Home Blog Page 73

11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा :- निलेश जाधव(Lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :मेहकर येथील अशोका वाटिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथा मेहकर विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. निलेश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनामध्ये सांगताना सांगितले संवाद यात्रा का निघत आहे ?

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

याचे आत्मचिंतन करण्याची गरज समाजाला आहे. कारण आपण 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी व 2024 च्या निवडणुकीची टक्केवारी तपासून बघितली तर यामध्ये खूप तफावत आहे. ज्या बुद्धिजीवी लोकांनी सविधानाच्या नावाखाली समाज बांधवांची दिशाभूल केली. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे सर्व समाज बांधवांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे या 2024 विधानसभेमध्ये खंबीरपणे उभे राहावे. असे सांगितले व अशोक भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या संवाद यात्रेचे आपल्या जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करून मान्यवरांचे विचार आत्मसात करावे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष न.ल. खंदारे, महिला जिल्हाध्यक्ष साबळे ता,ई साबळे सर, मेहकर ता.अध्यक्ष मोरे सर, लोणार ता. अध्यक्ष राहुल अंभोरे सर, युवा नेते अनित्य घेवंदे,बळीभाऊ

Lonar :मोरे,मोबिन भाई, दिलीप राठोड, दीपक पाडमुख, दिपक अंभोरे,आबाराव वाघ, भुजंग शिरसाट , जितु भाऊ डोंगरदिवे, सिद्धार्थ अवसरमोल , प्रदीप सरदार, महेंद्र मोरे, वसंतराव वानखेडे, मिलिंद खंदारे ,शेख ताई, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष मोरे, राजहंस जावळे, महेंद्र पनाड, अचित पाटोळे, राहुल सरदार , गवई सर,गौतम गवई ,यांनी परिश्रम घेतले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खा.मुकुलजी वासनिक यांची ग्रेट भेट(lonar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर खान

Lonar :देऊळगाव राजा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुंलजी वासनिक साहेब आले असता दुसरबीड येथील समृद्धी महामार्गावर त्यांच्याची ग्रेट भेट झाली लोणार काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणार येथे आयोजित कार्यक्रमाची तारीख खासदार मुकुंलजी वासनिक यांनी दिली होती.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

परंतु हरियाणा च्या निवडणुकीमुळे या कार्यक्रमाची तारीख रद्द् झाली होती पंरतु आज साहेबा सोबत चर्चा केल्या नंतर खा.मुकुलजी यांनी दसऱ्यानंतर तारीख देणार असल्याची सागितले यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दीपक काटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयजी अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दुसरे उपाध्यक्ष संजयजी राठोड, एड आनंतराव वानखेडे, काँग्रेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलालजी गुगलीया,माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे,

राजीव गांधी पंचायत राज तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी सेल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा. गजानन खरात, ज्येष्ठ नेतै प्रदीप संचेती, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अहमद शेख अहमद,सेवादलाचे प्रदेशचे शैलेश बाविस्कर,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, पत्रकार अशोक इंगळे, प्रा. देशमुख सर मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित होते.

Lonar :यावेळी खासदार मुकुंलजी वासनिक यांनी लोणार तालुक्यातील काँग्रेस पक्षाची सखोल माहिती घेतली व तसेच मेहकर विधान सभा मतदार संघाच्या यावेळी आढावा घेतला

मेहकर विधानसभा वंचित बहुजन आघाडी लढणारच(mehkar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Mehkar :वंचित बहुजन आघाडी मेहकर विधानसभा मध्ये सोशल मीडिया द्वारे व वृत्तपत्रांमध्ये मी वंचित चा उमेदवार मीच मेहकर विधानसभा लढणार अशा बातम्या सोशल मीडियाद्वारे व काही वृत्तपत्र द्वारे बातम्या प्रसिद्ध करून मेहकर विधानसभा क्षेत्रातील जनतेला माझं तिकीट फायनल आहे मीच वंचित चा उमेदवार आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

अशी अफवा काही लोक करत आहे व जनतेची दिशाभूल करत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांनी अद्याप पर्यंत मेहकर मतदार संघामध्ये कुठलाही उमेदवार दिला नसून जनतेला संभ्रमात आणण्यासाठी काही इतर पक्षांची लोकं वंचित बहुजन आघाडीची दिशाभूल करण्यासाठी व वंचित बहुजन आघाडी मेहकर विधानसभा निवडणुकी रिंगणात उतरू नये.

यासाठी धडपड करत आहेत परंतु आदरणीय बाळासाहेबांचा आदेश असल्याशिवाय निवडणूक लढणे शक्य नाही त्यामुळे जनतेने संभ्रमात न राहता वंचित चा उमेदवार निश्चित होईपर्यंत कुठल्याही तथाकथित उमेदवाराला थारा देऊ नये मेहकर व लोणार तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

की वंचित बहुजन आघाडीने अद्याप पर्यंत कुठलाही उमेदवार दिला नसून कोणाच्याही भुलथापाला बळी न पडता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी बाळासाहेब सांगतील त्याच उमेदवारांना आपण निवडून द्यायचे आहे काही उमेदवार आदरणीय साहेबांचे नाव खराब करण्यासाठी मी उमेदवारी आणली माझी उमेदवारी फिक्स आहे.

Mehkar :असे सभेत शहरात गावागावात सांगत फिरत आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याकारणाने त्यांचा सल्ला घेण्यासाठी सर्व पक्षातील राजकीय लोक त्यांना भेटण्यासाठी जात असतात त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी गैरसमज न करता कोणाच्या भूलथापांना बळी न पडता साहेबांनी दिलेला उमेदवार निवडून आणायचा आहे असे आवाहन लोणार तालुकाध्यक्ष दिलीप राठोड यांनी केले आहे.

जाम येथे आमदार समिर कुणावार यांचा भव्य नागरी सत्कार(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जाम व समुद्रपूर सर्कल चे वतीने आमदार समीर कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल व जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल काल दिनांक ०५-१०-२०२४ रोजी भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

यावेळी जाम चौकातून भव्य रॅली काढून आमदार समीर कुणावार यांचा अनेक गावातील नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी जाम च्या सरपंच लता कुडमथे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष किशोर दिघे,माजी जि प सदस्य शंकर कांबळे,माजी सरपंच मोरेश्वर सातपुते,अजयराव किटे, महादेव बैलमारे, अशोक मून,गोविंद सराटे, शेतकरी संघटनेचे शंकर घुमडे,सुभाष चंदनखेडे, व्यपारी अशोषियन चे रमेश

https://youtu.be/IRsgDzlyUFE?si=eaKQZaZgxO8OkR8i

भोयर,हरिओम बाबा गौशाळा चे संचालक राजा मॅडमवार, जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे,युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर,ओबीसी मोर्चा चे रवी उपासे,संजय डेहणे,योगेश फुसे,गोविंद सराटे ,प्रभाकर घुमडे, देव खोब्रागडे ,तास च्या सरपंच वीणा झोटिंग, हिवरा सरपंच नलिनी थुटे ,रवी लढी,गजानन राऊत,सचिन गावंडे, मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून व दहेगाव चे सरपंच स्व. अंकुश खुरपडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना म्हणाले की महाराष्ट्रात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये कसे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात येशस्वी ठरलो.

आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझे धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे. जाम ,समुद्रपूर परिसरातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्त्याचे कामे हाती घेणार आहो असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, रमेशभाऊ भोयर,शंकरराव कांबळे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच सचिन गावंडे यांनी केले तर संचालन प्रा मेघश्याम ढाकरे यांनी केले.

Hingnghat :तर आभार गजानन राऊत यांनी केले यावेळी गावागावातुन आलेल्या लोकांनी आ. समिर कुणावार यांचा सत्कार केला सदर कार्यक्रमाला पाच हजाराचे वर जाम सर्कल व समुद्रपूर शहरातून नागरिक ,महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी जाम येथील सचिन गावंडे मित्र परिवार व शेषराव तुळणकर मित्र परिवार व सर्व स्तरातील युवकांनी परिश्रम घेतले.

पिव्ही टेक्स्टाईल येथील युनियन कामगारांच्या श्रीकांत भगत यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश..(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, तरुण वर्ग, कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करीत आहे.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

जाम येथील पिव्ही टेक्स्टाईल येथील युनियन कामगारांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला…

यावेळी तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, श्रीकांत भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे आदी मंचावर उपस्थित होते…

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी रवींद्र टिपले, रवींद्र दुरबुडे,अविनाश वाघे, शंकर पिसे, भारत वरघणे, गुलाब डाहाके, गजू भजभूजे, महेंद्र भोंडे, नंद किशोर पाटील, लक्ष्मीकांत तिवाडे, विनायक दुर्वे, प्रशांत उमाटे, शंकर चाफले, विजय तराळे, प्रदीप सुरकार, अंकित खुडसंगे, शंकर घोडमारे, साहिल कोरडे, दिनेश खडसे आदींनी पक्ष प्रवेश केला. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सर्वांचे पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

Hingnghat :याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे,सुभाष सोयाम, कुणाल येसबंरे, तालुका अध्यक्ष तुषार थुटे,राहुल जाधव, बबलू शेख,शोहेब शेख, विपुक थुल, रोशन थुटे, पवन भगत उपस्थित होते,

नवयुग दुर्गा उत्सव मंडळ कोरपावली.इथे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने संपन्न झाला..(Yavalnews)

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

Yavalnews:नवयुग दुर्गा उत्सव मंडळ .कोरपावली..इथे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने संपन्न झाला..

मोठ्या आनंदाने गावकऱ्यांनी गर्दी करून हा कार्यक्रम शांततापूर्वक ऐकला.व्यसनांपासून आज मनुष्याचा संसार कसा उध्वस्त झालेला आहे दुःखी अशांत झालेला आहे.

राष्ट्रीय ओबीसी महीला महीला मेळावा नविन पदाधिकारी यांची नियुक्ती( obc)

पण आताही आपण आपल्या मनाला नियंत्रण करून आपल्या संसाराला व स्वतःला सुरक्षित ठेवून नवीन दिशा देऊ शकतो..

असा संदेश ब्रह्मा कुमारी राजश्री दीदींनी यांनी दिला..
तर संस्थाचा परिचय आणि नवरात्रीचा आध्यात्मिक रहस्य ज्योती दीदींनी सांगितले व कार्यक्रमाचे सर्व कलाकार भुसावळ मधून आलेले होते त्यामध्ये ब्रह्माकुमारीकविता दीदींनी भाग घेतलेला होता…

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Yavalnews:नाटकामध्ये जे कलाकार आहेत ते पण राज योगाचा रेगुलर अभ्यास करणारे आहे.. रितेश , यशवंत ,मनोज , स्वप्निल , अनिल , भरत यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता..मंडळाचे अध्यक्ष आणि संदीप नेहते यांनी हा प्रोग्राम त्यांच्या गावांमध्ये ठेवलेला होता

राष्ट्रीय ओबीसी महीला महीला मेळावा नविन पदाधिकारी यांची नियुक्ती( obc)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Obc:हिंगणघाट :- संत तुकडोजी बॅक हिॅगणघाट ईथे राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ यांचा महीला मेळावा तसेच नविन पदाधिकारी यांच्या नियुक्तीपत्र देण्यात आले.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय ओ बि सी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे सर, तसेच महीला राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुषमा भड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योती ढोकणे, तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा अर्चना भोमले, या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनात तसेच रागिणी शेंडे वर्धा जिल्हा अध्यक्षा यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात अर्चना भोमले ओबीसी समाजा बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले महिलांचे हक्क अधिकार काय आहे हे समजावून सांगितले. आणि सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवुन त्याच्या वर जबाबदारी सोपविण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वर्धा जिल्हा उपाध्यक्ष पदी वंदना हिवंज, मंगला देशमुख , हिॅगणघाट तालुकाध्यक्ष लता सुकळकर, कार्याध्यक्षा सुनिता तळवेकर ,तालुका उपाध्यक्षा सुवर्णा भोयर, हिॅगणघाट शहर अध्यक्षा मेघना वानकर , कार्याध्यक्षा पद्दी सुनिता गुजरकर ,तसेच समुद्रपूर तालुका अध्यक्षा स्वाती हिवंज , समुद्रपूर शहर अध्यक्षा दिपा निगोट यांची नियुक्ती करण्यात आली .ह्या सर्व पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्र देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

Obc:तसेच ह्या कार्यक्रमाला काॅग्रेस विजे एनटी जिल्हाध्यक्ष सोनाली कोपुलवार , मंदाकीनी ढाले,चंदा येलेकर, सुजाता जिवणकर, सौ. कल्पना हिवंज, विध्या गिरी, शितल शेंडे, माधुरी मालेकर, सुनिता भोयर , बेबी कोल्हे ,शकुंतला बावणे, प्रतिभा सोनटक्के ,सोनुलकर ,बुराडे अश्या बहुसंख्य ओबीसी महीला भगिनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

मेहकर विधानसभा महाविकास आघाडी कडून तिकीट मिळाल्यास लढणारच – भाई दीपक केदार(lonarnews)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonarnews:मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघावर लागले आहे.

अनेक उमेदवार मतदार संघामध्ये तिकीट मिळण्याकरता प्रयत्न करत आहेत तर काही उमेदवार अपक्ष सुद्धा निवडणूक लढवणार आहेत.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

महाविकास आघाडी कडून सिद्धार्थ खरात यांच्या नावाचे जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे आपण मेहकर विधानसभा मतदारसंघ एका जागेची मागणी केली.

असून मेहकर विधानसभा निवडणूक तिकीट मिळाल्यास लढणारच व जिंकून दाखवणारच असल्याचे मत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी लोणार येथील शासकीय विश्रामगृहावर बोलताना सांगितले, ते पुढे म्हणाले की मेहकर मतदार संघामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेची ताकद आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

महाविकास आघाडीने आपल्याला तिकीट दिल्यास संपूर्ण ताकतीने आपण निवडणूक लढवणार आहोत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर एम आय एम यांच्याशी सुद्धा चर्चा करून उमेदवार न देण्याची मागणी सुद्धा आपण करणार आहोत.

lonarnews:त्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा सुद्धा दीपक केदार यांनी बोलताना सांगितल्यामुळे मेहकर विधानसभा ची जागा महाविकास आघाडी कडून कोणाला सुटणार हे पहाणे येणाऱ्या दिवसांमध्ये महत्त्वाचे ठरणार आहे, शिवाय विद्यमान आमदारासमोर आपणच योग्य उमेदवार असून आपल्यामुळेच मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे असा दावा सुद्धा भाई दीपक केदार यांनी केला आहे,

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

0

 

Ravikanttupkar:मुंबई, मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात् शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

आपण सातत्याने केलेल्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पिकविमा कंपनीने सन 2023 च्या खरीप हंगामातील पात्र 2 लाख 24 हजार 482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 138 कोटी 51 लाख रु. पिकविमा जमा आहे. तर रब्बी हंगामातील पात्र 56 हजार 989 शेतकऱ्यांच्या खात्यावर 125 कोटी 22 लाख रुपये पिकविमा कंपनीने जमा केला आहे.

 

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

 

परंतु रब्बी हंगामात पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाही, त्याचबरोबर खरीप हंगामातील 70 हजार 831 शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग व अपात्र अशा 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करावा, ही आपली मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे सरकारने कंपनीला उर्वरित रक्कम अदा करून तातडीने पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे, त्याचबरोबर पिकविमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पिकविमा कंपनीवर कठोर कारवाई करावी,

Ravikanttupkar:अशी मागणी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना कृषी प्रधान सचिव जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

मातेने मुलाला जन्म दिला बसमध्ये नवजात बाळाचा मृत्यू ( Wardhanews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Wardhanews:हिंगणघाटकितीही आणि कोणतेही सरकार विकासाच्या नावाने कितीही बोबा ठोको, अखेर ग्रामीण जनतेच्या नशिबी लागलेले ग्रहण काही सुटत नाही ते नाहीच.
अशीच एक दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

समुद्रपूर तालुक्यातील धूम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रकृती दाखविण्या साठी येत असतांना हिंगणघाट जवळील नंदोरी चौका तिला प्रसव वेदना झाल्या.

व बस मध्येच तिची प्रसूती झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बसचे चालक विक्रम काटकर, वाहक शेषराव कांढरकर यांनी त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयात आणली. व महिलेला प्रसूतीगृहात दाखल केले.या ठिकाणी आईची व बाळाची तपासणी करण्यात आली असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सदर दुर्दैवी मातेवर उपचार सुरु आहेत. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. शेंडे, बसस्थानक प्रमुख श्री.शेडमाके, प्रदीप शेंडे यांनी रुग्णालयात येऊन मातेची भेट घेतली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सूरज कुबडे यांनी घटनास्थळ गाठून सदर कुटुंबिना मदत केली.

रुग्णालयात ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती रुग्णांना योग्य वेळी उपचारासाठी मिळत नसून महिलांसाठी दोन एबूलन्स राखीव आहेत.

पण आळशी पणा वा कामचुकारपणा मुळे 102 या क्रमांकवर फोन केला तर चक्क ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सुरज कुबडे यांनी केला असून चार महिन्यापूर्वी वेळा येथील एका महिलेसाठी रुग्णालयातील 102 वर कॉल केला असता.

Wardhanews :ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती नाही असे खोटे सांगण्यात आली परिणामी सदर महिलेला खासगी ऍटोतून दवाखान्यात नेत असतांना ती ऍटो मध्येच प्रसूत झाली होती .त्यामुळे सदर एम्बुलन्सला जीपीएस ट्रॅकर लावण्यात यावा अशी मागणी रुग्णसेवक सूरज कुबडे, व वन्यजीवरक्षक राकेश झाडें यांनी केली आहे.