Home Blog Page 452

यावल येथे काँग्रेस कमेटीच्या वतीने ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने केन्द्र शासन व तत्कालीन फडणवीस सरकारच्या विरूद्ध जनआंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्रातील ओबीसी समाज आरक्षण रद्द करण्यामागे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असुन , देशाच्या सर्वाच्च न्यायालयाने केन्दातील भाजपाच्या सत्ताधारी शासनाकडुन ओ बी सी समाजाची आकडेवारी मागितली होती परन्तु ती आकडेवारीची माहीती देण्यास केन्द्र शासन अपयशी ठरल्याने देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने रद्द केले असुन , या ओ वी सी समाजाच्या आरक्षण रद्द करण्यास महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणी केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असुन , दरम्यान आज यावल येथील बुरूज चौकात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या तालुका कमेटीच्या वतीने सामाजीक न्याय दिनाचे औचित्य साधुन ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मिळावे या करीता सकाळी ११ वाजता केन्द्रातील भाजपा सरकारच्या निषेर्धात जनआंदोलन आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील व तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह , नगरसेवक मनोहर सोनवणे , पुंडलीक बारी , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईम्रान पहेलवान, नदीम शेख मोमीन , अविनाश बारी , अजय रामकृष्ण बढे , राजु बारी नावरेचे माजी सरपंच समाधान पाटील , कॉंग्रेस आदीवासीआघाडीचे बशीर तडवी , कलीम खान , विक्की गजरे , उस्मान खान यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

ओबीसींचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जळगांव जामोद येथे शहर व तालुका भाजपचे रास्ता रोको आंदोलन.

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:

दिनांक 26 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविल्य राज्यव्यापी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता स्थानिक पेट्रोल पंपाजवळ शहर व तालुका जळगाव जामोद भारतीय जनता पार्टी तर्फे रवींद्रशेठ ढोकणे ओबीसी सेल बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी

उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो

महाभकास आघाडी सरकारचा निषेध असो

ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में

*ओबीसी का नेता कैसा हो डॉक्टर संजय कुटे जैसा हो

यासह इतर घोषणा देत रस्त्यावर ठिय्या देण्यात आला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र गांधी, डॉक्टर प्रकाश बगाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे यांचे मार्गदर्शन मार्गदर्शनपर भाषणे झाली त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध करून पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी आंदोलनस्थळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शेठ ढोकणे जळगाव जामोद जिल्हा सरचिटणीस नंदू भाऊ अग्रवाल जिल्हा सचिव रामदास बोंबटकार, गुणवंत राव कपले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा परिषद बुलढाणा विरोधीपक्षनेते बंडूभाऊ पाटील, नगरसेविका रत्नप्रभा खिरोडकर सविताताई कपले महिला शहराध्यक्ष शिल्पा भगत, ग्रा प सदस्या सारिका तुपकरी, शांताबाई तायडे, सुनीता म्हसाळ, नगरसेवक शैलेंद्र बोराडे आशिष सारसर, निलेश शर्मा, पस सदस्य एकनाथ वनारे, पस सभापती रामेश्वर राऊत, उपसभापती महादेव धुर्डे, अशोक काळपांडे, विजय तिवारी, भेलके टेलर, श्याम देवताळू, संजय पांडव, चंद्रकांत वाघ, मुरलीधर राऊत, राजेंद्र उमाळे, एम. आर. इंगळे, युवमोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे,शहर अध्यक्ष उमेश येउल, पंकज देशमुख, शाकीर खान, जमीर टेलर, आझम खान, अशपाक, गणेश शेजोळे, अंबादास निंबाळकर, संदीप तुपकरी, सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, भास्कर राऊत, खवले टेलर, डिगंबर हिवरकार यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सचिन जगताप यांची नासिक महसुल विभागातुन ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले कार्यतत्पर व अभ्यासु व्यक्तिमत्व शिस्तप्रिय अधिकारी सचिन जगताप यांची ई -फेरफार स्थायी समितीचे राज्य समन्यव्यक रामदास हरिभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघ समीतीचे प्रदेश अध्यक्ष शाम जोशी यांनी ई-फेरफार व ई-चावङी प्रकल्प स्थायी समिती वर नासिक महसूल विभागातून मंडळ अधिकारी संवर्गातून सचिन जगताप यांची निवड करण्यात आली आहे .मा. जमाबंदी आयुक्त यांचे निदर्शनाप्रमाणे ईर्‍ फेरफार प्रणालीत देण्यात आलेल्या
सुविधा या पुढे होणाऱ्या सुधारणा आणि काळानुरूप आवश्यक वाटणारे तसेच जनतेला अचूक,
तत्पर व पारदशी सेवा देण्यासाठी तसेच तलाठी मंडळ अधिकारी व अन्य वापरकर्ते यांचे कामात
आवश्यक अशी सुलभता येण्यासाठी करावे लागणाऱ्या बदलांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता
आणि सुसंगता तपासून त्या लागू करण्यासाठी तशी शासनाला शिफारस करण्यासाठी जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली ई-फे रफार व ई-
चावडी प्रकल्प स्थायी समित्या करण्यात आल्या असुन , दरम्यान महाराष्ट्र शासनच्या महसुलव विभाग जमावबंदी आयुक्त आणी संचालक अभी लेख विभागाअंतर्गत झालेल्या समितीच्या निवडीबद्दल फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी , यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दिपक गवई यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांनी सचिन जगताप यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात .

ओबीसींच्या समर्थनार्थ भाजपाने जाम येथील राष्ट्रीय महामार्गावर रोखली २ तास वाहतुक

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२६ जून
ओबीसींच्या न्याय्य मागण्या सरकारने मान्य कराव्या या मागणीसाठी समुद्रपुर तालुक्यातील जाम येथे भाजपाचे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार,विधानपरिषद सदस्य डॉ.रामदासजी आंबटकर यांचे नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करीत ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली.
सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान शेकडो पक्षकार्यकर्ते
आंदोलनस्थळी उपस्थित होत तब्बल २ तास राष्ट्रीय महामार्गावरची वाहतुक रोखुन धरली होती,
आमदार समीर कुणावार ,माननीय आमदार रामदासजी आंबटकर, जिल्हा भाजपा महामंत्री किशोर दिघे, हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंताणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद मृणालताई माटे, पंचायत समिती सभापती सौ. सुरेखाताई टिपले हिंगणघाट पंचायत समिती सभापती शांताताई आंबटकर, वसंतरावजी आंबटकर, तालुका अध्यक्ष संजय डेहने, तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, हिंगणघाट शहर अध्यक्ष आशिष पर्बत, समुद्रपूर नगराध्यक्ष गजु राऊत, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, माजी प. स. सभापती गंगाधरजी कोल्हे, पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, तुषार आंबटकर , कैलासजी टिपले, सुनील डोंगरे , बिस्मिल्ला खान, अनिल गहरवार , वामनराव चंदनखेडे , कवीश्वर इंगोले , रोशन रोशन पांगुळ , चंदू भमाळवे विनोद विटाळे, सरपंच नितीन वाघ , सुभाषजी कुंटेवार, सिंधी रेल्वे नगर परिषद अध्यक्षा बबीताताई तूमाने ,ओम प्रकाश राठी, जयंत बडवाईक ,अमोल गवळी ,मनोज पेटकर ,देवा कुबडे, राकेश शर्मा, किशोर रोंगे, दिनेश वर्मा ,शिवाजी आखाडे, कैलास टिपले, वामनराव चंदणखेडे उपस्थित तथा मतदार संघातील सर्व सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलना दरम्यान पोलिसांनी आमदार कुणावार, आमदार आंबटकर यांचेसह सर्व आन्दोलकांना ताब्यात घेतले,नंतर पोलिसांनी त्यांची मुक्तता केली.

सामाजिकहित जोपासताना व्यक्ती द्वेष नको पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले मनोगत

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जीवनात पक्षीय वाद वेगळी बाब आहे मात्र समाज उपयोगी हित जोपासताना व्यक्तिगत द्वेष करता कामा नये असे मनोगत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या चाळण व प्रतवारी यंत्रणेच्या लोकापर्ण व नामकरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून व्यक्त केले खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले , कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की, स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू होते शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे नामदार पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांचे समवेत विधानसभेत घालविलेल्या क्षणानाही या कार्यक्रमाप्रसंगी उजाळा दिला स्वर्गीय हरीभाऊ जावळे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांची एक आठवण म्हणून बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला त्यांचे नामकरण दिल्याबद्दल त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कौतुक करून त्यांच्या या कार्याचे समाधान व्यक्त केले
तालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रित यावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले व्यासपीठावर भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे हे असतांना त्यांनी भाजप आणि सेनेची जुनी मैत्री असल्याची आठवण करून देत वर्षभरापुर्वीच आपली मैत्री तुटल्याचे सांगून राज्यात आमची तर केंद्रात तुमची सत्ता असल्याचे म्हणत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही केंद्रातून निधी आणा आम्ही राज्यातून आणतो असे म्हणून त्यांनी सभागृहाला हसवलं, बाजार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास काँग्रेस व राष्ट्रवादी भाजपासह सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते मात्र या कार्यक्रमास सेना व भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे हा कार्यक्रम केवळ भाजपा – सेनेचा असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.
याप्रसंगी खासदार रक्षा खडसे आमदार राजू भोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर म.सा .का. चेअरमन शरद महाजन यावलच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हर्षल गोवींदा पाटील, जळगाव जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहते , भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे , शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले निवासी नायब तहसीलदार के पवार ,भुसावळ नगर परिषदचे उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , संतोष धोबी, पप्पू जोशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (उर्फमुन्ना ) पाटील, उपसभापती उमेश पाटील , संचालीका कांचन फालक, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील आदींची उपस्थित होती कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय जावळे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
प्रास्ताविक तुषार ( उर्फमुन्ना ) पाटील तर सूत्रसंचालन प्राध्यापक जतिन मेढे यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील यांनी व्यक्त केले .

रोटरी क्लब हिंगणघाट द्वारा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न .(नाममात्र सेवाशुल्क 500 रुपये )

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगनघाट 25.6.21
आज रोटरी क्लब द्वारा कोविडच्या प्रादुर्भावात रुग्नांणा रुगनावाहिकेचा खुप मोठा त्रास सहन करावा लागला, याची कमतरता लक्षात घेता रोटरी क्लबचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. जितेंद्र केदार यांचे जन्मदिनानिमित्य नाममात्र 500/- रुपये सेवा शुल्का मध्ये हिंगनघाट येथील जनतेला रुग्णवहिका उपलब्ध करुन देण्याचा सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी मोहम्म्मद रफीक पत्रकार तथा जेष्ठ पत्रकार सतीश वखरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे रितसर पूजन करुन व फित कापून लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपलगाव रोड येथील कमला नेहरू शाळा येथील आश्रय निवारा केंद्र, येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक, जेष्ठ पत्रकार सतीश वखरे, रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी, नवनियुक्त अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जितेंद्र केदार , मावळते अध्यक्ष अशोक डालिया , सचिव पराग कोचर , आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अशोक मुखी म्हणाले की कोरोनाचे कालखंडात रुग्णांना बाहेर गावी पोहचविण्यासाठी जी लुट होत होती त्याची लूट थाबांवी याकरीता हि रुग्णंवाहिका केदार यांच्या जन्मदिनी जनतेच्या सेवेत सुपूर्द करतांना आनंद होत आहे.
भविष्यात रोटरी क्लब द्वारा कमी पैशात शहरातच सिटिस्कँन केन्द्र, औषधी केन्द्र व मल्टीस्पेशालिटी रुग्णांलय स्थापन करण्याचा मानस असून त्या दिशेनी आम्ही प्रयत्न करत असून नामदार नितिन गडकरी यांना या संदर्भात निवेदन सुद्धा सादर केले आहेत असे डॉ. मुखी म्हणाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना सतीश वखरे यांनी रोटरी क्लबचे अभिनंदन करून गौरन्वित उद्गगार काढून कृतज्ञता व्यक्त केली, तर हाजी मोहम्मद रफीक यांनी रोटरी क्लब हा जनसेवेचा माध्यमातून रुग्णांना अत्याल्प मोबदल्यात सेवामय रुग्णवाहिका उपलब्ध करुण दिल्या बद्दल त्यानी रोटरी क्लब चे आभार मानले तसेच अधिक हे सेवा कार्य तळागळातील व गरजुवतांना याचा लाभदायी ठरेल याची दक्षता घेण्याची मानस व्यक्त केला, प्रसंगावश पत्रकार संघाचे सचिव प्रदीपकुमार नागपुरकर , यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक डालिया व आभार प्रदर्शन पराग कोचर यांनी केले.
याप्रसंगी इन्वीलर क्लबच्या महिला पदाधिकारी,तथा रोटरीचे डाँ. रमेश रांका, भुपेन्द्र शहाणे, शाकिर खाँन पठान, मुकूंद मुंधडा, नरेंद्र पोहनकर, राम कोटेवार, सुरेश चौधरी, प्रा.अशोक बोनगिरवार, मुरली लाहोटी, तेजन्द्र मोहता, प्रा. माया मिहानी आदि सदस्यांनी अथक यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

 

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या ईमारतीचा लोकापर्ण व नामकरण सोहळा पालकमंत्री ना. पाटील यांचे हस्ते होणार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावल आवारातील खर्चाने बांधण्यात आलेल्या नवीन क्लिनींग ग्रेडींग युनिट व गोडावुन बांधकामाचे लोकापर्ण व धान्य चाळ्ण व कृषीमित्र स्व हरीभाऊ जावळे नामकरण सोहळा दिनांक २५ जुन२०२१ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजीत करण्यात आले आहे . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या भव्य क्लिनिंग ग्रेडींग युनिट व गोडावुन बांधकामाचे लोकापर्ण व नामकरण सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला असुन या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणुन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे , शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत बळीराम सोनवणे , मुख्य अतिथी म्हणुन खासदार रक्षाताई खडसे , माजी जलसंपदामंत्री व आमदार गिरीष महाजन , यावल रावेर चे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , आमदार सौ . लताताई सोनवणे , मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे ( राजु मामा ) यांच्या उपस्थितीत हा लोकापर्ण व नामकरण सोहळा सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार असुन , या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कोवीड१९च्या नियमांचे पालन करीत आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषारसिंग ( उर्फ मुन्नाभाऊ ) सांडुसिंग पाटील, उपसभापती उमेश प्रभाकर पाटील यांच्यासह कृउबाचे सर्वसन्मानिय संचालक मंडळ तसेच सचिव स्वप्नील बी सोनवणे यांनी केले आहे .

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा

0

 

सचिन वाघे वर्धा
वर्धा 24.6.21
केंद्र सरकारला ओबीसींनी ठणकावले
– ओबीसी समाज एकवटला
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाभर निदर्शने संपन्न ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाने जिल्हाभर तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरातील ओबीसी समाज एकवटला.
ओबीसी समाजाची २०२१ मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, दिनांक 4 मार्च 2021 चा सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने पुर्ववत करण्याकरीता समर्पित आयोगाची नियुक्ती करुन इम्पेरीकल डाटा गोळा करुन संकलित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागु करावे, २४३ डी व २४३ टी या घटनात्मक कलमान्वये घटनादुरुस्ती करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण २७% निश्चीत करा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येवू नये, क्रिमीलेयरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने ती वाढवा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण दया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पुर्ववत करा, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पुर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागु करा, व राज्यसरकारने मेगा नोकर भरती त्वरीत करावी, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या, आदी अनेक मागण्यांवर आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष शेषकुमार यरलेकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते ऋषभ राऊत, राष्ट्रीय ओबीसी युवक महासंघ चे जिल्हाध्यक्ष अक्षय इंगोले आणि राष्ट्रिय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहित मधुसूदन हरणे तसेच जिल्हा समन्वयक दिनेश काटकर,प्रशांत घवघवे,महेश खडसे,प्रमोद डूकसे, शैलेश मैंद,युवराज मऊसकर,शुभम घोडे,विशाल आसुटकर,रुपेश लाजुरकर,सुरेंद्र बोरकर,गौरव गोहाडे,पीयूष ठाकरे, भिशांत कोल्हे,सूरज वरघने, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व शाखाचे पदाधिकारी, ओबीसी च्या सर्व संघटना, ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटना सहभागी होत्या.

मोहता गिरणी सुरु करण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या ! आमदार समीर कुणावार

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.२४
मोहता गिरणीचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा,बंद गिरणी ताबड़तोब सुरु करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी काल जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे दालनात आयोजित बैठकी दरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी केली.
काल दि.२३ रोजी आयोजित बैठकीमधे आमदार कुणावार यांचेसह,इंटुकचे पदाधिकारी आफताबखान,गिरणी व्यवस्थापनाचे प्रतिनिधी श्रीयुत सिंग, प्रदीप हरणे तर शासनाच्या कामगार विभागातर्फे कामगार अधिकारी श्रीयुत भगत,पानबुडे इत्यादि उपस्थित होते,यावेळी सदर बैठकीत महावितरणचे उपव्यवस्थापक,कामगार राज्य विमा योजनेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.
कोरोनाकाळात संचारबंदीचे कारण देत गिरणी व्यवस्थापणाने टाळेबंदी जाहिर करीत कामगारांना वाऱ्यावर सोडले असून त्यांचे कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काल जिल्हाधिकाऱ्यांचे दालनात संपन्न झालेल्या सभेमधे सर्वप्रथम कामगारांचे थकित वेतन व इतर देणी तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली.
मोहता गिरणी कामगारांचा प्रश्न आता गंभीर होत चालला असून यावर तात्काळ निवाडा होऊन गिरणी सुरु करने आवश्यक आहे,येथे तोडगा न निघाल्यास हा गिरणी कामगारांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने थेट मुख्यमंत्र्याच्या दरबारी मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार समिर कुणावार यांनी उपस्थित गिरणी कामगारांना दिले.

जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविन्द्र पाटील यांनी पिता व आईंच्या स्मरणार्थ दिले साकळी गावास स्वर्गरथ

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सामाजिक समरसता हे गावाचे वैभव- महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्याकडून देण्यात आलेल्या स्वर्गारथाचे लोकार्पण !कार्यक्रम साकळी येथे संपन्न झाले .
साकळी ता.यावल-सामाजिक समरसता हे गावाचे वैभव असून गावातील सर्वधर्मजातींचे मन मजबूत होणे गरजेचे आहे. सर्वधर्मीय एकोपा ही गावाची गरज आहे.माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे व मानवतेच्या साखळीतून आपण आपण कोरोना सारख्या अनेक संकटांचा सामना करून लढाई जिंकू शकतो आई-वडिलांची आठवण म्हणून तसेच गावाची गरज ओळखून गावास स्वर्गरथ लोकार्पण करणेही ही बाब समाजाप्रती फार व्यापक दृष्टिकोन सांगून जाणारी आहे परंतु स्वर्गरथाचा वापर कमीत कमी व्हावा अशी अपेक्षा फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच गावास स्वर्गरथ लोकार्पण केल्याबद्दल रविंद्र पाटील यांचे कौतुकही केले.
यावल तालुक्यातील साकळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा लोकप्रिय सामाजीक कार्यकर्ते म्हणुन आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे
स्वर्गीय आण्‍णासो.सूर्यभान हिरामण पाटील व स्व.सोनाबाई सूर्यभान पाटील यांच्या स्मरणार्थ जळगाव जिल्हा परिषदचे शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र(छोटू)सूर्यभान पाटील यांच्या तर्फे साकळी गावास स्वर्गरथाचे लोकार्पण दि.२३ रोजी करण्यात आले. स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज(फैजपूर), ह.भ.प.जळकेकर महाराज,ह.भ.प.अंकुश महाराज विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी मधुकर शिंपी यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आले.यानंतर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर रवींद्र पाटील यांच्या हस्ते उपस्थित संत- महंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेडीसीसी बँकेचे संचालक गणेश गिरधर नेहेते, यावल कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विलास पाटील, साकळी ग्रामपंचायतचे उपसरपंच वसीम खान, ग्राम पंचायत सदस्य साहेबराव बडगुजर ,शरद बिऱ्हाडे, दिनकर माळी,खतीब तडवी यांचेसह साकळी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील,सै.अहमद सै.मिरा, मुसेखाँ पठाण, नूतनराज बडगुजर,राजू सोनवणे, विलास काळे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन निंबादास पाटील, पांडुरंग निळे,रामकृष्ण खेवलकर,सूर्यभान बडगुजर, किसन महाजन, भिका पाटील,शेख सलिमभाई, भाजयुमोचे यावल तालुका उपाध्यक्ष योगेश (आप्पा) खेवलकर, राजू जंजाळे, अशोक जंजाळे, विलास पवार, नितिन फन्नाटे,ज्ञानेश्वर मोते,बंटी बडगुजर, आत्माराम तेली,भागवत रावते(शिरसाड) यांचेसह विविध पदाधिकारी व ग्रामंस्थ उपस्थित होते.रविंद्र (छोटू)पाटील यांनी आई-वडीलांच्या स्मरणार्थ गावास स्वर्गरथ दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.