Pahalgam Terror Attack:काश्मीरमधील पर्यटकांच्या आवडत्या पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या सायंकाळी, बुलढाणा जिल्ह्यातील एका कुटुंबाला जीवदान मिळाले.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सुरू झालेल्या गोळीबारात अनेकांच्या प्राणांचा बळी गेला, पण बुलढाण्यातील पाच जण एका हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे वाचले. या घटनेत तीन पुरुष आणि दोन महिला असलेले जैन कुटुंब सुरक्षित राहत हॉटेलमध्ये आश्रय घेतले.
हॉटेलमालकाने त्यांना गोळीबार सुरू असताना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांचे प्राणी वाचले.
२८ लोकांच्या मृत्यूने झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात, बुलढाण्याचा हा जैन कुटुंबाचा जीव वाचल्याची माहिती आली आहे.
हे कुटुंब १८ एप्रिल रोजी मुंबईहून जम्मू काश्मीर भेटीस गेले होते.
सोमवारचा दिवस (२२ एप्रिल) सकाळी हॉटेलमालकाने अचानक फायरिंग सुरू झाल्याच्या धोक्याबाबत कुटुंबाला सावध केले.
कुटुंबातील सदस्य हे हॉटेलच्या आतच सुरक्षित होते, ज्यामुळे ते बचावले.
या कुटुंबात जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचा भाऊ, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे.
हल्ल्याच्या वेळेस त्यांचा जीव वाचवण्याकरिता हॉटेलमालकाचा मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचा ठरला.
पाहलगाममधील हल्ल्याचा संक्षिप्त आढावा:
काश्मीरच्या पहलगाम येथील हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी झाला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा देखील समावेश आहे.
सुरक्षा दलांनी त्वरित परिस्थिती हाताळली असून, भारतीय सैन्य, CRPF व स्थानिक पोलिसांनी मोठा मोर्चा काढला आहे. या हल्ल्यामुळे जागतिक नेत्यांनीही भारतासोबत एकजुटीची भावना व्यक्त केली आहे.
बुलढाण्यातील जैन कुटुंबाचे तपशील:
नावे: निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ. श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन
कुटुंब मुंबईहून काश्मीरला गेले होते, आणि जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी फिरून २१ तारखेला पहलगाममध्ये आले.
२२ एप्रिल सकाळी हॉटेलमधून बाहेर पडण्याचा विचार असताना, हॉटेलमालकाने गोळीबार चालू असल्याचे सांगून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला.
Pahalgam Terror Attack:या प्रकारातील मदतीने दहशतवादी हल्ल्यातून अनेकांचे प्राण वाचवले जात आहेत, तर इतर ठिकाणी सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
बुलढाणा: जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नख गळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली.
त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते.
या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे.
Nail loss Case:ही कारवाई आजाराच्या स्रोताचा शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.
Wardhanews:वर्धा :- दि. 22 :भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात दि. 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट व दि.15 एप्रिल पासुन तापमानामध्ये बरीच वाढ होऊन तापमान 40 अंश सेल्सअस पेक्षा जास्त नोंदविल्या गेले आहे. उष्मालाटेमुळे संवेदनशीलगट यामध्ये कामगार, शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, वयोवृध्द, बालके, स्त्रिया इत्यादीवर प्रतिकुल परिणाम होऊन त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात नागरिकांनी व संबंधीत यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
काय करावे सर्वांसाठी अत्यावश्यकः- तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या, अपस्मार, हृदयरोग, मुत्रपिंड, यकृतविषयक आजारामुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे, ओआरएस (ORS) म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातील पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक. नारळाचे पाणी घ्या.
हलक्या रंगाचे वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा, घराबाहेर असाल तर डोके झाका एखादे कापड वापरा, टोपी घाला, दुपट्टा किंवा छत्री वापरा डोळ्याच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तीची विशेष काळजी घ्या. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपाचा वापर करावा.
उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही किंवा माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती शक्यतो पांढरे कपडे वापरावेत नोकरदार व कामगारांसाठी :- कामाच्या जागी पिण्याचे थंड पाणी पुरवा. सर्व कामगारांसाठी विश्रांतीसाठी सावलीची जागा, स्वच्छ पाणी, ताक, प्रथमोपचार पेटी, आईस पंक आणि ओआरएसही ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायचे टाळावे. कामाची आखणी अशी करा की, ताणाच्या श्रमाच्या कामांसाठी दिवसातला तुलनेने कमी वेळ निवडला जाईल. उघड्यावर काम करणाऱ्यांना विश्रांतीच्या वेळा अधिक ठेवा आणि कालावधीही वाढवा अतिउष्णतेच्या क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या कामगारांना हलके काम द्या.
कामाचे तास कमी ठेवा. गरोदर महिला आणि आजार असलेल्या व्यक्तीकडे अधिक लक्ष द्या.इमारत अथवा घरे थंड ठेवण्यासाठी :- सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग वापरा, छत थंड ठेवणारं तंत्रज्ञान, हवेशीर, हलके, थर्माकोलचे आवरण वापर ज्याद्वारे कमी किमतीत थंडपणा राखता येईल. उष्णता बाहेरून आत येण्याऐवजी ती बाहेरच फेकली जावी, यासाठी तात्पुरते अल्युमिनियम आच्छादित पट्ट्यांसारखे परावर्तक खिडक्यांवर बसवा अथवा ग्रीन नेट चा वापर करा. घर थंड ठेवा, गडद रंगाचे पडदे वापरा रात्री काळ्या काचा, उन्हापासून बचावाची सोय असलेली छते, खुल्या खिडक्या असू द्या शक्यतो सर्वात खालच्या मजल्यावरच राहा. हरित छप्पर, हरित भिती, घरांतर्गत वनस्पती इमारत नैसर्गिकरीत्या थंड बनवून उष्णता कमी करतात.
वातानुकूलन यंत्राचे तापमान २४ सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. यातून विजेचे बिलही कमी येईल आणि आरोग्यही चांगले राहील.पशुधनासाठी :-पशुधन सावलीच्या छताखाली ठेवा आणि त्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या. त्यांच्याकडून सकाळी 11 ते दुपारी 4 काम करून घेऊ नका.
प्राण्याच्या आस-याच्या ठिकाणी छतावर स्ट्रॉच्या नळ्यांनी आच्छादन करा, त्याला पांढरा रंग द्या किंवा शेणाच्या प्लास्टरद्वारे तापमान कमी करा. पशुधनाच्या शेडमध्ये पखे, पाण्याचे फवारे करणारे यंत्र वापरा. अतिउष्णतेच्या वेळी पाण्याचे फवारे मारा आणि प्राण्यांना जवळच्या पाण्याच्या स्रोतावर थंड करण्यासाठी घेऊन जा. त्यांना हिरवे गवत, प्रोटीन फॅटला फाटा देणारा पूरक आहार द्या, मिनरल्सचे मिश्रण आणि मीठ द्या. तुलनेने थंड हवेत त्याना चरू द्या.
काय टाळावे:-उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी 12 ते 03 मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.
दारे खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका.
शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
Wardhanews / आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव श्रीपती मोरे यांनी केले आहे.
Policenews:शेगाव येथील एका रेडीमेड कापड दुकान चालवणाऱ्या तरुणावर तीन जणांनी हॉटेलमध्ये जेवण करत असताना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित चंद्रकांत पातुरकर (वय 26, रा. शंकर राजेश्वर कॉलनी, शेगाव) हे ‘आयकॉनिक रेडिमेड’ नावाचे कपड्यांचे दुकान चालवतात. दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी हरीश पारखेडे यांनी त्यांच्या दुकानात येऊन एक पँट बदलण्याची मागणी केली होती. मात्र, पँट फाटलेली असल्याने फिर्यादीने परत घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने संताप व्यक्त केला.
दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 11.50 वाजता, फिर्यादी रोहित पातुरकर हे गौरव झाडोकार व ओम नांदोवार यांच्यासोबत आठवण हॉटेलमध्ये जेवत असताना, आरोपी हरीश पारखेडे, राम चव्हाण, निखिल पारखेडे व एक अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.
Policenews:घटनेनंतर फिर्यादी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी रिपोर्ट दिला. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 118(1), 296, 3(5), 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा तपास पो. कॉ. करुटले यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Lonarnews/ छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय तरुणीवर प्रेमाच्या नावे घडलेल्या भयावह घटनेचा उलगडा झाला आहे.
आरोपी आयुब अमीर पठाण (वय २८, लोणार) या तरुणीला ओळख करून घेऊन तिच्यावर जबरदस्तीचे अवैध कृत्य केले. हा प्रकार २०२३ पासून सुरु होऊन २०२५ च्या जानेवारीतही सुरू होता.
आरोपीने तरुणीला अनेक वेळा एका हॉटेलमध्ये आणि पिकअप वाहनात बलात्कार केला. त्याचबरोबर तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली.
नकार देताच त्याने तिची बदनामी करण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुणीने ही स्थिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तरुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न करताना आरोपीने तिला शिवीगाळ व धमक्या दिल्याची माहिती मिळाली आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी तरुणीला पिकअप वाहनात नेत त्याने बलात्कार केले
, तर २६ जानेवारीला तिला आणि तिच्या भावांना जीवेमारण्याची धमकी दिली. या सगळ्या घटनेमुळे वाळूज परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
ही कारवाई चिखलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असून आरोपीविरुद्ध तातडीने कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे.
Lonarnews :या घटनेने स्थानिक समाजात मोठा सवाल निर्माण केला आहे, विशेषतः लव्ह जिहाद आणि हत्याराच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
हिंगणघाट दि.२१ एप्रिल स्थानिक तहसील कार्यालय परिसरात आज सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान झालेल्या अपघातात एका ७४ वर्षीय दिव्यांग महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतक महिला शहरातील संजय गांधी शाळेमागील न्यू यशवंतनगर येथील रहिवासी असून सावित्रीबाई राजाबाबू तिवारी अशी तिची ओळख आहे.
दुपारी ही मृतक महिला सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान ती महिला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाकरिता आली होती.
कामकाज आटोपुन ही महिला तहसील कार्यालयाचे आतील मुख्य द्वारासमोरचे परिसरात आली,याच परिसरातून निघालेल्या कार क्रमांक एम एच ३२- एएन ८४४४ ने चिरडून काढले.
परिसरातील उपस्थित काही नागरिकांनी या कार मधील ३ इसमाना दमदाटी करून महिलेला उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. कारचालक व इतरांनी सदर महिलेला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व या दरम्यान या तिघांनी तेथून कार क्र. एम एच ३२- एएन ८४४४
सह पळ काढला
अपघातादरम्यान तिचे जवळ असलेल्या आधार कार्डवरती असलेल्या मोबाईल क्रमांकावरून तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
मृतक महिलेचे कुटुंबीय स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले असता त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी कळविले.
Brekingnews:सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, पोलिस कर्मचारी अंगेश्वर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Mahsulnews:समुद्रपूर:- समुद्रपूर तालुक्यातील चिखली (उमरी) येथील कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाणेदार, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन भेट दिली.
समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे. या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहेत. परिणामी गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. गावातील लहान मुले, वृद्ध व अन्य दुर्गंधी पसरल्याने आजारी पडत आहे.
उमरी येथील प्रदीप मिलमिले यांच्या सहा वर्षीय मुलगा यामुळेच आजारी पडला आहे. दुर्गधी मुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले. त्यांची रक्त तपासणी केली असता त्यात दोष आढळून आलेत. आजार बळावल्याने या सहा वर्षीय मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधी मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती सुद्धा करू शकत नाही आहे. यामुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत आहे. त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. याकरिता दिनांक ११ मार्च २०२५ ला तहसीलदार यांना निवेदन दिले. यानिवेदनाची प्रशासनाने दखल सुद्धा घेतली नाही किवां गावात जाऊन सुद्धा बघितलं नाही, यानंतर २ एप्रिल २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
यानंतर कुकुटपालनामुळे गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील? यानंतर सुद्धा कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) व गावातील नागरिक मिळून आक्रमक भूमिका घेऊ यानंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन देण्यात आले होते.
आठ दिवसात उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तेव्हा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले व आठ दिवसात कारवाई करून कुकुटपालनाची परवानगी रद्द न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असे अतुल वांदिले यांनी सांगितले.
Mahsulnews :-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, शहराध्यक्ष मधुकर कामडी, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे,दशरथ ठाकरे, दिव्यांग सेलचे प्रदेश संघटक मारोती महाकाळकर,हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, अमोल बोरकर,गणेश वैरागडे,माजी नगरसेवक राजू भाईमारे, सुनील भुते, श्रीकांत भगत,सुभाष चौधरी, महादेव वांदिले, सुधाकर वाढई,युवक तालुका अध्यक्ष तुषार थूटे, ईश्वर पोफळे (तंटामुक्ती अध्यक्ष), विठ्ठल नन्नावरे(उपसरपंच), अनिल भगत (शिवणी उपसरपंच), हरिभाऊ ढगे वासी उपसरपंच,उमाकांत पोफळे, विजय सालवटकर ग्रा.स, रंजना कानमोडे ग्रा.स, मेघा कुमरे ग्रा.स, सविता उईके ग्रा.स, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजन, परमेश्वर पोफळे, गजानन पोफळे, देवा आमने, वसंतराव चौखे, प्रभाकर भरडे, जीवन नारनवरे,पुरुषोत्तम सालवटकर, संदीप सालवटकर, निलेश डुकरे, बंडू डुकरे, कवडू बावणे, अक्षय चाफले, विजय मुके, वाल्मीक तपासे, डोमा शेंडे, रवींद्र नखाते, गुलाब भगत,अतुल चौधरी, अमोल मुडे, सुनील घोडखादे,गोकुळ टिपले, पंकज भट्ट,रोशन थुटे, सोहम शेंडे, आकाश हुरले, कुणाल गोल्हर यांच्यासह चिखली (उमरी) गावातील शेकडो नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
jayshree tai shelke:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या दोन प्रतिष्ठित सुनांचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील करवंड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
या गावात जिजाऊ माँसाहेबांच्या सहाव्या सुनबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले
तसेच तंजावरचे राजे छत्रपती व्यंकोजी राजे यांच्या पत्नी राणी दीपाताई राजे यांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
करवंड गावाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे कारण इथले इंगळे परिवार हे स्वराज्यासाठी समर्पित होते. या गावात पूर्वी ५२ बुरूज होते,
पण सध्या केवळ ३-४ बुरूज उरले आहेत, ज्यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेच्या ॲड. शेळके यांच्या मते, या गावाचा इतिहास उजळवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या गौरवात भर घालण्यासाठी या दोन्ही कर्तृत्ववान सुनांचे स्मारक उभारणे आवश्यक आहे.
बावनबुरुजी परिसरात या गावाचे नाव आजही महत्त्वपूर्ण आहे, मात्र प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या या गावाचा ऐतिहासिक कधी लक्षात येत नाही.
jayshree tai shelke:त्यामुळे शासनाने या स्मारकांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
RanjitKasle:पुणे – निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांच्या आरोपांनी निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये दिले गेले असल्याचा धक्कादायक दावा केला होता.
मात्र, आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रंजित कासले यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडत आहे. त्यांनी ज्या कंपनीचा उल्लेख करून दहा लाख रुपये स्वीकारल्याचा दावा केला होता,
त्या कंपनीच्या संचालकांनी या पैशांचा वापर मुलाच्या फी भरण्यासाठी केला असल्याचे प्रतिपादन पोलिसांपुढे केले आहे. या तक्रारीनंतर कासले यांच्यावर संशयाची छाया अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात पत्रकार परिषदेत कासले यांनी त्यांच्या बँक स्टेटमेंटसह ईव्हीएम छेडछाडीपासून दूर राहण्याच्या नावाखाली देण्यात आलेल्या पैशांचा उल्लेख केला होता.
तसेच, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा पण दावा त्यांनी केला होता.
मात्र, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर संदर्भातील चर्चाही काळ्या पडद्यामागे झाली असल्याचा आरोप कासले यांनी यापूर्वी केला होता.
त्यानंतर संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दहा लाख रुपये कासले यांना “उसे” म्हणून, म्हणजे मुलाच्या शिक्षण फी भरण्यासाठी दिले गेले होते.
या संदर्भात त्यांनी पुरावेही सादर केले आहेत. यामुळे कासले यांचा आरोप सध्या विचाराधीन असून त्यांचे वर्तन पोलिस तपासाच्या प्रकाशात आले आहे.
ही माहिती समोर आली आहे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी, 21 नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या नावाने कासले यांच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते.
त्यावेळी कासले परळी मतदारसंघातील ईव्हीएमसंबंधी ड्युटीवर होते. त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाडी होण्याची शक्यता असल्यामुळे दूर राहण्याचा सल्ला असल्याचे सांगितले होते.
मात्र या सर्व आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील काही खुलासे केले आहेत आणि कासले यांना त्या वेळी ड्युटीवर नसल्याचे सांगितले आहे.
RanjitKasle/सदर प्रकरणात कासले आणि संबंधित पक्षांमध्ये काय निर्णय होतो, हे पुढील तपासात स्पष्ट होईल; मात्र आतापर्यंतची घडलेली घटनाक्रम त्यांच्या विरोधात अधिक पुरावे समोर येण्याची शक्यता दर्शवते
Hingnghat:हिंगणघाट :- राणी दुर्गावती सभागृहामध्ये रविवार दिनांक 13/04/2025 रोजी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे फॉउंडेशन, चंद्रपूर हया संस्थेमार्फत रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.सदर प्रशिक्षणात एकूण 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते वरील प्रशिक्षणात विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
जसे सॅनिटरी पॅड, हर्बल मास्कीटो फाईल, नोट बुक मेकींग, डिटर्जन्ट केक मेकींग, टी पावडर मेकींग, फुटवेअर मॅन्युफॅक्चरींग तसेच कोकोनट आईल तयार करणे.
हया विषयावर मार्ग दर्शन करण्यात हे प्रशिक्षण पुर्णतः मोफत होत. हया कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा वंदना सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होत्या तर संस्थेचे प्रशिक्षक अतुल इदाने यांनी विविध विषयावर यथोचित माहीती दिली.
Hingnghat:जिल्हा को आडीनेटर खोब्रागडे मॅडम, वनिता पराते, सविता वाकडे, माधुरी मालेकर या सर्वानी अथक परीश्रम घेतले.