Home Blog Page 41

Eknathshinde viral video/ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओची पूर्ण कहाणी

0

 

Eknathshinde viral video:ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात पाणीपुरी विक्रेत्याच्या गाड्यावर झिलकत्या पाणीपुरी आणि दहीपुरीचा आनंद घेतला.

यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर म्हशीच्या दहीपुरीसह पाणीपुरीचा आस्वाद घेतला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या सरळ स्वभावावर पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष गेले आहे.

Wardh Accdent / रानडुक्करच्या अपघातात पोलीस कुटुंब उध्वस्त

पाणीपुरीचा आस्वाद घेताना.चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या विसर्जन मिरवणूकच्या दरम्यान हा प्रसंग घडला.

एकनाथ शिंदे यांनी वाटेत मिळालेल्या पाणीपुरी विक्रेत्याशी संवाद साधला आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर खिशातून नोटांचा बंडल काढून काही नोटा त्या कर्मचाऱ्याच्या हातात दिल्या.

त्यांच्या बांधिलकीमुळे आणि दिलदारपणामुळे सर्वांची प्रशंसा होत आहे.

दिलदारपणाची प्रशंसा :या प्रसंगाने एकनाथ शिंदेंचा सहज स्वभाव सर्वांच्या नजरेसमोर आणून दिला आहे.

सोशल मीडियावर लोक त्यांच्या या दिलदारपणाची प्रशंसा करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वात हा चैत्र नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.

सध्याच्या उत्सवातील विशेषता :चैत्र नवरात्र हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. या उत्सवाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास दाखवलेली सहभागिता आणि सहजता प्रेक्षकांना खूप भावली आहे.

Eknathshinde viral video:यावेळी त्यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांबरोबरच, सामान्य नागरिकांशीही संवाद साधला.

Wardh Accdent / रानडुक्करच्या अपघातात पोलीस कुटुंब उध्वस्त

0

 

Wardh Accdent:सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा तालुक्यातील तरोडा येथे घडलेल्या भीषण अपघातात वडनेर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत वैद्य हे त्यांच्या कुटुंबासह प्राण गुमावले.

हा अपघात रस्त्यावर रानडुक्कर येत असल्याने वैद्य यांना गाडीवरील नियंत्रण गमवावे लागले,

Maharashtra Cabinet Meeting / राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : घरांसाठी मोफत वाळू आणि झोपडपट्टी पुनर्वसनाला गती

ज्यामुळे त्यांच्या स्विफ्ट गाडीने समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला धडक बसली.

या दुर्दैवी घटनेत प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी प्रियंका, तीन वर्षाचा मुलगा प्रियांश आणि पाच वर्षाची मुलगी माही यांचा मृत्यू झाला.

प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,

Wardh Accdent / रानडुक्करच्या अपघातात पोलीस कुटुंब उध्वस्त

जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय मांडगाव येथील श्रीराम मंदिरात महाप्रसाद कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी गेले होते आणि तिथून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Wardh Accdent: अपघाताच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित माहिती घेतली व मृत्यू मुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली दिली.

mohan bhagwat/ वाराणसीमध्ये मोहन भागवतांचे ऐतिहासिक विधान: भगव्याचा आदर असला तर मुस्लिमांनाही संघाच्या शाखेत स्थान

0

 

mohan bhagwat/:उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहभागातून मोठी सांस्कृतिक आणि समाजिक चर्चा सुरू झाली आहे. प्रतिष्ठित विद्वान आणि सामाजिक नेत्यांशी संवाद साधत असताना,

भागवत यांनी राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक समानतेचे स्पष्टीकरण दिले आहे, ज्यामुळे भारतातील विविध समाजाच्या गतिविधींवर विशेष लक्ष केंद्रित होत आहे.

Ram Navami /श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला

भारत माता की जय या घोषणेतून राष्ट्रीय भावनेला अभिव्यक्त करण्यात कसलाही संकोच नसेल आणि भगव्या ध्वजाचा आदर असेल,

या अटीवर मुस्लिम समुदायाच्या लोकांनाही संघाच्या शाखेत सामील होता येईल, असे भागवत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जे लोक स्वतःला औरंगजेबाचे वंशज मानत नाहीत, त्या सर्व भारतीयांना संघाच्या शाखेत स्वागत आहे.

भारतातील विविध धर्मांचे लोक असले तरी सर्वांची संस्कृती सारखीच आहे, हे महत्वाचे विधान त्यांनी केले.

मोहन भागवत यांची वाराणसी दौरा

mohan bhagwat/ वाराणसीमध्ये मोहन भागवतांचे ऐतिहासिक विधान: भगव्याचा आदर असला तर मुस्लिमांनाही संघाच्या शाखेत स्थान

भागवत यांनी वाराणसीच्या दौऱ्यात जातिभेद नष्ट करणे, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि बलशाली समाज निर्माण करणे या विषयांवर भाष्य केले.

mohan bhagwat :त्यांच्या विशेष भेटींमध्ये विविध सामाजिक आणि धार्मिक नेते सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, मोहन भागवत यांनी भारताला जागतिक नेता बनवण्याच्या उद्देशाने विद्वानांशी चर्चा केली आहे

Ram Navami /श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Ram Navami /हिंगणघाट:- श्री.राम जन्मोत्सव हिंगणघाट शहरात उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

श्रीराम मंदिरात वर्षानुवर्षे असलेल्या परंपरेने सुरू रामलल्लाचा पाळणा गाऊन विधिवत पुजा अर्चना करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो रामभक्तांनी गुलाल उधळून एक दुसऱ्याचे अभिवादन केले.

Ram Mandir /श्री राम मंदिर देवस्थान संम्पती भाडे करारनामा रद्द व गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

शोभायात्रेत पौराणिक कथेवर आधारित देखावे, महिला भजन मंडळ, ढोलपथक, प्रभु श्रीराम दर्शन, बाहुबली हनुमान झाकी, मातृशक्तीसह रणरागिणी मैदानी खेळ, आकर्षक गोंडी नृत्य, श्रीराम दरबार दर्शन व आकर्षक रोषणाईसह सामाजिक व सांस्कृतिक शोभयात्रेचा समावेश होता.

शहरात एकूण चौदा शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभयात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित दर्शवली.राष्ट्रवादी चौक येथे अतुल वांदिले मित्रपरिवार तर्फे सरबत वाटप करण्यात आले.

तसेच सराफा असोसिएशन तर्फे महाप्रसाद वाटपाला भेट दिली.भक्तिमय वातावरणात जिकडे तिकडे प्रभु श्रीरामचंद्रचा जय घोषाने संपूर्ण हिंगणघाट दुमदुमून गेले होते.

Ramnavami :याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट शहराध्यक्ष बालु वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर,सुनील भुते, गजु महाकाळकर, बच्चू कलोडे,प्रवीण भुते,अरविंद रघाटाटे,किशोर चांभारे, परम बावणे,सुनील घोडखांदे,रमेश चतुर, बबलू शेख, सुशील घोडे, राहुल जाधव, वैभव साठोने,विपुल वाढई,कुणाल घोल्हर आदी उपस्थिती होते.

Ram Mandir /श्री राम मंदिर देवस्थान संम्पती भाडे करारनामा रद्द व गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

0

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

Ram Mandir:हिंगणघाट :- राम मंदिर वार्ड येथील पुरातन
श्री राम मंदीर देवस्थान यांचे जैन मंदीर वार्ड येथे नझूल शिट. क्र. 19 ब्लॉक न 10 प्लॉट नं, 88/1 व्यावसायिक देवस्थान मालकीचे आहे.

या प्लॉट चे रजिस्टर्ड भाडे पत्र करारनामा अध्यक्ष अनिरुद्ध भांदकर यांनी दि. 18 ऑगस्ट 2022 कमलकिशोर मेघराज रांका यांच्या नावाने नवीन रजिस्टर्ड भाडे पत्र करारनामा दुय्यम निबंधक हिंगणघाट यांचे कार्यालयात केला आहे.

Manikrao Kokate/ माणिकराव कोकाटे यांचे वादविवादित विधान: शेतकऱ्यांना माफी मागितली आणि वाद संपला?

अध्यक्ष यांनी भाडेकरू बरोबर संगनमत करून रजिस्टर्ड भाडे पत्र केले करारनामा दि. 18.08.2022 ला कमलकीशोर मेघराज रांका यांच्या नावाने नोंदणी केली आहे. त्यामध्ये रजिस्टर्ड भाडेपत्र करारनामा लागू करण्याची मागील महिन्यातिल तारखे पासून 01 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 पर्यन्त तीन वर्षा करीता करण्यात आली आहे. हा करारनामा मध्ये रजिस्टर्ड केल्या तारखेच्या मागच्या 8 महीने पूर्वेच्या तारीख पासून लागू केला आहे.

तसेच, आजच्या मार्केट भावानुसार भाडे पत्रा मध्ये अत्यंत अल्प दर 2000/- रुपये प्रती महिणा भाडे पत्र करारनामा करण्यात आला आहे. याचा अगोदर ही जागा नगर पालिका रेकॉर्ड मध्ये भाडेकरू पुखराज मेघराज रांका यांच्या नावाने होती. ही जागा शहराच्या मध्यभागी असल्यामुळे व्यवसाईक प्लॉट चे भाडेपत्रा मध्ये मोठा गैरव्यवहार झालेला दिसून येते.

भाडेपत्राची दुय्यम निबंधक कार्यालय हिंगणघाट मधून सत्यप्रत काढलेली आहे त्यामध्ये धर्मादाय आयुक्तची कोणतीही रीतसर परवानगी चे पत्र व विश्वस्त मंडळाची ठराव प्रत दिसत नाही.

Ram Mandir:या प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य भाडे पत्र करारनामा रद्द करण्यात यावा व होणारे देवस्थानाचे संपतीचे नुकसान वाचवण्यात यावे अशी मागणी वर्धा सहाय्यक धर्मदाय आयुक्त कडे सचिन वाघे यांनी केली.

Manikrao Kokate/ माणिकराव कोकाटे यांचे वादविवादित विधान: शेतकऱ्यांना माफी मागितली आणि वाद संपला?

0

 

Mnikrao kokate:महाराष्ट्रातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) च्या नेत्यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली होती.

कोकाटे यांनी नाशिकच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे काय करतात याचा सवाल केला होता, ज्यात त्यांनी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा आणि लग्न करतात असे म्हटले होते.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

या घटनेनंतर, ६ एप्रिल रोजी कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माध्यमांसमोर माफी मागितली व त्यांना शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेल्यास दिलगिरी व्यक्त केली.

कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना सुनावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता,

ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता कामा नये असे म्हटले होते. तसेच या काळात कर्ज भरू नये असे सुचवले होते. हे विधान शेतकऱ्यांसह विरोधकांनी नाकारले होते.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर कोकाटे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत त्यांची जोरदार टीका केली.

“कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित कोकाटेंना ज्ञात नसावे,” असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर संजय राऊत यांनीही कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Manikrao Kokate:कोकाटे यांनी आपल्या वादविवादित वक्तव्याचा पुरावा नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यात दिला, जिथे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Buldhana / जिजाऊ ज्ञान मंदिरात आनंद मेळावा

0

 

जावेद शहा बुलडाणा

Buldhana:राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. क्रॉप सायन्स कॉलेज, पळसखेड भट मध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. व पालक, विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी या आनंद मेळाव्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. आनंद मेळाव्यात पालकांचाही उस्फुर्त असा सहभाग होता .

Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

पालक स्वतः विद्यार्थ्यांसोबत आनंद मेळाव्याच्या स्टॉलमध्ये सहभागी होते. या आनंद मेळाव्यात जवळपास एकुण 75 स्टॉल होते. यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची विक्री करत जवळपास 35560 रुपयांचा व्यवसाय केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध खाद्यपदार्थाचे चविष्ट स्टॉल लावले होते. तसेच या आनंद मेळाव्यात सहभागी पालकांनी खाद्य पदार्थाचा यथेच्छ आस्वाद घेतला.

यावेळी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले की, आनंद मेळाव्याच्या माध्यमातून व्यावसायिक कलागुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाले पाहिजे आणि ते त्यांना भविष्यात नक्कीच कामी येतील. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमातून सातत्याने मुलांना आपण प्रोत्साहन देत असतो.

Buldhana :याचाच भाग म्हणून आनंद मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांच्या मार्गदर्शन लाभले. तर शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Bjpnews / भाजपा स्थापना दिवस संपन्न

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

Bjpnews:सिंदी रेल्वे येथे भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे यांच्या नेतृत्वात जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी बस स्टॅन्ड वरील पक्ष कार्यालयात आयोजन केले होते.

यावेळी पक्षाला मोठे योगदान देणारे व एका छोट्याश्या रोपट्याला कष्टाने वटवृक्ष रुपी भाजपा बनविन्यात हातभार लावणारे भाजपाचे जेष्ठ सदस्य,माजी मंडळ अध्यक्ष नरेंद्र जी सुरकार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस कार्यक्रमाला सुरुवात केली.

Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनार्थ भाषनां नंतर जेष्ठ सदस्य नरेंद्रजी सुरकार,जेष्ठ सदस्य जनकजी पालीवाल, विनायकजी झीलपे, माजी मंडळ अध्यक्ष जयंतजी बडवाईक, माजी नगरसेवक संजयजी इटणकर,जेष्ठ सदस्य महादेवजी बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रस्तविक माजी उपाध्यक्ष राजू गंधारे, संचालन जिल्हा सचिव स्नेहल कलोडे तर आभार पंकज पराते यांनी केले.

Bjpnews:यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ नेते पत्रकार आनंदजी छाजेड,जिल्हा सचिव प्रभाकरजी तडस,एकता युवा मंडळ चे नरेंद्रजी पेटकर,रामेश्ववरजी घंगारे, किशोरभाऊ भांदककर,रामभाऊ सोनटक्के,राजूभाऊ तेलरांधे,मिलिंदजी पेटकर,प्रभाकरराव तुमाने,गुल्लूभाऊ भंसाली,नरेंद्रजी सेलूकर, मोहन तळवेकर,राहुल सोरटे,अरुणराव ढेंगरे, वामनराव ढोक,चंपूभाऊ भंसाली,महिला मोर्चा च्या सौं. रोशनाताई पेटकर, सौं. वैशालीताई पेटकर,सौं. काटोले ताई व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews:हिंगणघाट : आधार फाऊंडेशनची वार्षिक सभा नुकतीच आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष जगदिश वांदिले आणि विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

आधार फाऊंडेशनच्या घटनेनुसार दरवर्षी नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येत असल्यामुळे वर्ष 2025 -26 साठी आधार फाऊंडेशनची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली. यात कार्यकारी अध्यक्ष – माधुरी शरद विहीरकर, उपाध्यक्ष अँड .इब्राहिम हबीब बख्श,सचिव सुनिल डांगरे, सहसचिव सुभाष शेंडे,कोषाध्यक्ष सुरेश गुंडे यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष जगदीश वांदिले यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करून नवीन वर्षात विविध उपक्रमे आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी नव्या कार्यकारणीला दिल्या.

यावेळी मावळते कार्यकारी अध्यक्ष जगदीश वांदिले व संस्थापक अध्यक्ष अतुल वांदीले याच्या हस्ते नवीन कार्यकारी अध्यक्ष माधुरी शरद विहिरकर यांचा व नवीन कार्यकारनी चा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सभेचे सुत्रसंचालन पराग मुडे यांनी केले तर आभार चंद्रशेखर निमट यांनी मानले.

Hingnghatnews:यावेळी डॉ.नरेंद्रकुमार मनवर, लक्ष्मीकांत धार्मिक, प्रा. डॉ.शरद विहिरकर, सुहास घिनमिने, डॉ. संजय हिवरकर,डॉ.गिरीधर काचोळे, प्रमोद बोरकर,सचिन येवले,प्रा.अभय दांडेकर,गणेश जोशी, डॉ.अनिता मनवर,माया चाफले, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, स्वाती वांदिले, वीरश्री मुडे, अनिता गुंडे आदीं सदस्य उपस्थित होते.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

0

 

शेगाव इस्माइल शेख

Buldhananews:बुलढाणा- लिंगायत समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या, समाजहितासाठी झटणाऱ्या, तळमळीने समाजकार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश मुरलीधर फिसके यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.समाजकार्याची दखल घेत सन्मानाची जबाबदारीनियुक्तीपत्रात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक

की, “ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रीय सहभाग, समाजहितासाठी असलेली जाणीव आणि निष्ठा ही खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आहे.”

ही निवड ही केवळ पदावरची नेमणूक नसून, समाजाने त्यांच्या कार्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांच्याकडून भविष्यातील अपेक्षांचा पुरावा आहे. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीयज्ञानेश्वर आप्पा साखरे हे लिंगायत समाजाच्या सशक्तीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून निःस्वार्थपणे कार्यरत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीपासून ते बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजसेवा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम आणि सामाजिक सलोख्यासाठी विविध जनजागृती मोहिमा त्यांनीयशस्वीरित्या राबवल्या आहेत.त्यांचे कार्य केवळ लिंगायत समाजापुरते मर्यादित नसून, सर्वसामान्यांसाठी त्यांनी कायमस्वरूपी सहकार्याची भूमिका पार पाडली आहे.

समाजातून उत्स्फूर्त अभिनंदनाचा वर्षावज्ञानेश्वर आप्पा साखरे यांच्या या नियुक्तीबद्दल लिंगायत समाजासह विविध समाजघटकांतून, युवक वर्गातून, महिलांमधून आणि सामाजिक संस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. ही निवड समाजासाठी एक नवे दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.भविष्यातीलसंकल्पआणिदृष्टीकोन
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना साखरे यांनी सांगितले, “ही नियुक्ती म्हणजे माझ्या समाजाने माझ्यावर ठेवलेला अमूल्य विश्वास आहे. मी ही जबाबदारी केवळ पद म्हणून नव्हे, तर समाजासाठी झगडण्याचे एक साधन म्हणून पाहतो.

Buldhananews:आगामी काळात मी युवकांमध्ये नेतृत्व जागवण्यावर, महिलांना सामाजिक मंच उपलब्ध करून देण्यावर, आणि गरजूंसाठी शाश्वत उपक्रम राबविण्यावर भर देईन.”समारोप.ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांची ही नियुक्ती म्हणजे सामाजिक कार्यकत्यांच्या संघर्षाला मिळालेली प्रतिष्ठा आहे. लिंगायत समाजाच्या नवचैतन्याची ही नवी सुरुवात मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वात समाजहितासाठी आणखी प्रभावी आणि परिणामकारक काम होईल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.