Home Blog Page 647

मनब्दा येथे दोन वृध्द शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथिल शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृध्द शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ची घटना शुक्रवार ४संप्टेबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास घडली पांडुरंग अमृता पाथ्रीकर वय ७०व रामकृष्ण संपत शिखरे वय ७४अशी मृतकाचे नावे आहेत मनब्दा येथिल पांडुरंग पार्थिकर व रामकृष्ण शिखरे हे दोघेही मित्र असुन ते नेहमी सोबत राहायचे शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खराबे यांच्या शेतात अंबाडी ची भाजी आणायला गेले होते तेथे विहीर जवळ च्या विजेच्या विघुत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी यांनी शेतात धाव घेतली दोघेचेही मृतदेह विहीर जवळ पडलेले आढळुन आले तेल्हारा पोलिस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठविण्यात आले या घटनेमुळे मनब्दा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

रियाची घरी NCB, सर्च ऑपरेशन सुरु, मिरांडाला घेतले ताब्यात

 

मुंबई, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर आता रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

सॅम्युल मिरांडाविरोधात NCB टीमकडे पुरावे असल्यानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर रिया आणि शोविकला अटक होणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी NCBकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड(रेल्वे)येथील दोन युवकांचा साकोली तालुक्यातील शिवणीबांध तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना

 

शैलेश राजनकर प्रतिनिधि

(दि.3 सप्टेंबर)ला घडली.सदर युवक हे पोहण्यासाठी त्या तलावात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.मृतामध्ये सौंदड निवासी नितेश धनिराम सूर्यवंशी(वय 20) व श्रीरामनगर रहिवासी अमर शामराव कुंभारे(वय 20)या मुलाचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी तलावावर एकच गर्दी केली होती.ते बुडत असल्याचे दिसताच त्याठिकाणी हजर असेलल्या स्थानिकांच्या सहकार्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.हे दोन्ही युवक आयटीआयचे शिक्षण घेत होते.तब्बल दहा वर्षानंतर शिवनीबांध जलाशय भरल्याने पर्यटकांची सध्या त्याठिकाणी मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.त्यातच पोहण्याचा आनंद घेण्यासाठीही युवक तिथे जाऊ लागले आहेत.

बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन ची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…

 

जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख सचिव युवराज वाघ तर कार्याध्यक्ष फहिम देशमुख….

खामगाव – पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 12 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे
असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला , यावेळी असोसिएशन ची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी वसीम शेख, सचिव पदी युवराज वाघ, तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी फहिम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलपणे – जिल्हा उपाध्यक्ष संदिप वानखडे, गोपाल तुपकर, जिल्हा समन्वयक कासिम शेख, संदिप सावजी, जिल्हा संघटक देवीदास खनपटे, राजेश वाढे, कोषाध्यक्ष दिपक मोर, राजेश बाठे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमूख नितीन कानडजे पाटील, अनिलसिंघ चव्हाण,सोशल मिडिया प्रमूख संदिप मापारी, सुरज देशमुख,आंदोलन समिती प्रमुख मुबारक खान, गजानन काळुसे, आरोग्य समिती प्रमुख संतोष मालोसे, महेंद्र मिश्रा, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती योगेश शर्मा, गौरव खरे,

जिल्हा प्रवक्तापदी – अमोल गावंडे, श्रीधर ढगे पाटील, संदिप शुक्ला, गणेश सोळंकी, इश्वरसिंग ठाकुर,

जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी – मोहम्मद फारुक,अमोल सराफ , विनोद वानखडे,सिद्धार्थ गावंडे,सागर झनके, संजय दांडगे, देवानंद सानप, किशोर सोनोने, सुनिल मोरे, विजय हिवराळे, शिवाजी भोसले, जका खान, कुणाल देशपांडे,

तालुका समन्वयक पदी – शेगाव – राजवर्धन शेगावकर , संग्रामपुर – शाम वाघ, जळगाव – जामोद गणेश गिर्हे , नांदुरा – संतोष तायडे , मलकापुर – समाधान सुरवाडे , मोताळा – गोपाल काटे, बुलडाणा – निलेश राऊत, चिखली – संदिप सावळे, देऊळगाव राजा – विलास जगताप, सिंदखेडराजा – महेंद्र मोरे, लोणार – सागर पनाड, मेहकर – रमेश चव्हाण, खामगाव – निखिल शहा. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी अनिल भगत,शिवदास सोनोने,गणेश भड, विलास बोडखे,आदेश कांडेलकर, गोपाल अवचार ,शिवाजी भोसले,राहुल गवई यांच्यासह आदींची उपस्थिती होती अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील यांनी दिली

एक स्पॉट व सोन्यासारख कुटुंब उध्वस्त

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

(कोल्हापूर) : एक स्पोट व सर्व संसार उध्वस्त गॅस हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहीत असूनही निष्काळजीपणाने रेग्युलेटर सुरू ठेवल्याने उडालेल्या भडक्‍यात दोघांच्या मृत्यूस आणि दोघांच्या गंभीर जखमी होण्याला कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांत एकावर गुन्हा दाखल केला. उमेश वसंत मोहिते (वय ३५, मांडेकर गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, ११ ऑगस्टला मोहिते याच्या घरी सत्यनारायण पूजा व आंबील कार्यक्रम होता. यानिमित्त मोहिते याने शेजारच्या दीपक बामणे यांच्या घरातील सोप्यात जेवण केले होते. त्यासाठी गॅस शेगड्या आणि सिलिंडर आणले होते. जेवण केल्यानंतर मोहिते याने भांडी, शेगडी आणि सिलिंडर तेथेच ठेवले.
रात्री जेवण गरम केले. त्यानंतर मोहिते याने रेग्युलेटर बंद केले नव्हते. त्याच दिवशी रात्री गॅस गळती होऊन पणतीमुळे गॅसचा भडका उडाला. त्यात दीपक बामणे (वय ४९), पत्नी सौ. संगीता, मुली उत्कर्षा आणि आरती हे चौघेही गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आधी दीपक यांचा तर, काही दिवसांनी उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. गॅस हा स्फोटक व ज्वलनशील असल्याची कल्पना असूनही त्याच्या हाताळणीत हयगय आणि निष्काळजीपणा करून दोघांच्या मृत्यूस आणि गंभीर जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिस हवालदार पी. बी. गोजारे यांनी संशयीत मोहिते याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद करीत आहेत.

दरम्यान, गॅसच्या भडक्‍यात पती-पत्नीसह दोन मुली भाजून गंभीर जखमी झाल्या. पती आणि मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. पत्नीचीही प्रकृती गंभीर आहे. पाच वर्षांची मुलगी ३० टक्के भाजली आहे. पत्नी व मुलगी घरीच आहेत. आर्थिक स्थितीअभावी पुढील उपचाराला अडचण आल्याचे कळताच तपासकामी कुटुंबाच्या घरी गेलेली खाकी वर्दी गहिवरली अन्‌ त्या मुलीला वर्गणी काढून खासगी दवाखान्यात दाखल केले.

हे पण वाचा – ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला

गडहिंग्लज पोलिसांनी दाखवलेली माणुसकी प्रेरणादायी आहे. मांडेकर गल्लीतील दीपक बामणे यांच्या घरी ११ ऑगस्टला गॅसचा भडका उडाला. त्यात स्वत: दीपक, पत्नी संगीता आणि उत्कर्षा व आरती या दोन मुली भाजून जखमी झाल्या. उपचार सुरू असताना दीपक व उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू होते.

हे पण वाचा – धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार

दरम्यान, तपासकामी गडहिंग्लजचे पोलिस बामणे कुटुंबीयांच्या घरी गेले. संगीता व आरती यांची स्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढून आरतीला दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.

बिडीओ भरत चव्हाण यांनी स्वीकारला ग्रामपंचायत सिरसोली चा प्रशासक म्हणून पदभार

 

अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे

 

सिरसोली तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील ग्रामपंचायत ची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे प्रशासक पदावर प्रभारी गटविकास अधिकारी भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसोली चा पदभार स्वीकारला त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता अढाऊ पंचायत समिती सभापती रफत सुलताना पंचायत समिती सदस्य मो इद्रीस प स संजय हिवराळे ग्रामसेवक गजानन मेतकर रतन दांडगे सरपंच सौ सरिता प्रशांत काईंगे उपसरपंच विजय वाघ ग्रामपंचायत सदस्य अहमद शहा सादिक पटेल राजू पाटील गावंडे विजय भारसाकडे इरफान अली पत्रकार विनोद सगणे ग्रा प कर्मचारी शंकर अनासने नागसेन भारसाकडे दीपक वानखडे जिल्हा परिषद मुख्याध्यापक सौ सुनंदा गावंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते पाच वर्षातील समस्या ग्रामस्थांनी प्रशाषकापुढे मांडून ते कशा प्रकारे मार्गी लागतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे

वाशिम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करा भूमिपुत्र संघटनेची मागणी

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी भूमिपुत्रचा रास्ता रोको
वाशीम : रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असतांना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  बंद केलेले काम पूर्ववत सुरु करून तात्काळ सुरु करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात  गुरवार ता. ३ सप्टेंबर रोजी आसेगाव-कोयाळी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले .
नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने रिसोड ते वाशीम ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नियमित ये जा करणाऱ्या अनेकांना मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे तर वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हे रखडलेले रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करावे, खोदून पडलेल्या रस्त्याकडे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, व काम चालू असतांना पर्यायी मार्ग व्यवस्थित ठेवण्याची जबादारी निश्चित करण्यात यावी. या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
*विलंब होत यासल्याची अधिकाऱ्यांची कबुली*
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही एम देशमुख यांनी बांधकामात दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याची कबुली यावेळी दिली
आंदोलनासाठी भूमीपुत्रचे राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशीम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, मालेगाव तालुकाध्यक्ष नागेश इंगोले, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर बोरकर, ग्यानदेव भुतेकर, गजानन पोफळे, सचिन काकडे, रवी जाधव, पवन खोंडकर, विष्णू सरकरटे, संतोष खरात, महावीर सिंग ठाकूर, दत्तराव खानझोडे, शिवाजी कढणे, राजू डांगे, अमोल बाजाड, अर्जुनराव तुरूकमाणे, सतिष गंगावणे, शत्रूघन अवचार, बंडू जाधव, बंडू अवचार, जगदिश अवचार, गजानन सयाजी आरु, बालाजी बोरकर, राम अवचार, ज्ञानेश्वर वाघ, विठ्ठल अवचार, संतोः अवचार, रवी अवचार, विशाल मापारी, शंकर गिर्हे, आयजी बोडे, सुनील शिंदे , गजानन वाघ बाळासाहेब बोडखे मदन बोडखे
अभिषेक देशमुख,राहुल डांगे,ऋषिकेश देशमुख,उमेश राईटकर,रवी गाडे,समाधान गाडे,सचिन गाडे,गणेश माने,मयुर हिवाळे,ज्ञानेश्वर कांबळे,अमोल डांगे,संतोष पाटील,शुभम कदम,समाधान खळबर,अभिषेक कोरडे,पवन खोडके,वैभव कांबळे
,विश्वास चव्हाण,भगवान राऊत,अविनाश पाटील,महादेव पाटील,विष्णू मुंडे,आशिष चोपडे,भगवान पाटील,गोरख डांगे,शिवराज खिराडे,विकास खानखेडे,धर्मपाल वाकळे,मदन बोडखे,बाळासाहेब बोडखे
अजय बोडके यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

हिवरखेड पोलीस स्टेशनचा कार्यभार पूर्ववत सुरु

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

काही दिवस अगोदर हिवरखेड येथील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले होते. येथील कामकाज तेल्हारा पोलिस ठाण्यातून सुरु होते.
हिवरखेड परिसरातील नागरिकांना पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड वरुन तेल्हारा येथे खराब रस्त्याने येने-जाने हे तारेवरची कसरत करण्या बरोबर होती. परंतु आता हिवरखेड पोलीस स्टेशन दिनांक 1 सप्टेंबर मंगळवार सायंकाळ पासून पूर्ववत सुरु करण्यात आलेले आहे तरी हिवरखेड आणि हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील नागरिकांनी कुठलीही पोलीस तक्रार करायची असल्यास हिवरखेड पोलिस स्टेशन येथे निसंकोच तक्रार करावी असे आवाहन ठाणेदार आशिष लवंगळे यांनी केले आहे.

कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम 

 

 

 

मुंबई प्रतिनिधी (महेश कदम)

 

कोरोना चा कालावधीत व गणेशोत्सवात सथानिक लोकांना अडचणी न येऊ म्हणुन माननीय आमदार कार्यसम्राट श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले विविध उपक्रम

दादर पश्चिम भागातील सेनापती बापट मार्ग, भवानी शंकर रोड, काका साहेब गाडगीळ मार्ग या ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडे असल्याने नागरिकांना रहदारी करताना त्रास होत असल्याच्या तक्रारी नुसार खड्डे लवकरात लवकर बुजविण्या साठी स्थानिक आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्फत महानगरपालिका
अधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीनुसार गणेशोत्सव कालावधीत श्री. गणेश विसर्जन सोहळ्या अगोदर पाठपुरावा करुन सदर मार्गावरील खड्डे महानगरपालिका चे कर्मचारीं कडुन बुजवून घेण्यात आले.

तसेच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रतेक मंडळा मध्ये कोरोना चा वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन सेनिटायजर वाटप करण्यात आले  अनंत चतुर्दशीला श्री गणेश विसर्जनानिमित्त पोलीस बांधवांसाठी उभारण्यात आलेले दादर कीर्ती कॉलेज तसेच सी-5 माहीम चौपाटी येथील मनोर्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जल-जीव सुरक्षा रक्षकांना मदत करण्याता आले. व परेल भोईवाडा येथे सदाकांत ढवण मैदानात श्री. गणेश मुर्ती विसर्जनासाठी होणारी लोकांची गर्दी पाहता प्रतेक विभागात कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते.

ह्यात श्री. जितेंद्र कांबळे साहेब यांची विशेष मेहनत असुन त्यांचा सह ॠषिकेश शिखरे, योगेश अहिरे संदीप तिवरेकर, संतोष शिंदे, राजेश जाधव, आदर्श दुबे, शैलेश यादव, विजय डगरे, अजित वैगुडे, संदिप बनसोडे, ज्ञानेश्वर मोरे, पार्थ बावकर यांचे अमुल्य सहकार्य लाभले.

अमिताभ बच्चन कुटुंबात आली नवी पाहुनी,,,, कोन आहे है पाहुनी

 

मुंबई : अमिताभ बच्चन साधारण काही महिन्याभरापूर्वीच बच्चन कुटुबीयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर चाहत्यांमध्ये बरंच चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. योग्य वेळी याचं निदान झाल्यामुळं बच्चन कुटुंबीयांनी त्यावरील उपचार घेत कोरोनावर मात केली.

हळूहळू का असेना, पण अखेर हे सेलिब्रिची कुटुंब पुन्हा एकदा रुग्णालयातून घरी परतलं. आता तर बच्चन कुटुंबीयांनी त्यांच्या कामासही सुरुवात केली आहे. कुटुंबातील विविध समारंभांपासून ते अगदी एखाद्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणापर्य़ंत त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
अशा या सेलिब्रिटी कुटुंबामध्ये आता एका नव्या पाहुणीची एंट्री झाली आहे.

 

आता तुम्ही म्हणाल नेमकं या कुटुंबात नव्यानं आलं तरी कोण? छायाचित्रकार आणि नेटकऱ्यांचंही लक्ष वेधणारी बच्च कुटुटंबातील ही नवी पाहुणी म्हणजे त्यांच्या कारच्या ताफ्यातील एक नवं मॉडेल. बिग बींनी नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही लक्झरी कार खरेदी केली आहे.
नव्या कारची नंबर प्लेट पाहिली असता एक बाब लक्षात येते की त्यावर असणाऱ्या आकड्यांची बेरीज केली असता मिळणारं उत्तर आहे ११. हा आकडा म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची तारीख आणि अर्थातच त्यांचा शुभअंक. बच्चन कुटुंबातील या नव्या कारची किंमत १ कोटी ३८ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर सध्या बच्चन कुटुंबातील याच नव्या पाहुणीची चर्चा सुरु आहे.