Home Blog Page 452

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांना यश शेळगांव बँरेजच्या पुर्णत्वासाठी शासनाने केले १४० कोटींचा निधी मंजूर..

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जळगावसह यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हरीत क्रांतीचे स्वप्न साकार करणारा महत्वकांशी प्रकल्प शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचेशी सन२०२१व२०२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आमदार शिरीष चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे जलसंपदा ना.जयंत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असुन. नुकतेच त्यांचे पत्र मिळाले. त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणी मध्ये रू. १४०कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे. सदर निधी मुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल असे आमदार कार्यालयाने कळविले आहे. शेळगाव बॅरेजच्या कामाला पुर्णत्वास नेण्यासाठी निधी दिल्याबद्दल आ.चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहे.

यावल शेळगाव मार्ग जळगाव रस्ता तापी नदीला पाणी आल्याने पूल पुर्ण पाण्याखाली वाहतुकीसाठी रस्ता बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील शेळगाव मार्ग जळगाव जाणारा रस्ता तापी नदीला पाणी आल्याने तात्पुरता असलेला पुल व त्या वरील रस्ता बंद झाला असुन यावल ते बोरावल, टाकरखेडा मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या नागरीकांनी या मार्गाने आपली वाहने घेवुन येवु नये असे आवाहन परिसरातील नागरीकांनी केले आहे . दरम्यान यावलहुन बोरावल ,टाकरखेडा , शेळगाव . असोदा, भादली मार्ग जळगाव जाण्यासाठी कमी वेळेत जाण्याचा हा पर्यायी मार्ग असुन , या दोन दिवसात मध्य प्रदेश आणी महाराष्ट्रच्या काही भागात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने शेळगाव बॅरेजच्या बाजुस तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता तापी नदीला पाणी आल्याने हा रस्ता पुर्णपणे पाण्याखाली आली असल्याने या मार्गाने वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे . यावल व परिसरातील नागरीकांनी जळगाव जाण्यासाठी या मार्गाने येवु नये तसेच हे वृत्त आपल्या संपर्कातील ईतर
मित्रमंडळी यांनी कळविले आहे .

अपंगासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे स्मार्ट कार्ड रद्द करा

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावतीत अपंग जनता दल(सामाजिक संघटना) ची मागणी

अमरावती: अपंगा साठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ६ मार्च रोजी युनिक कार्ड वरून,स्मार्ट कार्डासारखे कार्ड अपंगांना देण्यात येणार आहे.त्यांची नोंदणी देखील चालू करण्यात आली आहे.परंतू दि.९ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार आधार कार्ड संलग्न अपंग युनिक स्मार्ट कार्ड देणे असा शासन निर्णय असूनदेखील तरी एस.टी महामंडळाकडून आदेश काढण्यात आले आहेत.त्यामुळे स्मार्ट कार्डचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. अपंगांना समाज कल्याण विभाग यांच्याकडून पिवळी व पांढरे वन फोर पास असतांना केंद्र शासनाने दिव्यांगांना युनिक कार्ड सवलतीस ग्राह्य धरावे असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी काढले आहेत व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी सुद्या युनिक कार्ड वर अपंगांना सवलत लागू करा असे लेखी आदेश असून अपंग व्यक्तींनी अजून किती कार्ड सवलतीसाठी सोबत ठेवावे म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व अपंगाकडून संताप व्यक्त केला जात आहे . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी ६ मार्च रोजी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्याची मागणी अपंग जनता दल (सामाजिक संघटना)चे अमरावती शहराध्यक्ष श्री.अनवर शाह यांनी ऑनलाइन निवेदन परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांना पाठवून मागणी केली आहे.

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन चे दबंग ठाणेदार सचीन चव्हाण सन्मानीत !

0

 

पि. राजा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे दबंग ठाणेदार सचिन चव्हाण यांना नुकताच जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. या मध्ये जिल्हातील मोजक्याच पोलिस अधिकारी यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. या मध्ये पिपळगांव च्या पोलिस स्टेशन चा नंबर आहे. खामगाव उपविभाग ग्रामीण भागांमध्ये दरोडेखोर  गुन्ह्यांमध्ये आरोपी हे पद्धतशीररीत्या लोकांना गंडवून नकली सोने खरे भासवुन  लोकांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांना मारहाण करत लुटत असायचे अशी हि टोळी  खामगाव ग्रामीण भागामध्ये सक्रिय झालेली होती आणि या टोळी ला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नष्ट करण्यात आले. सदर ग्रामीण भागामध्ये या लूटमार करणाऱ्या टोळी ला पायबंद घालने महत्त्वाचे असल्यामुळे  सहा मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव विभागात  विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आले, त्यामध्ये नियोजन बद्धरीत्या कोम्बिग ऑपरेशन करण्यात येऊन अत्यंत धाडसाने शस्त्रसज्ज असलेले एकूण २५ आरोपी  पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन अत्यंत दक्ष काम करत असून कर्तव्यदक्ष असलेले जिल्ह्यामध्ये पोलिस प्रशासन  दिसुन आले होते. या कारवाईमध्ये पिंपळगाव राजा चे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना गौरविण्यात आले. या सन्मानाने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या गौरव मध्ये यशाचा तुरा हा प्राप्त झाल्या मुळे पोलिस स्टेशनचे कर्मचारी आनंदित असून परिसरात पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरी निवासी बाइकस्वाराचा अपघात दरम्यान मृत्यु

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.१२
हिंगणघाट शहरातून बाजार व शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन मोटरसायकल क्र.एमएच ३४-एएल-१४५८ ने गावी निघालेल्या मोटरसायकलस्वाराचा अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना सकाळी तालुक्यातील मानोरा शिवारात घडली.
मृतकाची इसमाची आकाश सर्जेराव कुमरे(२६) रा.नागरी जि.चंद्रपुर अशी ओळख पटली असून अज्ञात मोटसायकल स्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने सदर मोटरसायकल चालकाचा मृत्यु झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
आज शनिवारी सकाळी १०.१५ चे दरम्यान हिंगणघाट पोलिसांना मानोरा शिवारात सदर मोटरसायकलस्वार मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले.
पोलिस उपनिरीक्षक आगाशे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतकाचे शव स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
या प्रकरणी अज्ञात मोटरसायकलस्वार व्यक्तिविरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आगाशे,पोहवा बंडू महाकाळकर, महेंद्र आकरे ,भारत बुटलेकर,पोशी रविंद्र कांबळे इत्यादि करीत आहे.

चुंचाळे बोराळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावाला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची मागील काही वर्षापासुन अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन , या वर्षीच्या येवु घातलेल्या पावसाळ्यात नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे . यावल पासुन साधारण९ किलोमिटर लांब असलेल्या चुंचाळे बोराळेफाटा ते गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमिटरच्या मार्गावरील रसत्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन दुचाकी वाहनधारकांपासुन तर पादचाऱ्यांना ‘ या रस्त्यावरून चालतांना तारेवरची घसरत करावी लागत असल्याने चुंचाळे बोराळे व परिसरातील काही गावांनांशी बुरहाणपुर अंकलेश्वर या प्रमुख राज्य मार्ग असुन शेतकरी व सर्वसामान्यना दळणवळणाचे साधन म्हणुन जोडणारा ग्रामस्थांना परिसरातील आणी नागरीकांच्या दृष्टीने तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्वपुर्ण रस्ता असुन , क्षेत्राच्या नागरीकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना सांगीतल्यावरही या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असुन , लोकप्रतिनिधीनी तात्काळ लोकहिताच्या दृष्टीकोणातुन निर्णय घेवुन या चार किलोमिटरचा संपुर्ण खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिस्तातील नागरीकांकडुन करण्यात येत आहे .

कोवीड योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी जळगाव जामोद कोवीड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी दिले आ.डॉ कुटे यांना निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

कोविड 19 च्या भयंकर महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर नर्स तसेच इतर कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 12 जून रोजी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना कोविड केअर सेंटर येथील कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे. या भीषण महामारीमध्ये कोविड सेंटर मधील डॉक्टर नर्स व कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नव्हती तरी त्यांनी कोविड रुग्णांना सेवा दिली. तसेच या डॉक्टर नर्स व कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असताना जीवित हानी झाल्यास शासकीय नियमानुसार 50 लाख रुपये विमा कवच तसेच कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे असेही या कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे तसेच कोविड सेंटरमध्ये हे कर्मचारी मागील एक वर्षापासून सेवा देत असून ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती न करता याच कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना संधी देऊन कोविड केअर सेंटर जळगाव जामोद येथे त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी जळगाव जामोद येथील कोविड सेंटर मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवेदणाव्दारे केली आहे.सदर निवेदन देतेवेळी डॉ. निता पुंडे, डॉ. पवन सुरपाटणे,डॉ. शुभम पाटील, विष्णु गव्हाळे, आखरे,कांचन आखरे,मैना वक्टे,निता पाटील, ज्योत्स्ना पवार, दिपाली इंगळे,सुनिता गवई,शुभम गायकवाड, धम्मपाल सपकाळ, श्रीकृष्ण सोनोने, अमोल गवई,गौरव चोपडे, पायल निंबाळकर, शुभांगी गवई,पुनम गवई इत्यादींची उपस्थिती होती.

राष्ट्रीय महामार्गाने जाणारी दुचाकी टैंकरवर धडकून झालेल्या अपघातात एक ठार,एक गंभीर जखमी

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट,दि.१२ जून
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्या टैंकरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहपाठी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली.
टैंकर क्र एमएच-२१ डब्ल्यू-६४४७ हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान तालुक्यातील सेलु मुरपाड येथील वैभव नेहारे (२३) तसेच मयूर विलास कुमरे(२४) हे दोघे युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच -३४ क्यू-३५ ९४ ने सुगुणा फॅक्टरीकड़े निघाले होते,त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन समोर जात असलेल्या टैंकरला धडकली. सदर झालेल्या अपघातात दुचाकी चालक वैभव नेहारे (२३) जागीच ठार झाला तर मागे बसून असलेला एक जण गंभीर जखमी झाला.
सदर अपघात तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात घडली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून जखमीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मृतक तसेच त्याचा सहपाठी हे दोघेही सुगुणा फॅक्टरीमधे नोकरीच्या शोधात दुचाकीने निघाले होते,परंतु रस्त्यातच त्यांचा असा दुर्दवी अपघात घडला. सदर घटनेचा पुढिल तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शुक्ला,पोशी सौरभ गेडाम, महेंद्र आकरे करीत आहे.

कोरोनाचे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखाची भरपाई द्यावी; प्राचार्य विनोद गायकवाड यांची मागणी

0

 

तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

कारोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न देता कोरोनाची ड्युटी करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित होते. जळगांव जिल्हयाचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कोरोना काळात फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लस देण्याची मागणी केली आणि प्रशासनाने ती मान्य केली. तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देणे टाळत असलेल्या प्रशासनाला प्रा.गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले होते.
रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंट लाइन वर्कर म्हणून काम करत आहेत. प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यात बळी गेले आहेत. विमा कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करताना संपर्कात येत नाही काय, प्रत्यक्ष संपर्कात विमा लाभ मिळणार नाही का?. मग अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित करण्यात केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखवली जाते, परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अश्या शिक्षकांच्या परिवाराला ५० लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे गायकवाड यांनी केली आहे.

प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने रेतीचोरी चौकशीची मागणी .

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट/,दि.११
अवैध रेतीवाहतुक तसेच रेतीचोरी प्रकरणी सततच्या बातम्या प्रकाशित होऊनही रेतीतस्कर आपला रेतीचोरिचा व्यवसाय बीनदिक्कतपणे करीत असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांपासून तर सर्वच अधिकारी अवैध रेतीव्यवसाय बंद करण्याचा दावा करीत असले तरीही लाखो रूपयांची चिरिमिरी मिळत असल्याने पोलिस यंत्रणा,परिवहन खाते तसेच महसुल खाते यांचे आशिर्वादाने रात्रीचे अंधारात हा रेतीचोरिचा खेळ अविरत सुरुच असल्याचे दिसुन येत आहे.
परवा दि.९ रोजी रात्री हिंगणघाट शहरात असाच एक प्रकार घडला.रात्री ८.३० चे दरम्यान शासकीय यंत्रणेने स्थानिक रेतीव्यापारी खियानी यांचा रेतीने भरलेला डंपर अडविला.
कारवाईसाठी सदर डंपर हिंगणघाट बस स्थानकाचे परिसरात आणला गेला.यावेळी शासकीय अधिकारी आपल्या वाहनासह तेथे पोचले,परंतु ४० हजार रूपयांची सरकारी खात्यात दक्षिणा चढ़विल्यावर सदर डंपर सोडण्यात आला.
सदर शासन अधिकाऱ्यांनी आपल्या सरंक्षणात रेती भरलेला डंपर तेथून पाठविल्यानंतर आपल्या शासकीय वाहनाने ते सुद्धा पसार झाले.अधिक माहिती घेतली असता डंपरमधे भरलेल्या जवळपास २५ टन रेतीची रॉयल्टी त्यांचेकड़े नव्हती.
झालेल्या प्रकाराची जोरदार चर्चा रेती व्यावसायिक वर्तुळात होत आहे