Home Blog Page 554

साखरखेर्डा येथे ७२. ६५% मतदान !तालुक्यात एकूण ७४ . ६५ % पेक्षा जास्त मतदान !किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील एकूण ३९ग्रामपंचायत साठी आज दिनांक १५जानेवारीला मतदान घेण्यात आले अनेक ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले !
तालुक्यातील एकूण ६४ हजार ८३५ मतदारां पैकी एकूण ४८ हजार ३९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलायामध्ये पुरुष २५ ७४७ ‘ तर महिला 22,९८५ एकूण टक्केवारी, ७४ . ६५%पेक्षा जास्त असू शकते !टक्केवारी मध्ये बदल होऊ शकतो !
अतिशय संवेदनशील व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या
साखरखेर्डा ग्राम पंचायत निवडणूकीत ७२:६५ टक्के मतदान झाले असून ११ हजार ५९१ मतदारांपैकी ८ हजार ३०६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .
साखरखेर्डा येथील ग्राम पंचायत निवडणूकीत ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते . १७ सदस्या करीता झालेल्या मतदानासाठी सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या . सकाळी ७:३० वाजता काही उमेदवारांनी चिन्ह दिसत नसल्याची तक्रार मतदान केंद्र प्रमुखाकडे केली होती . काही काळासाठी मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती . परंतू उमेदवार प्रतिनिधी यांनी चिन्ह दिसत आहे असे सांगितल्या नंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली . या गोंधळात ३० मिनीटाचा वेळ गेला . विज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने मतदान करतांना चिन्ह स्पष्ट दिसत नव्हते . दुपारी ११ वाजेपासून जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेत मतदारांची प्रचंड गर्दी वाढल्याने ठाणेदार यांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खुपचं कसरत करावी लागली . वार्ड क्रमांक एक मध्ये २२२७ पैकी १५२१ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक दोन मध्ये २०५८पैकी १४९५ मतदान झाले . वार्ड क्रमांक तीन मध्ये १४०८ पैकी ९५९ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक चार मध्ये २१८४ पैकी १६१५ मतदारांनी मतदान केले . वार्ड क्रमांक पाच मध्ये १८८१ पैकी १३४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . वार्ड क्रमांक सहा मध्ये १८६९ पैकी १२१३ मतदारांनी मतदान केले . या निवडणुकीत ४३३४ पुरुष आणि ३८१२ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला . या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल रवींद्र पाटील , जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांची सुन ज्योती सचीन जाधव , भाजपा नेते उल्हास प्रभाकर देशपांडे , विद्यमान सरपंच महेंद्र पाटील , माजी सभापती राजू ठोके यांच्या मातोश्री लिलाबाई श्रीपत ठोके , माजी उपसभापती सुनील जगताप यांच्या पत्नी सुमन सुनिल जगताप , सय्यद रफीक , शेख रफीक तांबोळी हेही निवडणूक रिंगणात उतरले होते ! साखरखेर्डा ग्राम विकास पॅनल आणि परिवर्तन पॅनल मध्ये सरळ झाली आहे .आता ठिक ठिकाणी लोकांचे घोळके दिसत असून विजय कोणाचा अशी चर्चा सध्या रंगत आहे !

पत्रकार किशोर इंगळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित

0

 

सुनील पवार नांदुरा

बुलढाणा नांदुरा :- दयाभाई खराटे स्मृती अभिवादन सभेत पत्रकारिता गौरव पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त महेश भवन,मलकापूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते,तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व मान्यवरांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पत्रकारिता गौरव, समाजगौरव, कलावंत सन्मान पुरस्कार तसेच हॅलो महाराष्ट्र न्युज,चे संपादक तथा, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्री,किशोर इंगळे याना डॉ,बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,व समाजरत्न दयाभाई खराटे फाऊंडेशन मलकापूर द्वारा देऊन सन्मानित करण्यात आले,

आडगावराजा च्या तरुणाईचा अभिनव ऊपक्रम!! वाढदिवसाचा खर्च न करता अभ्यासिकेला देणार पुस्तके भेट!!

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील राजे लखुजीराव जाधव यांचे पुञ अचलोजी राजे जाधव यांचे ऐतिहासिक गाव आडगावराजा येथील तरुण युवकांनी मकर संक्राती च्या मुर्हतावर एकञ येऊन वाढदिवसा चा खर्च टाळुन गावातील ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले अभ्यासिकेला पुस्तके भेट देत आपला वाढदिवस साजरा करण्यचा अभिनव ऊपक्रम आडगावराजा येथिल तरुणाईने घेतल्याने या ऊपक्रमाचे गावातील नगरिकांनी अभिनंदन केले आहे.
आडगावराजा येथे ३ जानेवारी रोजी सावित्री बाई फुले यांच्या जयंती निमित्ताने गावातील जिल्हा परिषद ऊच्च केंद्रीय प्राथमिक शाळेत ज्ञान ज्योति सावित्री बाई फुले अभ्यासिकेचे ऊदघाटन करण्यात आले.यावेळी गावातील नागरिकांनी लोकवर्गणी तुन सुरु केलेल्या अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली .याचबरोबर गावातील तरुण युवकांनी एकञ येऊन वाढदिवसा निमित्ताने केक व ईतर खर्च केल्यापेक्षा गावातील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा निर्णय घेतला . मकर संक्रातीच्या शुभ मुर्हतावर एकञ येत गावातील तरुणांनी यापुढे वाढदिवसाला केकसह होणार खर्च न करता शाळेतील अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्याचा अभिनव ऊपक्रम आज मकर संक्रांतीच्या शुभ मुर्हतावर घेतला गावातील तरुणांईने घेतलेल्या या निर्णयाने गावातील नागरिक आनंदीत झाले असुन अभ्यासिकेला पुस्तके मिळाल्याने या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या मुलींना या पुस्तकांचा फायदा होईल हे नकीच

माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी समाज भूषण अर्जुन गवई यांची निवड !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माजी सैनिक तथा समाज भूषण अर्जुन गवई यांची माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे !
ही नियुक्ती 12 जानेवारीला राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या जयंती दिनी माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आली आहे !
त्यांच्या या निवडीमुळे सिंदखेड राजा तालुक्यातील संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधील माझी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे !
माजी सैनिक अर्जुन गवई हे अगोदरच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे असतात त्यातच माजी सैनिक फेडरेशनच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आणखीन जबाबदारी त्यांच्यावर वाढली आहे !आपण तन-मन-धनाने माजी सैनिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही यावेळी नवनियुक्त विदर्भ अध्यक्ष अर्जुन गवई यांनी बोलताना दिली आहे !

शिंदी येथे शेतातून ठिबक सिंचनचे ३५ हजार किंमतीचे 11 बंडल चोरीला !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अगोदरच शेतकरी शेतातील विजेच्या समस्येमुळे त्रस्त आहेआणि शेतातील शेतीचे साहित्य चोरीला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे ! शिंदी येथील प्रयोगशील शेतकरी विनोद खरात यांनी शेतामध्ये ठिबक करण्यासाठी दुकानातून नवीन ठिबक सिंचनचे 11 बंडल खरेदी केले होते त्याची किंमत 35000 रुपये होती !त्यांनी हे सर्व बंडल एका शेतातील झाडावरती ठेवून दिले होते .काही दिवसांनी शेतामध्ये ठिबक लावायचे असल्यामुळे त्यांनी ठेवलेले ठिबकचे बंडल बघितली असता त्या ठिकाणी ते आढळून आले नाहीत !शेजारीपाजारी सर्व ठिकाणी शोध घेतला असता कुठेही ठिबक चे बंडल आढळली नाही ‘शेवटी शोधाशोध झाल्यानंतर शेतकरी विनोद खरात यांनी ठिबक ची बंडल चोरीला गेल्याची साखरखेर्डा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दि . १० जानेवारीला दिली !यावेळी पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला !शेतातील साहित्य चोरीला जात असल्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे ।पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री चव्हाण करत आहे !

सिंदखेडराजा तालुक्यातील 39ग्रामपंचायत साठी मतदान !साखरखेर्डा येथे चुरशीची लढत !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गावोगावी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अखेर मतदानाची तारीख आणि मतदान करण्याचा दिवस उजाडला 15 जानेवारीला मतदान करायला प्रत्यक्षपणे सुरुवात होईल यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील त् ४३ ग्रामपंचायती पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी मतदान होईल !
यासाठी संपूर्ण महसूल व इतर यंत्रणा कामाला लागलेली आहे !तसेच पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे !
अनेक ठिकाणी सरपंच साठी बोली लागली आहे तर काही ठिकाणी सदस्य बिनविरोध निवडून देण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले !काही प्रयत्न सफल झाले तर काही असफल झाली !
तालुक्यातील काटे पांगरी येथे सात सदस्य पैकी सहा जण बिनविरोध निवडून दिले व एका जागेसाठी तेथे तिरंगी लढत सुरू आहे !
तालुक्यातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे अतिशय चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे !अनेक पॅनल ने महिलांना प्राधान्य दिलेली आहे !35उमेदवारांपैकी एकूण वीस महिला उमेदवार दोन्ही पॅनेलने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत !14 जानेवारी ची रात्र ही प्रचाराची शेवटची रात्र असल्यामुळे अनेक उमेदवार हे रात्रभर जागरण करत असतात !या ठिकाणी रात्रीस खेळ चाले ।प्रमाणे उमेदवाराकडून मतदारासाठी खेळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही !निवडणुकीच्या निकालानंतरच काय ते चित्र स्पष्ट होईल !

माँ जिजाऊ जन्मोत्सव व युवा दिन निमित्त विरांगणा संस्कार सायकल रॅलीचे आयोजन

0

 

आयुषी दुबे शेगाव

12 जानेवारी शेगाव जायन्टस सहेली ग्रुप व लायनेस क्लब च्या संयुक्त विद्यमाने माँ जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन निमित्त महिलांची विरांगणा संस्कार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश माँ जिजाऊ चे संस्कार युवा पिढीवर रूजवणे व युवतींना विरांगणा असल्याची जाणीव करून देणे अश्या आशयाचा होता. या रॅलीमध्ये एकूण 50 सायकल स्वर विद्यार्थिनी व शेगाव शहरातील सर्व महिला सहभागी झाल्या होत्या.

सायकल रॅलीचे उद्घाटन शेगावच्या प्रथम महिला नागरिक नगराध्यक्ष शकुंतलाताई बुच यांनी माँ जिजाऊ व विवेकानंदाचे पूजन, हारार्पण, दीपप्रज्वलन करून व हिरवी झेंडी दाखवून जिजामाता चौकातून सुरुवात केली व मथुरा लॉन्स वर ही समाप्त झाली.यावेळी कल्पना मसने,राजकुमारी भट्टड,अंजूषा भूतडा किशोर मिश्रा,विनायक भारंबे हे विशेष रूपाने उपस्थित होते.यावेळी अश्वारूढ जिजामाता च्या वेशभूषेत आलेल्या लावण्या असंबे यांनी मशाल पेटवून युवतींना संदेश दिला.
ही रॅली संपूर्ण शेगावातून मेन रोडने मथुरा लॉन्स येथे समाप्त झाली. तेथे विद्यार्थिनींना लायनेस क्लबच्या वतीने व स्नॅक्स व पाणी वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे बिस्किट वाटपही करण्यात आले. कार्यक्रमा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी सामूहिक नृत्य सादर करून शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
यावेळी
स्वामी विवेकानंद ,राजमाता जिजाबाई, बाल शिवाजी या वेशभूषां मध्ये तयार होऊन आलेले बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण करण्यात आले. त्यामध्ये सान्वी इधोळ, साक्षी कदम, गायत्री देशमुख, हर्ष वासनिक, ऋतुराज मसने यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींना सामुहिक नृत्यासाठी पुस्तक बक्षिस म्हणून देऊन प्रोत्साहित केले. मुख्याध्यापिका सौ जयश्री इधोळ मॅडम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करणाऱ्या लावण्या असंबे यांनाही विशेष रूपाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राधिका देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वीणा लाखे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी वृषाली ताई भारंबे, लावण्या अंसबे,रजनी शर्मा व लायनेस ग्रुप जायन्टस गृप पतंजली च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

राष्ट्रमाता माँ जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी चिखली तालुक्यातील
अंत्रि खेडेकर येथे सकाळी , माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी स्वाभिमानीचे अमोल मोरे,लहुजी शक्ती सेनेचे संतोष गायकवाड, पोलीस पाटील रामदास मोरे, भगवान मोरे, धीरज मोरे उपस्थित होते.

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त शिवनी आरमाळ येथे रक्तदान करून अभिवादन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे गावकऱ्यांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन केले !सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर तसेच महाराष्ट्रामध्ये असलेला कमी रक्तसाठा हे लक्षात घेता शिवनी आरमाळ येथील 50 युवकांनी रक्तदान केले !
जालना येथील
जनकल्याण रक्तपेढी रक्तदान करता आली होती यावेळी
:प्रभाकर राऊत ,अमोल आरमाळ, बळीराम गायके, स्वप्नील आरमाळ ‘संजय आरमाळ ।आधी सहकार्य केले !

बुद्ध विहार व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सवडद येथील युवकांनी केलेले श्रमदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

युवकांनी आता जर कुठलेही काम हातामध्ये घेतले तर ते शक्य झाल्याशिवाय राहत नाही याची प्रचिती सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद या गावी आली आहे ।दिनांक 13 जानेवारी रोजी येथील दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समोरील वाढलेले गवत काढून साफ-सफाई केली तसेच बुद्ध विहाराच्या नियोजित जागेतील गवत काढून सुद्धा साफसफाई केली !यावेळी श्रमदाना मध्ये !भाई पुंजाजी मोरे ‘राहुल मोरे समाधान मोरे विश्वनाथ मोरे छगन मोरे स्वप्नील मोरे डॉक्टर ज्ञानेश्वर मोरे प्रमोद मोरे विशाल मोरे गौतम मोरे सुखदेव मोरे शुभम मोरे रवी हिवाळे रणजित मोरे जीवन मोरे शांताराम मोरे पवन मोरे आधी युवक श्रमदाना मध्ये सहभागी होते !