Home Blog Page 511

पवन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारी रुग्णालयात फळांचे वाटप

0

 

खामगाव:-खामगाव येथे सरकारी रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्याचे समाज सेवक पवन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णांचा विचार करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.व कैलास भाऊ फाटे यांनी एका गरजू वेक्तीला रक्त दान केले पवन चव्हाण यांच्या विचारातून गोरगरीब जनतेला काहीतरी मिळावं म्हणून गरीब रुग्णांना फळवाटपचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी उपस्थित सात्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास भाऊ फाटे,जिल्हा संघटक अयाज शेख,सत्याग्रह युवा अध्यक्ष गणेश सडतकार,प्रफुल्ल इंगळे, पवन चव्हाण,अमोल हरामकर,आनंद गायकवाड,
खामगांव टायगर ग्रुप गगन सेठ छाबरा , पियुषभाऊ चव्हाण अंकुशभाऊ हटकर, रोहीत भाऊ माळवंदे सुरजभाऊ लोंढे राम भाऊ देवकते लक्ष्मण भाऊ कान्हेरकर पवन गवळी क्रुष्णा गवळी करण ञिभवन रुपेश काकडे राहुल सुरोसे स्वप्निल तांबे क्रुष्णा काकडे प्रशांत वरघटे अजय बैरागी कुनाल कुंदलवार अमोल वानखडे अनंता बोरे सोपान रहाणे समस्त टायगर ग्रुप तालुका खामगांव जिल्हा बुलढाणा

डोंगर कठोरा जिल्हापरिषदच्या ऊर्दु शाळेच्या आवारात घाणीचे उकीरडे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका ,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

. तालुक्यातीत डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील आवारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे विद्यार्थी आणी शिक्षक यांच्यासह परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे . डोंगर कठोरा तालुका यावल येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेच्या कंपाऊंडच्या परिसरातील संरक्षण भिंत नसल्याने चारही बाजुने मोकळया असलेल्या आवारातील आतील ठीकाणी गावातील काही बेजबाबदार नागरीकांनी मागील सुमारे पाच ते सहा वर्षापासुन गुराढोरांसह शेणखताचे उकिरडे टाकुन ठेवले असून,या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या गंभीर प्रश्नाकडे ग्राम पंचायत प्रशासनासह ग्रामस्तरीय स्वच्छता अभियान समितीने तात्काळ लक्ष द्यावे , डोंगर कठोरा ग्राम पंचायत नवनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदच्या उर्दु शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या आणी शिक्षकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे घाणीचे उकीरडे तात्काळ उचलुन त्या ठीकाणी स्वच्छता प्रस्थापीत करावी जेणे करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या महामारीच्या संकटातुन व इतर आजारातुन सुरक्षीता प्रदान करण्यास मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मारूळ ते न्हावी मार्गावरील १ कोटीच्या निधीच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते भुमीपुजन

0

 

. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, ,

तालुक्यातील मारूळ ते न्हावी या पाच किलोमिटर मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे शुभारंभ रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आज आले. दरम्यान आज दिनांक २० मार्च रोजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या सुमारे १ कोटी८ लाख रुपये निधी खर्चाच्या रस्ता दुरूस्ती डांबरीकरण कामाचे शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भुमीपुजन व कुदळ मारून करण्यात आले , या प्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील , पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी , काँग्रेसचे कार्यकर्ते जावेद अली सर , मारूळ ग्रामपंचायत सरपंच सय्यद असद अहमद जावेद व सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. बऱ्याच दिवसांपासुन या मार्गावरील रस्त्याची ठीक ठीकाणी खड्डे पडल्याने दयानिय अवस्था झालेल्या रस्त्यावरून चालणे वाहनधारकांना फारच जिकरीचे झाले होते .आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष लक्ष घालुन या मार्गासाठी निधी मंजुर करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने मारूळ वासीयांनी त्यांचे आभार मानले.

सिंदखेडराजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस !गारपीटिचा ही तडाका ‘अनेक कांदा ‘ फळबागांच्या पिकांचे नुसकान !विद्युत खांब सुद्धा पडले जिल्हा माजी सभापती दिनकर बापू देशमुख यांनी केली पीकांची पाहणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

हवामान खात्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये गारपिटीचा पावसाची शक्यता वर्तवली होती यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरला याचे चित्र जिल्ह्यांमध्ये दिसत आहे .19 मार्च रोजी रात्री आठ वाजता सिंदखेडराजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या सह पाऊस पडला .या पावसामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाचे ‘ कांदा । पपई ‘ टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले ‘तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यामुळे ‘अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसले अनेकांचे घराचे तीन पत्र सुद्धा उडाले यामध्ये पांगरी काटे येथील सत्यजित थिगळे यांच्या घरावरचे टिन पत्र उडल्यामुळे ‘ पावसामुळे गहू ‘ मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले’तसेच पांगरी काटे देऊळगाव माळी परिसरामध्ये विजेचे खांब तुटून पडल्यामुळे सोळा तासापेक्षा जास्त वेळ झाली तरी लाईट आलेली नव्हती !त्यामुळे पावसाची भीषणता लक्षात येते ।यावेळी पांगरी काटे शिवारातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुसकानीची पाहणी माजी कृषी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापू देशमुख यांनी केली .यावेळी त्यांच्यासोबत तलाठी आनंद राजपूत शेळके साहेब सरपंच शिवानंद थिगळे व सत्यजित थिंगळे इतर शेतकरी उपस्थित होते

हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा मिळाल्यास असे असेल डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक !

0

 

सिंदखेड राजा । ( सचिन खंडारे )

बुलढाणा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा आदर्श स्मारक उभे राहावे यासाठी सम्राट संघटनेने ३ मार्च रोजी नगरपरिषदेला हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा देण्याची मागणी केली होती ‘व भीम सैनिकाच्या निधीमधून हे स्मारक तयार होईल असे सुद्धा सांगितले होते ‘त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून विविध राजकीय पक्षांनी संघटनेने नगरपरिषदेला निवेदने देऊन पेट्रोल पंपाजवळ जागा देण्याची मागणी केली ।आता फक्त बुलढाणा नगरपरिषदेने लवकरात लवकर जागा द्यावी व त्यानंतर त्या ठिकाणी भव्य दिव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू होईल .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अतिशय सुंदर व भव्य असणार आहे ‘याबाबत स्मारक कसे असावे याची डिझाईन सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी तयार केले असून अतिशय देखणे असे स्मारक या ठिकाणी उभा राहणार आहे ‘आता जास्तीची उत्सुकता नगरपरिषदेने ताणून न हिरोळे पेट्रोल पंप जवळील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी द्यावी एवढीच रस्ता पेक्षा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे ‘

पिंपळगाव काळे युवकानं वाचविले हरिनाचे प्राण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

पिंपळगाव काळे येथे दि. 20 मार्च रोजी गोपाल रामभाऊ राऊत यांच्या घरात चक्क ऐक हरीण शिरली. हरिनाचा पाठलाग करत कुत्र्यांनी तिला जखमी केलं आणि ते हरिण जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेत शेताच्या बाजूने असलेल्या एका घरात शिरली घर मालक गोपाल रामभाऊ राऊत यांनी कुत्र्यांना पडवून लाऊन हरिनेला पाणी पाजून वण अधिकाऱ्यांना फोन लावला आणि हरिणेला वण अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून आपले कर्तव्य पूर्ण केले…

आरोग्य हेच आदर्श गावा साठी कानमंत्र !बीग्रेडिअर माजी खासदार सुधीरजी सावंत यांचे प्रतिपादन ! ..शिंदी येथे बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांची भेट !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

आरोग्य हीच समृद्धी तथा आदर्श गावासाठी सर्वात मोठे कानमंत्र आहे ‘आरोग्य प्रत्येकाने जपली पाहिजे ‘असे मत माजी खासदार तथा माजी सैनिक फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष बिग्रेडिअर सुधीरजी सावंत यांनी दिनांक 20 मार्च रोजी शिंदी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात केले,यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व्यायाम केला पाहिजे महिलांनी सुद्धा विविध प्रकारचे खेळ खेळले पाहिजे बचत गटांच्या महिलांनी छोटेखानी उद्योग उभारून आपल्या गावातच उद्योगाची उभारणी केली पाहिजे ‘असेही त्यांनी यावेळी सांगितले ‘यावेळी मंचकावर बागायतदार निवृत्ती खरात सरपंच सौ अर्चना ताई खरात उपस्थित होते यावेळी माजी सैनिक विदर्भ अध्यक्ष तथा शिंदी येथील ग्रामसेवक माननीय अर्जुन जी गवई यांनी शिंदी गाव हे आदर्श गाव झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असून माननीय साहेबांनी शिंदी गावासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी अर्जुन गवई यांनी केली ‘यावेळी शिंदे येथील सभागृहांमध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणाने नियम पाळण्यात आले ।प्रत्येकाने तोंडाला माक्स बांधले होते ‘यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केली ‘तर आभार गजानन भांड यांनी मानले ‘या कार्यक्रमासाठी माजी सैनिक केवळ गिरी महाराज ‘ काशिनाथ बुरुकुल ‘ बंगाळे ‘भगवान गवई ‘भाऊराव चव्हाण .आत्माराम खिल्लारे .तसेच ‘बचत गट अध्यक्ष स्वाती मार्के ‘रेखा पवार ‘सुनील खंडारे विशाल खंडागळे ‘अनिल बंगाळे गवळी ‘ग्रामपंचायत सदस्य श्री सखाराम खंडागळे ।ज्ञानेश्वर खरात ‘गजानन खरात ‘गणेश तोडे ‘विनोद वैद्य ‘प्रयोगशील शेतकरी निवृत्ती खरात ‘सरपंच पती विनोद खरात ‘आधी आजी-माजी सैनिक या ठिकाणी हजर होते ‘यानंतर मा .सुधीरजी सावंत यांनी शिंदी गावची फेरफटका मारुन पाहणी केली ‘

कोरोना नियम व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या प्रेमाचा चहा संचालकवर दंडात्मक व पोलीस कारवाई

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचे वाढते प्रादुर्भावाने चिंता वाढली असून प्रशासनसुद्धा कडक उपाययोजना करीत आहे.
तालुक्यात महसुल कर्मचारी,पोलिस,शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी जीवाची जोखिम पत्करित नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे याहेतुने रस्त्यावर कार्यरत असतांना नागरिक मात्र विनामास्क बेजबाबदारपणे वागत आहेत.
हिंगणघाट शहरातील अनेक नागरिक व व्यापारीसुद्धा वेळप्रसंगी कोरोना नियंत्रण कर्मचाऱ्यांशी वाद घालु लागले आहेत.
दि.१७ मार्च रोजी स्थानिक ‘प्रेमाचा चहा’ या रेस्टॉरेंटच्या संचालकाने नगरपालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालित अर्वाच्य शिविगाळ करीत मारहाण करण्याची धमकी देत त्यांचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला.
कोरोना काळात प्रशासनाने सायंकाळी ७ पर्यंत दुकाने व इतर प्रतिष्ठाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे.या संबंधी जिल्हाधिकारी तसेच स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे स्पष्ट आदेश असल्याने पालिकेच्या पथकाने ‘प्रेमाचा चहा’ या रेस्टोरेंटवरती धाड़ मारित दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला.यावेळी या रेस्टोरेंटचे संचालक संतोष गौतम (ठाकुर)यांनी उलट पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत अर्वाच्य शिविगाळ केली.
सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश असूनही रात्री ७.४५ वाजता ही ‘प्रेमाची चहा’ सुरुच होती,यावेळी तेथे कोविड-१९ तसेच सोशल डिस्टनसिंग आदेशाचे उल्लंघन करीत १०-१५ ग्राहक हजर होते.
हैंडवाश,सैनिटाइजर तसेच ग्राहक नोंदवहीसुद्धा पथकाला आढळली नसल्याचे पोलिस तक्रारीत म्हांटले आहे.
तुम्ही कोणाचे आदेशाने येथे आले अशी विचारणा केली,वाद वाढतांना दिसुन येताच पथकातील कर्मचाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधुन ‘चहावाले’ संतोष गौतम उर्फ संतोष ठाकुर यांचा संपर्क करुन दिला.परंतु पूर्वाश्रमीचे पोलिस दलातील शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या संतोष ठाकुर यांनी भ्रमणध्वनीवर बोलतांनासुद्धा उर्मट भाषेचा प्रयोग करीत मुख्याधिऱ्यांचा उपमर्द केला तसेच शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केला.
सदर प्रकरणी दि.१८ मार्च रोजी मुख्याधिकारी जगताप यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली असून कलम १८६,१८८,२७० भादंवी सहकलम ३,४ साथरोग प्रतिबंधक अधिनियम ५१( ब) आपत्ती प्रतिबंधक अधिनियम,महाराष्ट्र कोविड-१९ अधिनियम ११ अन्वये गुन्हा नोंद केला.

असदपूर पोलीस चौकी समोर बसली गरीब निराधार लाचार महीला धरणे उपषोण वरती कोणी तरी मदत करणार का?

0

 

उषा पानसरे  प्रतीनीधी असदपूर

दि.12 मार्च रोजी मदत मागायला पिडीत महीला रेखा बाई पाठक रा. असदपूर मराठी शाळे चा मागे वय ५० ही महीला समाज सेविका व पत्रकार उषा पानसरे यांच्या राहते घरी रंगारवासनी पोहचली मदत मागायला ।
पिडीत महीला रेखा बाई पाठक याना आपल्यावरती होनार्‍या अत्याचार विषयी सविस्तर माहीती सागितली व ती शनिवार दि.13 /3 / 2० 21 रोजी असदपूर पोलिस चौकी समोर रात्र दिवस धरणे अंदोलन ला एकटीच बसले आहे ।कि कूणीतरी पोलिस विभागातील या गावातील प्रतिष्ठ नागरिक सरपंच, पोलिस पाटील ,तंट्यामूक्ती अध्यक्ष मैबंर हया महीलेला मदत करतील ।हया ठाम निर्नय घेवून ही रेखाबाई पाठक घट्य निर्नय घेवून बसले धरणे अंदोलनला पिडीत महीले वर अत्याचार मानसिक, छळ ,मारपिट. झोपडी तोडून तिला बेघर केले असून घरातली भांडी तीन टिन चादर ज्याची किमंत 1800 रू. असून सर्वच काही घेवुन घेले अजय महादेव पारडे त्याची आई करूणा बाई पारडे हया दोघाचे नाव सागत आहे तर तिची झोपडी तिच्यात झोपडी समोर राहणारी संगिताबाई विनोद नितनवरे हया महीलाने दिड दोन महीण्या झाला असून रेखा बाई ची झोपडी तोड फोड करून पाडून टाकली असे पिडीताचे म्हणने आहे रिपोर्ट दिला पाहीजे नाही तर तिला वारंवार मार पिट करून मानसिक त्रास देवून पागल पाघल हा शध्दाचा उपयोग करून त्याचे कडचे पूरूष तिच्या छाती व गूप्त अंगाला हात सूध्दा लावतात ही पिडीता दोन महीण्या पासून एका बाबूळ च्या झाडा खाली खाट टाकून झोपत आहे तिथच स्वयपाक करूण लोकाकडे भाडी घासायला जातो शेतात फन परटी सरवा सूध्दा येचायला जातो तरी सूध्दा तिला तिथही सूखाने राहू न देता तिचा छळ करणे चालू असून शेवट रेखाबाई कंटाळून पोलीस चौकी समोर पाँच दिवसापासून धरणे आदोलनला बसली आहें ती पोलिस पाटील असदपूर येथिल माहूरे त्याचे नाव घेवून बोलतो कि मला न्याय मिळाला नाही तर मी माहूरे पोलिस पाटील च्या घरासमोर फाँसी या जहर खावून आत्महत्या करतो तिचे हेही म्हणने आहे कि पोलिस पाटीलच मला रिपोर्ट दयायला जावु देत नाही व गेली तर माझा रिपोर्ट घेवू देत नाही कि ती बाई पागल आहे असे रेखा बाई ने आमचे प्रतीनीधी व समाजसेविका उषा पानसरे सी बोलताना सांगितले आहे । तसेच रेखाबाई पाठक ही महीला आठ महीणे आधी पानसरे मँडम कडे मदत मागायला गेल्या होत्या तेव्हा सूध्दा संगिताबाई नितनवरे च्या मूलिनी तिचा मार पिट करूण घरावरती दगड फेकले असता पिडीत रैखाबाई हीने आसेगाव पोलीस स्टेशन ला एन सी आर करूण तक्रार केली होती या तक्रार का ? केली म्हणून तिला पागल म्हणून सर्वानी तिचा छळ पून्हा चालू केला असता
तिला पानसरे मँडम नी दोन महीणे आपल्या स्वताह च्या घरी ठेवले होते तिला दोन टाँईम जेवन चाहा नास्ता व दोन जोडी साड्या व ईतर कपडे सूध्दा दिले होते ती त्याचा कडे भाडी घासत होती त्याचे वेगळे पैसे 800 रू. महीणा वेगळा देत होत्या
ही पीडीत महीला रेखा पाठक जर पागल असती तर हया महीलेला त्यानी रात्र व दिवस घरात ठेवले असते का?
तिच्या एकटे पणाचा फायदा घेवून तिला शारीरीक ” मानसिक ” छळ करत असून तिच्या गूप्त अंगाला सूध्दा हात जबरदस्तीने लावतात
गावातिल नागरिक एका महीलेला मदत करू शकत नाही
ति पण एक स्त्री च ? आहे आपल्या आई बहीण मूलगी सारखीच आहे हया विचार कोण करतो का?
हया महीलेला कोण न्याय मिळून देणार कोण आरोपीला सजा देणार कि नाही देनार हा मात्र प्रश्र पडला काय असदपूर पोलिस कर्मचारी तिला न्याय देतील का?
व ते पाँच दिवसा पासून का तिला भेट दयाला आले नाही ? विषय गंभीर आहे ही महीला रेखाबाई पोलीस पाटील माहूरे चेच नाव घेवुन आत्महत्या त्याचा घराजवळ करतो असे बोलते कारण काय ?आहे तिला कोणी न्याय देणार का? किवा नाही
?

कोरोना लसीकरण केंद्र वाढवून द्यावे – अमर रमेश पाटील यांची तहसीलदारांकडे मागणी

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

कोरोणाच्यां महाभयंकर लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. यामधे आपला बुलडाणा जिल्हा कोरोना हॉट स्पॉट म्हणून घोषित झाला आहे. आपल्या नांदुरा तालुक्यात हा आकडा वाढता असल्यामुळे याला आळा घालण्यासाठी असलेल्या उपाययोजना कमी पडत आहेत. अशातच कोरोणावर मात करण्यासाठी भारताने जी लस संशोधनानंतर उपलब्ध करून दिली त्यासाठी लाखो लोक प्रतीक्षेत आहेत. परंतु आपले लसीकरण केंद्र मर्यादित असल्यामुळे कोरोना लस घेण्यासाठी २-२ महिने लोकांना वाट बघावी लागत आहे. यामुळे जनतेत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. करिता आपण हे लसीकरण केंद्र वाढवून नांदुरा शहर व तालुक्यातील प्रतीक्षेत असलेल्या लाखो लोकांना दिलासा द्यावा या संदर्भाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी तहसीलदार साहेब यांना दिले. यावेळी पत्रकार प्रफुल्ल बिचारे,सुमित धांडे व कापडे उपस्थित होते.