Home Blog Page 71

चिखलीत श्वेता ताई/ राहुल बोन्द्रे ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?(vidhansabha )

0

 

 

चिखलीत ‘श्वेता ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार? श्वेता ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे.

Vidhansabha :-बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे केंद्र. मात्र आता तर यामुळे १९६२ च्या निवडणुकीपासून प्रत्येक लढतीत काँग्रेस विरुद्ध (प्रारंभी) जनसंघ आणि कालांतराने भाजप असा संघर्ष पाहवयास मिळाला.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

नव्वदीच्या दशकात जिल्ह्यात दमदार आगमन करणारी शिवसेना किंवा अलीकडच्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसा थारा मिळाला नाही. अजूनही हीच स्थिती आहे.

मागील काँग्रेसची दोन शकले झाल्यावरही इंदिरा काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध जनसंघ अशीच लढत झाली. या संघर्षाची टोकाची चुरस १९७८ च्या लढतीत पाहवयास मिळाली.

ती लढत जिल्ह्यातील आजवरची सर्वाधिक चुरशीची तिरंगी लढत ठरली. इंदिरा काँग्रेसकडून लढणारे जनार्दन बोन्द्रे (२७, ७८५मते), भाराकाँचे भारत बोन्द्रे (२७,६०७) आणि भाजपतर्फे लढणारे जनसंघाचे केशवराव बाहेकर ( २७४४७) यांच्यातील विक्रमी लढतीत विजयी उमेदवाराने जेमतेम १३८ मतांनी बाजी मारली. विजयी उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकारील बाहेकर यांच्यात ३३८ मतांचा फरक होता.

Vidhansabha :-काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपच्या रेखा खेडेकर यांनी १९९५ ते २००४ अशी सलग बाजी मारली. त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर २००९ आणि २०१४ च्या लढतीत राहुल बोन्द्रे हे आमदार झाले.

यावल शहरात पाचशे रूपयाच्या बनावट नोटा चलनात दोन जणाना पोलीसांनी घेतले ताब्यात (brekingnews)

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

brekingnews:-यावल शहरातील एका बियरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या चार ग्राहकांकडून बिलापोटी ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांना दुकानदारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, तर यातील दोनजण दुचाकीवरून पसार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे

यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेल्या एका बियर शॉप मध्ये बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान संबधीत बिअरबारमध्ये चारजण बियर पिण्यासाठी आले असता त्यांचे बियर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या नोटांच्या बंडलातुन दुकानदारास बिलापोटी दिले.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

दरम्यान ५०० रुपयांच्या चलनी नोटा या बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअरशॉपवरील व्यक्तीच्या चलनी नोटा बनावट असल्याचे निर्दशनास आले. दुकानदार तडकाफडकी दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या दोन जणांचा सेटर बंद करून पकडून या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात.

दरम्यान यातील दोन जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले. या संदर्भात यावल पोलिसांकडून या दोन जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

brekingnews:-दरम्यान यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे प्रकार आले आहे. रावेर यावल विधानसभा मतदारसंघ हा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रोटरी क्लब हिंगणघाट ने चावरा आश्रमात बौद्धिक अपंगांसोबत साजरी केली दिवाळी(diwali)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

diwali:-हिंगणघाट: रोटरी क्लब हिंगणघाटने जाम येथील चावरा आश्रमात बौद्धिक अपंग व्यक्तींना समवेत घेऊन हर्षोल्लासात दिवाळी साजरी केली.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

या प्रसंगी क्लब अध्यक्ष जितेंद्र वर्मा, सचिव उदयशेंडे, संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी, प्रकल्प संचालक प्रा. माया मिहानी, धीरज मांडोत, माजी अध्यक्ष प्रा. अशोक बोंगिरवार, सुरेश चौधरी तसेच आश्रमाचे फादर प्रिन्स आणि सिस्टर जेस्मी उपस्थित होते. क्लब अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की रोटरीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे “सेवा हीच सर्वोच्चता”; गरजूंच्या जीवनात आनंद आणि हसू आणणे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून बौद्धिक अपंग व्यक्तींना कुटुंबासारखा अनुभव देऊन त्यांना आनंदी करणे हे आमचे ध्येय होते. डॉ. अशोक मुखी यांनी सांगितले की रोटरी क्लब दरवर्षी अशा वंचित समुदायांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. प्रा. अशोक बोंगिरवार यांनी या व्यक्तींना सृजनशील कला शिकवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांच्यातील सुप्त कौशल्ये बाहेर येतील आणि ते व्यस्त राहतील.

यानंतर दिवाळीचा आनंद पारंपरिक मिठाई आणि चिवडा वाटप करून साजरा करण्यात आला. रोटरी क्लबच्या सदस्यांनी त्यांच्यासोबत दिवे लावले आणि फुलझड्या उडविल्या. संपूर्ण कार्यक्रमात आनंद आणि प्रेमाचे वातावरण होते, ज्यातून सर्वांच्या जीवनात प्रकाश आणि प्रेम असावे, तसेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यावे असा संदेश मिळाला. त्यानंतर सचिव उदय शेंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Diwali :कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. माया मिहानी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक बकाने, पंकज देशपांडे, उदय भोकरे, पितांबर चंदानी, मितेश जोशी, मंजुषा मुले, अर्चना झाल्टे, जितेश नांदुरकर, समीक्षा, साई चौधरी आणि इतर अनेक सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

जळगाव जा. मतदार संघात प्रशांत डिक्कर यांची प्रचारात आघाडी/मतदारांचा प्रतिसाद, प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांनी घेतली धास्ती(prashantdikkar)

0

 

prashantdikkar:संग्रामपूर- जळगाव-जामोद मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांचा मतदार संघातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तिनही तालुक्यातील गावागावात झंजावती प्रचार दौरा अविरत सुरू आहे. तर मतदारांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत असून तसे त्यांचे कार्यकर्तेही खाजगीत बोलत आहेत.

प्रशांत डिक्कर हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी मागील 16 वर्षापासून अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे मतदार संघासाठी नवखे उमेदवार नाहीत तर संकटाच्या समयी धावून येणारा जनसेवक असल्याचे मतदार बोलत आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या मतदारांना प्रशांत डिक्कर यांच्या रूपाने पर्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांचे गावागावात जंगी स्वागत होत आहे. मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांची विजयी घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावात काही ग्रामस्थ त्यांना वर्गणी देऊन निवडणुकीसाठी आर्थिक सहकार्य करत आहे.

वाढता प्रचार, नागरिकांचा प्रतिसाद आणि विजयाकडे वाटचाल बघता विरोधी उमेदवारांना प्रशांत डिक्कर या नावाची धास्ती बसल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे.

prashantdikkar:-जनतेसाठी लढणारा, जनतेसाठी झाटणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत जावा, अशी इच्छा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबर रोजी क्रमांक 5 वरील ‘सात किरणांसह पेनाची नीब’ या चिन्हसमोरील बटन दाबून प्रशांत डिक्कर यांना प्रचंड बहुतांताने विजयी करावे असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या रूपातून मिळाला पर्याय, जळगाव जामोद मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद(Vidhansabha)

0

 

Vidhansabha :-जळगाव जामोद- / शेतकरी व सर्वसामान्यांसाठी लढणारे शेतकरी नेते जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी नेते प्रशांत काशिराम डिक्कर निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावित आहेत.

आज जळगाव तालुक्यातील गोळेगाव नवे, गोळेगाव जुने, टाकळी खासा, टाकळी पा. माऊली, कुरणगाळ खु. इत्यादी गावाचा आज १२ नोव्हेंबर दौरा केला आहे, प्रशांत डिक्कर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून त्यांना प्रचारादरम्यान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

प्रचार दौऱ्यादरम्यान संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला जात आहे. प्रशांत डिक्कर हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी मागील 16 वर्षापासून अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे मतदार संघासाठी नवखे उमेदवार नाहीत तर संकटाच्या समयी धावून येणारा जनसेवक असल्याचे मतदार बोलत आहेत.

त्यामुळे आतापर्यंत प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या मतदारांना प्रशांत डिक्कर यांच्या रूपाने पर्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांचे गावागावात जंगी स्वागत करण्यात आले.

Vidhansabha:रॅलीमध्ये युवक युवतींचा सहभाग लक्षणीस असतो. त्यांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांची विजयी घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर जळगाव जामोद मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

रिमडोह परिसरात दुसर्यांदा पुन्हा कपंनीत लागली आग.(brekingnews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

brekingnews:दि.12 राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह परिसरात के.बी. पेपर मिल्स प्रो. दिनेश कोचर यांच्या कंपनीला आज 12 वाजता वेस्टेज मटेरीयलला आग लागून लाखोचे नुकसान झाले. कंपनीत उघड्यावर ठेवलेल्या पेपर वेस्ट मटेरियलला आग लागली,

प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची सभा संपन्न__(vidhansabha )

आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानीक नगरपरीषद, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पुलगाव येथील फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले.जवळ्पास सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही आग धुमसत असून अग्निशमन यंत्रणा आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणतीही जीवितहानी झाली नसून उघड्यावर आग लागल्याने कपंनीचे आतील कोणतेही नुकसान झाले नाही.
या जळालेल्या वेस्ट मटेरियल पासून येथे खरड्याचे पेपर रोल बनविण्याचे काम येथे केल्या जाते.

brekingnews:या वेस्ट मटेरियल कचऱ्याचे तापमान वाढल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज येथील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.तसेच काही दिवसा अगोदर याच परिसरात श्रेयांश खर्डा कपंनी ला दी. 6 तारखेला आग लागली होती.

प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ परिवर्तन महाशक्तीची सभा संपन्न__(vidhansabha )

0

________
महायुती आणि स्थानिक आमदारांनी मतदार संघातील जनतेला मुंगेरीलाल चे हसीन स्वप्न दाखवले: राजे छत्रपती संभाजी महाराज

जळगाव(जामोद):११महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे. आता त्यांना कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत सरकार त्यांचेच होते.

कर्जमाफी पण सोडाच आतापर्यंत अतिवृष्टीचे पैसे नाहीत, पिक विम्याचे पैसे नाहीत, एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा २० वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीने ह्या मतदारसंघात आणला नाही. जळगाव जामोद, विधानसभेची लढत ही प्रस्तापिताविरुद्ध लढाई आहे.

छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते, आम्ही सुद्धा रयते सोबतच आहे. प्रशांत सुद्धा रयतेचा राजा आहे.जनतेच्या मनातला आमदार आहे. आमचा महाराष्ट्र स्वराज पक्ष हा शेतकरी ,शेतमजूर, मागासवर्गीय, दिन दलित वंचितांचा पक्ष आहे. स्थानिक आमदार संजय कुटे हे रोज रोज नवीन थापा मारतात. जनतेची दिशाभूल करतात.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

महायुती आणि आमदार संजय कुटे यांनी ह्या परिसरातील जनतेला वीस वर्षात फक्त मुंगीरेलालचे हसीन स्वप्न दाखविले. आता कोणत्याही भूल थापांना बळी न पडता परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा व व परिवर्तन घडवा असे आवाहन परिवर्तन महाशक्ती चे संयोजक तथा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अध्यक्ष राजे छत्रपती संभाजी यांनी केले. ते दिनांक १० ऑक्टोबर रोजी स्थानिक बायपास वरील मैदानावर उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हजारोंच्या जनसमुदायासमोर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रशांत डिक्कर, गजानन बंगाळे पाटील , धनंजय जाधव , उज्वल पाटील चोपडे, सम्मेद पाटील, सय्यद बाहोद्दीन, विठ्ठल वखारे, विलास बोडखे, वंदनाताई डिक्कर यांची सुद्धा उपस्थिती होती.
एका आदिवासीने आपले दीड गुंठा शेत आणि एका युवकाने चार ग्राम सोन्याची अंगठी उमेदवार प्रशांत यांना दिल्याने आपण स्वतः भाराऊन गेलो होतो. आता ही लढाई प्रशांत डिक्कर यांची नसून राजे छत्रपती संभाजी यांची आहे. प्रशांतला यापुढे खर्च करण्याची गरज नाही. त्याचा सर्व खर्च राजे छत्रपतींचा महाराष्ट्र स्वराज पक्ष करेल.

असेही यावेळी राजे छत्रपती यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांनी जसा इतिहास घडवला तसाच इतिहास प्रशांत डिक्कर यांना निवडून आणून तुम्हाला घडवायचा आहे. प्रशांत ने शून्यातून विश्व निर्माण केले. तो निवडून येता बरोबर त्याला हेलिकॉप्टरने मुंबईला नेऊ असे आश्वासन सुद्धा यावेळी राजे छत्रपती संभाजी यांनी दिले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शेतकरी शेतमजुरांचा संघर्ष विधानसभेत पाठवा: प्रशांत डिक्कर सध्या महायुतीकडून मला व माझ्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास होत आहे. प्रशासनावर दबाव टाकून आमदार संजय कुटे यांनी आमच्या सभेला परवानगी नाकारली. सोनाळा, बावनबिर, पडसोळा परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमचे बॅनर फाडले. आपण स्वतः भूमीहीन असून एक गुंठा जमीन सुद्धा आपल्याकडे नाही. १६ वर्षापासून जनतेसाठी संघर्ष करत आहे.

माझी पत्नी दिवसभर टेलर काम करते. माझी आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. माझ्याजवळ पैसा असता तर मी आईला दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ दिले नसते. शेतकरी, शेतमजूर , कष्टकऱ्यांचां संघर्ष हा विधानसभेत पाठवा. अंगामध्ये रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत आपण जनतेची सेवा करत राहू असे आश्वासन यावेळी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी जनतेसमोर दिले. महायुतीच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांच्यावर सुद्धा डिक्कर यांनी टीका केली. महायुती म्हणते प्रशांत डिक्करला महाविकास आघाडीच्या स्वाती वाकेकर यांनी उभे केले.

vidhansabha:-तर महाविकास आघाडी वाले म्हणतात महायुतीच्या संजय कुटेंनी प्रशांत डिक्करला उभी केले. आई आणि दोन मुलांची शपथ घेऊन सांगतो, आपण कुणाच्या सांगण्याने उभे राहलो नाही. शरीरात अखेरचा रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत जनतेसाठी हा संघर्ष करत राहील, असे सुद्धा यावेळी प्रशांत डिक्कर यांनी कथन केले. राजेनी उमापुर येथिल आदीवासी वस्तीवर मुक्काम केल.

विकासकार्यातून मतदारसंघाचे रुप पालटणाऱ्या श्वेताताईंनाच जनता पुन्हा विजयी करेल – विजय कोठारी(vidhansabha )

0

 

 

vidhansabha:-बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीः ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा नसल्याने शेतकरी व गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. विजेच्या लपंडावामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत असे याशिवाय आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्याने ग्रामीण भागातील अबाल वृद्धांना वेळप्रसंगी जीव देखील गमावावा लागत असे. ही विदारक परिस्थिती या मतदारसंघाने अनेक वर्ष अनुभवली.

मात्र श्वेताताई महाले यांनी आमदार झाल्यानंतर आपल्या विकासकार्यातून मतदारसंघाचे रुप पालटण्याचे कार्य हाती घेतले. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनता पुन्हा श्वेताताईंनाच विजयी करेल असा दृढ विश्वास भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी यांनी व्यक्त केला. भोरसा भोरसी येथे गाव भेट दौऱ्या दरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ म. खंडाळा, शेलगाव ज.. एकलारा पांढरदेव भोरसा भोरसी,

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

नायगाव बु, कारखेड, पिंपरखेड, हराळखेड, धानोरी आणि इसोली येथे गाव भेट दौऱ्याचे आयोजन दि. ६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.

प्रत्येक गावात या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी गावातील नागरिक व माता- भगिनींकडून आ. श्वेताताई महाले यांचे उस्फुर्त स्वागत झाले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, राष्ट्र‌वादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, पांढरदेव येथील सरपंच चेतन म्हस्के, शिवसेना नेते भास्करराव राऊत, गजानन परिहार, शिवसेना चिखली

तालुकाप्रमुख गजानन मोरे, बबनराव राऊत, माजी पंचायत समिती सदस्य गजानन ठेंग, बद्री पानगोळे, मंदार बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ तायडे, अमोल साठे, धर्म जागरण जिल्हाप्रमुख गजानन महाराज सपकाळ, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण अंभोरे, युवराज भुसारी, सतीश काकडे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पीरिपा महायुतीमधील पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

श्वेताताईंनी भरून काढला विकासाचा अनुशेष – शंतनू बोंद्रे

शेतकरी, शेतमजूर, दलित, महिला आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची जाण असलेल्या नेत्या

श्वेताताई महाले यांच्या रूपाने चिखली मतदारसंघाला एकखंबीर नेतृत्व लाभले आहे.

आपल्या कल्पकतेने व धडाडीने त्यांनी चिखली मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढत प्रगतीचे नवे मार्ग येथील जनतेला दाखवले.

Vidhansabha :-श्वेताताईंची अडीच वर्षातील कामगिरी ही काँग्रेस उमेदवाराच्या दहा वर्षाच्या कार्यकाळावर निश्चितच भारी असून त्याची परतफेड मतदानाच्या रूपातून या मतदारसंघातील जनता निश्चितच करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे यांनी आपल्या भाषणातून बोलून

बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरामध्ये शिवसेनेची भव्य प्रचार रॅली संपन्न(vidhansabha )

0

 

अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ताहेर शेख शेगाव शहर ग्रामीण प्रतिनिधी

vidhansabha:आमच्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेत पाठवणार उपस्थित महिलांचा निर्धार…!
आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा शहरातील प्राचीन श्री हनुमान मंदिर जुनागाव परिसरातून शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ असंख्य माता-भगिनींच्या साक्षीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली….!

उद्धव ठाकरे गरजले, लोकसभेत उधळलेले युतीचे खेचर महाराष्ट्राने रोखले; म्हणाले, मशालीच्या ज्वालानी गद्धारांचे सरकारही भस्मसात करणार (Vidhansabha)

यावेळी त्या प्रचार रॅलीमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत मोठ्यापासून ते वृद्धापर्यंत,वृद्धांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आमच्या लाडक्या भावाला, बुलडाण्याच्या ढाण्या वाघाला पुन्हा एकदा जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी प्रचार रॅली दरम्यान केला…!

vidhansabha:यावेळी त्या ठिकाणी शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक,माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे गरजले, लोकसभेत उधळलेले युतीचे खेचर महाराष्ट्राने रोखले; म्हणाले, मशालीच्या ज्वालानी गद्धारांचे सरकारही भस्मसात करणार (Vidhansabha)

0

बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्ली समोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखला. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालच्या ज्वालानी गद्धारांचा कारभार भस्मसात करणार असल्याचे आग्रही प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्धार आसाम कडे पळाले त्या सुरत शहरासह महाराष्ट्र राज्यात सर्वत्र छत्रपती शिवरायांची मंदिर उभारणार या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या ( महाविकास आघाडीच्या) उमेदवार जयश्री सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी बुलढाण्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जंगी सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आज शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडलेल्या जाहीर सभेला आघाडीचे कार्यकर्ते, नागरिक, मतदार, शेतकरी यांची अलोट गर्दी उसळली.

अतुल वांदीले यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा, हिंगणघाट विधानसभेत वाजणार तुतारी!(sharadpawar )

यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, बुलढाणा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या( आघाडीच्या) उमेदवार जयश्री सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार रेखा खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रे, लखन गाडेकर, साहेबराव सरदार, सुमित सरदार,काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, धृपदराव सावळे, गणेश पाटील,आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, रवी पाटील, ऍड विजय सावळे, रशीदखान जमादार, सुनील सपकाळ, सतीश मेहेंद्रे, रवी पाटील दत्ता काकस, शिवसेनेचे लखन गाडेकर, अशोक गव्हाणे, दत्तात्रय लहाने आदी उपस्थित होते.
नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा ठाकरेंचे सभास्थळ असलेली बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील मैदानात आगमन झाले.आपल्या भाषणाची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी ‘माझ्या महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, माता- भगिनींनो’ असे संबोधित करून केली. लोकसभेनंतर आज आपली विधानसभा निमित्त भेट होत असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाशी संवाद साधत भाषणाला सुरुवात केली. बुलढाणा लोकसभेत कमी मतांनी आघाडीचा पराभव झाला. हा पराभव मनाला चटका लावणारा ठरला.

यामुळे एक गद्धार वाचला असे खासदार प्रतापराव जाधव यांचा नामोल्लेख न करता ते म्हणाले. लोकसभेतील महा यशाने आघाडीचे मनोबल वाढले असल्याचे सांगून यामुळे विधानसभेत आघाडी जास्त एकजूट आणि एकदिलाने एकत्र आली आहे. व्यासपीठाव रील मित्रपक्षांच्या उपस्थिती ने हे सिद्ध झाले. लोकसभेत एक गद्धार कसाबसा वाचला पण बुलढाण्यातील गद्धार कसाच वाचत नाही हे आजच्या तोबा गर्दीने सिद्ध झाले आहे. राज्यात आघाडीचीच हवा नव्हे वादळ असून आघाडीचे सरकार सत्तेत येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा दावा ठाकरे यांनी बोलून दाखविला. आघाडीत शिवरायांचे खरे भक्त, मावळे आहेत तर ‘पलीकडे’ महाराष्ट्र द्रोही आहेत. भगवा मिळविणारा प्रत्येक जण मावळा असतोच असे नाही. चाळीस दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा घातला, भगवा, धनुष्य आणि पक्ष चोरला असा घणाघात त्यांनी यावेळी केला. युतीचे शिवरायावरचे प्रेम बेगडी आहे. त्यांना केवळ मते मागण्यासाठी शिवराय पाहिजे. शिवरायांचा जयजयकार ऐकला की देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट होतो. मालवण मध्ये कोसळलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यासारखे यांचे शिवप्रेम पोकळ आहे.

भ्रष्टाचार करुन बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण अशुभ हाताने झालं, मग तो सफल होणार तरी कसे असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. शिवरायांचा पराक्रमी महाराष्ट्र यांनी दोन नेत्यांच्या आणि गुजरातच्या चरणी अर्पण केल्याची जहाल टीका ठाकरेंनी यावेळी केली. त्यांच्या कचाट्यातून उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी देखील सुटले नाही.विदर्भात घेतलेल्या सभात योगी यांनी ‘बटेगे तो कटेगे’ ; एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या विधानाचा त्यांनी समाचार घेतला.इथे सर्व जण गुणया गोविंदाने राहत आहे. त्यांच्या या घोषणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच विरोध दर्शविला आहे.आम्हीं कसे राहावे हे बाहेरच्यांनी शिकवायची गरज नाही असे दादा म्हणाल्याची आठवण करून दिली.

खबरदार!गाठ माझ्याशी आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ठाकरेंच्या भाषणापूर्वी जयश्री शेळके यांनी आक्रमक भाषण झाले.राज्यातील युतीच्या नेत्यां प्रमाणेच बुलढाण्याच्या आमदारानेही राज्याच्या संस्कृती धुळीला मिळविली आहे. नौटंकी, नाटक आणि ढोंग या तिनसूत्री वर वागणाऱ्या
आमदाराने न केलेल्या विकास कामाचा रिकामा ढोल बडविणे सुरू केले आहे. आत्ताच पराभवाच्या भीतीने पाया खालची वाळू घसरल्याने त्यांनी माझ्यावर, परिवारावर आरोप करणे सुरू केले आहे. मात्र याने मी डगमगणारी नाही. यामुळे नकली सेनेच्या नकली वाघाने मला भीती घालू नये, गाठ माझ्याशी आहे याचे भान ठेवून बोलावे असा इशारा शेळकेनी दिला. सूत्रसंचलन गजानन धांडे यांनी केले.

Vidhansabha :-‘ताईना तुम्ही आमदार करा,मी ‘भाऊ’ ला करतो’यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा मतदारसंघाच्या उमेदवारीचे गुपित व नाट्यमय घडामोडी उपस्थिताना सांगितले. लोकसभा नरेंद्र खेडेकर आणि विधानसभा जालिंदर बुधवत याना असे मी फार पूर्वी दोघां ना संगितले होते. अंतिम बैठकीत आपण बुधवत याना ‘थांबण्यास’ सांगितले असता त्यांनी एका क्षणात माघार घेतली.या निष्ठची मी कदर करणारच.तुम्ही जयश्रीताईना आमदार करा, जिल्हा प्रमुख बुधवत याना मी आमदार करेन असा शब्द त्यांनी बुलढाणे कराना दिला.