नगरपालिकेत सौ.छाया अतुल पाटील नगराध्यक्षपदी विजयी; भाजपला धक्का

0

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सौ. छाया अतुल पाटील यांनी १४,१०६ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना ९,०५६ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या स्वाती मनोहर पाटील यांना ७३४, तर अपक्ष शबानाबी आरिफ सुलेमानी यांना २०६ मते मिळाली.

नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकूण ११ प्रभागांतील निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या.

 

प्रभागनिहाय निकाल (मतांसह)

प्रभाग क्र. १

१-अ (अ.जा.) – अपक्ष शिला श्रीधर सोनवणे (५७९) विजयी; तायडे छाया कौतिक (एमआयएम) ३२८, सोनवणे पूनम देविदास (भाजप) ३२६, गजरे अजय विजय (राष्ट्रवादी) २१६, सोनवणे मनोहर बाबु (काँग्रेस) १५२, सावकारे यशोदाबाई पंडित (शिवसेना) ३९.

१-ब (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमेनाबी शाकीर खान (७०२) विजयी; मोमीन सुमय्या शेख समीर (अपक्ष) ३४४, निगार बी मोहम्मद अरशद (काँग्रेस) ३०३, महाजन रत्नाबाई गणेश (भाजप) २५४, बारी रंजना निळकंठ (शिवसेना) ३५.

 

प्रभाग क्र. २

२-अ (अ.ज.) – भाजपच्या रुबाब महमंद तडवी (१,१९२) विजयी; तडवी हुसेन जहांगीर (उबाठा) ६८५, तडवी मनोज लुकमान (शिवसेना) ५९९, ठाकुर संतोष राम (अपक्ष) ६३.

 

२-ब (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंजुम बी कादीर खान (१,२८०) विजयी; फेगडे वंदना भूषण (भाजप) ९२३, चौधरी भारती अभिमन्यु (उबाठा) २९५, सोनार ज्योती नितीन (शिवसेना) ३३, पाटील सरला रितेश (अपक्ष) ३४.

 

प्रभाग क्र. ३

३-अ (ना.मा.प्र. महिला) – काँग्रेसच्या शाहीन बानो शे. रज्जाक (९१०) विजयी; खाटिक जुबेदाबी शेख (राष्ट्रवादी) ७२८.

 

३-ब (सर्वसाधारण) – अपक्ष इमाम रजा समीर खान (१,३५५) विजयी; शे. असलम शे. नबी (काँग्रेस) ८०६, बारी राजेंद्र शामराव (शिवसेना) ९०.

 

प्रभाग क्र. ४

४-अ (अ.जा. महिला) – काँग्रेसच्या शालुबाई भालचंद्र भालेराव (१,१७२) विजयी; जंजाळे लता अनिल (भाजप) ३३४, लोखंडे समिता अरुण (राष्ट्रवादी) १८२.

 

४-ब (सर्वसाधारण) – काँग्रेसचे साबी साबी कमरुत्री (१,०८५) विजयी; खा सईदा बी सलाम (राष्ट्रवादी) ४६१, भालेराव सदानंद पंडित (शिवसेना) १२५.

 

प्रभाग क्र. ५

५-अ (ना.मा.प्र.) – काँग्रेसचे निसार हमीद शेख (८२२) विजयी; पिंजारी एजाज कादर (अपक्ष) ७१८, कुरेशी गणी साबीर खान (अपक्ष) ५५८, खाटीक अजहर अनवर (अपक्ष) ४४.

 

५-ब (सर्वसाधारण महिला) – काँग्रेसच्या सईदा बी मोहम्मद याकूब (१,०९१) विजयी; खान रुक्सारजबीन जामीर (अपक्ष) १,०४२.

 

प्रभाग क्र. ६

६-अ (ना.मा.प्र. महिला) – काँग्रेसच्या रुबीना उमर कच्छी (१,५८०) विजयी; शाहीन बी शेख रशिद (अपक्ष) ४२१.

 

६-ब (सर्वसाधारण) – अपक्ष करीम कासम कच्छी (१,०९८) विजयी; मनियार तनवीर करीम (काँग्रेस) ८५०, सपकाळे जागृती सागर (शिवसेना) ६७.

 

प्रभाग क्र. ७

७-अ (ना.मा.प्र. महिला) – भाजपच्या कल्पना दिलीप वाणी (९४४) विजयी; धोबी रेखाबाई संतोष (उबाठा) ६३९, बडगुजर आशा शांताराम (अपक्ष) ४६६.

 

७-ब (सर्वसाधारण) – अपक्ष पराग विजय सराफ (८७६) विजयी; गडे सुरेखा सुरेशचंद्र (भाजप) ५७४, कोळी शरद रंगु (उबाठा) ३४३.

 

प्रभाग क्र. ८

अ (सर्वसाधारण महिला):

बारी संध्या पुंडलिक – भारतीय जनता पार्टी(८३८)

बारी वैशाली निलेश – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)(१६००) विजयी.बारी सुनिता संजय – अपक्ष(७४)

 

८-ब (सर्वसाधारण) – उबाठा गटाचे सागरकुमार सुनील चौधरी (१,६२६) विजयी; बारी गोविंदा मधुकर (भाजप) १,०३६.

 

प्रभाग क्र. ९

९-अ (सर्वसाधारण महिला) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा निरज चोपडे (१,१७४) विजयी; महाजन देवयानी गिरीष (भाजप) ७१३.

बारी मनिषा नितीन ४२

 

९-ब (सर्वसाधारण) – भाजपचे राकेश मुरलीधर कोलते (१,३९७) विजयी; कचरे राहुल राजेंद्र (उबाठा) ५०४.

 

प्रभाग क्र. १०

१०-अ (ना.मा.प्र.) – भाजपचे योगेश विजय चौधरी (७०७) विजयी; करांडे राजेश कमलाकर (अपक्ष) ६३१, चौधरी युवराज विश्वनाथ (उबाठा) २६४.

 

१०-ब (सर्वसाधारण महिला) – भाजपच्या नंदा राजेंद्र महाजन (१,३००) विजयी; कोळी जागृती दुर्गादास (उबाठा) २४१.

मेघा विजय कासार ३९

 

प्रभाग क्र. ११

११-अ (अ.ज. महिला) – भाजपच्या सविता विजय नन्नवरे (२,१२८) विजयी; कोळी सुरेखा शरद (उबाठा) १,४०६.

 

११-ब (ना.मा.प्र.) – भाजपचे हेमराज जगन्नाथ फेगडे (१,७२३) विजयी; पाटील अतुल वसंत (उबाठा) १,५०६.

चौधरी मधुकर मुरलीधर ३२१

 

११-क (सर्वसाधारण महिला) – भाजपच्या शुभांगी रोशन यवले (१,३६४) विजयी; शिंदे मिरा नरेंद्र (उबाठा) ९१७, अडकमोल आशालता वासुदेव (शिवसेना) ९११, शिके पुजा विशाल (अपक्ष) ४०२.

पक्षनिहाय बलाबल

भाजप – ८, काँग्रेस – ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ३, शिवसेना (उबाठा) – २, अपक्ष – ४.

नगराध्यक्षपदी छाया अतुल पाटील यांच्या विजयामुळे नगरपालिकेच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात सत्तास्थापन व विकासकामांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hingnghatnews /हिंगणघाटमध्ये भाजपची सत्ता; जनतेचा कौल भाजपच्या विकासाला, नयना उमेश तुळसकर नगराध्यक्षपदी विजयी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : हिंगणघाट नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक व दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नयना उमेश तुळसकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून, हा विजय म्हणजे भाजपच्या विकासकामांवर जनतेने टाकलेली शिक्कामोर्तबच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नगर पालिकेच्या एकूण २० प्रभागांपैकी बहुसंख्य प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांनी विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शहरातील विकास, पारदर्शक कारभार आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावी लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या भाजपच्या धोरणाला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला आहे.

प्रभाग क्रमांक ३ ते २० दरम्यान बहुतांश ठिकाणी भाजप उमेदवारांनी बाजी मारली असून, प्रभाग क्रमांक ५, ६, १०, ११, १३, १४, १६, १७ आणि १८ मध्ये भाजपने दुहेरी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. काही प्रभागांमध्ये अपक्ष व इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले असले, तरी एकूण चित्र भाजपच्या बाजूने झुकलेले स्पष्टपणे दिसून आले.

या विजयामुळे शहरात भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

हिंगणघाटच्या विकासासाठी भाजपला मिळालेला हा कौल म्हणजे आमदार समीर कुणावार यांच्या स्थिर, सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

Umrganews /स्ट्रीट लाईट सुरू करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आ. प्रवीण स्वामी यांचे आंदोलन मागे

0

 

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : उमरगा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर तलमोड दस्तापूर दरम्यानच्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तलमोड जवळील टोल बंद करण्यात इशारा आ. प्रवीण स्वामी यांनी दिला होता. मात्र सात दिवसात ह्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले आहे.dharashivnews

राष्ट्रीय महामार्गावर तुरोरी, जकेकुर चौरस्ता, येळी, दाळिंब,
मुरूम मोड, या ब्रिजवर गेल्या अनेक महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद होत्या. त्यामुळे वाहनधारकांची मोठा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यासाठी संबंधित विभागास तीन वेळेस लेखीपत्र दिले होते.

Umrganews /मात्र या स्ट्रीट लाईट दुरुस्त केल्या जात नसल्याने आ. प्रवीण स्वामी यांनी १७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावरील हा टोल बंद करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता. या
मार्गावर मोठी वर्दळ असते आणि अनेक भागात लुटीचे प्रमाण वाढले आहे.

Dharashivnews त्यामुळे प्रवासी भयभीत झाले असताना राष्ट्रीय महामागार्ची अधिकारी याकडे जाणून मधून दुर्लक्ष करत होते. मात्र आमदार स्वामी यांनी टोलबंदच्या या तंबीनंतर येत्या सात दिवसात ह्या ट्रीट लाईट सुरू करण्याची लेखी आश्वासन दि. १७ डिसेंबर रोजी आ.प्रवीण स्वामी यांना दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Umrganews /जगद्गुरु रामानंद संप्रदाय सत्संग सेवा केंद्राच्या वतीने उमरगा तालुक्यात १६ वनराई बंधारे

0

श्री नरेंद्रचार्य महाराज उमरगा सत्संग सेवेचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
————

सूर्य मराठी न्यूज उमरगा

उमरगा : जगद्गुरु रामानंद संप्रदाय श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या सत्संग सेवा केंद्राच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातील दाबका, तलमोड, चिटकोट, जहागीर चिंचोली, नागराळ, उमरगा शहर, येळी, सुंदरवाडी, धाकटेवाडी, मळगी, अशा विविध ठिकाणी उमरगा तालुक्यात एकूण १६ वनराई बंधारे बांधून जलसंधारण, आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या या संप्रदायाने महाराष्ट्रात एकूण असे पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.dharashivnews

वनराई बंधारा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती, वाळू आणि दगड भरून नदी-ओढ्यांच्या पात्रात चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर या
दरम्यान हा कच्चा बंधारा बांधण्यात आला आहे.
या ठिकाणचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत जिरावे व या ठिकाणचे सिंचन वाढावे या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला आहे.umrganews

गेल्या महिण्यात या संप्रदायाने १ लाख १० हजार वृक्षारोपण ही केले आहे.

Dharashivnews /रक्तदाना मध्येही हा सांप्रदाय अग्रेसर असतो. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करुन १ लाख ५० हजार बॉटल रक्त संकलित करण्याचे उद्धीष्ट असल्याचे या संप्रदायाने सांगितले आहे.
वनराई बंधारा बांधण्यासाठी गुरुभगिनी, गुरुबंधू, यांनी श्रमदान केले.