Home Blog Page 49

आईच्या हातातून सात वर्षाच्या मुलाला ओढून नेत बिबट्याने केले ठार किनगाव-साकळी शेत शिवारातील घटना ( Brekingnews )

0

 

आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित केला प्रश्न विधानसभेत

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

Brekingnews:शेतमजुरीसाठी शेताच्या बांधावरून जाणाऱ्या एका मजुरमहिलेच्या सात वर्षाच्या मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने गंभीर पणे हल्ला करीत आईचा हातातुन हिसकावत त्या मुलाला शेतात बऱ्याच अंतरावर फरपटत नेले.या हल्ल्यात या मुलगा ठार झाला असून सदरची दुर्दैवी घटना दि.६ रोजी दुपारच्या वेळी साकळी शिवारातील मानकी नदीजवळ एका शेतात घडली आहे.

आपल्या पोटच्या मुलाला आपल्या हातातून एखादी हिंस्र प्राणी ओढून नेत त्याच्यावर हल्ला करीत असताना या अतिशय हृदयद्रावक घटनेत त्या मुलाच्या मातेने मुलाला वाचवण्यासाठी खूप जीवाचा आटापिटा केला मात्र नियतीपुढे ती हतबल झाली.व आपला पोटचा मुलगा हिरावला गेला. सदर घटनेने परिसरातील शेतशिवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.या अगोदरही शिरसाड शिवारात काही दिवसा अगोदर बिबट्याने बकरीच्या पिलावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर (santoshdeshmukhcase)

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की,किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या साकळी शिवारातील मानकी नदीजवळील शेत गटनं ४७२मध्ये दि.६ रोजी मोलमजुरी करण्यासाठी चार ते पाच महिला गेलेल्या होत्या.त्यांच्यासोबत सात वर्षीय केशा प्रेमा बारेला हा एक लहान मुलगाही होता.दुपारच्या वेळी दीड ते दोन वाजेदरम्यान सदर शेताच्या बांधावरून जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने या सर्व महिलांवर अचानक हल्ला करून सोबतच्या लहान मुलाला आईच्या हातातून हिसकावले व त्याला घेऊन पळाला.

त्या महिलांनी एकच आरडाओरडा केला व त्या आईसह महिलाही त्या बिबट्याच्या मागे पळाल्या. बिबट्याने त्या मुलावर जोरदार हल्ला करत फरफटत ओढून नेल्याने तो लहान मुलगा जागीच ठार झाला आहे. केशा प्रेमा बारेला (वय ७ वर्ष) रा.खंडवा ह.मु.किनगाव असे या ठार झालेल्या मुलाचे नाव असून तो आदिवासी समाजातील आहे.त्या बिबट्याने ज्या ठिकाणावरून मुलाला आईच्या हातातून हिसकावले होते त्या ठिकाणापासून जवळपास शंभर फुटाच्या अंतरावर त्या मुलाला मारून सोडून दिले होते.

बिबट्याने त्या मुलाच्या डोक्यावर तसेच मानेवर,गळ्याजवळ तसेच छातीच्या भागाजवळ गंभीरपणे जखमा केलेल्या होत्या.या घटनेची माहिती कळताच किनगाव सह परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे एकच धाव घेतली.काही नागरिकांनी संबंधित वनविभागाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या दुर्दैवी घटनेची माहिती कळवली.

 

आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित केला विधानसभेत प्रश्न

स दर घटनेची माहिती चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना ही माहिती समजतात घटनेबाबत कुटुंबाच्या मदतीसाठी तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विधानभवनामध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेश ना मध्ये हा प्रश्न त्यांनीअर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला

घटना स्थळी अधिकारी वर्गाची धाव

घटनास्थळी यावलच्या तहसीलदार
मोहनमाला नाझीकर,पोलिस प्रदीप ठाकूर,माजी आमदार रमेशदादा चौधरी, सह परिसरातील शेतकरी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख सहाय्यक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे,यावल पश्चिमचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे पूर्वचे सुनिल भिलावे यांनी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.घटनास्थळी पंचनामा करून मयत झालेल्या मुलाला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व त्याच्यावर डॉ तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले.मयत मुलाचे आई-वडील हे आदिवासी समाजातील असून मोलमजुरीसाठी गावाकडे आलेले.मागील काही दिवसांपूर्वी शिरसाड-पिळोदा तसेच थोरगव्हण शेतशिवारातही बिबट्या दिसला असल्याची शेतकरी सांगत आहे.भीतीदायक वातावरणात रात्रंदिवस आपली शेतीची कामे करीत आहे.यादरम्यान शिरसाड शिवारात एका बकरीला हल्ला करून जखमी केलेले होते.याबाबत येथील नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारही केलेली होती.संबंधित वनविभाग कार्यालयाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गरज आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वनविभागातर्फे आवाहन किनगाव साखळी शेत
शिवारातबिबट्याने लहान बालकावर जो हल्ला केला त्या पार्श्वभूमीवर शेतात एकट्या दुखट्याने जाऊ नये रात्रीच्या वेळी स्टार्च किंवा टेंभा घेऊन शेत शिवारात ये -जा करावीआणि अफवांवरअंकुश ठेवावा तसेच बिबट किंवा त्याचे ठसे आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा खेड्यापाड्याच्या आजूबाजूलाच हिरवळ आहे थंडाव्यामुळे व पाण्यासाठी बिबट गावाजवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीचे वेळी शौचास ला जाताना टॉर्च किंवा ठेवा सोबत असू द्यावाअसे आवाहन वनविभागातर्फे सुनील भिलावे वनपरिक्षेत्राधिकारी पूर्व यांनी केले आहे

. वन विभागाकडून 25 लाखाची मदत मिळणार

Brekingnews:शेत शिवारात बिबट किंवा हिंस्र प्राणी यांनी मानवी हल्ला केल्यासत्याला वनविभागातर्फे आर्थिक मदत दिली जाते असा कायदा आहे त्यानुसार वन विभागाच्यावरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मताच्या वारसांसाठी 25 लक्ष रुपये देण्यात येतील असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे माहिती दिली त्यातील दहा लक्ष रुपये येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संबंधित कुटुंबांना देण्यात येणार आहे व उर्वरित पंधरा लक्ष रुपये शासनाचे नियम नुसार फिक्स मध्ये ठेवण्यात येतील असे सांगण्यात आले

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर (santoshdeshmukhcase)

0

 

santoshdeshmukhcase:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती,

संतोष देशमुख हत्याकांड: मुलगी वैभवीची भावनिक प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांची हत्या कुणाच्या वरदहस्ताखाली?'( Santoshdeshmukhmurdercase)

ज्यामध्ये त्यांना बळजबरीने ‘सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे’, असे म्हणायला लावण्यात आले. आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर एकूण 15 व्हिडीओ आणि 8 फोटो काढले, ज्यात संतोष देशमुख यांची अमानुष मारहाण करण्यात आली होती.

या व्हिडिओंमध्ये त्यांचे कपडे काढताना आणि केस धरुन मारहाण करतानाचे चित्रण आहे. संतोष देशमुख यांनी “मला मारु नका” अशी विनवणी केली होती, मात्र आरोपींनी त्यांची मारहाण सुरू ठेवली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली होती. या व्हिडिओंमध्ये तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या पाईपच्या साहाय्याने मारहाण केल्याचे दिसून येते.

या प्रकरणातील आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर अत्यंत अमानुषपणे वार केले,

santoshdeshmukhcase: ज्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडची साक्ष देण्याची शक्यता आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी ( Santosh Deshmukh Murder Case )

0

 

Santosh Deshmukh Murder Case:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. ही घटना 10 डिसेंबर 2024 रोजी घडली होती आणि त्यानंतरच्या तीन महिन्यांत या प्रकरणाच्या तपशिलांनी राज्यभर खळबळ उडवली आहे.

या हत्येच्या मुख्य सूत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याची नावे घेतली जात आहेत. आता वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्याविरोधात साक्ष देऊ शकतो का, यावर चर्चा सुरू आहे.

संग्रामपूरात अवैध रेती वाहतूक जोरात महसूल प्रशासनाची कारवाई शून्य (revenue)

मुख्य आरोप आणि प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांच्यावर खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झालेल्या महत्वाच्या बैठकीचा उल्लेख केला आहे.

या बैठकीत खंडणीसाठी चर्चा झाल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आरोपींनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून कृती केल्याचा आरोप केला आहे.

वाल्मिक कराडची भूमिका आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणी

वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेक वर्षांपासून जवळचे संबंध जपले आहेत. आता त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात साक्ष देण्याची शक्यता आहे का, यावर चर्चा सुरू आहे.

अबु अझमींना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित; देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहात हल्लाबोल ( Devendrafadnvis)

धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिला असला तरी, त्यांच्यावरील आरोपांमुळे त्यांच्या अडचणी कमी होत नाहीयेत.

Santosh Deshmukh Murder Case:संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील क्रूर फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात आणखी ताण उत्पन्न झाला आहे

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (ग्राहक संरक्षण)चे महाराष्ट्र राज्याध्यक्ष पदी प्राचार्य श्री विनोद हिम्मतराव गायकवाड (Yavalnews )

0

 

प्रतिनिधी : विकी वानखेडे

Yavalnews:दिल्ली येथील ग्राहक संरक्षणचे राष्ट्रीय अधिवेशन मध्ये विनोदजी गायकवाड भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
(ग्राहक संरक्षण) चे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली मध्ये संपन्न झाले या वेळी ग्राहक संरक्षण कायद्याचे पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

विधी न्याय आणि कंपनी मामले भारत सरकार मंत्रालय द्वारा अखिल भारतीय ग्राहक संरक्षण चे मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली 15 जनपद डॉ आंबेडकर इंटरनॅशनल भवन मध्ये समारोह आयोजित करण्यात आला.

पुणे स्वारगेट रेप प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश ( puneswargatecase)

मुख्य अतिथी गंगोत्री धाम चे जगत गुरू अनंत श्री वर्या श्री नारायण तीर्थ दंडी महास्वामी श्री हरीप्रसाद स्वामिगल, जर्मनी चे मार्क एक्स जेड वाय जर्मन,
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ श्री हरिशंकर शुक्ल जी यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय वार्षिक अधिवेशन आणि प्रशिक्षण चे आयोजन समस्त भारतातून प्रत्येक प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि आंतरराष्ट्रीय उपभोक्ता कमिटी द्वारा मध्य प्रदेश यांनी ग्राहक संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल सन 2024/25 मध्ये प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र राज्याला द्वितीय आणि गुजरात तृतीय क्रम मिळाला,

प्रथम क्रमांक पुरस्कार मध्यप्रदेश द्वितीय क्रमांक पुरस्कार – महाराष्ट्र तृतीय क्रम पुरस्कार – गुजरात या राज्यांना मिळाला,या वेळी द्वितीय क्रमांक पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्राचार्य डॉ श्री विनोद हिम्मतराव गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (ग्राहक संरक्षण) मधे भारतीय विद्यालंकार निकेतन चे संस्था चालक तथा प्राचार्य डॉ श्री विनोद हिम्मतराव गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य सचिव पदावर सन 2010 पासून कार्य करत असताना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा

Yavalnews:राष्ट्रीय अध्यक्ष डॉ श्री हरीशंकर शुक्ल जी यांनी घेऊन डॉ गायकवाड यांना पदोन्नती म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदावर डॉ श्री विनोद हिम्मतराव गायकवाड यांची नियुक्ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनामधे करण्यात आली,,या वेळी संपूर्ण भारतातील ग्राहक संरक्षण पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करून डॉ गायकवाड यांचे कौतुक होत आहे,,,

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची 7 मार्च रोजी गुणांकन यादी होणार प्रसिद्ध (Yavalnews )

0

 

प्रकल्प अधिकारी अर्चना अटोळे यांची माहिती

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:एकात्मिक बाल विकास सेवा योजना बालविकास प्रकल्प यावल या कार्यालयात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननी ची प्रक्रिया सुरु असून दिनांक 07 मार्च 2025 या दिवशी अर्जदारांना किती गुण प्राप्त झाले यासंदर्भात प्राथमिक यादी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यावल येथे लावण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक रित्या बोलताना सांगितले.

पाण्याची तंगत: बुलढाणा जिल्ह्यातील गावांची पाण्याची समस्या वाढत आहे ( Water )

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावल मार्फत सरळ भरती द्वारे शासनाच्या निर्णयानुसार 03 अंगणवाडी सेविका जागांसाठी 25 अर्ज आले होते तर 47 मदतनीसांसाठी 464 अर्ज प्राप्त झाले होते शासनाच्या नियमावलीनुसार इच्छुक अर्जदारांना शासनाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसार त्यांना गुण देण्यात येत आहेत.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या जागांसाठी अर्जदारांनी कोणाच्याही अमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये आणि कोणी उलट सुलट माहिती देत असेल तर अशा माहिती ला कुणी हि थारा देऊ नये उमेदवारांना मिळालेल्या गुणांकनानुसारच अर्जाची छाननी होणार असून कुणावर हि कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याची हमी. प्रकल्प अधिकारी यांनी दिलेली आहे.

प्राथमिक यादी 7 मार्च रोजी कार्यालयच्या बोर्डावर व पंचायत समितीच्या बोर्ड वर व रिक्त जागाच्या ग्रामपंचायतिच्या बोर्ड वर गुणांकन झालेली यादी प्रसिद्ध करण्यात येईल ज्यांना कोणाला या यादीमधील निवडीवर किंवा गुणांवर हरकत घ्यायची आहे त्यांनी दि. 07/03/2025 ते 21/03/2025 पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधावा 21/03/2025 नंतर आलेल्या हरकतीवर कुठल्याच प्रकारची दखल घेतली जाणार नाही…

अंतिम यादी 24 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यावल तर्फे कळविण्यात आले.

Yavalnews:संपूर्ण तालुका स्तरातून याची मोठी प्रसिद्धी झाली त्यामुळे एवढ्या इच्छुक अर्जदारांना प्रत्यक्ष अर्ज भरता आला आहे सदर भरती निपक्षपातीपणाने व विहित शासन निर्णयानुसारच होणार असल्याची ग्वाही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यावल श्रीमती -अर्चना आटोळे यांनी दिलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा निरीक्षक पदी खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची नियुक्ती. (Sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Sharadpawar:हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा निरीक्षक पदी वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आगामी होणाऱ्या निवडणुका तसेच गडचिरोली जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली..

जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड,आरोपीचा आका कोण? एकनाथ खडसे यांचं गंभीर आरोप :(Eknathkhadse)

सदर नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नियुक्तीने गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे.

Sharadpawar:तसेच लवकरच गडचिरोली जिल्हा दौरा सुद्धा करू असे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले.गडचिरोली जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाचे विदर्भ प्रमुख अनिल देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी अभिनंदन केले.

राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अनुद्गागार काढणारे प्रशांत कोरटकरला अटक करण्याची शिवसेनेची मागणी (Hingnghat )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने नागपूर चे प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना भ्रमणदूरध्वनी द्वारे (फोन) महाराष्ट्राचे आराध्य दैवत *राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराजयांच्या बदल अर्वाच्य भाषेत संभाषण करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या

बद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख,सतीश धोबे, श्रीधर कोटकर,मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट पोलीस निरीक्षक ठाकूर यांना प्रशांत कोरटकर यांना अटक करण्याकरीता निवेदन देण्यात आले.

निवेदन देण्यापूर्वी हिंगणघाट पोलीस स्टेशन चे नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक श्री. ठाकूर साहेब यांना शिवसेना हिंगणघाट शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बोलिव्हियामध्ये भयंकर अपघात: ३७ जणांचा मृत्यू, ३९ जखमी( accdent news )

सविस्तर असे की, जेव्हा पासून भाजपाचे शासन या देशात आणि राज्यात आले तेव्हा पासून कोणत्या ना कोणत्या विषयाला धरून महाराष्ट्राचे दैवत *राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती संभाजी महाराज, आणि परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर** यांच्या बाबत चुकीचे विधान करण्याची एका विशिष्ट वर्गातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी मालिका सुरू केली आहे.

हे सर्व असूशिक्षित नाही .परंतु एका ऐजंडा च्या मार्फत जाणुन – बुजून चुकीचे विधान केल्या जात आहे. जेणेकरून बहुजन समाज आप-आपसात विखुरलेल्या अवस्थेत असला पाहिजे.व या बहुजन समाजाच्या डोक्यात चित्रपटाच्या माध्यमातून असो किंवा असे चुकीचे विधान करून एका विशिष्ट समाजाकडे बोट दाखवून हाच तुमचा खरं शत्रू आहे.

असे दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे.बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की ही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. नवीन तरुण पिढीला शिक्षणापासून वंचित राहून असल्या विषयाकडे वळविण्याचे प्रामाणिक प्रयत्न भाजप समर्थीत लोकांचा आहे.व स्वतःचे मुले असल्या गोष्टी पासून दूर ठेवून देशात आणि परदेशात उच्चशिक्षण घेत रहावे असा त्यांचा ध्यास आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दोन दिवसांपूर्वी पुन्हा तोच प्रकार झाला नागपूर चे एका व्यक्तीने कोल्हापूर चे इतिहासकार श्री. इंद्रजित सावंत यांना भ्रमण दूरध्वनी द्वारा फोन करून या महापुरुषांच्या संदर्भात चुकीचे विधान करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असल्या लोकांना कोणाचे पाठबळ आहे. याची संपूर्ण माहिती या महाराष्ट्र द्वेषी कोरटकरला अटक केल्या नंतर बाहेर येईल. असल्या लोकांना अप्रत्यक्षपणे कोणाचे संरक्षण आहे , हे लक्षात येईल. असली माणसं या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

Hingnghat:असे आमचे शिवसेनेचे म्हनणे आहे.या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावे ,जेणे करून पुढे कोणाचीही अशी हिम्मत होणार नाही. जर गृह विभागाने त्याला अटक केली नाही तर , शिवसेना ( उध्दव बा. ठाकरे ) पक्षाच्या वतीने या विषयाला घेऊन रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही .आणि पुढे काही झाल्यास याची सर्वस्वी जवाबदारी शासन व प्रशासनाची राहील. निवेदन देताना उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, सुनील आष्टीकर, शंकर झाडे, गजानन काटवले, अनंता गलांडे,राजू मंडलवार,चंदू भुते, शंकर मोहमारे, पप्पू घवघवे,अविनाश धोटे, प्रशांत कांबळे, अमोल वादाफळे,भास्कर मानकर,शकील अहमद,पंकज ठाकरे, स्वप्नील नगराळे, शंकर भोमले,गणेश ढेकले उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेतील नवीन अपडेट: महिलांना कसे मिळणार ३००० रुपये? (Ladki Bahin Yojna)

0

Ladki Bahin Yojna:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहेत. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जात आहे.

मात्र, फेब्रुवारी महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, यामुळे त्यांच्यामध्ये निराशा पसरली आहे. आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार असल्याने महिलांच्या खात्यात एकदम ३००० रुपये जमा होणार आहेत.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पकडला (puneswargatecase)

मुख्य माहिती

हप्त्याची वाट: फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, यामुळे महिलांमध्ये निराशा आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील तोडफोड

पडताळणी: या योजनेतील अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या पडताळणीमुळे काही महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

अर्थसंकल्पानंतरची घोषणा: मार्च महिन्यात महिलांना २१०० रुपये देण्याची चर्चा आहे, मात्र ही घोषणा अर्थसंकल्पानंतरच केली जाणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Ladki Bahin Yojna:लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली होती. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, या योजनेतील अपात्रतेची पडताळणी सुरू असून, अनेक महिलांचे नाव यादीतून काढण्यात आले आहे

नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

policenews:हिंगणघाट :– दिनांक 27 फेब्रुवारी ला मुखबीरकडून गुप्त माहिती मिळाली की,नंदोरी चौक येथील उडानपुलाखाली काही इसम पैशाचा हार जितचा जुगार खेळत आहे. अशा विश्वासनिय गुप्त माहितीवरून मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनां माहिती देऊन .

प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरे प्रमाणे नंदोरी चौक येथे पंच व पो स्टाफ सह रेड केला असता यातील आरोपी 1) आशिष विठ्ठल कारवाटकर वय 36 वर्ष राहणार विठ्ठल मंदिर वार्ड हिंगणघाट 2) आदेश भाऊराव इटणकर वय 21 वर्ष रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट 3) गजानन ज्ञानेश्वर गोल्हर

वय 40 वर्ष 4) गोविंद करमचंद सौदे वय 32 वर्ष राहणार शिवाजी वॉर्ड हिंगणघाट 5) राम बाबुराव कांबळे वय 24 वर्ष 6) मतीन मेहबूब शेख वय 32 वर्ष रा. वेळा ता. हिंगणघाट हे सगण मताने जुगार खेळताना मिळून आल्याने 1) बावन ताश पत्ते की. 100 /रू. 2)पत्त्याच्या डावावरील नगदी 1750 रू 3) आरोपीताच्या अंगझडतीत नगदी 5050 रू असा एकूण जु कीं 6900 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नंदोरी चौकात जुगार खेळण्याळ्यावर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कार्यवाही (policenews)

असून पोलीस स्टेशन हिंगनघाट येथे आरोपीता विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे .ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन , मा.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . सागर कुमार कवडे , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत . यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक .

policenews:हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अधिकारी पोउपनि भारत वर्मा , पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे, सुनील मेंढे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत पिळोदा बु.येथील हार्दिक संदीप महाजन प्रथम क्रमांक मिळवून विजयी (Yavalnews )

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:गोवा येथे भारतीय युवा व्यवहार व क्रिडा मंत्रालय यूथ होस्टेल येथे रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशनल स्तरावरील स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

EPFO च्या ७ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, व्याज दरात कपातीची उद्या होऊ शकते घोषणा(EPFO)

या स्पर्धेमध्ये गोवा, आंध्र प्रदेश ,महाराष्ट्र, कर्नाटक,अशा अनेक राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये नॅशनल स्केटिंग रेस स्पर्धेत रिले मॅच व स्केटिंग रेस मध्ये अंडर १० वयोगटा मध्ये पिळोदा बु. येथील हार्दिक संदीप महाजन याने प्रथम क्रमांक मिळवून त्याला गोल्ड मेडल मिळाले व पुढील दोन महिन्यानंतर थाइलंड येथे होणाऱ्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गोवा येथील नॅशनल स्केटिंग स्पर्धेत पिळोदा बु.येथील हार्दिक संदीप महाजन प्रथम क्रमांक मिळवून विजयी (Yavalnews )

Yavalnews:त्याच्या निवडीबद्दल अंतरराष्ट्रीय कोच श्री भिकन अंबे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले त्याच्या राष्ट्रीय स्तरीय निवडीमध्ये सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी चे त्याचे कोच पियुष दाभाडे सर व दीपेश सोनार सर यांनी खुप मेहनत घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन व त्याला या यशस्वी शिखरा पर्यत पोहचविण्या साठी मोलाचा वाटा उचलला आहे त्या बद्दल सरांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले हार्दीक हा कष्ठकरी शेतकरी कुटुंबातील संदीप महाजन व कोमल महाजन यांचा मुलगा आहे