Home Blog Page 505

अपंग जनता दल (सामाजिक संघटना) ची राज्य कार्यकारिणी बरखास्त

0

 

नवीन कार्यकारिणी 26/03/2021 ला जहीर होणार

अमरावती:- अपंग जनता दल (सामाजिक संघटना) हि एक अराजकीय सामाजिक संघटना असून या संघटनेत मार्फत व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते मा.शेख अनिस पत्रकार यांच्या नेत्रूत्वत संपूर्ण महाराष्ट्रात अपंगांच्या हक्का व न्यायासाठी सतत कार्य करतात व अपंगांना न्याय मिळवून देतात.
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ची राज्य कार्यकारणी 23-03-2021 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून बरखास्त कारणात आली आहे व नवीन कार्यकारणी 26-03-2021 रोजी जहिर करण्यात येणार आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यत काही चांगले काम करणारे जिल्हा अध्यक्ष. जालना. नंदुरबार. लातूर. नाशिक. यांना राज्य कार्यकारणी संधी देण्यात येणार असून लवकर या बद्दल अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी चा बैठकीत चर्चा करून नियुक्ती करणार येणार आहे तरी अपंग जनता दल सामाजिक संघटना चा राज्य कार्यकारणी बैठकित दि. 26/03/2021 रोजी ठिक 11 वाजता हजर राहावे.
स्थळ:-डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर हॉल शिवनेरी नगर सर्वे नंबर 56.
गल्ली नंबर 15.
कोंढवा खुर्द पुणे 48 ——————————————————
राज्य कार्यकारणी खालील प्रमाणे गठीत करण्यात येणार आहे

1) राज्य संपर्क प्रमुख 1 पद
2) राज्य उपाध्यक्ष 6 पद
3) राज्य महासचिव 1 पद
4) राज्य सचिव 1पद
5) राज्य महिला अध्यक्ष 1 पद
6) राज्य सल्लगार 3 पद
7) राज्य प्रसिद्ध प्रमुख 1 पद
8) राज्य कार्यकारणी सदस्य सर्व जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त सदस्य असतात.

संपर्क :- श्री.प्रदिप कामठे
राज्य उपाध्यक्ष
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मो7020358954

श्री. राज़िक शाह राज्य महासचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मो. 9923671563

प्रहार जनशक्तीपक्षाच्या वतीने 22 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन …!  

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरवट बकालच्या वतीने बस स्थानक पाणपोई या स्थळी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन २२ मार्च सकाळी १० ते २ वाजे दरम्यान करण्यात आले असुन रक्तदात्यांनी या शिबीरात रक्तदान करण्याचे आव्हाण प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे .

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे अहोरात्र गोर गरिब शेतकरी शेतमजुरांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर असतात ,अपंग निराधार अनाथ शेवटच्या घटकाचा आधार असलेले राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतुन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा वरवट बकाल पदाधिकाऱ्याच्या वतीने बस स्थानक वरवट बकाल पाणपोई जवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केल्यास गरिब गरजु रुग्णांना जिवदान मिळेल रक्त संकलन करुन रक्त बॅक ठाकरे लॅब अकोला यांना पाठविण्यात येणार आहे परिसरातील युवकांनी रक्तदान शिबीर प्रसंगी उपस्थीत राहुन रक्तदान करावे असे आव्हाण प्रहार जनशक्ती पक्षचे पदाधिकारी तौसिफ जमदार अर्जुन सोळंके व प्रहार जनशक्ती मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्या दालनात अनिल वरघट यांच्यासह शेकडो घुईखेड वासीयांचे बेमुदत आमरण उपोषण

0

 

धिरज नेवारे चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी

दलीत मागासवर्गीय नागरीक अतिक्रमित अतिरिक्त बांधकामाच्या मोबदल्यापासुन वंचित ठेवल्यामुळे घुईखेडवासी यांचे आमरण उपोषण

सविस्तर असे की 2009मध्ये तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी हेमंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली घुईखेड येथील नझुल घर व त्याला लागून असलेल्या अतिरिक्त अतिक्रमित बांधकाम केलेल्या नागरिकांची मागणी यादी 508अर्ज जिल्हाधिकारी अमरावती यांना प्राप्त झाले होते त्यापैकी 46+28+40=114 या अतिक्रमित व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घुईखेड येथील नागरीकांना मोबदला देण्यात आलेला आहे. यामध्ये धनदांडग्यांनाच, राजकारणी लोकांना मोबदला देण्यात आलेला आहे असा आरोप बेंबळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष अनिल वरघट यांनी केलेला आहे व आजही 12 वर्षानंतर ज्यांचे अतिरिक्त अतिक्रमित बांधकाम सुटलेले आहे अशा नागरिकांची यादी प्रकल्पातून गहाळ असुन पुन्हा 46+28+40 या यादीतील नागरिकांना 71 च्या यादीमध्ये स्थान देऊन त्यांना पुन्हा मोबदला देण्यात आला असून मुळ अतिरिक्त अतिक्रमणधारक त्या मोबदल्या पासुन आजही वंचित असल्यामुळे पुन्हा बेंबळा प्रकल्प अधिकार्यांनी अर्ज मागविले मुळे त्या कार्यालयाला 392 अर्ज प्राप्त झाले आहे त्यामध्ये अनेक नागरिकांनी पुन्हा पुन्हा अर्ज केल्यामुळे ज्या नागरीकांचे जे एम आर व्यतिरिक्त अतिक्रमित बांधकाम होते अशा नागरीकांची यादी तपासणी करून अपात्र लोकांना वगळून पात्र लोकाची समवेशक यादी बनवुन न्याय द्यावा अशी गावकऱ्यांची मागणी होती परंतु बेंबळा प्रकल्प अधिकारी व काही नागरीकांच्या संगनमताने बेंबळा प्रकल्पाच्या अधिकार्यांनवर दबाव टाकून याच गावातील 20 ते 30 नागरीकांची यादी त्याच्या मुल्यांकनासह सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे गावामध्ये प्रचंड असंतोष होऊन खळबळ उडाली त्यामुळे समस्त गावकरी हे बेंबळा प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आलेल्या 392 व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांचेकडे देण्यात आलेल्या(2009) मध्ये508 अर्ज व अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या अतिक्रमित बांधकामाचा मोबदला अजुन पर्यंत बेंबळा प्रकल्प यांच्या कार्यालयामार्फत देण्यात न आल्यामुळे या न्याय मागणीकरीता सोमवार दि 22 मार्च 2021 पासुन कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांच्या दालनात अनिल वरघट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद आहे याबाबत चे निवेदन सर्व संबंधित विभागाला देण्यात आलेले आहे.

8 लाख 17 हजाराची घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी मध्य प्रदेशातील लोधीखेडा इथून अटक

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.२१ मार्च
स्थानिक संत चोखोबा वार्डातील हॉटेल व्यावसायिक जितेंद्र राऊत हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी १४ मार्चला रात्रीच्या सुमारास एकूण ८ लाख १७ हजार रुपयाची घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी संत चोखोबा वार्ड येथीलच एका आरोपीस अटक केल्यानंतर आता पोलिसांनी काल पोलिसांनी पुन्हा एक आरोपी रोशन डोंगरे मु.लोधिखेडा यास अटक केली. आज स्थानिक न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठड़ी मंजुर केली.
घटनेच्या दुसरे दिवशीच स्थानिक आरोपी सोनु सिंग उर्फ सौनिहालसिंग याचेकडून २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या घरफोड़ीप्रकरणी एकूण तीन व्यक्ति सहभागी असून इतर दोन चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी दुसरा आरोपी रोशन डोंगरे याला मध्यप्रदेशातील लोधिखेडा (ता.सौंसर) येथून अटक केली. सदर आरोपीकडून घटनेदरम्यान वापरलेली दुचाकी, मोबाईल तसेच ३२८० रुपये नगदी असा ४४२८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
या चोरीच्या घटनेतील तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.या प्रकरणाचा पुढिल तपास ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोहवा विवेक बंसोड़, शेखर डोंगरे पोशी सुहास चांदोरे,सहायक उपनिरीक्षक सादिक शेख हे करीत आहेत.

राज्याचे खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा भाजपाची मागणी  

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी आणी खंडणीखोर गृहमंत्री ना . देशमुख यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे आज करण्यात आली आहे . या संदर्भात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका लिखित पत्राद्वारे सणसणीत आरोप करीत म्हटले आहे की , राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला सांगीतले की तुम्ही प्रति महीन्याला मला १०० कोटी रुपये जमा करून द्यावे , असे जर असले तर ही बाब महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने योग्य नसुन , तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे भ्रष्ठाचारी आणी खंडणीखोर असुन त्यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकारी नाही तरी त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा , जर गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा न दिल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा ईशारा दिला असुन, या प्रसंगी तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या सौ.भारती भुसावरे यांना व महसुल कर्मचारी पराग सरोदे, सुरज जाधव यांच्या उपस्थितीत दिलेल्या निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील , जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी , जिल्हा सरचिटणीस हर्षल गोविंदा पाटील , यावल पंचायत समितीच्या सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी , जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता अतुल भालेराव , पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , कृउबाचे उपसभापती उमेश प्रभाकर पाटील , योगीराज बऱ्हाटे यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत .

नांदगाव खंडेश्वर तालुका भाजपा शहर च्या वतीने अनिल देशमुखसह राज्य शासनाचा लाजखोर ग्रुहमंत्री निषेध केला राजीनामा द्यावा अशी मागणी केली 

0

 

प्रतिनिधी/नांदगाव खंडेश्र्वर

महाराष्टाचे गुहमंञी अनिल देशमुख ऐका सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातुन महीन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करतात असा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीर सिंग यांनी केला.
त्यानंतर महाराष्टात खळबळ ऊडाली आहे दरम्यान आज (रविवार)नांदगाव खंडेश्र्वर बस स्टाॅप परीसरामध्ये भाजपाच्या वतीने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागनीसह राज्य शासनाचा तिव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला असुन यावेळी
उपस्थित मा. न.प.अध्यक्ष श्री संजय पोफळे भाजपा शहर अध्यक्ष नवल खाची श्री दिपक भाऊ पुसदकर तालुका सरचिटणीस सौ रुपाली ताई नाकाडे जिल्हा महिला सचिव सौ मोनाली ताई बाभुळकर तालुका अध्यक्ष सौ गादेताई जिल्हा महिला कार्यकर्त्या सौ दहातोंडे ताई महीला अध्यक्ष शहर सौ भगतताई श्री निकेत ठाकरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री रणजित पाटील खंडाळकर जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा श्री अविनाश ब्राह्मणवाळे श्री मंगेश मानके शहर सरचिटणीस श्री निकेत ब्राह्मणवाळे शहर सरचिटणीस श्री सुधीर देवघरे शहर सरचिटणीस श्री राहुल गेडाम शहर अध्यक्ष युवा मोर्चा श्री अतुल जयसिंगपूरे श्री निलेश पायघंन श्री पवन जोशी श्री विजय सोनोने निकेश तडस व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

एक हात मदतिचा आपन केलेली छोटी छोटी मदत कोनाचे तरी जिवन वाचवु शकते

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा. तालुक्यातील माळुंगि येथील एका गरीब कुटुंबातील अजय विजय पारेकर.नावाचा मुलगा हा सलग३महिने पासुन आजारी असल्याने त्यांना त्यांच्या वडिलांनी अकोला येथे दवाखान्यात नेले असता डॉक्टर यांनी वेगवेगळ्या टेस्ट केल्या व अजयला पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जायचे सांगितले अजयला मुंबई ला घेऊन गेले असता टाटा हासपिटल येथे तपासणी केल्या वर ब्लड कँनसर असल्याचे सांगितले त्या वर.केमोथेरपी करावि लागनार. व औषधी कीमान४ते५लाख रुपये खर्च येनार आहे अजय पारेकर यांच्या परिवाराचि आथिर्क परीसतिथि मजबुत नाही की ते हा खर्च करु शकतिल म्हणून काही मदत अजयचे मित्र करित आहे आपन सर्वाना विनंती आहे की आपल्या कडुन जि पन मदत होईल ति आपन करावी फोन पे नंबर8605658793.विजय सुपडाजि पारेकर
32766726546.भारतीइस्टेट. बँक. नांदुरा. आय.एफ.एस.सि.कोड
एस.बि.आय.एन0002166.या.नंबर वर मदत करने असे त्याचे मित्राकडून सांगन्यात येते

निसर्गाचा प्रकोप: नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा तालुक्यातील गावांमध्ये काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घासाचे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे.
मुरंबा व बरफगाव शिवारात मका, हरभरा, कांदा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर वसाळी, वळती बु. व खु. या शिवारात मध्ये केळी, ऊस, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे
या नुकसानाचे संबंधित कृषी अधिकारी, तलाठी यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देवून माझ्या माय बाप शेतकऱ्यांना सहकार्य करावे ही विनंती.
तर पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी ही तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

पवन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी रुग्णालयात फळांचे वाटप

0

 

खामगाव:-खामगाव येथे सरकारी रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्याचे समाज सेवक पवन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णांचा विचार करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.व कैलास भाऊ फाटे यांनी एका गरजू वेक्तीला रक्त दान केले पवन चव्हाण यांच्या विचारातून गोरगरीब जनतेला काहीतरी मिळावं म्हणून गरीब रुग्णांना फळवाटपचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी उपस्थित सात्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास भाऊ फाटे,जिल्हा संघटक अयाज शेख,सत्याग्रह युवा अध्यक्ष गणेश सडतकार,प्रफुल्ल इंगळे, पवन चव्हाण,अमोल हरामकर,आनंद गायकवाड,
खामगांव टायगर ग्रुप गगन सेठ छाबरा , पियुषभाऊ चव्हाण अंकुशभाऊ हटकर, रोहीत भाऊ माळवंदे सुरजभाऊ लोंढे राम भाऊ देवकते लक्ष्मण भाऊ कान्हेरकर पवन गवळी क्रुष्णा गवळी करण ञिभवन रुपेश काकडे राहुल सुरोसे स्वप्निल तांबे क्रुष्णा काकडे प्रशांत वरघटे अजय बैरागी कुनाल कुंदलवार अमोल वानखडे अनंता बोरे सोपान रहाणे समस्त टायगर ग्रुप तालुका खामगांव जिल्हा बुलढाणा

डोंगर कठोरा जिल्हापरिषदच्या ऊर्दु शाळेच्या आवारात घाणीचे उकीरडे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका ,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

. तालुक्यातीत डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील आवारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे विद्यार्थी आणी शिक्षक यांच्यासह परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . डोंगर कठोरा तालुका यावल येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेच्या कंपाऊंडच्या परिसरातील संरक्षण भिंत नसल्याने चारही बाजुने मोकळया असलेल्या आवारातील आतील ठीकाणी गावातील काही बेजबाबदार नागरीकांनी मागील सुमारे पाच ते सहा वर्षापासुन गुराढोरांसह शेणखताचे उकिरडे टाकुन ठेवले असून,या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या गंभीर प्रश्नाकडे ग्राम पंचायत प्रशासनासह ग्रामस्तरीय स्वच्छता अभियान समितीने तात्काळ लक्ष द्यावे , डोंगर कठोरा ग्राम पंचायत नवनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदच्या उर्दु शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या आणी शिक्षकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे घाणीचे उकीरडे तात्काळ उचलुन त्या ठीकाणी स्वच्छता प्रस्थापीत करावी जेणे करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या महामारीच्या संकटातुन व इतर आजारातुन सुरक्षीता प्रदान करण्यास मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.