Home Blog Page 532

दुचाकीच्या अपघातात इसम गंभीर जखमी

0

 

नांदुरा ः (प्रफुल्ल बिचारे पाटिल) बुलढाणा रोडवरील लाकडीपुलाजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाल्याची घटना १०फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजेदरम्यान घडली
याबाबत वृत्त असे की नामदेव आत्माराम नेमाडे वय अंदाजे ३५ वर्षे रा पातोंडा हे आपल्या दुचाकी क्रं एम एच २८बी जे २३०७ ने जात असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला यात ते गंभीररित्या जखमी झाले अपघाताची वार्ता कळताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, पत्रकार प्रवीण डवंगे,पत्रकार दिलीप इंगळे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकेसह धाव घेऊन गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र अतिरक्तस्रावामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचाराकरीता अकोला येथे हलविण्यात आले.

यावल पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी साकळी गणाच्या दिपक अण्णा पाटील यांची निवड  

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

पंचायत समितीच्या सभापती पदी मनवेल साकळी पंचायत समिती गणातील उमेदवार तथा यावल पंचायत समिती उपसभापती दीपक अण्णा नामदेव पाटील यांची प्रभारी सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे दोडे गुजर समाजाच्या इतिहासात त्यांच्या माध्यमातून सभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने डोळे गुजर समाजातील कार्यकर्त्यांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे यावल पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ पल्लवी पुरूजीत चौधरी या सतरा फेब्रुवारी पर्यंत रजेवर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल डॉ . निलेश पाटील यांनी या रिक्त जागी त्यांची नियुक्ती केली आहे दीपक पाटील यांच्या नियुक्तीमुळे माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजूमामा भोळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी शिक्षण व आरोग्य समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू सूर्यभान पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, माजी सभापती जिल्हा परिषद हर्षल गोविंदा पाटील, भाजपा सरचिटणीस उज्जैनसिंग पाटील, विलास चौधरी जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष पुरूजीत र्चौधरी ,जिल्हा परिषद सदस्या सौ सविता भालेराव ,पंचायत समिती सदस्य योगेश भंगाळे सौ. विजया मोरे, यावल शहर भाजपाध्यक्ष डॉ. निलेश गडे , वड्री ग्रामपंचायतचे संभाव्य सरपंच अजय भालेराव , माजी पंचायत समिती सदस्य नागेश्वर साळवे , मनवेल येथील कैलास पाटील हिरामण पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिपक पाटील यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी कै . हरिभाऊ जावळे यांच्या निवास स्थानी जावुन त्यांच्या मातोश्री सुमनबाई जावळे व पत्नी कल्पनाताई जावळे यांची भेट घेवुन त्यांचे आशीर्वाद घेतले

साखरखेर्डा येथील सर्वसाधारण सरपंचपदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी .पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद रफीक यांना पहिल्या टर्म मध्ये संधी मिळेल काय ?

0

 

सिंदखेडराजा । ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष गटासाठी सुटलेले आहे .सरपंच पदाच्या दावेदारी साठी इच्छुक उमेदवारांनी आतापासून फिल्डींग लावणे सुरू केलेली आहे ‘साखरखेर्डा येथील १७सदस्यांपैकी १६ सदस्य हे परिवर्तन पॅनल चे निवडून आले आहे ‘पक्षाची एकनिष्ठ राहिलेले सय्यद रफिक यांना संधी मिळावी म्हणून साखरखेर्डा येथील त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहे ‘सय्यद रफीक यांनी अनेक वृत्तपत्रांमधून आपली पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली आहे 1991 ते 1995 या साली ते एन एस यू आय . काँग्रेसचे ते जिल्हा उपाध्यक्ष होते ।1995 ते 1997 साली ते युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बनले ‘ 1996 – 97असली संजय गांधी निराधार योजनेच्या सिंदखेडराजा सदस्यपदी निवड झाली . ’19 98 -99 साली काँग्रेस सेवादल च्या सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी निवड झाली ‘1999 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला ‘2000 ते 2005 मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले ‘2000 ते 2004 रोजगार हमी योजनेच्या जिल्हा सदस्य पदी निवड झाली ‘जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी 2001 ते 2004 सली निवड ।जिल्हा परिवहन महामंडळ सदस्यपदी 2008 ते 2011 निवड ‘2012 ते 2014 साली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वर सदस्यपदी निवड ‘ आणि आत्ता 2021 साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते विजयी झाले ‘तरी अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना व सरपंच पदाची जबाबदारी द्यावी अशी मागणी साखरखेर्डा येथील त्यांचे कार्यकर्ते करत आहेत !सर्वसाधारण पोत असल्यामुळे सय्यद रफिक आउत्सेत कुरेशी सौ सुमन सुनील जगताप व सौ सुनिता दिलीप बेंडमाळी यांचीही नावे चर्चेत आहेत ‘परंतु येणाऱ्या अकरा फेब्रुवारी रोजी नेमके पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणे औचित्याचे ठरेल ।

देऊळगाव माळी येथे सरपंचपदी .किशोर गाभणे तर उपसरपंचपदी रंगनाथ चांळगे यांची निवड !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मागील दीड महिन्यापासून सुरु असलेल्या लोकशाहीच्या उत्सवाची आज पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यात जिल्ह्यात दीडशेहून अधिक गावात सरपंच उपसरपंच निवडले आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामीण राजकारणाची व राजकारण्यांची आज फायनल मॅच झाली. आजच्या दिवसासाठी गाव पुढारी आणि कसोटीच्या सामन्यासारखी मेहनत घेतली. अशा उमेदवारांची आज मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वर शपथ विधी व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.मेहकर तालुक्यातील
देऊळगाव माळी येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुद्धा मोठ्या थाटामाटात नवनियुक्त सदस्य सरपंच उपसरपंच यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी विस्तार अधिकारी श्री पादरे साहेब, पंचायत समिती निवडणूक निर्णय अधिकारी राम नवघरे, ग्रामसेवक मस्के साहेब, तलाठी पऱ्हाड या शासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रण रेखी खाली 2 च्या ठोक्याला विशेष सभेला प्रारंभ झाला. यावेळी 13 सदस्यांपैकी महा विकास आघाडी परिवर्तन पॅनलचे चे सर्वच्या सर्व10 नवनियुक्त सदस्यांमधून सरपंच व उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे देऊळगाव माळी चे सरपंच पद श्री किशोर विश्वनाथ गाभणे तर उपसरपंच श्री रंगनाथ हरिभाऊ चाळगे हे सांभाळणार आहे.
सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाने माखलेले ढोल, ताशा वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रशासन व सुव्यवस्था राखण्याचे काम मेहकर पोलीस स्टेशन चे बीट जामदार मस्के साहेब, व रामेश्वर रिंढे, पोलीस पाटील गजानन चाळगे यांनी पार पाडले.

गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

संदिप हा तरुण पोलीस किंवा सैनिक भरती मध्ये भरती होऊन देशाची सेवा करावी यासाठी तो प्रयत्न करत होता !परंतु संदीपच्या मनात काय आले कुणास ठाऊक आणि आणि पाच फेब्रुवारी रोजी संदीपच्या आत्महत्येची बातमी गावात धडकली ‘सिनखेडराजा तालुक्यातील कंडारी या गावातील संदीप जायभाये हा तरुण पोलीस भरतीची तयारी करीत होता ‘5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान नवीन चप्पल आणायची आहे म्हणून आई कडून पैसे घेऊन तो घराबाहेर पडलमात्र संदीप दिवसभरघरी आला नाही म्हणून संदीपच्या कुटुंबांनी त्याचा शोध घेतला परंतु सायंकाळी च्या दरम्यान पश्चिमेच्या दिशेने डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेलाच्या झाडाला संदीप जायभाये हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला .या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश सानप व मृतकाचा भाऊ नारायण जायभाये यांनी साखरखेर्डा पोलिसांना दिली ‘लगेच साखरखेर्डा पोलिसांनी माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे .पि एस आय दीपक राणे ‘प्रकाश मुंडे सुरजसिंग इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केलात्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी 7 फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणामध्ये संदीप नारायण जायभाये यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ‘

साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अर्धवट टाकून मजूर पसार !रस्ता त्वरित सुरू करावा अन्यथा चक्का जाम आंदोलन करू -भाजपचे वैभव तुपकर यांचा इशारा ‘

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा ते गुंज रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तसेच खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते परंतु अचानक पणे रस्त्यावर गिट्टी चे मोठाले खडे टाकून मजूर गेल्या बारा दिवसांपासून पसार झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ‘संपूर्ण रस्त्यावर गिट्टी असल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची मोटरसायकल घसरून पडली आहे !साखरखेर्डा ते गुंज या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे युवा नेते वैभव तुपकर यांनी दिला आहे त्यांनी असे सांगितले की रस्त्याचे काम हे पूर्ण व्हायला हवे होते परंतु अचानक रस्त्यावर गिट्टी टाकून मजूर पसार झाली आहे नेमके अर्धवट कामामुळे अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेकजण मोटारसायकल घसरून पडली आहे अनेक जण जखमी झाले आहे !अशा परिस्थितीमध्ये अर्धवट काम करणे योग्य नाही .तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून तातडीने गुंज ते साखरखेर्डा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे ‘तसेच शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणीही यावेळी वैभव तुपकर यांनी केली आहे !अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे !

खाजगी वाहनाने प्रवास करीत असताना मोबाईल खिशातून लंपास !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर वरून वरुडी येथे खाजगी वाहनाने येत असताना विवो कंपनीचा किंमत 13,000हजार रुपयेमोबाईल खिशातून लंपास झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन च्या दरम्यान घडली !हकीकत अशी की लक्ष्मण नारायण गवई वय 40 वर्ष व त्यांचा मुलगा आशिष लक्ष्मण गवई वय 19 वर्ष दोघेही राहणार वरुडी हे मेहकर वरून काळीपिवळी या खाजगी वाहनाने वरुडी येथे येत असताना .विवो कंपनीचा 13 हजार रुपये चा मोबाईल आशिष गवई यांच्या खिशातून लंपास झाला ‘प्रवास करत असताना विशेष गवळी याला झोप लागली होती त्याच्या शेजारी अन्य सुद्धा प्रवासी होते .जेव्हा तो गाडीतून उतरून घरी गेला तेव्हा त्याच्या खालच्या खिशातील मोबाईल त्याला दिसला नाही ‘याबाबत त्याने साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिली असता लवकरच मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी सांगितले !पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे

सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्याची सांगता !प्रांत अध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गेल्या 12 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे माध्यमातून विदर्भातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केली आहे .विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून आतापर्यंत त्यांनी 66 विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या आहेत :दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत तील विदर्भ दौऱ्याची सांगता करण्यात आली !यावेळी राष्ट्रवादी संवाद यात्रा व झालेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सिंदखेडराजा येथील पवार साहेबांच्या जुन्या सहकार्याच्या आठवणीला उजाळा दिला ‘ते पुढे म्हणाले की पवार साहेबांनी अनेक वर्ष खस्ता खाऊन जी माणसं कमवली की कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी नाहीत पुढे बोलताना ते म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पवार साहेबांचे नाव घेतले शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधण्याचा सल्ला पवार साहेबांनी दिला होता मोदींनी पवार साहेबांचा सल्ला ऐकला तर निश्चितच यातून मध्यम मार्ग निघू शकतो अशीही यावेळी पाटील यांनी सांगितले तसेच ‘सिंदखेड राजा मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदार संघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मनापासून प्रयत्न करत आहेत जिजाऊ स्मारक आला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ती मागणी आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच राजमाता जिजाऊंच्या नावे सुरू असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी नामदार जयंत पाटील यांनी दिली ‘यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले !यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी महिला जिल्हाध्यक्ष अनुजा साळवे युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे जिल्हा अध्यक्ष मीरा बावस्कर बुलढाणा विद्यार्थी अध्यक्ष नरेश शेळके राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे संदीप बाजोरिया विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील विनायक पाटील अँड साहेबराव सरदार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ।यावेळी सिंदखेड राजा मेहकर देऊळगाव राजा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते !

निर्माणाधीन सिंचन प्रकल्प गतीने पुर्ण कराव जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंचन प्रकल्प आढावा बैठक जिगांवसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा.दि.8.जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत एक मोठा व पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न राहणार असून सदर प्रकल्प यंत्रणेने गतीने पुर्ण करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादूरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर आदी उपस्थित होते.
जिगांव या महत्वाकांक्षी प्रकल्प गतीने पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जिगांवच्या बैठकीत प्रकल्पाच्या सर्व बाबींनी आढावा घेतला जाईल. यामध्ये निधीची तरतूद, भूसंपादन, भूसंपादन कायद्यांनुसार झाडे व तत्सम बाबींचा देण्यात येणारा मोबदला, मोबदला देण्याबाबत महसूल व जलसंपदा विभागाचा असलेला संभ्रम आदींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सरळ खरेदी प्रक्रिया ही विनाविलंब होणारी असल्यामुळे या प्रक्रियेचा अवलंब प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार करण्यात यावा. या प्रक्रियेने शेतकऱ्यांना लगेच मोबदला मिळतो.
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याबाबत सुचना देताना जलसंपदा मंत्री म्हणाले, पेनटाकळी प्रकल्पाचा 11 किलोमीटरचा कालवा आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे आजूबाजुच्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरी प्रकल्पाची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यतेमध्ये या कालव्याच्या दुरूस्ती, बंद पाईपद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या बाबीचा समावेश करण्यात यावा. त्यानंतर सुप्रमा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीची मंजूरी घेवून पाठविण्यात यावा. या कालव्याचे पाणी वितरण बंद पाईपद्वारेच करण्यात यावे. चतुर्थ सुप्रमा ही 416.59 कोटी रूपयांची आहे.
पालकमंत्री डॉ शिंगणे यावेळी म्हणाले, खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचे बाकी असलेल्या कामात नागरिकांच्या मागणीचा विचार करीत काम करावे. जिगांव प्रकल्पाच्या बाबतीत मोबदला देण्याबाबत यंत्रणांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा. याबाबत जलसंपदा विभागाने तोडगा काढावा. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर यांनी पेनटाकळी कालवा पाईपबंद करणे, लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची उंची कमी करणे, पेनटाकळी गावाच्या गावठाणाची हद्दवाढ करणे आदी मागण्या मांडल्या. आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील राहेरा प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बैठकीत अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील पुर्ण व निर्माणाधीन सिंचन प्रकल्प
पुर्ण प्रकल्प : मोठे 2, मध्यम 7 व लघु 100, अशाप्रकारे 109 प्रकल्प पूर्ण. पुर्ण झालेल्या प्रकल्पातून निर्माण झालेला पाणीसाठा 606.57 दलघमी, सिंचन क्षमता 90178 हेक्टर, निर्माणाधीन प्रकल्प : मोठे 2 (जिगांव व अनुशेष व्यतिकरिकत्‍ एक पेनटाकळी), लघु 5 (राहेरा, चौंढी, आलेवाडी, अरकचेरी, बोरखेडी) एकूण 7. बांधकामाधीन प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता 106553 हे, निर्माण झालेला पाणीसाठा 67.35 दलघमी, सिंचन क्षमता 14232 हे. प्रत्यक्ष झालेले सिंचन (सन 2019-20) 10159 हे.

राजेगाव येथे शॉटसर्किट होवून घराला आग ! अंदाजे अडीच लाखाचे नुसकान !

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथे दि ८फेब्रुवारी रोजी. दुपारी 2 वाजेदरम्यान अचानक पणे राहत्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागून अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे ‘घरातील विजेच्या तारेवर शॉर्टसर्किट होऊन आग लागली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही !आजगाव येथील रघुवीर बंडू जगताप यांच्या घराचे व घरातील सामानाची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान झाली आहे ‘यामध्ये मौल्यवान वस्तू शेती उपयोगी सामान । टीव्ही ‘कपडे इतर खाण्यापिण्याचे सामान याचा यात समावेश आहे ‘सदर आगीची माहिती मिळताच गावातील नागरिक व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग वर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली ‘यावेळी गावातील भानुदास जाधव हार्दिक खा पठाण लक्ष्मण तांगडे सचिन खंडागळे अमोल मसुरकर युवकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला !सदर या गीत घर मालक रघुवीर जगताप यांच्या घरातील सामानाचे अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाले असून तातडीने मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे ‘आगीची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल श्री सानप व तलाठी गुंजकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला .