Home Blog Page 600

जळगाव जा तालुक्यात मडाखेड येथे वाघांच्या जोडीची हजेरी सुरक्षेसाठी वनविभागाला गावकऱ्यांचे निवेदन

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड चावरा येनगाव शिवारात दोन वाघाची जोडी वावरत असून अनेक लोकानी त्याना पाहिले असल्याचे ठाम आणि खात्रीशीर मत आहे असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत जी पाटील यांच्या लेटर हेड वरून वनविभागाला दिले असून संबंधित शीवारातील अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुगीचे दिवस असताना सोयाबीन कपाशी मका व इतर पिके काढनिवर आलेले आहेत आशा वेळी शेतकरी शेतमजूर शेतावर जाण्यास धजावत नाही कारण या श्वापदांमुळे हरिणी आणि शेळी यांच्या शिकारी झालेल्याचे अवशेष जनतेने तसेच प्रत्यक्ष वनविभागाने पाहिलेले आहेत तरीही जनतेच्या सुरक्षेबाबत उपाययोजना केलेली नाही camera लावणे सापळा पिंजरा शॉप लावणे स्टॉल लावणे ई .ची उपाययोजना करावी अन्यथा होणाऱ्या जीवित हानीस संबंधित विभाग आणि शासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची अत्यंत दुरावस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे चुकवितांना अपघात घडत आहेत.

0

 

 

 

अपघातामध्ये अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अक्षरश: या मार्गाची चाळणी झाली असून याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. या विरोधात आज ७ ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच महामार्गावरील अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या महामार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. मलकापूर-नांदुरा जाणाNया या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या महामार्गावर नेहमी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरात मिळाली असून रस्ता कामाला सुरूवात सुध्दा झाली होती. मात्र, चार वर्षापासून या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. नागपूर ते मुंबई हा मोठा महामार्ग असून या महामार्गावर शेकडो वाहन ये-जा करतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांनी आता मोठे रूप धारण केले आहे. अचानक वाहन खड्ड्यातून गेल्यास वाहन अनियंत्रित होवून अपघात होत आहे. विशेष करून दुचाकी चालकांसाठी ते अतिशय धोकादायक ठरले आहे. याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यामध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तर या अपघातांना तसेच रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाNया संबंधित अधिकारी, ठेकेदार यांचेवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून महामार्गाचे काम तात्काळ सुरू न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित पुंâदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, बळीराम बावस्कार, युवा प्रमुख अमोल बावस्कार, मयुर बुडुकले, अर्जुन पाटील, शितल जांगडे यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हाथरस_मध्ये_घडलेल्या_प्रकरणाचा महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना गोंदिया तर्फे विरोध _प्रदर्शन_आंदोलन.

0

 

शैलेश  राजनकर गोंदिया प्रतिनिधी

आज दिनांक ०७ आक्टोंबर २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता तहसील कार्यालयासमोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी विरोध प्रदर्शन आंदोलन जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तसेच सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यर्पण व वंदन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली, तसेच विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात केले, त्यांनतर उप्पर तहसिलदार खडककर साहेब यांना निवेदन दिले. या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल हटवार, चंदू बडवाईक, शाखा अध्यक्ष राणा नागपुरे, शुभम नागोसे, आशिष भुजाडे, गौरव ठवरे, तन्मय हरिनखेडे, गौरव मेंढे, राहुल बकरे, कुणाल शहारे, विक्की टेंभेकर, वतन माणिकापुरी, माधव बनकर, वरूण माणिकापुरे व सर्व महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते

.कल्याण काका आखाडे यांनी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीचे मनोभावे घेतले दर्शन

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

आज श्रीक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी माननीय सावता परिषद चे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याण काका आखाडे सावता महाराजांचे वंशज श्री रमेश महाराज वसेकर हरिभक्त परायण म्हेत्रे महाराज सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू सोलापूर जिल्हाध्यक्ष मृदल माळी बीड जिल्हा संघटक अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते

अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.
श्री भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनविताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकासकामांबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी श्री भुजबळ यांनी दिली .
अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग-व्यापार वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संगितले.

बाळापुर तालुक्यातील वाडेगाव शेतशिवारात कुजलेले प्रेत आढळले

0

 

हिम्मतराव तायडे

महाराष्ट्र ब्युरो चीफ

अकोला जिल्ह्यातील -बाळापुर तालुक्यातील वाडेगाव शेत शिवारात ५२ वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कुंजलेला असल्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओ:-बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रामराव अवचार यांच्या शेतात किसन दगडुजी ढोके वय ५२ वर्ष यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मंगळवारी आढळून आला या बाबत शेती मालकाने तात्काळ स्थानिक पोलीस चौकीला माहिती दिली यावेळी वाडेगाव पोलीस चौकीचे ए पी आय महादेव पडघम, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावंडे, विशाल जावळे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. मृतदेहाची दुंर्गधी सुटल्याने ही घटना चार ते पाच दिवसापूर्वी घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून ही आत्महत्या आहे की घातपात हे वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल. यावेळी बाळापुर पोलिस स्टेशनला आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.

__________________________________

पळशी तील नवं तरुणांनी घेतला सर्वांना हसवण्याचा ध्यास.

0

 

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी.

सिल्लोड तालुक्यातील पळशी गावातील नव तरुणांनी एकत्र येऊन सर्वांना हसविण्याचा वसाच घेतला जणू आज कोरोना काळात लोकांना बाहेर जाऊ नये तसेच लोकांचे मनोरंजन व्हावे या साठी तसेच गावाचे नाव व्हावे या दृष्टीने गावातील योगेश साहेबराव बडक यांनी सर्व नव तरुणांना एकत्र करून पप्पू वैष्णव,
खुशबू कासीद,रुतूजा आहेर वैजापुर, विकास टोगे औरंगाबाद,साहील भालेराव पैठन,अंबादास जाधव,देवाभाऊ रवी शेलार बोजगाव,कांतीलाल ठाकूर,पळशी.गोपाल सर,भागवत राऊत पळशी,ईश्वर मोरे,नितीष बडक.सोपान बडक.या सर्वांचे पूर्ण गाव कौतुक करत आहे
यांनी गुडघ्याला बाशिंग ही मराठी वेब सिरीज तसेच अनेक मराठी गाण्यांची निर्मिती सुद्धा केली आहे पूर्ण गावाला आज या नव तरुणांचा अभिमान आहे

हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी नि:पक्ष व्हावी.

0

 

सागर जैवाळ फुलंब्री तालुका प्रतिनिधी

हाथसर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या घटनेने योगी आदित्यनाथ यांच्या राज्यासह देशातील तरुणी महिला यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेची निःपक्ष चौकशी व्हावी आणि पिडीत तरुणीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान मोदीजी, गृहमंत्री अमित शहा आणि यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपूर्ण राज्यातून राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने 10 हजार पत्र पाठवण्यात येणार आहेत.

#justice_for_manishawalmiki
Nationalist Congress Party – NCP
Supriya Sule

उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी- छगन भुजबळ

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीवे मारून टाकण्यात आल्याची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तीचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी भेटण्यासाठी गेले असतांना त्यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या दोनही घटना लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या घटना असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्का बुक्की करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर छगन भुजबळ यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, उत्तर प्रदेशातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्यावर कुटुंबियांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असतांना पोलिसांनी कुटुंबियांना डांबून ठेऊन रातोरात अंत्यविधी केला हा प्रकार तरी काय आहे असा सवाल गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले असतांना पोलिसांनी त्यांना धक्का बुक्की करण्याची गरज नाही. देशातील एका मोठ्या नेत्याला अशी वागणूक मिळते याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच कुठल्याही नेत्याला अशी वागणूक देणं ही बाब निषेधार्ह आहे. इकडे महाराष्ट्रात काही नसतांना महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम केलं जातं आणि उत्तर प्रदेशात काय नेमकं काय घडतंय असा सवाल उपस्थित करत सगळ्या देशातील जनतेने याचा निषेध करायला हवा असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, कुठल्याही पीडितेचे अश्रू पुसण्यासाठी शांततेने भेटायला जाणाऱ्या लोकांना अशी वागणूक दिली जाते हे अत्यंत घृणास्पद आहे. गरिबांवर अत्याचार होत असतांना त्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांना बंदिस्त करून ठेवणं हे चुकीचं आहे. हा देश महात्मा गांधी व गौतम बुद्धांचा हा देश आहे या भारताला हे अभिप्रेत नाही. या दोनही घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या घटना आहे. हा निषेध कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात निषेध असून त्यासाठी देशातील जनतेने एकत्र येत निषेध करायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले.

हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा… प्रशांत तायडे यांनी काळ्या फिती बांधून दिले तहसीलदारांना निवेदन.

0

 

जळगाव जामोद:-आज दि.५ सप्टेबर रोजी आर.पी.आय.गवई गटाचे बुलढाणा युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांच्या नेतृत्वात हाथरस मधील पिडितेला न्याय मिळावा यासाठि काळ्या फित बांधून तहसीलदार मगर साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्टपती यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
देशामधे बलत्काराच्या घटनात लाक्षणिक वाढ होत आहे. उत्तर प्रदेश मध्ये नुकतेच वाल्मिकी समुदायाच्या दलित मुलि वरती पाशवी अत्याचार करुन, तीला संपविण्यात आले, जिवंतपनीच यम यातना देवून मारणा-या त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच सदर प्रकरणाची निपक्ष्य उच्चस्तरीय चौकशी गठीत करुण सदर खटला हा जलद गती (फास्टट्रॅक) न्यायालयाअंतर्ग्त चालवुन पिडीत दलित कुंटुबास न्याय द्यावा. तसेच पिडितेचा दाहअग्नी अंतसंस्कार रातोरात उरकून तपास यंत्रणेतील पुरावे नष्ट करण्याचा हा प्रकार आहे पिडितेच्या दाहअग्नी संस्कारचा आधिकार हा पिडितेच्या कुटुंबाचा असताना पोलिसानी तो स्वताहा करुन मानव अधिकाराचे हनन केले आहे.धनदांडग्यां नट्यांना पाठीशी घालणाऱ्या महिला आयोगाने हाथरस प्रकरणात एवढा उशिर का केला,हा सुद्धा चींतनाचा विषय आहे. या सर्व प्रकरणात जेही आधिकारी आरोपी व आरोपिला सहकार्य करणारे पिडित कुटुबाच्या मानवी हक्काच हनन करणाऱ्या DM, SDM व पोलिस आधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ निलबित करुन त्यांच्यावर दंडात्मक कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी प्रशांत तायडे, गोपाल अवचार, भास्कर भटकर,सदाशिव गवई, संजय वानखडे,अमोल चोपडे, प्रभाकर वानखडे, प्रफ्फुल तायडे, मोहन चोपडे,अँड सिद्धार्थ वानखडे, हे सर्वउपस्थित होते.