Home Blog Page 516

सोमनाथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी मास्क वाटप..  

0

 

बोरगाव बु!! येथील सोमनाथ चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिसानिमित्त बोरगाव, जाफराबाद व माहोरा या ठिकाणी मास्क वाटप केले. त्यांनी जिल्हा परिषद शाळा बोरगाव, श्री शिवाजी विद्यालय बोरगाव, ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव तसेच माहोरा व जाफराबाद या सार्वजनिक ठिकाणी मास्क वाटप करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.सोमनाथ चव्हाण यांनी याअगोदर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबून जनजागृती केली आहे.
सोमनाथ चव्हाण हे नेहमीच वेगळ्या पद्धतीने समाज जागृती करण्याचे काम करत असतात परंतु आज तर त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता कोरोणा रोगापासून लोकांचा बचाव व्हावा या हेतूनं विविध ठिकाणी मास्क वाटप केले.या वेळी सोमनाथ चव्हाण,संदीप पाटील जाधव,विनोद पाटील फदाट ग्रामपंचायत कार्यालयाचे विविध कर्मचारी, जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक,शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे युवा नेते हर्षल फदाट ,मधुकर जाधव, सचिन फदाट प्रदीप चव्हाण व गावकरी उपस्थित होते.

यावल येथे तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमासंपन्न,. 

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

येथील तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिन निमित्ताने महसुल विभागाच्या विविध अधिकारी यांच्या उपस्थितीतऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनानिमित्त साजरा करण्यात येत असतो यावर्षी देखील राज्य शासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या, यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने जिल्हास्तरिय वेबिनारद्वारे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजीत करण्यात आले होते . यासाठी या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील तालुक्याल विविध विभागातील तहसीलच्या अधिकारी यांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी सुचना दिल्या होत्या , त्या अनुषगांने आज यावल तहसील मधील निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन तथा करमणुक निरिक्षक राजेश भंगाळे, पुरवठा हिशोबनिस कारकुन सकावत तडवी , सुयोग्य पाटील संगणक संचालक योगेश्वरी ताडे , प्रविण तायडे यांच्यासह खातेनिहाय विविध प्रशासकीय अधिकारी आदीनी या जागतिक ग्राहक दिनानिमित्त संपन्न झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला .

सरपंच दाऊत शेठ कुरेशी यांच्या प्रयत्नाला यश ! बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरु !लवकरच मिळेल साखरखेर्डा वासियांना शुद्ध पाणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जवळपास 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेले सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले साखरखेर्डा गाव ‘नेहमीच पाण्याच्या समस्येने त्रस्त होते . १० वर्षापूर्वी कोराडी प्रकल्पातून साखरखेर्डा गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली . 2002 साली जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले ‘काही दिवसातच ग्रामस्थांना चांगला शुद्ध पाणी मिळायला लागले नंतर काही तांत्रिक समस्येमुळे जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले ..नंतर तत्कालीन सरपंच पुनमताई महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नातून 2017 साली परत हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले ‘नंतर परत काही कारणास्तव हे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले ‘त्यानंतर आता परत साखरखेर्डा गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नवनिर्वाचित सरपंच दाऊत सेट कुरेशी यांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली ‘व जलशुद्धीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करा ‘ व जलशुद्धीकरण केंद्राच्या मशनरी दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करून द्याअशी आग्रही मागणी त्यांनी केली ‘त्यानंतर तात्काळ पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पाणी पुरवठा विभागाला ला आदेश दिले ‘व व तात्काळ जल शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले ‘दाऊद शेठ कुरेशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन आता साखरखेर्डा गावासाठी लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू होईल ‘आत्ता आहे जलशुद्धीकरण केंद्र किती दिवस सुरू राहील हे पाहणे औचित्याचे ठरेल ?

घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख रुपये नगदी तसेच 3 लाख रुपये किमतीचे सोने लंपास

0

 

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट, १५ मार्च शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस कानातले टॉप्स ४ जोड, १डोरले 3 तोळे ,४ जोड़ चांदीचे जोडवे असे एकूण अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे सोनेचांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दि.१५ रोजी उघड़किस आली.
स्थानिक रहिवासी जितेंद्र राऊत हे हॉटेल व्यावसायिक असून गावोगावी जावून हॉटेल व्यवसाय करतात.
शनिवारी काही महत्वाचे कामाने श्री राऊत व कुटुंबिय हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे गेले असता चोरट्यांनी त्यांचे रहातेघरी हात साफ केला.
सदर कुटुंबियांचे चोखोबा वार्ड येथे निवासस्थान असून वरच्या माळ्यावरती सदर कुटुंबिय राहतात.तर खाली त्यांचे वृद्ध पिता राहतात.
सदर कुटुंबिय परत आल्यानंतर आज सदर घटना उघड़किस आली असून त्यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.
सदर प्रकरणी तक्रार दाखल करताच पोहवा विवेक बंसोड़, शेखर डोंगरे यांचे डीबी पथकाने छानबिन सुरु केली असून संशयितास विचारपुस करीत आहेत.
सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानेसुद्धा भेट देत चौकशी सुरु केली.
वृत लिहिपर्यंत पोलिस कारवाई सुरुच असून सदर प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

सिंदखेडराजा पंचायत समिती सभापती पदी !सौ मीनाक्षी गजानन बंगाळे यांची निवड !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा येथील पंचायत समिती सभागृह मध्ये आयोजित सभापती निवड पदी ‘पंचायत समिती सदस्य सौ मीनाक्षी गजानन बंगाळे यांची सिंदखेडराजा पंचायत समिती सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे ‘सौ नंदिनी विलास देशमुख यांचा दीड वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता ‘ सिंदखेडराजा पंचायत समिती सभापतीपदी अगोदर ‘राजू ठोके ‘सौ नंदिनी विलास देशमुख ‘व आता सौ मीनाक्षी गजानन बंगाळे यांना पक्षाने संधी दिली आहे ‘सौ मीना गजानन बंगाळे यांची सभापती निवड होताच त्यांचे सर्व सदस्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले ‘यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य गटविकास अधिकारी व इतर कर्मचारी हजर होते ‘ तिन्ही सभापती हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत

अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या गणेश वर नियतीचा घाला !! मित्रत्व जपणाऱ्या गणेश चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ! …माळीपेठ वर दुःखाचा डोंगर .

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

असे म्हणतात एका शायरने असे म्हटले आहे की ‘जिंदगी का क्या भरोसा कब मौत आ जाये ,,हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते है जो औरो के काम आ जाये !!,,
या म्हणीप्रमाणे साखर खेर्डा येथील माळी पेठ येथे राहणारा,मृदू स्वभावाचा व नेहमीच मित्रत्वाचं नातं जपणारा ‘लोकांच्या सुखदुःखात एका आवाजावर धावून जाणारा ‘गणेश केशव बेंडमाळी वय 30 वर्ष अचानक नियतीने घाला घातल्यामुळे सर्वांना सोडून कायमचा निघून गेला ! ..सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माळी पेठ येथे राहणारा,गणेश बेंडमाळी हा 30 वर्षीय तरुण ‘शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगूनसाखरखेर्डा येथे ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये क्लासेस लावून स्पर्धा परीक्षेची तयारी गणेश करू लागला . ‘शिवाय पोलीस भरती किंवा सैनिक भरती मध्ये जाऊन देशाची सेवा करावी म्हणून तो व्यायाम करण्यासाठी सकाळी पाच वाजता धावायला जायचा ‘माळी पेठ एवढेच नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये गणेशचा मित्र वर्ग खूप होता ‘अतिशय शांत व मृदू स्वभावाचे गणेश मित्रत्वाचं नाती जपणारा होता ‘एखाद्या मित्राने जर म्हटले की गणेश माझ्या भावाचं लग्न आहे ‘ मुलीचं लग्न आहे तर गणेश सकाळीच उठून त्याला मदत करण्यासाठी जायचा व शेवटपर्यंत कामे करू लागत असे .शिवाय गणेश ने नुकतेच आरोग्य विभागाचा औरंगाबाद येथे पेपर सुद्धा दिला होता ’14 मार्च च्या सायंकाळी
मजबूत शरीरयष्टीचा गणेश च्या छातीमध्ये अचानकपणे रात्रीला दुखू लागल्यामुळे त्याला ताबडतोब घरच्यांनी चिखली येथील दवाखान्यांमध्ये हलवले .मात्र नियतीच्या मनात वेगळेच काही होते ‘व नियतीने गणेश हा हिरावून नेला व गणेश चे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री साडेअकराच्या दरम्यान निधन झाले ‘गणेश च्या मृत्यूची बातमी साखरखेर्डा येथे धडकताच ‘संपूर्ण माळी पेठ व मित्र परिवाराच्या डोळ्यातून अश्रू तरळले .गणेश आपल्याला सोडून गेला यावर कोणाचाही विश्वास बसेना ‘मित्रत्वाचं नातं जपणारा लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा .व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा गणेश ला मात्र काळाने हिरावून नेले ‘गेल्या दीड ते दोन वर्षापासून कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया राज्यात राबवली नसल्यामुळे ‘अनेक स्पर्धापरीक्षेची तयारी करणारे तरुण तरुणी दडपणाखाली खाली जीवन जगत आहेत ‘तान तनाव त्यांच्या डोक्यावर येत आहेत ‘म्हणून शासनाने सुद्धा लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे ।गणेश गेल्यानंतर गणेश च्या आठवणी सांगत असताना ‘त्याचे जीवाभावाचे मित्र असलेले ‘गणेश जाधव नारायण अवचार ‘बंडू बंडू माळी ‘यांचे डोळ्यातून अश्रूंच्या धारा मात्र वाहत होत्या !यावरून गणेश हा सर्वांच्या आवडीचा होता यात तिळमात्र शंका नाही !गणेश ला भावपूर्ण श्रद्धांजली !

ओम थोरहाते व शिव थोरहाते यां जुळया भावंडांनी बनविलेले दाणापाणी पात्र दानी पात्रातून अनेक पक्षी पाणी पिऊन भागवत आपली तहान ! टाकाऊ शहाळयापासून बनविले पक्ष्यांसाठी दाणापाणी पात्र !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमच्या जुळया भावंडांचा तन्हालेल्या पक्ष्यांसाठी पुढाकार
दरवर्षी उन्हाच्या दाहकतेने परिसरातील तहानलेल्या पशू पक्ष्यांची पाण्याअभावी होरपळ होते. अशा तहानेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांसाठी हिवरा आश्रम येथील ओम थोरहाते,शिव थोरहाते या जुळया भावंडांनी टाकाऊ शहाळया पासून दाणापाणी पात्र बनविले. त्‍यांचे पर्यावरण प्रेमीकडून कौतूक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सद्या उन्हाळयाच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याअभावी पक्षांची कमालीची घालमेल सुरू आहे. पर्यायाने निसर्गातील चिमण्या, कावळे, पोपट व इतर पक्षांची संख्या झपाटयाने कमी होत आहे. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर, झाडाला टांगून व सभोवताली जलपात्रे ठेवून पक्षांना जगविणे काळाची गरज आहे. या भावनेतून हिवरा आश्रम येथील ओम संतोष थोरहाते, शिव संतोष थोरहाते या जुळया भावंडांनी आपल्या पालकांकडे चिऊतार्इसाठी जलपात्र व पाणीदाणीची सोय करण्याचा हट्ट पकडला. संतोष थोरहाते व सौ.लक्ष्मी थोरहाते यांनी आपल्या पाल्याच्या पक्ष्यांसाठी जलपात्राच्या हट्टलाला  सकारात्मक प्रतिसाद देते टाकाऊ शहाळयापासून पक्ष्यांसाठी दाणापाणी पात्र बनविले. ओम  व शिव थोरहाते हे प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठाचे विद्यार्थी आहेत. चिऊतार्इचे लहानमुलांना कमालीचे आकर्षण असते. अंगणात दाण टिपण्यासाठी आलेल्या चिऊतार्इचे दाणे टिपतांनाची मोहक मुद्रेने बच्चे कंपनीला कमालीचे वेड असते. सिमेंटच्या जगात व तंत्रज्ञानामुळे पक्षांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. चिऊ, काऊ  व लहानगे यांचे नाते निसर्गाशी वर्णन करणारे अनेक संदर्भ सर्वच साहित्य प्रकारात अतिशय तन्मयतेने कवीराजांनी वर्णन केले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, वाढते जलप्रदुषण, झाडांची वारेमाप कटार्इ सुरू असल्यामुळे गर्द वनरार्इचा प्रकर्षाने अभाव दिसून येतो. म्हणून मानवाला पर्यावरण रक्षणासाठी मनापासून साद घालावी लागणार आहे. ओम, शिव थोरहाते यांचे चिऊतार्इसाठी केलेल्या जलपात्रावर पाणी पिण्यासाठी सकाळ, संध्याकाळ येणाऱ्या पक्ष्यांच्या किलमिटामुळे ओम व  शिव यांचा चेहरा उजळून जातो.

चिमुकल्यांच्या धडपडीचे कौतुक
ग्लोबल वार्मिंग व मोबार्इल टॉवरच्या रेडिएशनचा चिमण्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. सिमेंटच्या जगात झाडांचे अस्तित्व कमी होत आहे. चिमण्यांना निवाऱ्यासाठी झाडे कमी होत आहे. नदी, तलाव आटत असल्यामुळे त्यांच्यासाठी पाणीपात्राची सोय करणे गरजेचे आहे. ओम थोरहाते, शिव थोरहाते यांनी पक्ष्यांसाठी टाकाऊ शहाळयापासून बनविलेल्या दाणापाण्याची सोय केली. चिमुकल्यांच्या या धडपडीचे सद्या कौतुक होत आहे.

सुनगाव येथे शॉर्टसर्किट होऊन चार बैलगाड्या चारा जळून खाक

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शॉर्टसर्किटने आग लागून कडव्यांची चार बैलगाडी जागीच खाक सुनगाव येथील घटना
शॉर्ट सर्किट ने आग लागून कडब्याची चार बैलगा त्वडी जागीच खाक झाल्याची घटना सुनगाव वावडी हर्दो शिवारात सकाळी अकरा वाजता घडली आज सोमवार सकाळी भायट्या डावर,जहाज्या डावर, कालुसिंग जमरा ,श्रीराम सोलकी,सुभला सोलंकी,राजीराम डावर हे आदिवासी बैलांसाठी कडबा आणण्यासाठी सुनगाव भागातील वावडी हरदो शिवारातील मनोहर राऊत यांच्या शिवारात सकाळीच गेले सर्वांनी आपापल्या बैलगाडी मध्ये कडबा पूर्ण भरला येन त्याच वेळी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बैलगाड्या उभ्या होत्या त्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा एकमेकांना घासून त्या ठिकाणी सभोवताली व बैलगाडीवर ठीणगी पडल्याने बैलगाडी तील कडबा व शेतातील कडबा पूर्णपणे जळाला, सदर व्यक्तीच्या कडव्यासह 4 बैलगाडी आगीत भस्मसात झाल्या, सुदैवाने बैलांच्या जोड्या वाचण्यात यश आले व कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी महावितरनाने पंचनामा करून त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी यांच्याच्याकडून होत आहे

१५०mdkdjdbd

0

 

Hxjjdhdmdkf

 

 

शहरात नावापुरतीच बंदी

0

 

सचिन वाघे वर्धा जिल्हा प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वर्ध्याच्या जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या ३६ तासाचे संचारबंदी दरम्यान हिंगणघाट शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातही संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील दिसुन येत होते.
मार्च महिण्यातील येणाऱ्या सर्वच शनिवार रात्री ८ वाजेपासून तर सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांचा संचारबन्दी आदेश जिल्हाप्रशासनाने दिला आहे.
मात्र संचारबन्दी दरम्यान हिंगणघाट शहरातील नागरिक रस्त्यावरच असल्याचे दिसुन आले.
एस टी महामंडळाची आन्तरजिल्हा बससेवा बंद होती,परंतु नागपुर तसेच इतर ठिकाणावरुन येणाऱ्या काही बसेस सुरु असल्याने हिंगणघाट बसस्थानकावर प्रवाश्यांची वर्दळ दिसुन आली.
महत्वाचे म्हणजे एसटीची सेवा,पेट्रोलपंपसुद्धा बंद ठेवण्यात आले,परंतु जवळपासच्या ग्रामीण भागात वाहतुक करीत ऑटोरिक्षा चालक मात्र संधिचा फायदा घेत अडल्यानडल्या प्रवाशांची लुट करण्यात व्यस्त होते.पोलिसांचा आशीर्वाद प्राप्तअसल्याने ही ऑटोरिक्षासेवा अविरतपणे सुरुच दिसली.
अवैध दारूविक्रि,अंमली पदार्थाची अवैधविक्री यासह वरळीमटक्याची लेनदेन सुरूच होती.
उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांचेशी संपर्क साधला असता जिल्ह्यात आरोग्यसेवा,औषधीविक्री याशिवाय दुसरी कोणतीही दुकाने किंवा आस्थापना सुरू न ठेवण्याचे स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले.
महसुल कर्मचारी, पालिकापथकाने तसेच पोलिस विभाग संचारबन्दीदरम्यान संयुक्तरित्या कारवाई करतांना दिसुन आले.
काल रात्री ८ वाजेपासुनच पासून शहरात मांसाहारविक्रेत्यांसह सर्व विक्रेत्यांनासुद्धा आपआपली दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले.यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याने शहरातील दवाखाने,औषधी दुकाने इत्यादि सुरु होती.