Home Blog Page 449

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मारोती वार्ड येथे शिवसेनेची शाखा स्थापना

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 20.6.21शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मारोती वार्ड येथे शाखा उद्घघाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मा. राजेंद्रजी खूपसरे( शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धा ) यांच्या हस्ते शाखेचे उद्घघाटन करण्यात आले यावेळी मा. प्रमुख सतीशजी ढोमणे (शिवसेना शहर प्रमुख), रोहित बक्षी (शिवसेना उपशहरप्रमुख ), आदर्श गुजर (शिवसेना वैद्यक कक्ष प्रमुख ), शंकर मोहमारे (माजी नगरसेवक),करण्यात आले माननीय रंगीलाल बक्षी शिवसेना उपशहरप्रमुख श्री आदर्श गुजर( शिवसेना वैद्यक कक्ष प्रमुख), बाळूभाऊ अनासने, मुन्ना त्रिवेदी ,संजय पिंपळकर , अनिल कावडकर, संजय सयाम, श्री प्रकाश झाडे शाखाप्रमुख प्रकाश झाडे ,
यांच्या उपस्थितीत शाखेची नवीन कार्यकारिणी
शुभम पवार (शाखा प्रमुख ), कपिल आखाडे (उपशाखाप्रमुख ऋतिक झाडे ( सचिव)
हरीश घवघवे(कोषाध्यक्ष) सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले

यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी दहीगावचे रोहन महाजन यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथील युवा सामाजीक कार्यकर्ते रोहन महाजन यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका चिटणिसपदी निवड करण्यात आली आहे . यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी युवक काँगेसचे जिल्हा अध्यक्ष रवीन्द्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठक आज दिनांक १९ जुन रोजी ११ वाजता संपन्न झाली . या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, युवकचे हितेश गजरे आदी पदधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन युवा जोडो संपर्क अभीयाना अंतर्गत बैठक संपन्न होवुन , राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या यावल तालुका चिटणीसपदी रोहन
विनोद पाटील जिल्हा सरचिटणीस महाजन यांची राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष रवीन्द्र नाना पाटील व तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन निवड करण्यात आली . या निवडीबद्दल त्यांचे आदीवासी आघाडीचे एम बी तडवी सर , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार , युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील , नगरसेवक राकेश कोलते , प्रशांत पाटील ,गनी खान महीला कार्यकारणीच्या अध्यक्ष व्दारकाबाई श्रीनिवास पाटील , सौ . शामल भावसार , उज्वला कोळी , भुषण नेमाडे आदीनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्यात .

सावखेडा सिम आरोग्य केन्द्राअंतर्गत Near-To-Home कोरपावली व वड्री येथे कोरोना लसीकरण मोहीम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

विचार कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन कोरपावली आणी वड्री गावात कोरोना लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली असुन या कार्यक्रमास ग्रामस्थांच्या माध्यमातुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, सुविधा व्यवस्थापन जिल्हा रुग्णालय जळगाव नितीन राठोड, वॅहकसिन व कोल्डचैन मॅनेजर जळगाव जय कुमार कडवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय टाक्सफोर्स सभेतील सूचनेनुसार Near – To-Home अंतर्गत प्रत्येक गावात आवश्यकतेनुसार व लस साठा उपलब्धतेनुसार लसीकरण सत्र घेण्याच्या सूचना देण्यात आलेले होत्या. या अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोरपावली व वड्री येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना (कोविड-१९) प्रतिबंधातमक लसीकरण घेण्यात आले.
वड्री येथे लसीकरणाच्या वेळी जि. प. सदस्या सौ सविता अतुल भालेराव, डॉ. गौरव भोईटे, डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे, सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, पोलीस पाटील सौ ललिता भालेराव, सामाजिक कार्यकर्ते अतुल भालेराव, व आरोग्य सेविका प्रतिभा चौधरी तर कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमिद पटेल, डॉ. नसीमा तडवी, डॉ. रोशनआरा शेख, ग्राम पंचायत सदस्य आरिफ तडवी, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, व आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी आदी उपस्थित होते.
कोरपावली येथे ४० व वड्री येथे १०० असे १४० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशिल्ड लस देण्यात आली.
स्पॉट रजिस्टेशन आरोग्य सेवक बालाजी कोरडे, व भुषण पाटील यांनी केले. सदर शिबिरास आशा सेविका हिराबाई पांडव, हसीना तडवी, नजमा तडवी, मराबाई तडवी, सलमा तडवी, अंगणवाडी सेविका सुनंदा चौधरी, व सुलभा पाटील तसेच ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.

शिवसेना वर्धापन दिना निमित्य शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने 105 फूट हनुमान मूर्तीला जलाभिषेक व श्रीराम मूर्तीची आरती करून साजरा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

19 जून शिवसेनाचा 55 वा वर्धापन दिन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना संघटनेला आज 55 वर्ष पूर्ण होत असताना आज नांदुरा शहर शिवसेनेच्या वतीने मोट्या हनुमान मूर्तीला जलाभिषेक आणि आरती करून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना नांदुरा शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख मुन्ना पांडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने, प्रशासक संदीप पाटील, शिवसेना शहर संघटक संजय गुजर,राजूभाऊ पालकर विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर पांडव विद्यार्थी सेना शहर प्रमुख अभिराजे हिवराळे ,युवासेना उपशहर प्रमुख सोनू चोपडे, अक्षय सुलताने, किसान सेना शहर प्रमुख सागर वावटळीकर,संतोष लाहुडकार,संजय गुजर,रामा तांदुळकार,अमोल जैन,ललित राठी,राज सुसरे,कृष्णा तेलकर,पुरुषोत्तम सोनोवणे,सोहन गुजर,गजानन काळमेघ, ललित मलिक,सागर जुमळे,राज रोकडे,निलेश भारंबे,निलेश ताकवाले,पिंटू हिराळकर,आदी शिवसैनिक उपस्तीत होते.

यावल येथे शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा यानिमित्त आदिवासी गोरगरीबांना अन्नदानाचा कार्यक्रम

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आदीवासी गोरगरीब गरजु नागरीकांना अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला . दरम्यान आज यावल येथे शिवसेना पक्षाचा ५५वा वर्धापन दिवस मोठया उत्साहाचे वातावरणात शिवसेना तालुका शाखेच्या वतीने साजरा करण्यात आले , शहरातील आदीवासी वस्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गोळीबार टेकडीवर वास्तव्यास राहणारे व मोलमजुरी करून आपली उपजिवीका भागवणाऱ्या गोरगरीब आदीवासी बांधवांच्या कुटुंबांना मिठाईसह भोजन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे तालुकाप्रमुख रवीभाऊ सोनवणे , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , शिवसेना आदीवासी सेलचे तालुका प्रमुख हुसैन जहांगीर तडवी, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , गोटु सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी , पप्पु जोशी ,सागर देवांग , तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, शरद कोळी , निलेश पाराशर ,अजहर खाटीक , मोहसीन खान , संतोष बारी , राजु शेख , सुधाकर धनगर , विष्णु आवरे , सचिन कोळी , गजु भोसले , किरण बारी , सागर बोरसे , योगेश चौधरी , यशवंत चौधरी , गायनसिंग बारेला यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले .

मंगला ठक यांच्या कार्याचे होत आहे सर्वत्र कौतुक त्यांच्या कार्याला सलाम

0

 

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट 19.6.21
काल रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता मंगला ठक या ग्रामीण भागात महिला सशक्तीकरणाचे काम करून पिंपळगाव वरून हिंगणघाट ला येत असताना पावसामुळे एक मोठे झाड रोडवर पडल्याने मनोज पुरुषोत्तम कूमरे वय 30 वर्ष व संतोष साहेबराव माथनकर वय 35 हे दोघे जखमी झाडात मोटरसायकल पडून रात्रीची वेळ असल्याने अंधार खूप होता त्यामुळे काहीही दिसत नव्हते मंगला ठक नी दोघांनाही आपल्या गाडीवर बसवले उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे घेवून आल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केला जखमी मनोज कुमरे याला सेवाग्राम रेफर केले लगेच ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली ,संतोष माथनकर जास्त मार नव्हता मनोज कुमरे चे सोमवारला लग्न असल्याने त्यांच्या घरचे व नातेवाईकांना काळजी वाटू लागली होती .मंगला ताई तुम्ही या दोन्ही जखमींना तिथे पडून न ठेवता रुग्णालयात घेऊन आल्या एवढ्या रात्री लोक अपघात झालेल्या व्यक्तीला हात सुद्धा लावत नाही तुम्ही ते काम केले खरोखर तुमच्या कार्याला सलाम डॉक्टर प्रशांत डोंगरे , पिंपळगाव गावकरी व जखमींच्या परिवाराकडून मंगला ताईंचे कौतुक व आभार मानले

शासनाच्या आरोग्य सेवा आपल्या गावी या उपक्रमाव्दारे कोरपावली परिसरात फिरत्या मोबाईल युनिट व्हॅनसेवेत नागरीकांचा उत्तम प्रतिसाद

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्या तील कोरपावली गावाजवळ असलेल्या महेलखेडी गावात जळगाव जिल्ह्यात प्रथमच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन म्हणजेच चालता फिरता दवाखाना उपलब्ध झाला असुन यास ग्रामीण नागरीकांकडुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे, ग्रामीण भागात विशेषता : म्हणजे आदिवासी भागात आरोग्य सेवेसाठीतीलअसणाऱ्या अनास्ता दूर करण्यासाठी व ग्रामस्थांना आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे मिशन अंतर्गत फिरत्या दवाखाण्याची संकल्पना मांडण्यात आली, या कामात सरकारी हस्तक्षेप टाळण्यासाठी सामाजिक संस्थांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असुन , यात सर्वसाधारण रूग्णांसाठीची ओ पी डी, विशेषतः गरोधार महिलांसाठी आरोग्य सुविद्या, लहान मुलांना गोळ्या औषधी तसेंच रक्तगट तपासणी ही सात प्रकारच्या पद्धतीने करण्यात येते, अशी माहिती आरोग्य कर्मचारी यांच्या कडून प्राप्त झाली आहे, फिरत्या दवाखाण्यात एक मोठी मोबाइल व्हॅन आणि एक चार चाकी वाहन व युनिटमध्ये एक महिला वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तज्ञ परिचारिका, दोन वाहन चालक शिपाई असा पथक आहे, या पथकात डॉ, कांचन बारी, निलेश सोनवणे, लैब टेकनिकल तयराम जाधव, अरुण चौधरी, परंतु किरोन काळामुळे शासनाच्या नव्या पद्धतीच्या फिरत्या दवाखान्याला नागरिकांच्या अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते

यावल येथे एका मेडीकल चालकाची विविध साहीत्य पाठविण्याच्या नांवाखाली ४८ हजार रुपयांची फसवणूक -गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे .टी . महाजन व्यापारी संकुलनात एका जनरेलीक मेडीकल स्टोअर्स चालकाची साठी एका कंपनीकडुन आर्थीक फसवणुक झाल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , सुनिल मोतीराम भांरबे यांनी आॅक्सीमीटर व मास्क मागावीण्यासाठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर कंपनीकडे आॅनलाईन ४८ हजार सातशे सोळा रुपये भरणा केला मात्र कंपनिने कोणतेही साहीत्य न पाठविता मेडीकल व्यवसायीक सुनिल भारंबे यांची आर्थीक फसवणूक केल्यावरून अखेर सुनिल भारंबे यांनी दिलेल्या
फिर्यादी वरून येथील पोलीस स्टेशनमध्ये आर्थीक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडीकल स्टोअर्सचे संचालक सुनिल भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आमचे मालकीचे यावल येथे मेडीकल दुकानासाठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर या कंपनीकडे इंडीया मार्ट या फोन अॅपव्दारे आॅनलाईन अॅपवरून ४६ हजार ६५० रुपये किमतीचे ८५ आॅसीमीटर बीपीएल कंपनीचे आॅक्सीमीटर व १०० एन९५ मास्क साठी १९६६ रुपये १२ जुन रोजी आॅनलाईन पैशांचा भारणा केला मात्र अद्याप पावेतो कंपनीने साहीत्य पाठवले नसुन आपली आर्थीक फसवणूक केली म्हणून कंपनी विरूघ्द येथील पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ४२०प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

शासकीय गोदामावर पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाच्या भरडधान्य ज्वारी व मका या धान्याची शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ आज सकाळी ११ वाजता चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावल येथील तहसील कार्यालयजवळील सातोद कोळवद मार्गावरील शासकीय गोदामावर पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी यावलचे तहसीलदार महेश पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, कृउबाचे उपसभापती उमेश पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी, शिवसेने तालुकाप्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख गोटू सोनवणे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी संचालक, पप्पू जोशी, अजहर खाटीक, योगेश पाटील, स्वराज फाउंडेशनचे भरत चौधरी, उपतालुका प्रमुख, भारसिंग बारेला, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका कांचन फालक, आशिष झुरकाळे, रोहिदास महाजन, विभाग प्रमुख आशिष झुरकाळे, दिनेश साळुंखे, सुधाकर पाटील, कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन तथा कृउबाचे संचालक राकेश फेगडे, भरत चौधरी, सूर्यभान पाटील, समाधान सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, राष्ट्रवादीचे ललीत पाटील, प्रवीण महाजन, नाना धनगर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थित होती.

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध विकास कामांच्या राष्ट्रवादीच्या तक्रारी ना . हसन मुश्रीफ, ना .पवार , व ना . धनंजय मुंडेकडे

0

 

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या मार्च२०२०ते २०२१या कोवीड१९च्या संचारबंदी काळातील झालेल्या विविध विकास कामांची तात्काळ चौकशी करावी अशा मागणीची लिखित तक्रार जिल्हा परिषदचे मुख कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी केली आहे . या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी जिल्हा परिषद आणी पंचायत समिती यावल यांना दिलेल्या लिखित तक्रारीत म्हटले आहे की , यावल तालुक्यात जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या माध्यमातुन अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली असून, या विकास कामांबाबत गावपातळीवरून अनेक ग्रामस्थांच्या व विविध सामाजीक व राजकीय पक्षाच्या पदाधिकारींच्या सदरची ही कामे निकृष्ट प्रतिची झाल्याबाबत तक्रारी असतांना ही प्रशासकीय यंत्रणेकडुन या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधीत ठेकेदारांशी हात मिळावणी करून निकृष्ट कामांची बिले अदा करण्यात आली असुन , यावल पंचायत समितीमार्फत झालेल्या या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तालुक्यातील डोंगर कठोरा व डोंगरदे शिवारातील नदीपात्रातील पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत झालेली नाला बांधाची कामे अत्यंत खराब प्रतिची साहीत्य वापरून बांधकाम करण्यात आले असुन या पावसाळ्यात हे कामे वाहुन जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे राज्य शासनाकडुन तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आदीवासी वस्ती पाड्यांवर झालेल्या कोवीड१९च्या संचारबंदी काळातील परिस्थितीचा फायदा घेत विविध विकास कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा तसे न झाल्यास कायदेशीर पद्धतीने न्यायालयाचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे . दरम्यान आज यावलचे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांना पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम .बी . तडवी सर , राष्ट्रवादी तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष निवृत्त धांडे तक्रार निवेदन देण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील ही प्रामुख्याने उपस्थित होते . दरम्यान तक्रारकर्ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना . हसन मुश्रिफ , सामाजीक न्यायमंत्री ना . धनंजय मुंडे यांना देखील चौकशीच्या मागणीची निवेदने ईमेलद्वारे पाठविली असुन , राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री ना. अजीत पवारांशी त्यांचे दुरध्वनी व्दारे बोलणे झाले असुन , ना .पवार तात्काळ चौकशीचे आदेश देतो असे आश्वासन दिले आहे .