Home Blog Page 608

वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेचे उत्साहात उदघाटन

0

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी -ऋषी जुंधारे

ग्रामीण भागातील विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व काटक असूनही पोलीस व सैनिक भरती मधील बारकावे व शैक्षणिक ज्ञान व अभ्यासाचे तंत्र याबाबत पुरेशा माहिती अभावी विद्यार्थ्यांना परिश्रम करूनही संधी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी नालेगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण व या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मा फौंडेशन औरंगाबाद संचलित सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. यावेळी राजेश भोसले पाटील ( संचालक डिफेन्स करियर ॲकॕडमी औरंगाबाद ) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत गायकवाड (अध्यक्ष विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) हे होते तर प्रमुख अतिथी श्री.वाल्मिक सुरासे (सचिव विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) श्री.मनोज पाटील (अध्यक्ष शिक्षक क्रांती संघटना औरंगाबाद ) ,श्री. विजय द्वारकुंडे ( अध्यक्ष ज्ञानकुंज शिक्षण संस्था औरंगाबाद ) हे होते . कार्यक्रमासाठी महेश उबाळे ( अध्यक्ष चंद्रकला शिक्षण संस्था खांडी पिंपळगाव ), श्री.विजय खेडकर ( मु.अ.भगवान हायस्कुल अजब नगर ) विशाल भैय्या सुरासे (संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) श्री.सुधाकर बन्सोडे, बाजीराव भुतेकर ( प्रशिक्षक इदिरा गांधी सैनिकी शाळा ) द्वारकादास तांबे, श्री .दत्ताञय सुरासे (संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद )श्री. योगेश वैष्णव (पोलिस पाटील नालेगाव ) श्री.मधुकर ञिभुवन,श्री.हजारे बी.एम.(मु.अ.भा.मा.वि.नालेगाव) तसेच भागीरथी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.प्रमोद पठारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.भरत निंबाळकर यांनी केले.

वैष्णवी देवी सायकल ने प्रवास जालना जामवाडी

0

फुलंब्री प्रतिनिधी सागर जैवाळ

वैष्णव देवी च्या दर्शनासाठी व ख्वाजा गरिब नवाज अजमेर ला जाणार्या भावीक भक्त रफीक शेख सुमीत जाधव राजु पागे राहणार कन्हैयानगर यांचा जामवाडी फाटा येथे भास्कररावजी अंबेकर साहेब मित्र मंडाळच्या वतीने आई मल्टीसर्वीसे जामवाडी येथे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थीत बबलु बडदे श्री कृष्ण नगरच चे संरपच सलीम भाई जामवाडी चे काॅग्रेस कार्यक्रते नारायण राव वाढेकर सचीन पाचरणे दत्ता राजकर नंदु वाढेकर प्रतिक जाधव प्रभाकर वाहुळे बाळासाहेब कंकाळ रामनाथ तौर सतिश वाढेकर बिबिशन बडदे गौतम लांडगे खलील भाई लक्ष्मण वाघमारे महाराज हे उपस्थीत होते

औरंगाबाद मध्ये होणार 24 तास कोरोना चाचणी

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

शहरातील कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेने सहा एन्ट्री पॉइंट व मध्यवर्ती व सिडको बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हजारो प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे शहरातील संभाव्य संसर्ग टळला. मात्र सध्या रस्त्यावरील रहदारी व प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून, प्रत्येक वाहन थांबविणे शक्य नसल्यामुळे चाचण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. आता शहरात पाच ठिकाणी चोवीस तास चाचणीची केली जाईल व ११ सेंटरवर सकाळी १० ते सहा यावेळेत चाचण्या केल्या जाणार आहेत.

मात्र आता नागरिक स्वतः होऊन चाचणी करण्यासाठी समोर येत असल्याने टास्क फोर्स बंद करण्यात आले. त्यानंतर आता सिटी एन्ट्री पॉइंटवरील व बसस्थानके, रेल्वेस्टेशनवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहरात पाच ठिकाणी चोवीस तास, तर ११ ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चाचण्या केल्या जाणार आहेत.

ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे म्हणजेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा जाणवणे किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे. नागरिकांसाठी ८९५६३०६००७ या क्रमांकावर मदत उपलब्ध आहे.

इथे असेल २४ तास सेवा

१) सिपेट, चिकलठाणा एमआयडीसी
२) एमजीएम स्पोटर्स कॉम्पलेक्स
३) पदमपुरा अग्निशमन केंद्राशेजारील इमारत
४) एमआयटी मुलांचे वसतीगृह सातारा परिसर
५) समाज कल्याण मुलांचे वसतीगृह किलेअर्क

या ठिकाणी सकाळी १० ते ६ चाचण्या

१) सिडको एन-८ रुग्णालय
२) चिकलठाणा आरोग्य केंद्र
३) बायजीपुरा आरोग्य केंद्र
४) सिडको एन-११ आरोग्य केंद्र
५) आरोग्य केंद्र हर्षनगर-गितानगर
६) आरोग्य केंद्र राजनगर
७) छावणी परिषद रुग्णालय
८) तापडीया मैदान अदालत रोड
९) रिलायन्स मॉल, गजानन महाराज मंदिरासमोर
१०) सिडको एन-२ कम्युनिटी सेंटर
११) प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीनगर

डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात ‘स्वाभिमानी’ने डोणगाव येथे केली शेतकरी विरोधी विधेयकांची होळी..

0

 

डोणगावमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी..
पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते मा.राजू शेट्टी व मा.व्ही.एम.सिंग यांनी दि.25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगावमध्ये पडली आहे.
‘स्वाभिमानी’चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.25 सप्टेंबर) बुलडाणा जिल्ह्यातील नागपूर औरंगाबाद रोडवरील डोणगाव ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या तिन्हीही बिलांची होळी करून या विधेयकांना जोरदार विरोध करण्यात आला. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातुन पळ काढीत आहे. शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्याच्या दारात उभे करीत आहे.असा आरोप डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी केला. तसेच प्रथम शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून घ्या आणि मग त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा..शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे करणाऱ्या केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल….! असा इशारा त्यांनी यावेळी दिला..
यावेळी ‘स्वाभिमानी’चे पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल,वि.आघाडीचे ता.अ.अमोल धोटे,निलेश सदावर्ते,गौतम सदावर्ते, यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

लोणी येथे भूमीपुत्राच्या शाखेचे उदघाटन

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

दिनांक २४/०९/२०२० रोजी लोणी येथे भूमिपुत्र च्या शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मंचावर कार्यक्रम चे अध्यक्ष मा. विजयराव गाडे सं. कृ. उ. बा. स. रिसोड कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री . विष्णुपंत भुतेकर साहेब संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना म. राज्य प्रमुख उपस्थिती राम पाटील बोरकर जिल्हाध्यक्ष युवक भूमिपुत्र शेतकरी संघटना वाशिम राहुल डांगे शहर अध्यक्ष रिसोड मयूर हिवाळे विध्यार्थी आघाडी रिसोड रवि चोपडे प्रमुख मार्गदर्शक पंजाब नरवाडे गौरखनाथ पचारने तान्हाजी गाडे लोणीचे सरपंच अरविंद गाडे सदस्य
राहुल डांगे मयुर हिवाळेगणेश माने मंगेश ठोके विजय पाटील महादेव खंडारे विष्णू पानकनेरगाव भगवान पाटील रवी गाडे राजू गाडे प्रवीण जावळे गणेश कंगणे संतोष सोनुने दीपक गाडे सचिन गाडे शिवम सोनुने शुभम कोकाटे तान्हाजी गाडे प्रवीण गाडे गणेश सोनुने सदानंद गाडे शिवाजी गाडे टेजराव गाडे शंकर गाडे केईलाश गाडे योगेश गाडे रवी गाडे प्रदीप गाडे वेईभव गाडे ओम निकस शंकर पोटरे सुनील पोटरे गजानन गाडे भारत गाडे विजय गाडे कुमार हाडे गणेश जयभाई विषवनाथ गाडे सोनुने दीपक गाडे सचिन गाडे शिवम सोनुने शुभम कोकाटे तान्हाजी गाडे प्रवीण गाडे गणेश सोनुने सदानंद गाडे शिवाजी गाडे टेजराव गाडे शंकर गाडे केईलाश गाडे योगेश गाडे रवी गाडे प्रदीप गाडे वेईभव गाडे ओम निकस शंकर पोटरे सुनील पोटरे गजानन गाडे भारत गाडे विजय गाडे कुमार हाडे गणेश जयभाई विषवनाथ गाडे
यांच्या उपस्थितीत लोणी येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची शाखा ओपन करण्यात आली व काही पदभार सुद्धा देण्यात आले यावेळी लोणी जी. प. स. अध्यक्ष पदी समाधान गाडे तर शाखा अध्यक्ष पदी रवी गाडे तर शाखा उपाध्यक्ष पदी प्रदीप गाडे व मयूर हिवाळे याची विध्यार्थी आघाडीच्या ता. अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .

सलग चौथ्या दिवशीही उपोषण चालूच

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दि 22 सप्टेंबर पासून अतिक्रिमित टपऱ्या काढाव्या ही मागणी रेटून धरत सूनगाव येथील मोहनसिंह राजपूत व इतर चार यांचे ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस उजळला आहे टपरी धारकांना ग्रामपंचायत मासिक सभा 20 ऑगस्ट च्या ठरावानुसार नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली आहे व नंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे प्रकरण ग्रामपंचायत येथे प्रशासक रुजू झाल्यानंतर प्रशासक यांचेकडे आल्यानंतर त्यांनीसुद्धा संबंधित टपरी धारकांना दुसरी नोटीस बजावली आहे व नंतर ही प्रक्रिया ग्रामपंचायत प्रशासनाकडून थांबविली गेली आहे व ती प्रक्रिया पूर्ण करावी वरिष्ठ अधिकारी व प्रशासन यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी रेटून धरत उपोषण कर्त्यांनी आज सलग चौथ्या दिवशीही आपले उपोषण ग्रामपंचायत सूनगाव समोर चालूच ठेवले आहे

मास्क न लावणाऱ्यांना बसणार ५०० रुपये दंड

0

 

गोंदिया: जिल्ह्यात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक पावले उचला, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. तसेच मास्क न घालता घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता २०० ऐवजी ५०० रुपये दंड करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हर रेट फार कमी आहे. यासाठी टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही तर त्यांच्यावर आता 500 रुपये दंड आकारण्यात यावा. कोविड-19 संसर्गापासून स्वत:ला व आपल्या कुटूंबाला वाचविण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी किमान दोन मीटरचे शारिरीक अंतर राखून नियमाचे पालन करा. हात वारंवार धुवा. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी उदा. प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार स्पर्श करणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असल्यास दररोज तापमान मोजावे. डॉक्टरांकडून नियमीत तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल, आरोग्यमंत्री राजेश टोपे,आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहेषराम कोरोटे, राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खासदार डॉ.खुलाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,उपजिल्हाधिकारी राहुल खांदेभराड,जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, डॉ.हिंमत मेश्राम, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर उपस्थित होते.

आज वैजापूर शहराचे जिवणदायणी नांरगी-सांरगी धरणातून

0

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे

आमदार_श्री_वाणी_साहेब यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले व वैजापूर नगरीच्या प्रथम नागरिक वैजापूर नगरपरीषदचा नगराध्यक्षा सौ_शिल्पा_ताई_दिनेश_परदेशी यानी धरणाचे इलेक्ट्रिक मोटरचे बटण दाबून दरवाजातून पाणी सोडण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष  श्री_बाळासाहेब_संचेती, श्री प्रशांत वनगुजरे, पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णी साहेब, श्री विशाल शेठ संचेती, शिवसेना तालुका अध्यक्ष नगरसेवक श्री बंडू वाणी, वैजापूर भाजपचे शहर अध्यक्ष श्री भूषण राजे निंबाळकर, श्री नगरसेवक बजरंग मगर, नगरसेवक श्री गणेश खैरे, नगरसेवक श्री दिनेश राजपूत, नगरसेवक श्री पारस शेठ घाटे, नगरसेवक श्री स्वप्नील जेजूरकर, श्री नगरसेवक श्री ज्ञानेश्वर माऊली टेके नगरसेवक इम्रान कुरेशी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्याच्या सूचना बीडीओ इनामदार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या निदैस

0

 

शैलेश राजनकर गोंदिया

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी भरल्यामुळे बरेच लोक घरातून बेघर झाले होते. अशा परिस्थितीत बीडीओ इनामदार यांनी त्यांच्याकडे राहण्याचे कायमस्वरूपी घर नसल्याने अनेक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. घरकुल योजनेच्या तातडीने होणा benefit्या नुकसानीची माहिती म्हणून त्यांनी तहसीलदार गोंदिया यांना त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने पंचनामासाठी उपस्थित राहण्यास सांगितले. आणि प्रत्येक गरजूंना पक्के घर देण्याचे आश्वासन दिले. ते विचारात घेत बीडीओ इनामदार यांनी कनिष्ठ अभियंता बैठक बोलावून सर्वांना प्रत्येक गरजूंना पक्की घर देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आणि ज्यांची घरे पूर्ण झाली आहेत अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा हप्ता तातडीने भरल्यामुळे अपूर्ण धरणे झाली असून पुढील हप्त्याबाबत त्यांनी सूचनाही दिल्या. बीडीओ इनामदार म्हणाले की, सरकारची योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू

0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातुर :-
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे अनेक तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप पिकाचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे शेतजमिनीचे व इतर पिकाचे नुकसान झाले आहेत प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व जनतेला दिलासा द्यावा. असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण व कामगार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना बच्चू कडू यांनी दिले आहे गेल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झालेले आहेत मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात आलेल्या पावसामुळे नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पालक मंत्री आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुंबई येथून संपर्क करून आढावा घेतला यावेळी झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावाबरोबरच जिल्ह्यातील इतर ठिकाणांची ही खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मूग उडीद, ज्वारी, मका, तूर, कापूस, ऊस, व इतर पिकांची नासाडी झाली आहे पातुर तालुक्यातील गावाचे नावे पिंपळडोळी, चारमोळी , पांडुरणा, चरणगाव ,अंबाशी , चोंडी , सावरगाव ,झंरण्डी, चतारी, पिंपळखुटा , चानी, उमरा, अडगाव, राहेर, भागात केळी पिकाचे ही नुकसान झाले आहे.याशिवाय काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे तसे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आहे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शेटे ,यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केले अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात यावा असा निर्देशही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना दिले हवामान खात्याने जिल्ह्यात शनिवार पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने पुढे काही दिवस पाटबंधारे विभाग तसेच नागरिक शेतकरी व प्रशासनानेही या काळात दक्षता घ्यावी असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे