Home Blog Page 504

शहीद दिनानिमित्त शिंदी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !पंचवीस तरुणांनी केले रक्तदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावांमध्ये शहीद भगतसिंग ‘ सुखदेव ‘ राजगुरू ‘यांच्या शहीद निमित्त आदर्श गाव शिंदी येथे दिनांक 23 मार्च रोजी सकाळी ८वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन .डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया शिंदी च्या वतीने करण्यात आले होते ’23 मार्च रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना क्रांतीकारकांना इंग्रजांनी फासावर लटकवले होते ‘आणि त्यांचा स्मृतिदिन हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो ‘आणि याच शहीद दिनाचे औचित्य साधून ‘शिंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर , रक्तगट तपासणी, शिबिर नेत्रदान शिबीर,अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ‘या रक्तदान शिबिर मध्ये २५ तरुणांनी रक्तदान केले ‘रक्तदान केलेल्या तरुणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले ‘यावेळी शिंदी गावचे सरपंच विनोद खरात . पोलीस पाटील मदन हाडे ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे शिंदी अध्यक्ष निलेश बंगाळे ‘पत्रकार सचिन खंडारे ‘अरविंद खंडारे ‘अमोल खरात ‘प्रवीण वैद्य ‘डॉक्टर रामेश्वर खरात ‘सोमेश पागोरे ‘कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘दिपक खरात ‘आधी हजर होते ‘यावेळी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले ‘

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३० व्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी परवानगी न दिल्यास बौद्ध पंच मंडळ आंदोलन करणार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील साकळी येथील बौद्ध पंच मंडळाच्या वतीने येणाऱ्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने शासनाने परवानगी द्यावी या संदर्भात महसुलचे मुक्तार तडवी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना दि.२२ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात येणार असुन, शासनाच्या नियम अटी शर्तीचे पालन करून कोरोना संसर्गजन्य आजार पसरू नये याची खबरदारी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची साजरी करण्यात येणार असुन या मिरवणूकित सहभागी होणारे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला माक्स व सुरक्षित अंतर ठेऊन अतिशय नियमांचे काटेकोर पालन करीत ही मिरवणूक काढण्यात येणार असुन ,आपण आम्हास डॉ .बाबासाहेबांची जयंतीच्या मिरवणुक काढण्याची परवानगी द्यावी. आपण परवानगी नाकारत असाल तर आम्ही समस्त समाज बांधव रस्त्यावर उतरून शासनाचा लोकशाही मार्गाने तीव्र जाहीर निषेध करून प्रसंगी धरणे आंदोलन देखील करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असा इशारा शासनाला देण्यात आला आहे तरी आमची मागणी मान्य करून रीतसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी.अशी मागणी निवेदनातद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मिलिंद जंजाळे, अर्जुन जंजाळे, सागर सोनवणे, देवानंद जंजाळे, विक्रम सुरवाडे, भूषण तायडे, विलास सोनवणे, मुकेश तायडे, गणेश जंजाळे, विजय जंजाळे, दिपक जंजाळे, चंद्रकांत पवार, उमेश शिरसाडे, सचिन सोनवणे, राहुल जंजाळे, सागर भालेराव, रवी भालेराव, रवी पवार आदी सह समाज बांधवांच्या सह्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रती माहीतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री (महाराष्द्र राज्य), जिल्हाधिकारी (जळगाव), पोलीस अधिक्षक जळगाव , विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांना देण्यात आलेल्या आहेत.

 

चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांनवर होणार कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे ; 25 मार्च पर्यंत चाचणी करण्याचे आवाहन ; विशेष चाचणी कॅम्प चे आयोजन

0

 

हंसराज उके अमरावती

चांदुर रेल्वे तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता तालुक्यातील प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले आहे, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांनी कोविड चाचणी सक्तीची केली असून 25 मार्च पर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आज झालेल्या एका बैठकीत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी या सूचना दिल्या आहे, चाचणी सुलभ व्हावी यासाठी स्थानिक सरस्वती शाळा येथे 23 मार्च आणि न प कन्या शाळा येथे 24 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले, यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री आर कोवे, महिला बाल विकास अधिकारी वैशाली ढगे, न प चे प्रशासन अधिकारी, गट शिक्षणअधिकारी मुरलीधर राजनेकर उपस्थित होते. तालुक्यात काल दि 21 मार्च रोजी 20 कोरोना रुग्णाची नोंद झाली, त्यामुळे तालुक्यासोबत शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे, या शिबिरात इतर कोणालाही चाचणी करून घेता येईल या दोन सेंटर सह ग्रामिण रुग्णालयात रोज सकाळी 9 ते 12 या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले. तर 25 मार्च पर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड टेस्ट करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले त्यानंतर सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून प्रमाण पत्र नसणाऱ्या दुकानावर नाईलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचेही तहसीलदार इंगळे यांनी सांगितले.

हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल मे खुली व्यायाम स्कूल

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि .22
जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, इनके सहयोग से हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल बी.सी.ग्राऊड हिंगणघाट याहा खिलाडीओ के लिये खुली व्यायाम स्कूल।
ये खुली व्यायाम स्कूल खिलाडीओ के लिए हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी.एल खांडरे सर , फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बक्श सर , कराटे , किक बॉक्सिंग , प्रशिक्षक प्रशांत लेदाडे सर इनहोणे खुली व्यायाम स्कूल की पूजा करके खिलाडीओ के लिये शुरू हो गई।

पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट , ठाणेदार यांनि प्रत्यक्ष हजेरीत राबविलि वाश आउट मोहिम.  

0

 

तळेगाव (शा. पंत) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारसवाडा शिवारातील नदिच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच तळेगाव पो स्टेचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी आपल्या कर्मचारी सह सदर ठिकाणी आज वाश आउट मोहिम राबवली.
या कारवाईत मोहा सडव्या सह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट करन्यात आला.

जिल्ह्यात दारूबंदी असताना भारसवाडा शिवारात गावठी दारूची निर्मितीकरून त्याची विक्री परिसरातील गावांमध्ये केली जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत असे. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजाणीसह ईतर समस्या लक्षात घेता ठाणेदार आशिष गजभिये यांनी प्रत्यक्ष हजेरीत भारसवाडा शिवारात गोदावरी नदिच्या काठि पिप्या मध्ये दाबुन ठेवलेल्या मोहा सडव्याचे १६० पिपे नष्ट केले.

मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदुरा येथील पत्रकारांनी केला निषेध!!

0

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदुरा येथील पत्रकारांनी निषेध नोंदवून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करावी, या मागणीसाठी नांदुरा येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ रोजी सायंकाळी ७:३०वाजेच्या सुमारास आपले वृत्तपत्रांचे कार्यालय बंद करून दूध घेण्याकरिता रूपाली दूध डेअरी कडे जात असताना माता महाकाली येथील मोहन महादेव लटके हा दारुच्या नशेत येवून त्याने तुमच्या वृत्तपत्रांत माझ्या वडिलांच्या चांगल्या बातम्या लावा असे म्हटले त्यावर नगरपालिका निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे म्हणून त्याला समजावून सांगितले परंतु त्याने काही एक न ऐकता अश्लील शिवीगाळ करून फोन करून दहा ते पंधरा इतर मंडळी जमवून विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला.सदरचा हल्ला हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवर हल्ला आहे हे वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नांदुरा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे, निवेदनावर किशोर इंगळे विदर्भ प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना, तालुका अध्यक्ष अमर पाटील, दिनेश ब्राह्मणे, विजयानंद तायडे, पुरुषोत्तम भातुरकर, संतोष तायडे, राहुल खडेराव, निंबाजी बाजोडे, प्रफुल्ल बिचारे, विठ्ठल भातुरकर, देवेंद्र जैस्वाल , नजीर रजवी आदींच्या सह्या आहेत.

नगर परिषदेने जागेच्या मागणी संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची उत्तर न दिल्यामुळे सम्राट संघटनेचे संस्थापक आशिष खरात यांचे 30 मार्चपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भव्य स्मारक संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून फक्त आणि फक्त फक्त हे हिरोळे पेट्रोल पंप जवळील जागेवरच बांधण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे होत आहे !याबाबत सर्वप्रथम सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांनी हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळ्यासाठी व स्मारकासाठी नगरपरिषदेने द्यावी अशी मागणी केली होती ‘त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तहसीलदार जिल्हाधिकारी नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी विविध संघटनेचे तथा सामाजिक कार्यकर्ते सरसावले ‘परंतु या संदर्भामध्ये नगरपरिषदेने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंबहुना उत्तर सुद्धा दिली नाही त्यामुळे सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात हे 30 मार्च पासून नगर परिषद कार्यालय बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे । जोपर्यंत नगरपरिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देत नाही तोपर्यंत सम्राट संघटना असाच लढा देत राहील असेही यावेळी अशीच खरात यांनी सांगितले आहे !

शिक्षण उपसंचालक अनिल पारधी तसेच सहसंचालक तेजराव काळे इतर सहा जणांविरुद्ध बुलढाणा पोलीस अधिक्षकाकडे अन्यायग्रस्त शिक्षक गजानन खंडारे यांची तक्रार ! …शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांची उद्धटपणाची वागणूक ! ….न्याय न मिळाल्यास कठोर निर्णय घेऊ शिक्षक खंडारे यांची शेवटचा इशारा ! शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाने पैसे घेऊन प्रकरण दाबल्याचे आरोप 

0

 

(सिंदखेड राजा)सचिन खंडारे

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असणारे गजानन संपत खंडारे यांनी शिक्षण उपसंचालक अमरावती श्री अनिल पारधी तसेच सहसंचालक श्री तेजराव काळे यांच्यासह कार्यालयातील श्री शेगोकार अधीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयतसेच सूर्यकांत पवार अध्यक्ष द फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटी नागपूर राहणार राजेगाव तसेच कार्यालयातील श्री युनी कनिष्ठ लिपिक शिक्षण उपसंचालक अमरावती तसेच प्राचार्य विकास सरकटे ‘या सहा जणांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे !त्यामुळे एकच शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून ‘आपल्याला गेल्या 13 वर्षापासून शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास झाला असून आता आरपारची लढाई खेळल्या शिवाय पर्याय नाही !असे मत अन्यायग्रस्त शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी व्यक्त केली आहे ‘त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये या संबंधित संपूर्ण पुराव्यानिशी लेखी तक्रार दिली आहे ।त्यांनी या तक्रारीत नमूद केली आहे की ‘ते यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असून .वैयक्तिक मान्यतेचे प्रकरणअमरावती उपसंचालक श्री अनिल पारधी यांच्याकडे प्रलंबित आहे सदर प्रकरणात दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 च्यासुनावणीच्या निर्णयाविरोधात व शाळेतील नियमबाह्य प्रकरणा विरोधात सहाय्यक शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी 26 जानेवारी 2021 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते,सदरचे अमरण उपोषण माझ्या वैयक्तीक मान्यतेच्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी केली असून माझे प्रकरण खरे असून सुद्धा मला न्याय मिळाला नाही वास्तविक पाहता सदर शाळेमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केलेले कर्मचारी व नियमबाह्य बाबी अमरावती उपसंचालक श्री अनिल पारधी यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यासंदर्भात दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी निवेदन सुद्धा दिले होते सदर नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकरणे उघडकीस आणल्यामुळे गैरअर्जदार ‘शाळेचे अध्यक्ष सूर्यकांत पवार ‘व प्राचार्य विकास सरकटे ‘यांनी मी प्रकरण उजेडात आणले मुळे मला जीवाने मारून टाकण्याच्या तसेच गाडीखाली चिरडून टाकण्याच्या धमक्या दिल्या व तू फक्त शाळेच्या वाटेच्या दिशेने येते तुझी वाट लावतो असे सुद्धा म्हटले !शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयास दिलेल्या दिनांक 24 डिसेंबर 2020 27 जानेवारी 2019 च्या पत्रात मी अध्यक्ष सूर्यकांत पवार व प्राचार्य विकास सरकटे यांच्या विरोधात तक्रार देऊन सुद्धा शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी संगतमत करून प्रकरण दाबले ‘तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता श्री गजानन खंडारे यांनी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयासमोर कुटुंबा समवेत उपोषण केले होते परंतु अमरावती कार्यालय शिक्षण उपसंचालक मधील शिक्षण उपसंचालक अधीक्षक श्री शेगोकार व कनिष्ठ लिपिक श्री इवने ‘यांनी जर तुम्ही परत कार्यालयामध्ये आले तर तुमच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार करू इतकेच नव्हे तर दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिक्षण उपसंचालक श्री अनिल पारधी यांनी मी जर उपोषणाला बसले असता त्यांनी दालनात बोलावून घेतले व धमकी दिली की तू जर तुझी उपोषण मागे घेतले नाही तर तुला जर मध्ये टाकले जाईल .तसेच शिक्षण सह संचालक तेजराव काळे यांनी सुद्धा तुला एका भाषेत समजत नाही का तो परत परत या कार्यालयात आला तर तुला शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली वास्तविक पाहता वैयक्तिक मान्यतेचे प्रकरणे असल्यामुळे मला विचारणा करण्यासाठी वारंवार कार्यालयांमध्ये जावे लागत आहे ‘तसेही श्री गजानन खंडारे यांनी लेखी तक्रार मध्ये नमूद केले आहे !शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती मधील काही कर्मचारी हे संगत मत करून पैसे उकळून प्रकरण दाबण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व मला न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी अन्यायग्रस्त सहाय्यक शिक्षक गजानन खंडारे यांनीजिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे !आता यावर पोलिस काय कारवाई करते हे बघणे औचित्याचे ठरेल तरी अन्यायग्रस्त शिक्षक श्री खंडारे यांना जर न्याय मिळाला नाहीतर आपण कठोर निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले !त्यांनी या लेखी तक्रारी च्या प्रती माननीय मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री ‘ गृहमंत्री उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा ठाणेदार सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती यांना सुद्धा पाठवले आहेत

शासनाने सैन्य भरती व पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू ! बिग्रेडियर सुधीर सावंत व विभागीय माजी सैनिक अध्यक्ष अर्जुन गवई यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

गेल्या तीन वर्षांपासून शासनाने कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबवली नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण युवक – युवती वर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे !तसेच सैन्य भरती व पोलीस भरतीची तयारी करणारे तरुणांना कुठल्याच प्रकारचे ही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ‘त्यांच्यावर व त्यांचे परिवारावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे !या संदर्भामध्ये माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ‘तसेच अमरावती विभागीय अध्यक्ष माजी सैनिक अर्जुन गवई ‘यांनी 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देऊन भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी केली .जर भरती प्रक्रिया राबवली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे .अर्जुन गवळी यांनी 20 वर्ष सैन्यदलामध्ये नोकरी केली निवृत्त झाल्यानंतर गोरगरिबांचे मुलं सैन्य व पोलीस भरती मध्ये दाखल झाले पाहिजे या हेतूने त्यांनी साखरखेरडा येथे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लक्ष करिअर अकॅडमी चे प्रशिक्षण वर्ग सुरू केले .व त्यांना प्रशिक्षण देऊन हजारो मुलांना त्यांनी सैन्यामध्ये भरती केले ‘परंतु आज रोजी तीन वर्षापासून शासनाने कुठल्याही प्रकारचे सैन्य भरती व पोलीस भरती राबवली नसल्यामुळे मुलांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे !सध्या स्थिती मध्ये विद्यार्थ्यांनी फाशी घ्यावी काय असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे !त्यांनी अशी मागणी केली आहे की ज्याप्रमाणे सैन्य भरती मध्ये आसाम मध्ये ‘मुलांची उंची ही 162 इंच असते .पंजाब मध्ये 164 ‘ही इंच महाराष्ट्रामध्ये सैन्यभरती मध्ये का नसते कारण महाराष्ट्र मध्ये सैनिक भरतीच्या वेळेला 170 इंच उंची घेतली जाते ‘असा सवालही यावेळी अर्जुन गवई यांनी उपस्थित केला !शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवली नाहीतर ४ एप्रिल पासून राज्यभर आंदोलन तीव्र करू असा इशाराही यावेळी विभागीय अध्यक्ष अर्जुन गवई यांनी दिला आहे ।

पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पाजण्यासाठी सरसावले चिमुकले !शिंदीच्या हेमंत मी बनवले पक्षासाठी पाणी पात्र !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या पावसाच्या सरी जरी कोसळत असल्या तरी ऊन सुद्धा चांगलेच तपत आहे .आणि अशातच जनावरे तरी कशीबशी आपली तहान पाणी पिऊन भागवत आहे माणसे सुद्धा पाणी पिऊ शकतात ‘परंतु आकाशात उडणारे पक्षी चिमणी तप्त उन्हामध्ये आकाशात असतात उडत असतात .आणि अश्या पक्ष्यांना आपण पाणी पिण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूने सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील हेमंत ज्ञानेश्वर जाधव या पाच वर्षीय चिमुरड्याने ‘आपल्या घरासमोरील झाडावरती एक पक्ष्यांना पाणी पिता यावे यासाठी प्लास्टिकच्या तेलाच्या टाकावू कॅनी पासून पक्ष्यासाठी पाणी पात्र बनवली आहे ‘त्यामुळे पक्षी पाणी पिण्यासाठी पाणी पात्रावर येतात व पाणी पिऊन तृप्त होतात ।अगोदर आपण बघितले की अनेक लहान लहान मुलं पक्षासाठी चाऱ्याची व्यवस्था तसेच पाण्याचीसुद्धा व्यवस्था उन्हाळ्यामध्ये करत आहेत हेच चिमुरड्यांना समजते ‘तसेच हिवरा आश्रम येथील ओम थोरहाते व शिव थोरहाते ते या जुळ्या भावांनी सुद्धा पक्षासाठी दानापानी पात्र बनवले आहे ‘म्हणून लहान मुलांना जर पक्षा साठी काहीतरी करण्याची धडपड निर्माण होते तर माणसे यापासून बोध केव्हा घेतील हा खरा प्रश्न आहे :हेमंत ने बनवलेल्या पक्ष्यांसाठी पाणी पत्रामुळे त्याचे कौतुक होत आहे !