Home Blog Page 578

भाजपाच्या वतिने विज बिल माफ करावे यासाठी आंदोलन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

भारतीय जनता पार्टी च्या वतीने सिदंखेड राजा तालुक्यातील माहेरखेड गावात उपअभियंता कार्यालय माहेरखेड याठिकाणी कोरोणा महामारीच्या काळातील संपुर्ण घरगुती वीजबील माफ करावे यासाठी विदयुत महामंडळ कार्यालया समोर दि . 23 नोव्हेबर रोजी’ महाविकास आघाडी सरकार चा जाहीर निषेध करुन वीजबीलाची होळी करुन हे आंदोलन करण्यात आले व निषेध करण्यात आला यावेळी सिदंखेड राजा भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. प्रा. गजाननराव घुले मा. सर्जेराव नागरे मा.श्रीराम मुंढे भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी मा.संतोष डोईफोडे मा.राजेंद्र नागरे मा.रंजित पवार मा.राहुल पवार मा.रविंद्र जायभाये साहबराव नागरे मल्हारी जायभाये अंबादास जायभाये गजानन सानप राजु कोल्हे प्रकाश लहाने एकनाथ डोईफोडे शिवाजी नागरे गजानन नागरे विष्णू जायभाये डिगांबर लाड विश्वनाथ लाड भगवान वाघ भीमराव म्हस्के हिमंत ढाकणे प्रकाश ढाकणे भावराव नागरे संदिप घुले ज्ञानदेव घुले शिवानंद टेलर हनवंतराव नागरे संदिपराव नागरे दिलीप सानप गणेश नागरे विलास वाघ ई.पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी मंडळी उपस्थित होते

विहिरीत पडलेल्या रोहिला युवकांनी दिले जीवनदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी मध्ये रोहि पडला होता परंतु युवकाच्या सतर्कतेमुळे रोहितचे प्राण वाचवण्यात यश आले आहे ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील शेतात घडली ।23 नोव्हेंबर रोजी विक्रम इंगळे यांच्या गट नंबर 180 मधील विहिरीत रोही पडला होता ही माहिती मिळताच ‘सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे व त्यांचे सहकारी सुधाकर इंगळे प्रभाकर इंगळे गणेश इंगळे प्रशांत इंगळे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन !शेतातील विहीर गाठली .विहीर हे पूर्णपणे पाण्याने भरलेली होती काही करून रोहिचे प्राण वाचले पाहिजे या हेतूने संदीप इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोरी च्या साह्याने रोहित चे पाय दोरीने बांधून ।चौघांनी दोरी ओढून !रोहिला सुखरूप पणे पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीतून बाहेर काढले !त्यामुळे रोहिला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला सुखरूप पणे जंगलात सोडून देण्यात आले !

मलकापूर पांग्रा येथे दोन दुकानांमधून चोरी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या चोरट्यांनी तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला असून तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे 22 नोव्हेंबरला मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना घडली !मलकापूर पांग्रा येथील अतुल दायमा यांचे श्री महालक्ष्मी एजन्सी नावाचे होलसेल दुकान आहे हे दुकान चोरट्यांनी 22 नोव्हेंबर च्या मध्यरात्री शटर चे कुलूप तोडून चोरी केली !यामध्ये रोख 30 हजार रुपये .इतर किराणा सामान संतूर साबण खाद्यतेल मसाला ‘सीसीटीव्ही व्हिव्हीआर ‘असा एकूण पाच लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला ।त्यानंतर चोरट्यांनी बशीर किराणा दुकान कडे मोर्चा वळवला बशीर दुकानाचे कुलूप कोंडा तोडून ‘दुकानातील रोख ४०हजार आठशे रुपये ‘त्याच बरोबर इतर किराणा सामान ‘संतूर साबण कपड्याचे साबण खाद्यतेलखोबरेल तेल शांती आवला शाम्पू .असे इतर आणखी किराणा सामानअसा एकूण एक लाख 95 हजार 600दोन्ही दुकानातील सामानाची किंमत सात लाख 22 हजार शंभर रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला !या घटनेची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळी साहेब ।बीट जमदार नारायण गीते ‘पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर हे घटनास्थळी दाखल झालेव घटनेचा पंचनामा करून बुलढाणा येथून श्वान पथकाला पाचारण केले !परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही !त्यामुळे आता चोर शोधणे पोलिसांपुढे आव्हान असेल !

आदीवासी रूग्ण सेवा समीती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर संपन्न.-

0

 

दि,22-11-2020 रोजी संग्रामपुर तालुक्यातील वसाळी या गावा मध्ये आदीवासी रूग्ण सेवा समीती व सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांच्या
तफै नेत्र रोग निदान व आरोग्य शीबीर धेण्यात आले,होते त्या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री संजय कायंदे साहेब (वसाडी वनपाल,)
कार्यक्रमाचे उटघाटक. श्री डी.बी.तळवी (उप विभागीय पोलीस अधीकारी मलकापुर).
प्रमुख उपस्थीती हेमंतजी पिल्ले (आदीवासी रूग्ण सेवा समीती अध्यक्ष.) हुसेनजी पालकर (प्रदेश उपाध्यक्ष आदीवासी भील समाज विकास समीती,) अख्तरजी मोरे (पंचायत समीती सदस्य संग्रामपुर) लालमनजी मावस्कर (माजी पं,स,सदस्य,) बालकराम कोल्हटकर (तंटामुक्ती अध्यक्ष वसाळी) जे.एस.पालकर (पोलीस पाटील वसाळी) डॉ.प्रेमचंद पंडीत (नेत्र रोग तज्ञ) डॉ.कल्पना पंडीत (महीला रोग तज्ञ) डॉ.रविशंकर जाधव (हदय रोग व मधुमेह तज्ञ,) डॉ.प्राची जाधव (वैघकीय अधीकारी स,मो,सा, रुगणालय शेगाव,) डॉ.आशुतोष पंड़ीत (वैधकीय अधीकारी) कु.रेणुका उदार (शिबीर समनवयक) यांनी रूग्ण सेवा दीली तर नवीन वसाळी,जुणी वसाळी, हडयामहल,सायखेड,शिवणी,टुनकी,आलेवाडी,चीचारी येथील एकुण 74 रुग्णाणी शिबीराचा लाभ घेतला तर नेत्र शस्त्र कीया करीत 32 रुग्णाना निवडण्यात आले निवडलेल्या रूग्णान वर दि12/12/2020 पासुन नियमा प्रमाणे एका दीवसात फक्त 4 रूग्णान वर शस्त्र कीया होणार आहे तर,कार्यक्रम यशस्वी करण्या करीता.
डॉ.शाहरुख सुरत्ने,सुमीत पालकर,नजीर पालकर,समीर सुरत्ने,सरिन सुरत्ने,राम कासदेकर,यशपाल सुरत्ने,सरीचन कोल्हटकर,हातीम तायडे,बुधा भाऊ,लक्ष्मण गीरे,विजय लोनकर,यांनी परिश्रम घेतले तर कोरोना कालावधी ला लक्षात घेता सोषल डिस्टसींग,तोंड़ाला मास्क सँनीटायझर चा उपयोग करून काटेकोर नियमाचे पालन करूण शीबीर संपन्न झाले.

पित्याने केली मुलाची हत्या -गुन्हा दाखल

0

 

गजानन सोनटक्के  जलगाव जामोद :- प्रतिनिधी

तालुक्यातील ग्राम भिंगारा येथे घरगुती वादातून पित्याने केली मुलाची हत्या जळगाव ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
तालुक्यातील ग्राम भिंगारा येथील रहिवाशी रायजाबाई हिरालाल चव्हाण वय २७ वर्ष या महिलेने जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की दिनांक २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास तिचा पती हिरालाल मैकालसिंग चव्हाण वय ३०वर्ष व ससुर मैकालसिंग तानसिंग चव्हाण वय ५७ वर्ष राहणार भिंगारा यांच्यामध्ये शाब्दिक वाद होत होता तिचा सूर मृतक हिरालाल ला म्हणत होता की तू इथे माझ्या सोबत राहू नको आणि माझ्या समोर येऊ नको याच्यावर मृतक म्हणाला की तू माझा बाप आहे मी तुला सोडून कुठे जाऊ नाहीतर मला सांग की माझा बाप कोण आहे या कारणावरून आरोपी मैकालसिंग चव्हाण यांनी रस्त्यावरच दगड उचलून हिरालाल च्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले गंभीर अवस्थेत त्याला आम्ही जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील विदर्भ हॉस्पिटल मध्ये भरती केले त्या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशा तक्रारीवरून आरोपी मैकालसींग याच्याविरुद्ध कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रमेश धामोडे व पीएसआय प्रल्हाद मदन व त्यांचे सहकारी संजय राऊत आणि गणेश पाटील हे करीत आहे पोलिसांनीआरोपीला अटक करून ताब्यात घेतला आहे

वीजबिल सवलती साठी भाजपाच्या वतिने वीजबिल होळी आंदोलन

0

 

 

सुनील पवार नांदुरा

राज्यातील शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी सरकारने वीजबिलात सवलत देण्यास जाहीर केले होते पण आता याच सरकारच्या ऊर्जामंत्री यांनीच स्वतः वीजबिल बाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकाना ती बिले भरावी लागतील असे स्पष्ट सांगितले दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी व जनतेला आलेली भरमसाठ विजबिलामध्ये रास्त सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे नांदुरा महावितरण कार्यालया समोर वीजबिल होळी आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी नांदुरा शहरासह तालुक्यातील भाजपा विजय पाटील, प्रवीण मानकर,शैलेश भाऊ मिरगे,मयुर बघे,अर्चना ताई पाटील,संतोष मुंढे सर्व पदाधिकारी व कार्यकते बहुसंख्यने उपस्थित होते

नांदुरा तालुक्यातील तरूणाचे अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

0

 

 

सुनील पवार नांदुरा

शासनाने जप्त केलेली रेती साठा चोरी प्रकरणी रेती तस्कर व पोलीस पाटील यांच्याशी संगनमत करुन महसूल मंडळ अधिकारी चांदुर बिस्वा यांनी कर्तव्यावर कसूर केल्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी नांदुरा तालुक्यातील ग्राम टाकळी वतपाळ येथील प्रमोद दिलीप तायडे यांनी आज दिनांक 23 नोव्हेंबर पासून अमरावती आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय तरुणाची विहिरीत विषप्राशन करून आत्महत्या…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चाळीस वर्षीय विजय शंकर केदार हा तरुण इसम दिनांक 23 नोव्हेंबर सकाळी अकरा वाजेपासून घरून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी या तरुण इसमाचा मृतदेह सुनगाव जवळील शेत शिवार सुनगांव भाग दोन मधील गट नंबर पाचशे वीस दिनेश ढगे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.सदर इसमाचा मृतदेह सुनगाव येथीलच रामदास केदार यांना दिसून आल्याने त्यांनी गावचे पोलीस पाटील तळवी यांना माहिती दिली. पोलीस पाटील तडवी यांनी सदर घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीआय घुले, पोलीस हेडकॉन्स्टेबल तैय्यब अली, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस शिपाई वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत, सदर इसमाचा मृतदेह विहिरीतून गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढुन मृतदेहाचा पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तर प्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव जामोद येथे नेण्यात आला. सदर इसम हा विवाहित असून त्याला 9 वर्षीय मुलगा आहे . त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विज बिलाची सक्तीची वसुली कराल तर स्वाभिमानी स्वस्त बसणार नाही. : गोपाल तायडे

0

 

 

आयुषी दुबे शेगाव

कोविड 19 (कोरोना ) वाढत्या प्रादुर्भागामुळे सरकारने
लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वसामान्य जनता सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत तीन महीने कुठल्या ही कामावर न जाता घरीच राहली. सरकारने आव्हान केल्या मुळे सर्व सामान्यांची जबाबदारी मायबाप म्हणून सरकारची होती. तिथे व्यवस्था करण्यात सरकार कमी पडली. कोनत्याच कामावर न गेल्यामुळे सर्वसामान्य जनता ही आर्थिक संकटात सापडली आहे. अश्यातच विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिला मध्ये कोणतीच सूट मिळणार नाही असे वक्तव्य मंगळवारी
प्रसारमाध्यमाशी बोलताना केले. आगोदर वीज बिला मध्ये सूट मिळणार असे आश्वासन विद्युत मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु घुमजावं करीत सरकारने वीज बिल माफ होणार नाही अशी भूमिका घेगली आहे. कोरोना काळात जनतेला घरी बसून. जनतेने वापरलेल्या वीज बिलाची सक्तीची वसुली करण्याचे ठरवले आहे परंतु
राज्य सरकारने वीज बिल माफ करून सर्वसामान्य व शेतककरी जनतेला दिलासा द्यावा. अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकरी, शेतमजुर, कामगार व सर्वसामान्य जनता सह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.

हॉटेलमध्ये गळफास घेऊन तरुण इंजिनिअरची आत्महत्या

0

 

(सूर्या मराठी न्युज) पुणे: ही घटना दुर्दवि असून हा तरुण मोठा स्वप्न घेउन दिल्लीतून पुण्यात आलेल्या एका इंजिनिअर तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असून ही आत्महत्येचे कारण अद्याप ही समजू शकलेले नाही.

जितेंद्रकुमार गुप्ता (वय २९, रा. नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता नोएडातील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. ते दिल्लीतील राहत्या घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार तेथे पोलीसाना दिली होती. दिल्लीतून निघालेले गुप्ता मॉडेल कॉलनीत असलेल्या एका हॉटेलमध्ये राहायला आले.
रविवारी (२२ नोव्हेंबर) त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्ता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांनी नैराश्यातून ही आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी व्यक्त केली. असून पुढील तपास सुरू आहे