Home Blog Page 47

Bjpnews / भाजपा स्थापना दिवस संपन्न

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

Bjpnews:सिंदी रेल्वे येथे भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे यांच्या नेतृत्वात जिल्हा सचिव स्नेहल कलोडे यांनी बस स्टॅन्ड वरील पक्ष कार्यालयात आयोजन केले होते.

यावेळी पक्षाला मोठे योगदान देणारे व एका छोट्याश्या रोपट्याला कष्टाने वटवृक्ष रुपी भाजपा बनविन्यात हातभार लावणारे भाजपाचे जेष्ठ सदस्य,माजी मंडळ अध्यक्ष नरेंद्र जी सुरकार यांच्या हस्ते ध्वजारोहन करून भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस कार्यक्रमाला सुरुवात केली.

Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनार्थ भाषनां नंतर जेष्ठ सदस्य नरेंद्रजी सुरकार,जेष्ठ सदस्य जनकजी पालीवाल, विनायकजी झीलपे, माजी मंडळ अध्यक्ष जयंतजी बडवाईक, माजी नगरसेवक संजयजी इटणकर,जेष्ठ सदस्य महादेवजी बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रस्तविक माजी उपाध्यक्ष राजू गंधारे, संचालन जिल्हा सचिव स्नेहल कलोडे तर आभार पंकज पराते यांनी केले.

Bjpnews:यावेळी या कार्यक्रमाला जेष्ठ नेते पत्रकार आनंदजी छाजेड,जिल्हा सचिव प्रभाकरजी तडस,एकता युवा मंडळ चे नरेंद्रजी पेटकर,रामेश्ववरजी घंगारे, किशोरभाऊ भांदककर,रामभाऊ सोनटक्के,राजूभाऊ तेलरांधे,मिलिंदजी पेटकर,प्रभाकरराव तुमाने,गुल्लूभाऊ भंसाली,नरेंद्रजी सेलूकर, मोहन तळवेकर,राहुल सोरटे,अरुणराव ढेंगरे, वामनराव ढोक,चंपूभाऊ भंसाली,महिला मोर्चा च्या सौं. रोशनाताई पेटकर, सौं. वैशालीताई पेटकर,सौं. काटोले ताई व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Hingnghatnews / आधार फाउंडेशनची कार्यकारिणी गठीत

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews:हिंगणघाट : आधार फाऊंडेशनची वार्षिक सभा नुकतीच आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष जगदिश वांदिले आणि विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

आधार फाऊंडेशनच्या घटनेनुसार दरवर्षी नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येत असल्यामुळे वर्ष 2025 -26 साठी आधार फाऊंडेशनची वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली. यात कार्यकारी अध्यक्ष – माधुरी शरद विहीरकर, उपाध्यक्ष अँड .इब्राहिम हबीब बख्श,सचिव सुनिल डांगरे, सहसचिव सुभाष शेंडे,कोषाध्यक्ष सुरेश गुंडे यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष जगदीश वांदिले यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करून नवीन वर्षात विविध उपक्रमे आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी नव्या कार्यकारणीला दिल्या.

यावेळी मावळते कार्यकारी अध्यक्ष जगदीश वांदिले व संस्थापक अध्यक्ष अतुल वांदीले याच्या हस्ते नवीन कार्यकारी अध्यक्ष माधुरी शरद विहिरकर यांचा व नवीन कार्यकारनी चा सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व सदस्यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या सभेचे सुत्रसंचालन पराग मुडे यांनी केले तर आभार चंद्रशेखर निमट यांनी मानले.

Hingnghatnews:यावेळी डॉ.नरेंद्रकुमार मनवर, लक्ष्मीकांत धार्मिक, प्रा. डॉ.शरद विहिरकर, सुहास घिनमिने, डॉ. संजय हिवरकर,डॉ.गिरीधर काचोळे, प्रमोद बोरकर,सचिन येवले,प्रा.अभय दांडेकर,गणेश जोशी, डॉ.अनिता मनवर,माया चाफले, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, स्वाती वांदिले, वीरश्री मुडे, अनिता गुंडे आदीं सदस्य उपस्थित होते.

Buldhananews /महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे यांच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष . ज्ञानेश्वर आप्पा साखरे.पदावर नियुक्ती – समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान

0

 

शेगाव इस्माइल शेख

Buldhananews:बुलढाणा- लिंगायत समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या, समाजहितासाठी झटणाऱ्या, तळमळीने समाजकार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा, पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष सुरेश मुरलीधर फिसके यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.समाजकार्याची दखल घेत सन्मानाची जबाबदारीनियुक्तीपत्रात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक

की, “ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रीय सहभाग, समाजहितासाठी असलेली जाणीव आणि निष्ठा ही खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आहे.”

ही निवड ही केवळ पदावरची नेमणूक नसून, समाजाने त्यांच्या कार्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांच्याकडून भविष्यातील अपेक्षांचा पुरावा आहे. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीयज्ञानेश्वर आप्पा साखरे हे लिंगायत समाजाच्या सशक्तीकरणासाठी गेल्या अनेक वर्षापासून निःस्वार्थपणे कार्यरत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीपासून ते बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजसेवा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम आणि सामाजिक सलोख्यासाठी विविध जनजागृती मोहिमा त्यांनीयशस्वीरित्या राबवल्या आहेत.त्यांचे कार्य केवळ लिंगायत समाजापुरते मर्यादित नसून, सर्वसामान्यांसाठी त्यांनी कायमस्वरूपी सहकार्याची भूमिका पार पाडली आहे.

समाजातून उत्स्फूर्त अभिनंदनाचा वर्षावज्ञानेश्वर आप्पा साखरे यांच्या या नियुक्तीबद्दल लिंगायत समाजासह विविध समाजघटकांतून, युवक वर्गातून, महिलांमधून आणि सामाजिक संस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. ही निवड समाजासाठी एक नवे दिशादर्शक ठरणार असल्याचा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.भविष्यातीलसंकल्पआणिदृष्टीकोन
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना साखरे यांनी सांगितले, “ही नियुक्ती म्हणजे माझ्या समाजाने माझ्यावर ठेवलेला अमूल्य विश्वास आहे. मी ही जबाबदारी केवळ पद म्हणून नव्हे, तर समाजासाठी झगडण्याचे एक साधन म्हणून पाहतो.

Buldhananews:आगामी काळात मी युवकांमध्ये नेतृत्व जागवण्यावर, महिलांना सामाजिक मंच उपलब्ध करून देण्यावर, आणि गरजूंसाठी शाश्वत उपक्रम राबविण्यावर भर देईन.”समारोप.ज्ञानेश्वर आप्पा साखरे यांची ही नियुक्ती म्हणजे सामाजिक कार्यकत्यांच्या संघर्षाला मिळालेली प्रतिष्ठा आहे. लिंगायत समाजाच्या नवचैतन्याची ही नवी सुरुवात मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वात समाजहितासाठी आणखी प्रभावी आणि परिणामकारक काम होईल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

Lonarnews / लोणार पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश..४ आरोपी अटक

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:लोणार -पोलिसांना एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन बाजारात धावत आहे. अशा माहितीच्या आधारे लोणार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासह लोणार येथील हिरडाव चौकात सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष 100 रुपयांच्या 07 बनावट नोटा जप्त केल्या.

सपोनि इंगोले यांच्या लेखी अहवालावरून सदर आरोपी मोईन खान रा.लोणार याच्या विरुद्ध दि. 114/25 भादंवि कलम 179, 180 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा पुढील तपास धनंजय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पो.स्टेशने केला असता.

Santosh Deshmukh Case / संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे अशी मनोज जरांगे यांची मागणी

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील इतर आरोपी मोहमंद अतिक, मोहमंद लुकमान, वय 41 वर्षे, रा. नवीगरी लोणार, शेख लुकमान शेख कालू वय 56 वर्षे, रा. आझाद नगर लोणार, साई मुजाहिद अली से मुमताज अली वय २३ वर्षे रा. रोशनपुरा लोणार, अब्दुल रहीम अब्दुल रशीद वय 35 वर्षे रा. सुलतानपूरचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यांचा पीसीआर घेतल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या १०० रुपयांच्या १९ बनावट नोटा आणि एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे नोटा देण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे कमिशन जप्त केले.

उरलेल्या नोटा आरोपींनी पोलिसांच्या भीतीने जाळल्या. या गुन्ह्यातील अन्य आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या बनावट नोटा छापून त्या खऱ्या म्हणून बाजारात पुरविणारा मुख्य सूत्रधार कोण आणि अन्य आरोपी कोण याचा शोध सुरू असून यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे.

Lonarnews:सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक .विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक .बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहपोलिस निरक्षक गणेश इंगोले, पोलिस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोलिस हवालदार खराडे, पोलिस हवालदार संतोष चव्हाण, पोलिस नाईक संजय जाधव, पोलिसशिपाई गणेश लोढे, पोशि धोंडगे, पोलिस शिपाई शेळके, पोलिस शिपाई शिंदे, पुढील तपास सुरू आहे

Santosh Deshmukh Case / संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करावे अशी मनोज जरांगे यांची मागणी

0

 

Santosh Deshmukh Case:मराठा आरक्षणासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी ठरविण्याची मागणी केली आहे. हा दावा त्यांनी सराटी येथे केला,

जिथे त्यांची अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांच्यासोबत भेट झाली होती. मनोज जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या रस्त्यावरील काटे बाजूला सारण्याचे काम वाल्मिक कराड हा करत होता. पैशांचा गोळा तोच करत होता, जे धनंजय मुंडे यांनाच पोचत होते.”

Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी आहे.

मनोज जरांगे यांच्या मते, धनंजय मुंडे यांच्याकडे जमिनी हडपून, खून करून मिळालेल्या पैशांतून सत्ता उपभोगायला होती, हे त्यांना मुख्य आरोपी मानण्यामागचे कारण आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही आरोपींच्या सीडीआरची मागणी केली आहे.

त्यांना विश्वास आहे की या सीडीआरमधून अनेक सहआरोपी समोर येतील. धनंजय देशमुख यांनी सीडीआर मिळताच ते सार्वजनिक करण्याचा दावा केला आहे.

मनोज जरांगे यांच्या दाव्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराडची भूमिका: वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या रस्त्यावरील काटे बाजूला करण्याचे काम करत होता, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

सीडीआर धनंजय देशमुख यांनी सीडीआर मिळण्याची विनंती केली आहे. या सीडीआरमधून अनेक सहआरोपी समोर येतील, अशी शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर दबाव: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

संतोष देशमुख यांची हत्या बीडच्या मस्साजोग गावात झाली. या प्रकरणात आरोपींनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुनावणी बीडमध्येच होणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case :अंजली दमानिया यांनीही धनंजय देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात बाबींवरून प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

Jitendra Awhad /वक्फ जमिनीवर अंबानी यांचे घर, वादाचा मुद्दा

0

 

Jitendra Awhad:दिल्लीतील लोकसभेत मोदी सरकारने हालाच वक्फ संशोधन विधेयक सादर केले. या विधेयकावर असलेल्या चर्चेला आठ तासांची वेळ देण्यात आली असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 27 मंजिला आलीशान घर एंटीलियावर आधारित एक खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ते म्हणाले, “अंबानी यांचे घर वक्फच्या जमिनीवर बांधले आहे.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातून बरेच वादविवाद सुरू झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, “एकदा जमीन वक्फच्या नावावर दान करण्यात आली की ती परत विकण्यात येत नाही.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

जर कायदा करायचा असेल तर अशा प्रकारे करावा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही.”

तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा एक अनुभव सांगताना नमूद केले की, “मी मंत्री असताना जमीन वक्फ झाली म्हणजे ती विकण्यात येत नाही, अशा निर्णयावर सही केली होती.

Jitendra Awhad:माझ्याकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी आली होती, मी तिला नकार दिला.

Grampanchayat / कुकुटपालनाची (पोल्ट्रीफार्मची) परवानगी तात्काळ रद्द करा.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Grampanchayat:हिंगणघाट: समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे.

या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती करू शकत नाही आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधीमुळे शेकडो लोकांना गंभीर आजार सुद्धा झाला आहे. अनेक जेष्ठ नागरिक, लहान मुले दुर्गंधीमुळे बिमार होत आहे. त्यांचे जबाबदार कोण आहे ?

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. अन्यथा संपूर्ण गावातील गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेईल व मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Grampanchayat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, समाजसेवक सुनिल डोंगरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वर पोफळे, उमाकांत पोफळे, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजने, पुरुषोत्तम सालवटकर आदी उपस्थित होते.

Collector News / बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची चक्क खुर्ची जप्त करण्याचे दिले न्यायालयाने आदेश; नेमकं प्रकरण काय?

0

 

Collector News:बुलढाणा जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा लघु सिंचन प्रकल्पाच्या संदर्भातील एका प्रकरणात न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचर आणि खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिल्याने तेथे खळबळ माजली.

१९९८ मध्ये चिखली तालुक्यातील मोहदरी येथील शेतकऱ्याची जमीन भूसंपादित केल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळाला नसल्याची तक्रार मोर्चेबांधली गेली.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

जिल्हाधिकारी कार्यालयातील या जप्तीची कारवाई ११ मार्चला न्यायालयाचे आदेश रद्द करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश एच.एस. भोसले यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सूड घेण्याचे आदेश दिले होते.

पीडित शेतकरी चंद्रभागा उतपुरे यांची जमीन ब्राह्मणवाडा प्रकल्पासाठी १९९८ मधे संपादित करण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांना ४१ हजार ५७२ रुपये मिळाले होते.

 

२०१२ मध्ये न्यायालयाने व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश दिल्यानंतरही आजही ८२ हजार ४९३ रुपये दिले गेले नाहीत.

न्यायालयाचे कर्मचारी या मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले,

Collector News: ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सहाय्यक महसूर अधिकारी शैलेश गिरी यांच्या आश्वासनानंतर जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली.

AkolaNews / डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनीलजी उंबरकर यांनी शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना पुत्रप्राप्ती निमीत्त दिल्या हॉस्पीटल मध्ये जाऊन शुभेच्छा..

0

 

AkolaNews:अकोला – 30/3/2025 रोजी डिजिटल मिडिया परिषद शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना ईदच्या शुभ मुहूर्तावर पुत्ररत्नाची प्राप्ती झाली,

त्यानिमित्ताने मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांनी अकोला येथे हॉस्पीटल मध्ये जाऊन अमिन शेख यांची भेट घेऊन त्यांच्या बाळाची व पत्नीची विचारपूस केली.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

AkolaNews / डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनीलजी उंबरकर यांनी शेगांव तालुका उपाध्यक्ष अमीन शेख यांना पुत्रप्राप्ती निमीत्त दिल्या हॉस्पीटल मध्ये जाऊन शुभेच्छा..

 

तसेच अनिल उंबरकर व विवेक शेगांवकर यांनी अमिन शेख यांच्या बाळाची ट्रीटमेंट करत असलेल्या डॉक्टरांची भेट घेऊन डॉक्टरांना योग्य रीतीने उपचार करण्याचे सहकार्य करावे अशी विनंती केली.

AkolaNewsv:पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी, ईदच्या सणाला शेख अमीन यांना डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर व शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगांवकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या..

Hingnghat/ ज्ञानदीप विद्यानिकेतन मधील विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयाकरिता निवड.

0

 

प्रतिनिधी, सचिन वाघे

हिंगणघाट :- दिनांक, 1 एप्रिल 2025:
हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट येथील आठव्या वर्गाची स्मिता सागर जिडगिलवार तसेच ५ व्या वर्गाचा अथर्व देवानंद आंबुलकर या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत भरगोस यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले.

अथर्व देवानंद आंबुलकर या विद्यार्थ्यांची ६ व्या वर्गाकरिता व स्मिता सागर जिडगिलवार या विद्यार्थिनीची ९ व्या वर्गाकरिता नवोदय विद्यालयात निवड झाली असून शाळेची अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवली ही खास उल्लेखनीय बाब.

Viral Video / व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई: जळगाव प्रकरणात काय घडले?

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे शाळेचे संस्थापक आदरणीय गिरधर राठी. मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल तसेच नवोदय परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना व आपल्या पालकांना दिले. विद्यार्थ्याच्या सु यशाबद्दल शाळेचे संस्थापक आदरणीय गिरधर राठी, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल, उपमुख्याध्यापिका शिल्पा जयस्वाल सहसचिव रशेश राठी,

Hingnghat :शाळेच्या अध्यक्षा सौ. अर्पणा राठी, कोषाध्यक्ष श्री प्रवीण धोबे, तसेच नवोदय परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.