Home Blog Page 69

स्वाभिमानीच्या प्रचारासाठी ताकतीने कामाला लागा नियोजन बैठकीत कार्यकर्तांचा एकमुखी निर्णय. २८ ऑक्टोबरला प्रशांत डिक्करांचा होणार नामांकन अर्ज दाखल.(prashantdikkar)

0

 

prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला बचत गट,व युवकांच्या प्रश्नावर केलेल्या १६ वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एंट्री केल्याने विरोधक चांगलेच धास्तावले आहेत.

याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित मतदार संघातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष उज्वल पाटिल चोपडे यांच्या सुचनेनुसार संग्रामपूर येथिल रेणुका माता मंदिर परिसरात दणकेबाज बैठक पार पडली.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यावेळी सर्वांचे मत ऐकून घेण्यात आले त्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांना प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. २० वर्ष गोरगरिबांचे रक्त पिऊन सत्तेची मस्ती घेऊन पैशाच्या जोरावर निवडणुकीच्या रणभूमीवर लढाईसाठी उतरलेला शेतकरी विरोधी उमेदवारांना चितपट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा अशा सुचना देण्यात आल्या.

परिस्थितीवर मात करण्यासाठी एक नोट एक वोट या पध्दतीने लोकवर्गणीतून चंदा जमा करून निवडणुकीसाठी लागणारी सामुग्रीवर खर्च करु असा निर्णय घेण्यात आला. या होणाऱ्या खर्चासाठी कार्यकर्त्यांच्या निवडक समित्या गठीत करण्यात आल्या. मतदान पेटी बंद होई पर्यंत प्रचार संबंधित सर्व जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना वाटुन देण्यात आल्या.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच सोमवार दि २८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. जळगाव मतदार संघातील जणतेला २० वर्षाच्या वनवासातुन मुक्त करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांच्या रुपाने मतदार संघातील अहोरात्र शेतात राबणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत निरोप पोहचवा.कष्टकरी मायबाप जणतेला ही चांगली संधी मिळाली आहे.

prashantdikkar:या संधिचे सोने करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असा विश्वास देण्यासाठी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा अशी शिस्तबद्ध निवडणुक नियोजनाची बैठक पार पडली या बैठकीला मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन ( Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- मुलींच्या आरोग्य, सुरक्षा आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये एकलव्य आदिवासी आश्रम शाळेच्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा मुख्य उद्देश “वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व” आणि “गुड टच आणि बॅड टच” यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागरूक करणे हा होता. सत्रांचे नेतृत्व प्रसिद्ध समुपदेशक रोटेरियन अर्चना झाल्टे यांनी केले.

शिबिराची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेवर प्रेरणादायी सत्राने झाली, जिथे रोटेरियन अर्चना झाल्टे यांनी किशोरवयात स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थिनींना स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठी व्यावहारिक सूचना दिल्या, ज्यात मासिक पाळीच्या स्वच्छतेचे व्यवस्थापन देखील समाविष्ट होते, जेणेकरून मुली त्यांच्या दिनचर्येत आरोग्यदायी सवयींचा समावेश करू शकतील.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

दुसऱ्या सत्रात “गुड टच आणि बॅड टच” या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. रोटेरियन अर्चना झाल्टे यांनी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मुलींना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श कसा ओळखावा हे समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना असुरक्षित परिस्थितीत काय करावे आणि मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा याबद्दल माहिती दिली. या सत्राने विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेबाबत जागरूक आणि आत्मनिर्भर होण्यास मदत केली.

ज्या तरुण मुली चुकीच्या मार्गावर जाण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी रोटेरियन अर्चना झाल्टे यांनी सांगितले, “तुम्ही तुमच्या पालकांचे आणि कुटुंबाचे प्रेम विसरून चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ नका. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, तुम्हाला योग्य दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. शिक्षण तुमचा आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता वाढविण्यात मदत करू शकते.

https://youtu.be/Zq0f4nW8Fz0?si=Tg-Sb52HHvTL74ft

म्हणून, तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी धैर्य आणि विश्वासाने पुढे जा.” या समुपदेशनाने विद्यार्थिनींना प्रेरणा दिली की त्यांनी त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि योग्य निर्णय घ्यावा.

रोटरी क्लबचे अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी या प्रसंगी रोटरी क्लबच्या विद्यार्थी कल्याणासाठी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की क्लब विविध आरोग्य शिबिरं आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. “रोटरीमध्ये, आम्ही मानतो की विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्या समुदायाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक आहे.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रणीत अनसाने, सचिव अपर्णा अनसाने, आणि शाळेच्या प्राचार्या वीणा नर्सापुरकर उपस्थित होत्या. रोटरी क्लबचे सचिव उदय शेंडे आणि उदय भोकरें यांच्या उपस्थितीमुळे या एकत्रित प्रयत्नांना अधिक बळ मिळाले, ज्यामुळे विद्यार्थिनींच्या कल्याण आणि सुरक्षेबाबत समाजाची कटिबद्धता अधिक दृढ झाली.

Hingnghat:या शिबिराचे सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी कौतुक केले, आणि रोटरी क्लब हिंगणघाटच्या या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे समर्थन केले. क्लबने वचन दिले आहे की तो विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत राहील आणि तरुणांना शिक्षित आणि सशक्त करण्याच्या दिशेने सातत्याने कार्य करत राहील.

स्वाभिमानीच्या निवडणुक नियोजन बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित रहा. जिल्हाध्यक्ष उज्जल पाटील चोपडे(Vidhansabha)

0

 

Vidhansabha:संग्रामपूर/स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा मा.खासदार राजु शेट्टी यांनी प्रशांत डिक्कर यांची जळगाव जा विधानसभा जागेवर महाराष्ट्रातुन पहिली उमेदवारी जाहिर करित हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी चांगलीच प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयटीआयच्या बाजुला रेणुका माता मंदिर जळगाव रोड संग्रामपूर येथे दुपारी १ वाजता कार्यकर्त्यांची निवडणुक नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तुलनेत ईतर पक्षाकडे नेते मंडळींनी कार्यकर्ताच जिवंत ठेवला नसल्याने सध्याच्या घडीला मोजकेच नेते व ठेकेदार सोडले.

पीक विम्याची ऑनलाइन तक्रार करून जवळपास एक महिना पूर्ण होत आहे तरीसुद्धा अजून सर्वे झालेला नाही(farmer)

तर निवडणुकीच्या प्रचारासाठी मजुरीने माणसं लावायची की काय अशी परिस्थिती राजकीय पक्षात निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी जळगाव मतदार संघातील शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, विद्यार्थी,व बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर १६ वर्षांपासून लढा देत असल्याने या लढ्याच्या माध्यमातून मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली आहे.

सर्वच घटकांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनाने कष्टकरी जणतेचा फायदा झाला असल्याने जनसामान्यांचा प्रशांत डिक्कर जीव की प्राण झाला आहे. प्रशांत डिक्कर यांचेसाठी काही पण अशा हजारो कार्यकर्त्यांनी जीव ओवाळून टाकला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे गोर गरीब कष्टकरी जणतेचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांना विधानसभा सभागृहात पाठवण्यासाठी गावा गावात निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने केलेल्या तयारीचा आढावा व पुढील निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेली बैठक अतिमहत्त्वाची आहे.

Vidhansabha :-या बैठकीला संघटनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सरपंच-सदस्य,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी संग्रामपूर येथे दुपारी १ वाजता आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पीक विम्याची ऑनलाइन तक्रार करून जवळपास एक महिना पूर्ण होत आहे तरीसुद्धा अजून सर्वे झालेला नाही(farmer)

0

 

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

farmer:पिक विमा कंपनीने सर्वे न केल्यास आचारसंहितेमध्ये आंदोलन करण्याचा इशारा श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये

मागील वर्षी खरीप आणि रब्बी पिकाचा अद्याप पिक विमा मिळाला नाही अनेक वेळा उपोषण ,मोर्चे ,जलसमाधी आत्मदहन असे अनेक प्रकारे आंदोलन केले तरी सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्याला अद्यापिक विमा मिळून दिला नाही अशातच पुन्हा शेतकऱ्यापुढे नवे संकट उभे राहिले .

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यावर्षी 2024 चा सिंदखेड राजा मतदार संघामध्ये शेतकऱ्यांनी परत पीक विमा खरीपचा भरला असून पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून पिक विमा ऑनलाईन तक्रार केली असता सुद्धा आज पर्यंत एक महिना होऊन सुद्धा शेतकऱ्यांची पिक विम्याचा सर्वे झाला नाही असंच चालू राहिलं तर शेतकऱ्याला याही वर्षी पिक विमा मिळणार नाही असे चित्र दिसत आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

म्हणून या संपूर्ण सिंदखेड राजा मतदार संघातील सर्व नेतेमंडळी सध्या आपल्याला आमदारकीचे तिकीट कोण्या पक्षातून मिळेल याकडे त्यांचे सर्वांचे लक्ष लागले आहे या मतदारसंघांमध्ये जवळपास मतदार 80 टक्के मतदार हा शेतकरी असून या शेतकऱ्याकडे या नेत्यांचे लक्ष नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मताकडे सुद्धा नेत्यांनी अपेक्षा ठेवू नये

farmer:कारण आमच्या पिक विमा बद्दल आणि शेतकऱ्याच्या मागण्याबद्दल जर तुम्हाला बोलायचं नसेल तर
पिक विमा कंपनी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांनी जर या शेतकऱ्यांचा पिक विमा ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यां च्या पिकाचा जर सर्वे झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये परत पुन्हा आंदोलन उभं करू आचारसंहिता गेली खड्ड्यात पण पहिलं प्राधान्य शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे द्या असा इशारा या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वय श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिला

हिंगणघाटमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत ‘ब्यूटी एक्स्पो’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आयोजित हिरकणी बिझनेस अवॉर्ड्स आणि ब्यूटी एक्स्पो मोठया उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कनक यूनिक ब्यूटी पार्लरच्या व्यावस्थापक मीना सोनटक्के यांनी केले, तर ब्यूटी डे टू डेस प्रदीप मारोटकर यांनी याचे संचलन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे* उपस्थित होत्या.ज्यांनी आपल्या साधेपणा आणि व्यक्तिमत्त्वाने सर्वांची मने जिंकली.

‌कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.स्वाती अतुल वांदिले, मीना सोनटक्के ,प्रदीप मारोटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या एक्स्पोमध्ये आपली उपस्थिती दर्शवली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

या कार्यक्रमात आशू ग्लॅम मेकर, शेल्बी मेकअप आर्टिस्ट, अंजली भांदक्कर, रुतुजा मेकअप स्टुडिओने आपल्या सत्रांमध्ये ब्युटी आणि मेकअपशी संबंधित नव्या तंत्रज्ञान आणि ट्रेंड्सवर चर्चा केली आणि उपस्थित व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात बॅकस्टेज मेकअप, मेहंदी आणि हेअरकट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते,

यामध्ये ६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग आपली कला सादर केली आणि परीक्षकांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. त्यानंतर “मी अँड मॉम” फॅशन शो आणि मॉडेल हंटने प्रेक्षकांची मने जिंकली, ज्यात आई-मुलींच्या जोड्यांनी फॅशनसोबत आपली कला आणि कौशल्य सादर केली. या स्पर्धेने कार्यक्रमात एक वेगळा रंग भरला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, ज्यामध्ये सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी सर्व स्पर्धक आणि आयोजकांचे कौतुक केले आणि असे कार्यक्रम स्थानिक प्रतिभांना एक व्यासपीठ देऊन महिलांच्या सक्षमीकरणात महत्त्वाचे योगदान देतात, असे मत व्यक्त केले.

Hingnghat:कार्यक्रम यशस्वीतेसाठी रितेश सोनटक्के, प्रीतम गुप्ता, कनक सोनटक्के, एंजल सोनटक्के, राहुल डेविड, लीना शेंडे, चांद जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.हिंगणघाटमधील या ब्यूटी एक्स्पो आणि सेमिनारने नवी दिशा दिली असून, आयोजकांनी या यशस्वी कार्यक्रमानंतर भविष्यात आणखी मोठे इव्हेंट्स आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

रक्तदान करुन शहीद जवान अक्षय लक्ष्मण गवते यास परिसरातील नागरिकांनी वाहीली आदरांजली(buldhana)

0

 

जावेद शहा. बुलढाणा प्रतिनिधी

buldhana:दि. 20 ऑक्टोबर वर्षभरापूर्वी आज रोजी देशातील पहिले शहिद अग्नीविर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना विरमरण आले होते. आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपळगाव सराई गावाचे वतीने पुण्यस्मरण व रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी परिसरातील बहुसंख्य युवक-युवती व नागरीकांनी रक्तदान करुन वेगळ्या प्रकारे शहीद जवान अक्षय गवते यास आदरांजली वाहिली. प्रचंड प्रमाणात या रक्तदान शिबीराचे प्रतीसाद मिळाला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यातून एकप्रकारे विर शहीद जवान अक्षय च्या रुपाने अनेकांना जिवनदान मिळणार आहे. यावेळी सर्वंच गावकरी अगदी तन-मन-धनाने एकत्र येऊन शहीद जवानाप्रती आदरभाव व्यक्त करतांना दिसले.

तसेच या पुण्यस्मरण दिनानिमित्त सायंकाळी ह.भ.प. कु. कांचन ताई शिवनंदन शेळके यांचे जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगीही गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भारतमातेच्या सुपुत्राने हि पिंपळगाव ची भुमी पवित्र केल्याची भावना गावकऱ्यांच्या मनोमनी होती.

या शहिद अग्नीविर जवानामुळे परिसरातील प्रत्येक तरुणांच्या मनात सैन्यात जाण्याचा अग्नी प्रज्वलित झाला हे विशेष! याप्रसंगी नायब सुभेदार युवराज गवते यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, गावकऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे. एका शहीद देशबांधवासाठी ऐवढ्या आत्मियतेनं संपूर्ण गाव एकत्र येऊन जी होईल ती मदत करत आहे. वाट्याला येईल ते काम करत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज खरोखर अस वाटतंय की अक्षय आज तुझ्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल, आणि जर माझ्यावर किंवा दुसऱ्या एखाद्या फौजी वर अशी वेळ आली तर एवढं प्रेम, आदर पाहून आत्म्याला नक्कीचं शांती मिळेल. तसेच गावकऱ्यांच्या मनात फौजी बद्दल जी आत्मीयता आहे ती आज दिसून आली. पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. अशा शब्दांत नायब सुबेदार युवराज गवते यांनी प्रतिक्रिया दिली.

buldhana:प्रसंगी एकच नारा घुमला अमर रहे, अमर रहे, शाहिद जवान अक्षय गवते अमर रहे!यावेळी परिसरातील बरेच युवक- यूवती, मान्यवरांनी उपस्थिती दाखवली व नागरीकांनीही आदरांजली वाहिली.

मराठा संघटनांनी दिला मोरजकर यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा(maratha)

0

 


मराठा समाजाची भूमिकेविरुद्ध वागणूक सहन करणार नाही!

maratha:मुंबई: माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ पेक्षा अधिक व्यक्तींवर खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे. या संघटनेने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे प्रकरण उघड केले. यानंतर, मोरजकरांनी दाखल केलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचे पुरावेही समोर आले. विशेषतः, कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस ठाण्यात दोन मराठा समाजातील व्यक्तींविरुद्ध दाखल झालेल्या एफ.आय.आर.मुळे या प्रकरणाला आणखी गती मिळाली आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

या घटनेनंतर, स्थानिक मराठा समाज आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येऊन कुर्ल्यातील प्रमुख ठिकाणी मोरजकर यांच्याविरुद्ध बॅनरबाजी केली. या बॅनरवर मोरजकरांना “मराठा विरोधी” म्हणून घोषित केले गेले. मोरजकरांच्या उमेदवारीवर मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजी ब्रिगेड ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युतीत आहे, परंतु जर मोरजकरांना उमेदवारी दिली गेली, तर मराठा समाज त्याविरुद्ध रस्त्यावर उतरेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. स्थानिक मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांनी आधीच बॅनरबाजी करून आपला विरोध दर्शवला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यास मोरजकरांविरुद्ध आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

maratha:कुर्ल्यातील वातावरण तणावपूर्ण असून ठाकरेंच्या शिवसेनेला या स्थितीत बॅकफूटवर जावे लागण्याची शक्यता आहे. मराठा संघटनांचा विरोध आगामी कुर्ला निवडणुकीवर मोठा परिणाम करू शकतो.

पल्लवी मुडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट, दी : 18 ऑक्टोंबर 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय थाली फेक

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्ष गटातील पल्लवी मुडे या विद्यार्थिनीने विजय प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धे करिता आपले स्थान निश्चित केले. तिने दाखवलेल्या

पल्लवी मुडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

धाडसाबद्दल ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयाचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पणा राठी, सहसचिव रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:क्रीडा शिक्षक रोहन हुमाड व पायल तलवटकर यांनी पल्लवीचे कौतुक करून पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या.

डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश किनगाव जटुटु येथे कार्य कत्यांचे जलोश(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

sharadpawar:सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात घरवापसी केली आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश किनगाव जटुटु येथे कार्य कत्यांचे जलोश(sharadpawar)

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे छोटेखानी कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. पक्षाध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

sharadpawar:डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्याने किनगाव जटुटु येथील त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन आतीश बाजी व जल्लोष करुन अपले आंनद व्यक्त केले

तेरवीच्या खर्चाला बगल देत आरंभ बहुउद्देशीय संस्थेला 51000 हजाराची मदत(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाटयेथील सेवानिवृत्त शिक्षक पाडुरंग विरूळकर दि 6/09/24 ला कर्करोगाने निधन झाले.त्याच्या मृत्यू नंतर त्यांचे पार्थिवाचे त्यांच्या इच्छेनुसार आचार्य विनोबा भावे वैद्यकीय विद्यालय सावंगी येथे परिवारानी दान केला.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने समाजाचे समाजाला अर्पण या भावतेतून काही तरी देण लागतो या उदात्त भावनेतून त्यांच्या कुटुंबीयाने त्यांची तेरवी व अन्य धार्मिक विधी न करता.

तेरवीच्या खर्चाला बगल देत आरंभ बहुउद्देशीय संस्थेला 51000 हजाराची मदत(Hingnghat)
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्याला लागणारा खर्च आरंभ या वृद्धाश्रमात धान्य व आर्थिक स्वरूपाची अशी 51 हजाराची मदत केली.

Hingnghat :तसेच रुग्णसेवेसाठी कार्य करणाऱ्या फनिष बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांना पाच हजाराची मदत करून विरूळकर कुटुंबियांनी समाजात एक वेगळा संदेश दिला.