Home Blog Page 603

रुग्णसेवेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज; ज्ञानेश्‍वरदादा पाटील यांचे आवाहन

0

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी
जळगाव जा

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असल्या तरी वेगवेगळ्या पक्षीय विचारधारेचे लोक सत्तेकरिता एकत्र येताना आजवर आपण बघितलेत. मात्र लोकहितासाठी एकत्र येऊन सेवा व परमार्थाची यात्रा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून घडत आहे. सारथी सामाजिक संस्था व माऊली सेवाभावी संस्थेतर्फे भविष्यात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात गोर- गरिब कष्टकरी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध दुर्धर आजारग्रस्त रुग्णांकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू, असे प्रतिपादन माऊली हार्ट केअर व माऊली डायलिसीस सेंटरचे सर्वेसर्वा ज्ञानेश्‍वरदादा उपाख्य नानासाहेब पाटील यांनी केले.
नानासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महाआरोग्य शिबिर आज, 11 ऑक्टोबरला जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घेण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील होते. सारथी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ भिसे, साध्वी सर्वेश्‍वरी दिदी, पत्रकार डॉ. जयंतराव खेळकर, डॉ. राजपूत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाला सारथी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण मनसुटे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय खेर्डेकर, सचिव अ‍ॅड. अभिमन्यू वाघ, सहसचिव प्रविण चिपडे, कोषाध्यक्ष सुयोग मनसुटे यांच्यासह आनंद भोरे, किसना बुंदे, जय कोगदे, अभिषेक हिस्सल, राहुल ढोले, स्वप्निल भोरे आदी सदस्यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. प्रास्ताविक गोविंद अंबुसकर यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रविण मनसुटे यांनी मानले.

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानासमोरील झाडांची कत्तल, अज्ञाताविरुद्ध वनविभागाने नोंदविला गुन्हा

0

 

गोदिया-शैलेश राजनकर

विशेष म्हणजे, त्याठिकाणी लावलेली झाडे मरू नयेत याकरता सामाजिक वनीकरण विभागाने रोजंदारी कामागार ठेवले व त्यांनी सतत पाणीपुरवठा करत त्या झाडांना मोठे केले. मात्र, आज त्याच सामाजिक वनीकरण विभागाने जगविलेल्या झाडांची वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता कत्तल केली जात आहे. हे सर्व फक्त विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांना बंगल्याचा आकार छोटा वाटत असल्याने तो मोठा करण्यासाठी आहे. त्यानुसार, समोरील रस्ता सुरक्षा भिंतीच्या आत आणून जगलेली झाडे तोडून त्याठिकाणी नवा रस्ता तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हाती घेतले आहे. या रस्ताबांधकामाची माहिती मिळताच पाहणी केल्यावर किमान ३०-४० झाडे कापण्यात आल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात जिल्हाधिकारी दिपक कुमार मीणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला. ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. याचा सातबारा देखील आहे. सामान आणण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे राज्य सरकार कोटयावधी रुपये झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवत असताना मात्र गोंदिया जिल्हाधिकारी यांना शासनाच्या या उपक्रमाचा विसर पडला आहे का? या संदर्भात एका तक्रारदाराने वनविभागात तक्रार दिली असल्याने वनविभागाने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कायद्याचे रक्षणकर्तेच कायदा विसरले असतील तर जिल्ह्यात कायद्याचे पालन करणार तरी कोण अशा सवाल या ठिकणी उपस्थित केला जात आहे.

जळगांव (जा ) – 32 वे उपवर माळी युवक युवती परिचय संमेलन 3 जानेवारी 2021ला. जळगांव (जामोद) व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगांव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन संदर्भात

0

 

सुरेश गोंड जळगाव जामोद शहर प्रतिनिधी

कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवर चर्चा करून, सदर बैठकीत परिचय संमेलन रविवार दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव ( जा) येथे घेण्याचे ठरविले.
मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले मंडळ जळगांव जामोद यांच्या माध्यमातून उपवर युवक युवती परिचय मेळावा, सामुहिक विवाह सोहळा ह्यांची सर्वप्रथम मुहूर्तमेळ महाराष्ट्रात रोवली. मंडळाच्या या वर्षीच्या विविध कार्यक्रमासाठी सर्वानुमते
अध्यक्ष:- मारोती वानखडे(खेर्डा)
कार्याध्यक्ष:- पांडुरंग वेरुळकर(सोनाळा)
सचिव:- मुकुंद दाते (वडशिंगी),
उपाध्यक्ष:-विश्वंबर वावगे(धोनोरा) व सुनिल तायडे(पातुर्डा) कोषाध्यक्ष:-गोपाल इंगळे(लाडणापूर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपवर युवक युवती परिचय सम्मेलन नोंदणीची अंतिम तारीख दि. 8 डिसेंबर 2020 ठरविण्यात आली. सदर बैठकीला
प्रा.हरिभाऊ इंगळे
डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर,
अभिमन्यू राखोडे, वासुदेवराव भोपळे,
महादेवराव घुटे,
प्रवीण भोपळे, डॉ.संदीप वाकेकर, त्र्यंबकराव घाटे, राजीव घुटे, रामकृष्ण खिरोडकर, अँड.रतन इंगळे, गजानन बोदडे, रामदास राऊत, शालीग्राम भोपळे, समाधान खिरोडकर,पांडुरंग भोपळे, शांताराम म्हसाळ, नीलकंठ उमाळे,अरुण वानखडे, दीपक उमाळे, पंकज तायडे, गणेश भड,दीपक उमाळे, विजय म्हसाळ, डॉ.राखोंडे, नितीन जाधव, वैभव धर्माळ, अनिल इंगळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते
प्रस्ताविक नितीनभाऊ सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले

क्रांती क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खेळाडूंना साहित्य वाटप

0

 

अजहर शाह
मोताळा तालुका प्रतिनिधी

कोरोना काळात जोपासली सामाजिक बांधिलकी

बुलढाणा :- जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असुन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असुन कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार युद्ध पातळी वर कार्य करीत आहे असे असतांना कोरोना ला आपल्या पासुन दूर ठेवण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे यासाठी च योग्य,व्यायाम,मैदानी खेळ अश्या वेगवेगळ्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत असते या करिता क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप करून कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत खेळाडु चा आत्मविश्वास उचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे
क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व जनार्दन ठाकरे यांनी नेहमीच खेळाडूंना विविध मैदानी खेळा साठी प्रोत्साहित केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्व जनार्दन ठाकरे याचे पुत्र वैभवदीप ठाकरे यांनी दिली क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमामुळे अनेक खेळाडू नी राज्यस्तरा पर्यत मजल मारली असुन अनेक खेळाडु शासकीय सेवेत विविध पदावर कार्यरत आहेत मा मुकेश रेड्डी यांच्या पुढाकाराने क्रांती नगर बुलढाणा येथील खेळाडूंना विधी तज्ञ अँड संतोष वानखेडे यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी क्रांती क्रीडा व साहित्य मंडळाचे पदाधिकारी खेळाडूमोठ्या संख्येने उपस्थित होते

शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे पक्ष प्रवेश सोहळा पार पाडण्यात आला.

0

 

शैलेश राजनकार गोंदिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मानीय मराठीह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवकांनी जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षात प्रवेश घेतले. तसेच कारंजा व श्रीनगर येथे शाखा उटघाठीत करण्यात आली. प्रवेश करण्यामध्ये कारंजा शाखा अध्यक्ष रोहित ऊके, शाखा उपाध्यक्ष दिपक मानकर, शाखा उपाध्यक्ष विशाल दमाहे शाखा सचिव भुषण उईके, शाखा सदस्य सचिन शेन्द्रे, शाखा सदस्य शुभम लिल्हारे, श्रीनगर शाखा अध्यक्ष राहुल बाकरे, शाखा उपाध्यक्ष निखिल भालाधरे, वार्ड प्रमुख कुणाल शहारे, शाखा सदस्य आदित्य निर्वाण, वरूण माणिकापुरे, शुभम नागोसे, होते या प्रसंगी शहर अध्यक्ष राजेश नागोसे शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य शहर उपाध्यक्ष रजत बागडे, राणा नागपुरे व सर्व महाराष्ट्र सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते…

शासकीय धान खरेदीत भ्रष्टाचार, पैशांच्या गबन केल्यावर सालेकसा व कोटजंभुराचा परवाना रद्द…

0

 

शैलेश राजनकर
गोंदिया

कॉंग्रेसच्या कारवाईनंतर जिल्हा पणन अधिका Officer्यांनी आदेश काढला ..
गोंदिया. सहकारी भट गिरणी मर्यादित, सालेकसा संस्थेच्या अंतर्गत सालेकसा व कोटजंभुरा येथील धान खरेदी केंद्रामध्ये शासकीय निधीचा गैरफायदा करून खरेदी केल्याबद्दल या बाबत Officer ऑक्टोबर रोजी जिल्हा विपणन अधिका by्यांनी या संस्थेचा परवाना रद्द केला आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की संस्थेने धान खरेदीतील भ्रष्टाचाराच्या कथित भ्रष्टाचाराबाबत वित्त विभागाकडे तक्रार पाठविली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती. यासंदर्भात स्थानिक लोकांनी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अमर वरहाडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती आणि कॉंग्रेसच्या अनेक अधिका contacted्यांशी संपर्क साधून या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली.
कॉंग्रेसच्या हस्तक्षेपानंतर जिल्हा पणन अधिका ,्यांनी सालेकसा संघटनेवर कारवाई करत त्यांचे दोन्ही धान खरेदी करुन केंद्राचा परवाना रद्द केला. विशेष म्हणजे या गैरवर्तन कामाची तक्रार मिळाल्यावर पणन अधिका्याने संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती व पाच दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. परंतु संस्थेने 6 ऑक्टोबरपर्यंत या सूचनेला प्रतिसाद दिला नाही. हे स्पष्ट झाले की संस्थेने प्रतिसाद न देऊन कराराचे उल्लंघन केले. यासाठी संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला.
या कारवाईबाबत युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती म्हणाले की, संस्थेतर्फे शासकीय धान खरेदीत भ्रष्टाचार सर्रास झाला आहे. संस्थांवर चौकशी ब्लॉक लावून याविरोधात फौजदारी खटला दाखल करावा.

हिवरखेड़ येथील शेतात इलेक्ट्रीक शॉट लागुन एकाचि मृत्यु

0

 

हिवरखेड येथील पशुपालक राजिक खान रशीद खान वय अंदाजे 47 रहिवासी आठवडी बाजार वेस हिवरखेड़ हे पहाटे आपल्या गुरांसाठी चारा आण्यासाठी गेला होते अकोट रोडवरून एका नाल्याच्या दक्षिणेकडील रस्त्याने कराळे यांच्या शेतात विद्युत प्रवाहित केलेल्या तारांनी कुंपण केलेले होते त्या विद्युत प्रवाहित तारांच्या त्यांच्या पायला स्पर्श होऊन विजेच्या जबर धक्का लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची माहिती मुतकाच्य नातेवाइकांनी दिली घटनास्थळ हिवरखेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील रवाना केला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा हिवरखेड गाठले आणि घटनांची माहिती मृत्यू राजिक खान हे घरातील एक मात्र कमावते व्यक्ती होते त्यांना एकहि मुलगा नव्हता त्यांना सात मुली असून दोन मुलांचे लग्न अजून बाकी असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आह

बोडखा येथील हतबल शेतकऱ्याने सोयाबीनच्या 15 एकराच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर !

0

 

भाजपा पदाधिकार्याचे शासनाविरोधात निषेध व घोषणाबाजी

संग्रामपुर तालुक्यातील  बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एककर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच्या नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एक्करातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असुन आर्थिक विळख्यात सापडले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे अशी मागणी ह्यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे सोयाबीनच्या ७५% शेंगा पोकळ असल्याने तालुका खारपाण पट्ट्यात येत असुन सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवुन नैराश्य पोटी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले. ह्यावेळी भाजपा संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्याला धीर देत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आले . ह्यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतात उपस्थित होते..

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मा.बाळासाहेब भोसले यांचा जाहीर सत्कार…

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर

प्रहार जनशक्ती पक्ष
वैजापूर च्या वतीने…
ता.प्रमुख ज्ञानेश्वर घोडके व उपतालुकाप्रमुख गणेश पा.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
शहर प्रमुख विशाल शिंदे यांनी…
मा.बाळासाहेब भोसले यांनी
वैजापूर येथील प्रहार प्रमुख पदाधिकारी यांच्या सह संवाद साधला त्या वेळी …

केलेल्या उत्क्रृष्ट कामाचे कौतुक करत सर्व पदाधिकारी यांचा सत्कार केला…

व यापुढेही पक्षवाढीसाठी जिल्हा अध्यक्ष म्हणून मी खंबीर पणाने आपल्या पाठीशी आहे असे आश्र्वासन दिले…
व दादासाहेब होले यांची ता.चिटणीस तर चांगदेव पवार यांची ता.सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली..

या प्रसंगी अमोल रोठे, नितीन तांबे, आकाश गाडेकर, ज्ञानेश्वर तुरकणे,यांनीही अमोल मार्गदर्शन केले..

त्या वेळी उमेश डुबे, शांताराम वाळुंज, सागर घोडके, माउली घोडके,जितेंद्र फाळके,दिपक गाडेकर, रामेश्वर गाडेकर,दिपक आधुडे,सलीम पठाण, सह इ.पदाधिकारी उपस्थित होते..

आमदार प्रा.रमेश पा.बोरनारे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर.

आज चांडगाव, पानव, लाख पानव येथे आमदार प्रा रमेश पा .बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर करून आणलेल्या “2515 योजने अंतर्गत” चांडगाव येथील मारुती मंदीर परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये, पानवी खंडाळा येथे जि.प.शाळा परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये व पानव खु. येथे जि.प. शाळा परिसर पेव्हर ब्लॉक 5 लक्ष रुपये असे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सरयांच्या शुभहस्ते करण्यात आले.
.
तसेच चांडगाव येथील बंधारा पूर्णत:हा भरल्याने आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर*यांच्या शुभहस्ते जलपुजन केले.
.
.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पा गलांडे, तालुका प्रमुख सचिन वाणी, जि प सदस्य मनाजी पा मिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
.
यावेळी उपतालुका प्रमुख मोहन पा साळुंके,विभागप्रमुख प्रकाश मतसागर,अशोक हाडोळे, सुनिल काका कदम, सिताराम पा वैद्य, शंकर कदम, संदीप बोर्डे, तुकाराम आहेर, कैलास शेळके, सतिश खंडांगळे, राजू गायकवाड, कमलेश आंबेकर, रावसाहेब मोटे, राजुभाऊ बावचे, प्रदिप गायकवाड, राजु गलांडे, अशोक पा राहाणे,रमेश गायकवाड, पोंदे साहेब, त्रिंबक पा गायकवाड, गोरख राहणे,माधव बावचे, संदिप पा गायकवाड, वाल्मिक बावचे,अमोल बावचे, प्रकाश बावचे, आहेर सर,डॉ बावचे, नारायण बावचे व सर्व गावकरी उपस्थित होते.