Home Blog Page 513

अट्रावलच्या जागृत प्रसिद्ध मुंजोबा देवस्थान व खानदेशचे दैवत आज अमावस्याच्या दिवसी घेतले अग्निडाग. ,. 

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

संपुर्ण महाराष्ट्र आणी खान्देशवासी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा देवस्थानाने दिनांक १२मार्च रोजी शुक्रवारी अमावस्याच्या दिवसी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक अग्नीडाग घेतला आहे मागील वर्षी देखील ही शुक्रवारच्याच दिवशीच मुंजोबाने अग्निडाग घेतले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीत भरणारी यात्रा ही प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करीत रद्द करण्यात आली होती. यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत देवस्थान तथा भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणुन ख्याती असलेल्या मुंजोबाची यात्रा सालाबाद प्रमाणे दरवर्षी माघ महीन्यात शनिवार आणी सोमवार या दिवसी भरत असते त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील खानदेशवासी भाविक मुंजोबाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र यंदाही यात्रा रद्द करण्यात आली होती . यात्रा संपल्यावर मुंजोबा हे कोणत्याही दिवसी अग्निडाग घेत असतो अशी भाविकांची श्रद्धा आहे . या कोरोनाचे संकट पुनश्च ओढवल्याने अग्निडाग घेतल्यानंतर होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहे .

हिरोळे पेट्रोल पंपाजवळ ची जागा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी योग्य ! ती जागा नगरपरिषदेने स्मारक बांधण्यासाठी द्यावी ! …..जागा मिळावी म्हणून – .भारतीय बौद्ध महासभा . वंचित बहुजन आघाडी .तथा ५०० योध्दा ग्रुपच्या वतीने नगर परिषदेला निवेदन ! :

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नगरपरिषदेने बिना अटी द्यावी या जागेवर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्यदिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक बांधण्यात येईल .ही मागणी आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील समाज बांधवांच्या व तिकडून जोर धरू लागली आहे !विविध संघटना पक्ष यांनी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून गरज पडल्यास आंदोलन ही करू असा इशारा यावेळी संघटनेने दिलेला आहे !आज दिनांक 12 मार्च रोजी नगराध्यक्ष नगर परिषद बुलढाणा यांना विविध संघटनेच्या माध्यमातून पेट्रोल पंपाजवळ जागा स्मारकासाठी योग्य असून ती जागा देण्याची विनंती निवेदनात विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे : !

यामध्ये वंचित बहुजन आघाडी बुलढाणा ‘भारतीय बौद्ध महासभा शाखा ‘व 500 योद्धा ग्रुप बुलढाणा च्या वतीने 12 मार्च रोजी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले .या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की ‘जयस्तंभ चौकात असलेली जागा व आज रोजी तिथे विविध सामाजिक प्रतीके बनलेली असून ‘भविष्यात रस्ता रुंदीकरणाचे काम होऊ शकते ‘या जागेचे क्षेत्रफळ बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व पुतळा .हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा योग्य असून ‘नगरपालिका कायदा 1965 अनुच्छेद 572 ‘भाग ६जमीन देण्याबाबत असलेल्या नियमानुसार ‘दिनांक तीन मार्च रोजी सम्राट संघटना बुलढाणा यांनी मागणी केलेली हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा..स्मारकासाठी योग्य असून ‘तेथे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला तर सौंदर्यात आणखीन भर पडेल ‘
तरी हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नगरपरिषदेने द्यावी व त्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व पुतळा समाज बांधवाकडून निधी जमा करून उभारण्यात येईल ‘अन्यथा वंचित बहुजन आघाडी व पाचशे योद्धा ग्रुप च्या वतीने ‘तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ‘जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शेवटी देण्यात आलेला आहे !
त्यामुळे हा मुद्दा बुलढाणा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण बुलढाणा जिल्हा पुरता मर्यादित झाला आहे . .तरी याकडे नगर परिषद काय निर्णय घेती हे बघणे उत्सुकतेचे ठरेल !

बोरखेडा खुर्द येथे सर्पदंशामुळे एका आदीवासी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु. 

0

 

, यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे शेतात काम करीत असतांना एकास सर्पदंश झाल्याने जळगाव येथे उपचारादरम्यान दुदैवी मुत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्थात मिळालेली माहीती अशी की मुबारक दगडु तडवी वय३५ वर्ष राहणार बोरखेडा खुर्द तालुका यावल हे काल सायंकाळी ४ते ५ वाजेच्या सुमारास बोरखेडा शिवारातील आपल्या स्वता : च्या शेतात हरभरा काढणीचे काम करीत असतांना पायास एका विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांना तात्काळ गावातील मंडळी व नातेवाईकांच्या मदतीने प्रथम यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता मुबारक तडवी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जळगाव येथे सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाला आहे . मुबारक तडवी यांच्या पश्चात पत्नी , दोन लहान मुली आणी वडील आहेत . मयत मुबारक तडवी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सामान्य रुग्णालय जळगाव येथे करण्यात आले .

यावल येथे खिर्नीपुऱ्यात शॉर्टसक्रीट मुळे लागली आग चार लाखाचे नुकसान नागरीकांच्या मदतीने वाचले चार जणांचे प्राण. . .

0

 

यावल( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

येथील शहरातील खिरनीपुरा परिसरात एका घराला शॉर्टसर्कीट मुळे अचानक लागलेल्या आगीमुळे कुटुंबाच्या जिवनावश्क वस्तुसह सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. नागरीकांच्या शर्तीच्या प्रयत्नानमुळे आग आटोक्यात . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील खिरनिपुरा परिसरात राहणारे शेख भिकारी शेख चाँद आणी त्यांचे वडील शेख चाँद शेख कालु यांच्या घराला दिनांक ११ मार्च रोजी रात्री ९ , ३० वाजेच्या सुमारास अचानक विद्युत वाहीनीत शॉर्टसर्किट झाल्याने घराला लागलेल्या भिषण आगीत संपुर्ण घर जळुन खाक झाले असुन , या आगीत सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . अचानक घराला लागलेल्या आगीमुळे घराच्या एका खोलीत अडकलेल्या दोन महीला व दोन लहान मुलांचा जिव वाचविण्यासाठी उपस्थित युवकांनी समय सुचकता बाळगुन आग लागलेल्या घराची भिंत पाडुन सुखरुप बाहेर काढण्यात नागरीकांना यश आले असुन, थोडयाच वेळेत भिषणरूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभागातील नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर , सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान नसीर खान आदी समाज बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली . दरम्यान रात्री जळुन खाक झालेल्या घराच्या पंचनामा करण्यासाठी यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी ,यावल शहर तलाठी ईश्वर कोळी थोड्या वेळेत घटनास्थळी दाखल होत असल्याचे वृत्त आहे .

पाखरांना पाणी आणि अन्नाची सोय पाणवठे बनवण्याची कृती टाकाऊ अशा वस्तू पासून बनवतात पक्षासाठी पाणवठे

0

 

 

आयुषी दुबे (कार्यकारी संपादिका)

संग्रामपुर  उन्हाळा आला तेव्हा पक्षासाठी पाण्याची सोय करावी असे प्रत्येक जण सांगतो मात्र यातच टाकाऊ वस्तु पासून उपयोगी साहित्य कोणीही बनवत नाही परंतु मलकापूर पांग्रा येथील कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत शिक्षक शेख इमरान यांनी टाकाऊ वस्तु पासून पक्षासाठी पाणवठे तयार केले आहेत. हे पाणवठे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. उन्हाळा लागला की कित्येक पशु पक्षी यांच्या पोस्टवर संदेश सोशल मीडियावर फिरताना दिसतात मात्र त्यातील किती लोक या संदेश पासून सज्ञान होऊन पाखरांना पाणी आणि अन्नाची सोय करतात हा प्रश्नच आहे. मात्र कित्येकांची इच्छा असून सुद्धा ते उपायोजना करू शकत नाही कारण पाणी ठेवण्यासाठी मातीचे भांडे आणायची कुठून खर्च करणार कोण अशातच इच्छा असून सुद्धा नाईलाज असतो मात्र शिक्षक शेख इम्रान यांनी टाकाऊपासून उपयोगी असे पर्यावरण पूरक पाणवठे तयार केले आहे हे पाणवठे त्यांनी आपले मित्र शिक्षक किरण कायंदे व विजय इंगळे यांच्या मदतीने माळरानावर झाडाला लटकवले आहे .पाणवठे बनवण्याची कृती त्यांनी फेसबुक वरती शेअर केली त्याला खूप लोकांची पसंती मिळत आहे त्यातून खूप लोकांना प्रेरणा सुद्धा मिळत आहे ही उपायोजना सोशल मीडियावर गाजत आहे यापासून इतर लोकसुद्धा प्रेरणा घेत आहे श्रीमंतच नव्हे तर गोरगरीब होतकरू ज्याच्याकडे टाकाऊ असे प्लॅस्टिकचे सामान पडलेले आहे त्यांच्यासाठी या शिक्षकांनी केलेला उपक्रम खूप प्रेरणादायी आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे अशातच लॉकडॉउन ची परिस्थिती असल्या कारणाने बहुतांश शाळा विद्यालय बंद आहेत त्यातच विद्यार्थ्यांना घरी कार्यानुभव म्हणून सुद्धा टाकाऊ पासून उपयोगी असे साहित्य बनवून भूतदया घडू शकते.

*बॉक्स*
घराच्या गॅलरीत व माळ रानावरती केली सोय
प्रत्येक घरात खायच्या तेलाच्या रिकामे फुटकी कॅन ; प्लास्टिकचे टोपले तार; दोरी असे साहित्य पडलेले असते त्याला एक दीड लिटर पाणी बसेल याप्रमाणे आडवे कापून खिळ्याच्या साह्याने छिद्र करून तारा च्या साह्याने पक्ष्यांना बसण्यासाठी जागा बनवली घराच्या गॅलरीत आणि माळरानावरती झाडावर लटकवण्यासाठी त्याला उपाय योजना केली.मागील वर्षी सुद्धा त्यांनी उपक्रम राबविला होता हे विशेष.

 

 

महेलखेडीचे राहणारे कनिष्ठ शिक्षक रुबाब तडवी यांचा शिंदी गावाजवळ संशास्पद मृत्यु घटनेची पोलीसात नोंद ,

0

 

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील महेलखेडी येथील रहीवाशी आणी न . ह . राका हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज बोदवड मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले रुबाब ईब्राहीम तडवी वय५२वर्ष ह.मु. फालक नगर भुसावळ हे शिंदी तालुका भुसावळ या गावाजवळ अत्यंत गंभीर अवस्थेत रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या कडील मोटरसायकलसह आढळुन आले त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे दिसुन आले असुन, तडवी यांचा झालेला मृत्यु हा संशयास्पद असल्याचे आरोप त्यांच्या नातेवाईकांकडुन करण्यात येत आहे. दिनांक १oमार्च रोजी झालेल्या शिंदी गावाजवळ घड लेल्या माहीतीनुसार घटनेची माहीती मिळताच शिंदी गावातील पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जख्मी अवस्थेत असलेले रूबाब तडवी यांना रूग्णवाहीकेव्दारे डॉ . उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी रवाना केले .डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला . मयत तडवी यांनी मंगळवारी हायस्कुलमधुन सुटी घेतली होती. रूबाब तडवी मुळ् महेलखेडी ता . यावल येथील रहिवाशी असुन मृत्यु पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी , दोन मुल असे कुटुंब असुन , काल महेलखेळी गावात त्यांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेबाबतची नोंद भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे .

चार लहान मुलांच्या आईने प्रेमात पडुन थाटला दुसऱ्या सोबत संसार पहील्या पतीच्या फिर्यादी वरून तिन जणाविरूद्ध गुन्हा दाखलयावल ,

0

 

, ! यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

चार लहान मुलांच्या आईने पहील्या पतीशी घटस्फोट न घेता केला आपल्या दुसऱ्या प्रेमीशी विवाह अखेर पतीने दिली पत्नीच्या विरूद्ध पोलीसात तक्रार. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील नायगाव येथील राहणारे प्यारसिंग भाया बारेला यांनी यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी बोंदरीबाई बारेला वय ३८ ही मागील वर्षी किरकोळ घरगुती कारणा वरून भांडण करीत आपल्या एक ९ वर्षीय मुलगा, ८ व ६ वर्षीय मुलगी आणी ६ महिन्याच्या लहान बाळाला सोडून धोपा भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) आपल्या माहेरी निघुन गेली होती तेव्हा पासुन वारंवार पत्नीस नातलगांच्या व स्वत:हा विनंती करीत सासरी परत येण्यासाठी पती प्यारसिंग बारेला यांनी प्रयत्न केले . तरी देखील वर्ष उलटले पत्नी काही येत नसल्याचे पाहुण म्हणुन ते स्वत:हा आपल्या सासरवाडी धोपा ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश गेले असता त्यांच्या पत्नीने धोपा येथे राहात असतांना भगवानपुरा येथे राहणाऱ्या भल्या इतू वास्कले या व्यक्ति सोबत लग्न केल्याचे समजले व त्यास धक्काचं बसला तेव्हा प्रेमात पडलेल्या या विवाहिते चार लहान मुलांना व पतीला सोडून थेट दुसऱ्याशी लग्न लावल्याने निराश झालेला प्यारसिंग बारेला या महीलेच्या पतीने अखेर यावल पोलिस स्टेशनला आपल्याच चार मुलांची असलेल्या पत्नी बोंदरीबाई बारेला व सासरे तुताराम अंकऱ्या बारेला व आपल्या पत्नीचा दुसरा नवरा भल्या वास्कले या तिघांच्या विरूध्द पती असतांना व घटस्पोट न घेता परस्पर लग्न केले म्हणुन यावल पोलीस स्टेशनमध्ये तिन जणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

अनुकंपाधारक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय हत्तीमारे आरोप की जि.प. करतेय अनुकंपाधारकाचा शोषण हिटलरशाही कार्यप्रणाली ला बळी पडत आहे अनुकंपाधारक एकाच प्रक्रिये साठी होत आहेत 3 वेळा पडताळणी

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

जि.प.गोंदिया अंतर्गत अनुकंपा पदभरती संदर्भात कागदपत्रासह अनुकंपाधारकाना दि.10 मार्च ला बोलाविले आहे. तत्सम 4 मार्च ला पत्र व्यवहार केल्याचे सागीतले जात आहे पण पडताळणी दिवस उजाडला तरी निम्म्यापेक्षा अधिक अनुकंपाधारकाना तो पत्र च प्राप्त झाला नाही याला जबाबदार कोण?
त्यातही वेगवेगळ्या संमतीपत्राची मागणी केलेली आहे.
आता निरपराध अनुकंपाधारकाना असा प्रश्न पडला की एवढ्या शुल्लक वेळेत कागदपत्रे तयार करायची तर कशी?
गेल्या वर्ष भर कोविड-19,
नंतर अधिकार्याच्या बदल्या,
नंतर ग्राम पंचायत निवडणुक अशा वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी ना समोरे जाऊन कसातरी पद भरती चा मुहूर्त निघाला.
पण ते पदभरती नसुन निव्वळ कागदपत्रे पडताळणी होती.
त्यातही सर्वाना पत्र न मिळाल्याने अनुकंपाधारकाची त्रेधातिरपीट उडाली.
कित्येक सदस्यानी जसी तसी माहीती गोळा केली व जि.प. ला आपल्या अपूर्ण कागदपत्रासह पोचले.
कित्येक सदस्याना घरून फोन येत होते की तुमचा पत्र आला आहे.
अशा कित्येक समस्याना सामोरे जावे लागत आहे.
चिचगड,सालेकसा व जिल्ह्याबाहेरिल अतीदुर्गम भागात वास्तव्यास असणार्या लाभार्याना योग्य वेळेवर पत्र न मिळाल्याने ते या कार्यवाहीस मुकणार तर नाही असा प्रश्न उद्भवत आहे.
गेल्या वर्षभरा पासुन पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती पण भरतीला उशिर होणे या दरम्यान च्या काळात काही विशिष्ट दलालानी पात्र सदस्यासी संपर्क करून त्याच्यासी पैशाची लेनदेन करत आहेत. तत्सम पुरावा असल्याचे क्लीप असल्याचा खळबळजनक आरोप संघटनेचे पदाधिकार्यानी केला आहे.
या समोरची प्रक्रिया पारदर्शक रित्या व रितसर पत्र व्यवहाराने व्हावी जेणेकरून चारही बाजुने होरपळलेल्या अनुकंपाधारकाना दिलासा मिळेल असी अपेक्षा आहे अन्यथा कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जाण्याचा ईशारा अनुकंपाधारक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय हत्तीमारे, मंगेश मोहतुरे, ज्योती नानेट यानी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात मातंग व तस्सम समुहाच्या विकासा साठी बजेट

0

 

आयुषी दुबे शेगाव/ बुलढाणा

महाराष्ट्रा मध्ये मातंग व तत्सम समाज मोठ्या संख्येने राहत आहे मातंग समाजाचे अस्मिता असलेले संयुक्त राष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद यांच्या स्मारकासाठी अर्थ संकल्पिय बजेट मध्ये एक रुपयाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली नाही तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक निधीची तरतूद केलेली नाही हा मातंग समाजावर महाराष्ट्र शासनाकडून झालेला अन्याय आहे याचा आम्ही लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेंगाव तहसील कार्यालय ला निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला निवेदन देतांना लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष सावळे जगदेवराव तायडे विजय सावळे मुकेश गवई विनोद सोनोने g. o तायडे मुकेश अंजनकर नागेश गवई निखिल तायडे अजय तायडे गजानन सोनोने व सर्व सामाज बांधव उपस्थित होते

पळसमंडळ येथे स्त्री शिक्षणाची आरध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सोहळा

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्र्वर

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील
पळसमंडळ येथे भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्यधयापि.स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या.विध्येची जननी तमाम स्त्रियांना उजाडाची वाट दाखविणार्या यांची आज पळसमंडळ येथे लुबिंनी बुध्द विहार या ठिकाणी क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांचे १२४ वा अभिवादन सोहळा पार पडला अभिवादन सोहळ्याचे अध्यक्ष
श्री रविभाऊ रामटेके होते व सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले व प्रास्ताविक श्री प्रफुल वाहने यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा श्री किशोर गणविर यांनी केले या अभिवादन सोहळ्यात गावातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते व लोक शाहीर अर्जुन हिरेखन यांनी लोक कलेतुन शिक्षणाचे महत्व पटवून दिले. गावातील या अभिवादन सोहळ्याला सर्व स्थरातुन तील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्नेहा गणविर ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले व सोहळ्याला उपस्थित श्री देविदास मेश्राम, संतोष गोंडाने ,अमोल गोडांने यशकुमार उके साहिल उके खुशाल रामटेके मंगेश गोंडाने प्रकाश रामटेके कुणाला रामटेके सत्यवान वासनिक प्रशांत बागडे वैभव रामटेके सचिन गजभिये रवी हिरेखन पंकज नागदिवे धर्मेंद्र हिरेखन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.