Home Blog Page 607

वैजापूर तालुक्यात जास्त प्रमाणात अतिवृष्टी

0

 

 

प्रतिनिधी वैजापूर

वैजापूर तालुक्यातील शिवूर, वाघाळा, गारज या परीसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीची पाहणी आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर व संबंधित खात्याचे सर्व क्रुषी अधिकारी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.
यावेळी आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडून आपणास योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आश्वासन दिले.

यावेळी उपविभागीय क्रुषी अधीकारी देशमुख साहेब, तहसिलदार निखिल धुळधर साहेब, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, ता क्रुषी अधीकारी कुलकर्णी साहेब, मा सभापती रामहरी बापु जाधव, बबनतात्या जाधव, प्रभाकर जाधव, नंदकुमार जाधव, संतोष दौंगे,अंबदास खोसे, कारभारी आण्णा सरोवर, नरेंद्र सरोवर, या परीसरातील सर्व शेतकरी, पदाधीकारी, शिवसैनिक, क्रुषी सहायक उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक यांचे आमदार संतोषराव बांगर यांच्याकडून स्वागत.

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक मा.श्री.राकेश कलासागर साहेब यांची भेट घेऊन त्यांचे हिंगोली शहरात पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर साहेब, शिवसेना नगरसेवक रामभाऊ कदम, समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे यांची उपस्थिती होती.

हलबीटोला येथे कार्यानुभवातून धानावरील रोगाचे मार्गदर्शन

0

 

सालेकसा,दि.26ः-तालुक्यातील हलबिटोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सडक-अर्जुनी येथील विद्यार्थी मनोज पांडुरंग दमाहे याने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्राम हलबिटोला येथील शेतकऱ्यांना धान पिकावरील विविध रोगांवर मार्गदर्शन केले. यात धानावर मोठ्या प्रमाणात होणारा खोडकिडा, मावा, तुडतुडा व अन्य प्रकारची रोगांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावर कोणत्या प्रकारचे जैविक उपचार तसेच रासायनिक उपचार करता येतात याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही आवर्जून उपस्थित बांधावर उभे राहून माहिती घेतली. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांनाही बराच लाभ मिळतो अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाद्वारे दरवर्षी ग्राम हलबिटोला येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांना विविध रोगांवर माहिती तसेच त्यावर उपचाराबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित केले जावेत अशी मागणी केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. डी. आराम, प्रा. जी.आर. भाजीपाले, प्रा. एन. एन. रामटेके, प्रा. डी. आर. भोसले आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अनारसिंह, सुमित बोरकर आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.

वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे-अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

0

 

शैलेश राजनकार गोंदिया

देवरी,दि.२६ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम दिसून येत आहेत.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे.एकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे वृक्षांची घटती संख्या यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
आज २६ सप्टेबंर रोजी देवरी शहरातील नगरपंचायत क्रिडागंणावर पोलीस विभागाच्या वतीने वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत ७० झांडाचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक कुलकर्णी बोलत होते. यावेळी पोलीस विभागातील देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित कदम, पी.आय.देसुरकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व पोलीस कर्मचार्यांची प्रमुख उपस्थिती होती.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद परिसरात शेतकरी संत्रा मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात तरी या वर्षी आंबिया बहार संत्रा व मृग बहार संत्रा नैसर्गिक वातावरण व्यवस्थित नसल्या मुळे जळगाव जामोद तालुक्यात संत्रा पिकाला बहार आलेला नाही तरी जळगाव जामोद परिसरातील जामोद मंडळ वगळता इतर शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा विमा मिळालेला आहे व जामोद मंडळ यामधील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव व जामोद येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना काल दिनांक 25 सप्टेंबर रोजी निवेदन दिले व तात्काळ संत्रा पिकाचा विमा मिळावा अशी विनंती केली या निवेदनावर रूपालीताई अशोक काळपांडे जिल्हा परिषद सदस्य बुलढाणा जळगाव जामोद पंचायत समितीचे उपसभापती महादेव रामकृष्ण धुर्डे अनंता श्रीराम दामदर जामोद मंगेश सुरेश धुर्डे रामकृष्ण मारोती कळपांडे गणेश गणपत कळपांडे व 30 ते 35 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन

0

 

आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनातून केला केंद्र सरकारचा निषेध.
संपूर्ण शरीराला चिखल लावून व अर्धनग्न होऊन अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत .
शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या सर्व अटी मंजूर झालेल्या विधायकातून वगळण्यात यावा. शेतकरी व कामगार विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी बुलढाणा जिल्ह्यतील मलकापूर तालुक्यात धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले

जनतेस अवाहन करण्यात येते – सुबोध सावजी

0

 

 

 

कोरोना जर थांबवायचा असल्यास कोणत्याही प्रकारचे लहाण मोठे व्यापारी फेरीवाले आपल्या गावात फिरत असताना मास्क न लावता व्यापार करत असल्यास त्यांचे नांव व गावाचे नावासह फोटो पाठवा. व्हाट्सप नम्बर 9527338993 वर पाठवा
आपला कोरोणा योध्दे असा सत्कार करण्यात येईल.
सहकार्याची अपेक्षा
सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा जिल्हा.

शेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगांव (जा) :- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक 25 सप्टेंबर 2020 ला आंदोलन करण्यात आली.त्याच संदर्भाने अखिल भारतीय किसान सभा जळगांव जामोद तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली.सरकारने पारित केलेल्या 3 विधेयकाला किसान सभेचा विरोध असून सरकारने तंबोलतोब हे विधेयक वापीस घ्यावे.सदर अध्यादेश हा शेतकरी,शेतमजूर लोकांना देशोधडीला लावणारा असल्याचे मत किसान सभेची भूमिका आहे.तालुक्यातील शेकडीच्या प्रमाणात शेतकरी लाल झेंड्याखाली एकत्रित झाले होते. मोदी सरकार निक्कमी है! ये सरकार बदलनी है! च्या नाऱ्यानी परिसर दणाणून सोडला होता. मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या यादीतील तांदूळ,धान्य,तेल,बटाटा काढले. त्यामुळे भांडवलदार लोक या धोरणाने प्रचंड साठाबाजी करून भविष्यात जनतेची लूटमार होईल.गोरगरीब जनता अन्नधानच्या कमतरतेचा फटका बसून उपासमारीची वेळ सहन करेल.
कृषी उत्पन्न बाजार समिती हे लहान लहान अडते-व्यापारी जवळपास च्या शेतकरी वर्गाचा माल विकत घेतात.मात्र नवीन विधेयकामुळे लहान शेतकरी भांडवलदार व्यापाऱ्याच्या कचाट्यात सापडून आपला माल बेभाव विकण्यासाठी मजबूर होईल.तसेच कंत्राटी शेती पद्धतीने शेतकरी हा मालक न राहता कंपनी चा गुलाम होईल.देश रसातळाला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे का? अश्या अनेक प्रश्नाला जन्म देणारे हे 3 शेतकरी विधेयक मागे घ्या.ह्यासाठी जळगांव जामोद येथे मोठे आंदोलन पार पडले.या आंदोलनात ग्रामीण भागातील सर्व स्तरातील शेतकरी हजर होते, प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांनी हिराहरीने भाग घेत,मोदी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला.सदर निवेदनावर किसान सभेचे जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड रामेश्वर काळे ,कॉम्रेड विजय पोहनकर, प्रसेनजित दादा विचारमंचाचे अध्यक्ष अजहर देशमुख,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंता बकाल,अभय मारोडे,शिवाजीराव वाघ,कैलास भगत,प्रकाश महल्ले, विलास हिराळकर,प्रकाश सातव ,किसन भैड्या,श्रीराम भैड्या इत्यादी शेतकरी वर्गाच्या शेकडो साह्य आहेत.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील जवान नरेश बडोले शहिद.

0

 

सडकअर्जुनी दि.24: जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील जवान नरेश उमराव बडोले (वय ४९) शहीद झाले आहेत. केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे बडोले यांचे मूळ गाव. २४ एप्रिल १९७१ रोजी जन्मलेले बडोले १९८९ मध्ये सीआरपीएफला रुजू झाले होते. बडगम जिल्ह्यातील छदुरा परिसरात गस्तीवर असताना त्यांच्या पथकावर आज सकाळी पावणे आठच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बडोले यांच्या पथकाच्या दिशेनं अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत बडोले गंभीर जखमी झाले. जखमी बडोले यांची रायफल घेऊन दहशतवाद्यांनी पळ काढला. बडोले यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी प्रमिला, मुली प्रज्ञा,मोनाली, एक बहीण, एक भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव नागपूरला आणण्यात येणार आहे. त्यांचे निवासस्थान वैशाली नगर नागपुर येथे आहे. त्यांच्या शहीद झाल्याची माहिती मिळतात त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यदर्शनासाठी नागपूरला रवाना झाले आहेत.अशी माहिती आहे.

नवेगावबांध येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन,पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम

0

 

डावी कडवी विचारसरणी व नक्षल समस्या निर्मूलनाचा एक भाग म्हणून, नक्षलग्रस्त आदिवासी दुर्गम भागातील नवयुवक युवतींना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळावा. याकरिता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम विश्व पानसरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून, अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी,प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दला अंतर्गत पोलीस ठाणे नवेगाव बांध येथे मिशन पोलीस भरती- 2020 पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 14 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात 80 प्रशिक्षणार्थी युवक युवक मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. संपूर्ण राज्यात व देशात कोरोना वायरस संसर्गजन्य साथ रोगाचा प्रादुर्भावात वाढ झालेली असून, सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे. सुरक्षा व सतर्कता बाळगणे याबाबत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तिच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. ह्या दृष्टिकोनातून, गोंदिया जिल्हा पोलीस दल रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करीत असून, पोलीस व विविध सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोज बुधवार ला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना मैदानी सरावा करिता मोफत स्पोर्ट शूज, ट्रॅक सूट चे वाटप उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी प्रशांत ढोले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे ,डॉ. टंडन वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आपल्या भाषणात, पोलीस भरती करिता लेखी परीक्षेची तयारी कशी करावी. विषयांची विशेषतः गणित व बुद्धिमत्ता, राज्य प्रशासन व सामाजिक चालू घडामोडी या विषयावरील पकड कशी मजबूत करावी. आपले जिल्ह्याची बारीक-सारीक माहितीचे अवलोकन कसे करावे. याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ.टंडन यांनी covid-19 महामार्ग च्या काळात स्वतःचे आरोग्य अबाधित राखीत पोलीस पूर्व प्रशिक्षणाची तयारी कशी करावी. आरोग्य बाबत काळजी कशी घ्यायची. covid-19 संबंधाने सुरक्षा उपाय,सतर्कता व घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच इंजुरी फ्री शारीरिक व्यायाम कसा करावा, वार्म अप व कूलिंग डाऊन, स्वच्छतेचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी योग्य खानपान, डायट, पुरेसी विश्रांती तसेच ताजेतवाने असण्याचा कालावधी याची ओळख करून दिली. स्पर्धा व भरतीची तयारी तसेच उत्कृष्ट अभ्यास व स्वाध्याय कसा करता येईल. याबाबत ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईक पोलीस शिपाई जनार्दन कुसराम यांनी केले.
जागतिक स्वास्थ्य संस्था प्रणित गाईडलाईन, covid-19 आदर्श मानक व सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करून, किट साहित्य वाटप करून, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी प्रशांत ढोले यांच्या हस्ते नक्षत्र वृक्षारोपण पोलीस ठाण्याच्या आवारात करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली