Home Blog Page 77

सोयाबीन सोंगण्याची वेळ आणी तालुक्यात मुसळधार पाऊस शेतकर्यांच्या अडचणीत वाढ( farmer )

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Farmer :निसर्गापुढे कुणाचे काय चालते दरवर्षी सोयाबीन सोंगण्याचे दिवस सुरु झाले कि पाऊस पडतो आणि आता ह्याही वर्षी तसच होत आहे.

लोणार तालुक्यात आज बुधवारला संध्याकाळी पाच वास्ता मुसळधार पाऊस झाला आहे.ह्या पावसामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

पासाने किनगाव,बिबी,भुमराळा, लोणार वझर, सुल्तानपुर चोहीकडे मुसळधार पाऊस झाला.
सप्टेंबर,ऑक्टोंबर मध्ये सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरु होत असते या दिवसात पाऊस येऊ नये अशी अपेक्षा शेतकर्यांना असते.

मात्र निसर्गही शेतकर्यांना साथ देत नाही.अशातच पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दाखविलेला आहे.25 ते 29 सप्टेंबर ला अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

काही शेतकर्यांनी सोयाबीन सोंगुन गंजी माली तर काही शेतकर्यांचे माल अझुन उभेच आहे.

Farmer :बरेच शेतकर्यांनी शेतीसाठी लागनारे बि बियाने,खत,औषधि साठी सावकारी कर्ज, बॅंकेचे कर्ज काढलेले आहे.त्यामुळे सोंगण्याच्या वेळी असा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोंदिया आगार थेट चालविणार गोंदिया-लोणार बसफेरी(bus)

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

 

Bus:गोदिया आगाराची गोंदिया-लोणार-गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव प्रतिष्ठित बसफेरी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू असुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल देण्यात आलेले होते या कामगार बदल मुळे सदर फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त अमरावती पर्यंत तिकिट देण्यात येत होते

,तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे कामगार बदल मुळे एक ते दिड तास थांबत असल्याने प्रवाशांना बसफेऱ्या बदलुन पुढील प्रवास करावा लागत होता,हिबसफेरी गोंदिया आगाराच्या दोन चालक आणि एक वाहक यांच्याकडून लोणार पर्यंत चालविण्याची मागणी लोणार येथील प्रवाशी सेवा संघटना गत आठ महिन्यापासुन राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयकडे करत होते.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे प्रकरण केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे गेले त्यांनी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,डॉ.माधव कुसेकर यांना पत्राद्वारे सदर फेरीचे अमरावती येथील कामगार बदल बंद करण्याची मागणी केली.

त्यांच्या मागणीची दखल घेऊन गोंदिया-लोणार या 550 कि.मी एकेरी प्रवास करणारी फेरी दि.1 ऑक्टोबर 24 पासुन अमरावती येथील कामगार बदल बंद करून ती गोंदिया आगाराच्या दोन चालक व एक वाहक यांच्याकडून थेट लोणार पर्यंत चालविण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अशी माहिती प्रवाशी सेवा संघटना,लोणार यांना अमरावती-नागपुर प्रदेशचे प्रादेशिक व्यवस्थापक,श्रीकांत गभणे यांनी भ्रमणध्वनी व्दारे दिली आहे,अमरावती येथील कामगार बदल बंद केल्याने प्रवाशांना नियोजित थांब्या पर्यंत थेट तिकीट उपलब्ध होईल तसेच अमरावती बसस्थानक येथे प्रवाशांना एक ते दिड तास थांबावे लागणार नसल्यामुळे त्यांची हि अडचण कमी होणार आहे,प्रवाशांनी पूर्वीप्रमाणे सदर फेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवाशी सेवा संघटनेचे अध्यक्ष,उस्मान शेख,सचिव,भागवत खरात,यांनी केले आहे.(श.प्र.)

Bus :गत आठ महिन्यापासुन प्रवाशांची होणारी अडचण दूर करण्यासाठी वारंवार केलेली मागणीची केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर तसेच पत्रकार बंधु यांच्या सहकार्याने पुर्ण झाली असुन प्रवाशांच्या वतीने मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहे.

उस्मान शेख,अध्यक्ष,प्रवाशी सेवा संघटना,लोणार

किनगाव राजा येथील महसूल मंडळामध्ये प्रजन्यमापक यंत्रणा पडली धुळखात(lonar)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :किनगाव राजा येथे प्रजन्यमापक यंत्रणा येथे असून ती यंत्रणा पूर्णपणे धुळखात पडली आहे. या यंत्रणेमार्फत या मंडळामध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याची नोंद होत असते पण अक्षरशा या पर्जन्यमापक यंत्रणेमुळे शेतकऱ्याला पिक विमा व राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडून आर्थिक मदतीसाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे.

पण या यंत्रणेची आज रोजी अशी अवस्था आहे की ती पूर्णपणे धुळखात पडली असून त्या ठिकाणी पूर्णपणे त्या यंत्रणेची वायरिंग आणि अँटेना पूर्णपणे बाजूला पडल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही कारण यावेळी दिनांक 21 सप्टेंबर रोजी या किनगाव राजा परिसरामध्ये परिसरामध्ये कुठेच पाऊस पडलेला नसून 22 सप्टेंबर रोजी 3.5 मिलिमीटर पाऊस पडला असल्याची रेनफॉल रिपोर्ट मध्ये नोंद करण्यात आली आणि 22 सप्टेंबर रोजी 0.3 मिली पाऊस पडल्याची नोंद सुद्धा करण्यात आली.

ही नोंद करण्याचे एकमेव उद्देश 21 दिवसाचं पावसाचं खंडन जर पडलं तर शेतकऱ्याला सरसकट या मंडळात पिक विमा द्यावा लागतो म्हणून चुकीचा रेनफोल रिपोर्ट या ठिकाणी बनवण्यात आला पण 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच या दरम्यान या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सारखा पाऊस पडला असताना सुद्धा या परिसरामध्ये 0.0 मिली पावसाची नोंद रेन फॉल रिपोर्ट मध्ये करण्यात आली त्यामुळे येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्ण नादुरुस्त आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

ही माहिती शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी तालुका कृषी अधिकारी श्री पांचाळ साहेब यांना लगेच माहिती देऊन त्यांनी स्पॉट पंचनामा करण्याची विनंती केली आणि तालुका कृषी अधिकारी यांनी किनगाव राजा येथे पर्जन्यमापक यंत्रणेची पाहणी आणि संबंधित विभागाला फोनवरून आणि स्पॉट पंचनामा करून ताबडतोब चौकशी करण्याचे दिले.

आदेश प्रजन्यमापक यंत्रणेचे इंजिनियर श्री मस्के साहेब त्या ठिकाणी तात्काळ त्या पर्जन्यमापक यंत्रणेला भेट देऊन त्यांनी ही मशीन नादुरुस्त असल्याचे त्या ठिकाणी सांगितले म्हणून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे आणि त्या शेतकऱ्यांना पिक विम्याची ऑनलाइन तक्रार करण्यासाठी या रेन्फॉल रिपोर्टचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि त्या ठिकाणी ते रेन फॉल रिपोर्ट 0.0 मिळाल्यामुळे येथील नुकसान होऊन सुद्धा या शेतकऱ्याला मदत मिळणार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

म्हणून राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन ठिकाणचे पर्जन्यमापक यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी आणि या किनगाव राजा महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना कुठले निकष न लावता या परिसरातील सरसकट सोयाबीन व इतर पिकाला पिक विमा ऑनलाइन तक्रार करते वेळेस कुठलेही निकष न लावता ती तक्रार ग्राह्य धरावी जेणेकरून शेतकऱ्याला पिक विमा मिळेल अशी मागणी येथील शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी केली आहे

Lonar :त्यावेळी उपस्थित देवानंद सोसे , निलेश देशमुख, नितीन सानप शिवानंद पालवे ,कैलास हरकळ शिंगणे सर ,सतीश वायाळ ,दीपक पडोळकर, मधुकरराव साळवे ,रमेश सानप व इतर शेतकरी उपस्थित होते

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध: राजेश मापारी(lonar)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी लोणार तहसीलचे तहसीलदार भुषण पाटील यांना लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात निवेदन दिले सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचे पत्र फाडल्याच्या निषेधार्थ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा निवेदन देण्यात आलेआज शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मोठ्या संकटात सापडलेला आहे.


सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशील बनवण्यासाठी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहले होते. त्यावर तब्बल 3000 शेतकऱ्यांनी सह्या केल्या होत्या.19 सप्टेंबर 2024 रोजी बुलढाणा येथे माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार राहुल भाऊ बोंद्रे व त्यांचे सहकारी गेले असता पोलिसांनी त्यांची अडणूक केली व जबरदस्तीने निवेदन हिसकावून ते फाडून टाकले. दंडुकेशाहीच्या जोरावर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांनी जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या रक्तांचा केलेला हा घोर अपमान आहे.

आम्ही हे सहन करणार नाही सदर निवेदनामध्ये सोयाबीनला सात हजार रुपये भाव, थकलेला पिक विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग 12 तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण आदी शेतकरी हीताच्या मागण्यांसाठी सदर निवेदन होते या अपमानाविरोधात 23 सप्टेंबर 2024 पासून सावरगाव डुकरे तालुका चिखली या गावी शेतकरी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहोत गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्या केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मांगेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन राहील.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

त्यामुळे शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून माफी मागावी यासाठी आम्ही निवेदन करत आहोत. तसेच सदर अन्नत्याग आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.

या निवेदनावर माजी जिल्हा सरचिटणीस साहेबरावजी पाटोळे, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते भूषण मापारी, उपनगराध्यक्ष बादशाह खान,राजीव गांधी पंचायतराज तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिभडे, ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी,मा. नगरसेवक संतोष मापारी,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास
माजी बांधकाम सभापती प्राध्यापक सुदन कांबळे, माजी नगरसेवक पंढरी चाटे,मा.नगरसेवक सतीश राठोड, शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रामचंद्र कोचर, चिटणीस आप्पा शिंदे,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे, उपस्थित होते.

प्राध्यापक गजानन खरात जिल्हाध्यक्ष कांग्रेंस ओबीसी सेल
पोलिसांनी शेतकऱ्याचे रक्ताचे पत्र फाडल्यामुळे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार तसेच शेतकरी बांधव अन्य त्याग आंदोलना बसलेल्या आहेत त्यास बुलढाणा जिल्हा ओबीसी सेलच्या वतीने पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध करतो व गुन्हेगार वर त्वरित कारवाई करण्यात यावी.

अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडू प्राध्यापक गजानन खरात जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल
साहेबराव पाटोळे साहित्यरत्न अण्णाभाऊ सोशल फोरम प्रदेशअध्यक्ष पोलिसांनी शेतकऱ्याचे रक्ताचे पत्र फाडल्यामुळे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार तसेच शेतकरी बांधव अन्य त्याग आंदोलना साठी बसलेले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यास आंदोलनास साहित्य अण्णाभाऊ साठे फोरम प्रदेशच्या वतीने आमच्या जाहीर पाठिंबा आहे पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध करतो व गुन्हेगार वर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन छेडू

शेख समद शेख अहमद शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी लोणार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे बुलढाणा ला आले होते त्यानिमित्त 3000 शेतकऱ्यांच्या सह्या निवेदनमुख्यमंत्री यांना द्यायच्या होता पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.

Lonar :व जबरदस्तीने निवेदन हिसकून ते फाडून टाकले कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेच्या मार्गाने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे निवेदन देण्यात येणार होते परंतु धडप शाही पोलीस प्रशासनाच्या धडप शाहीचा शहर कांग्रेंस कमीटीच्यां वतीने जाहीर निषेध करतो

गिरड सर्कलच्या वतीने आमदार समिर कुणावार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:गिरड :- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधीरेल्वे विधानसभा क्षेत्रातील जनतेने मला दोन वेळा भरभरून मते देऊन विधानसभेत पाठविले आणि मी जनेचा सेवक म्हणून काम करीत तुमचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आज मी आमदार आहे आणि तुमच्या मुळेच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाला असून तो माजा नसुन मतदार संघातील जनतेचा आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

असे मत आमदार समिर कुणावार यांनी गिरड येथे आयोजित नागरी सत्कार समारंभाला मार्गदर्शन करताना व्यक्त केले.आमदार कुणावार यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याबद्दल गिरड ग्रामपंचायतीच्या प्रांगणावर भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गिरड येथील बस स्टॉप चौकातून ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत रॅली काढण्यात आली यावेळी आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते माऊली देवस्थान व छत्रपती शिवाजी महाराज व राम मंदिर येथे पुजा अर्चना करण्यात आली या रॅलीचा समारोप कार्यक्रमात स्थळी करण्यात आला.

त्यांनतर सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.यावेळी मंचकावर गिरडचे सरपंच राजु नौकरकर,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, तालुकाध्यक्ष वामनराव चंदनखेडे, सरपंच विलास नवघरे,अरूण मोटघरे, बहादुर सिंह अकाली,माजी उपसरपंच नुतन गिरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे, सामाजिक कार्यकर्ते अतुल काळपांडे,अब्दुल कदिर,प्रल्हाद पोयाम, सुभाष नन्नावरे , योगेश झिंगरे, दमडू मडावीआदी मान्यवर उपस्थित होते.आमदार कुणावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी गिरड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राजु नौकरकर सह ग्रामपंचायत सदस्यायांनी आमदार समिर कुणावार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.तर सामाजिक कार्यकर्ते अतुल काळपांडे यांनी सुध्दा सत्कार केला.यावेळी गिरड सर्कल मधील अनेक गावातील नागरिक,महिला ग्रामसंघ बचत गट, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आमदार समिर कुणावार यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार समिर कुणावार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की महाराष्ट्र ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा सरकारकडून करताच हे महाविद्यालय हिंगणघाट मध्ये असे आणता येईल यासाठी सातत्याने संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून आदी ४०० बेडचे रुग्णालय हिंगणघाट येथे मंजूर करून घेतले आणि त्यांनतर आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने वर्धा जिल्हा मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एका तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात येशस्वी ठरलो आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथे होणार असून माझ्ये धैर्य पुर्ण होणार यांचा मला आंनद आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गिरड गावातील येवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून माझा सत्कार व सन्मान केला यामुळे माझे मन भरून आले आहे.यापुढेही मी जनतेची सेवा करीत राहणार असे मत त्यांनी व्यक्त केली यावेळी किशोर दिघे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक अरुण मोटघरे तर आभारप्रदर्शन सरपंच राजु नौकरकर संचालन प्रशांत ठाकूर यांनी केले या कार्यक्रमाला गिरड सर्कल मधील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hingnghat:या सत्कार समारंभाला येशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे, प्रशांत ठाकूर मोंटु छायले,करण अकाली, सचिन उंबरकर, गौरव पेंदाम,अर्जून अकाली ,भोला बावणे,सागर बावणे,विजय सडमाके,संदिप शिवणकर, विक्की सहारे, मंगेश दोडके, अनिल गुंडू विनोद कनाळकर, विजया तेलरांधे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज भारस्कर , युवा मोर्चा अध्यक्ष आशिष अंड्रस्कर , आकाश मोंडे , आशिष खेडकर , गोलू भाऊ काटकर, तुषार हवाईकर, दिनेश जाधव, युवा मोर्चा महामंत्री आश्विन छोयले आदिनी सहकार्य केले.

स्थानिक इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणार येथे भव्य सत्कार.(lonar )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :जगाला शांती व समृद्धी चा संदेश देणारे इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर *हजरत मोहम्मद*(सल्ललाहो अलैही व सल्लम) यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर जिल्हास्तरीय *सिरत क्वीज* चे जमीयत उलमा -ए हिंद लोणार तथा झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल लोणार यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

यामध्ये स्थानिक इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणार चा विद्यार्थी मोहम्मद ज़ैद मोहम्मद रीज़वान याने प्रथम क्रमांक प्राप्त करून *उमराह (मक्का मदिना यात्रा) हे बक्षीस प्राप्त केले.

याबद्दल मोहम्मद ज़ैद मोहम्मद रीज़वान* तसेच त्याचे वडील मोहम्मद रीज़वान मोहम्मद नासेर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्याध्यापक शेख तौफिक सर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोहम्मद ज़ैद याने आपल्या यशाचे श्रेय आई वडील तथा शाळेच्या शिक्षकांना दिले,

Lonar:मोहम्मद रिजवान यांनी सर्वांनी पैगंबर हजरत मोहम्मद (सल्ललाहो अलैही व सल्लम) यांचे विचार आत्मसात करावे असे सांगितले तसेच मुख्याध्यापक शेख तौफिक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

जनतेच्या मनातील रस्त्यावरचा सर्वसामान्य कार्यकर्ता आपला माणूस, आंदोलन सम्राट नागवंशी संगपाल पनाड उतरणार लोणार ,मेहकर विधानसभेच्या रिंगणात(lonar)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonar :नागवंशी संघपाल पनाड यांची सुरुवात 2006 भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी पर्यंत सुरुवात झाली.

कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आपलं आगळे वेगळे स्थान निर्माण केले.2006 पासून सक्रिय समाजकारण व राजकारणाला सुरुवात केली शेकडो आंदोलने मोर्चे काढत, हजारो गोरगरीब, पिडीत, वंचित ,शोषित, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, जनतेला न्याय देण्याचे काम आजपर्यंत करत आहेत. 2019 च्या लोणार नगरपालिका निवडणूकीमध्ये त्यांच्या नेतृत्वात त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह दोन नगरसेवकाचे उमेदवार उभे केले.

त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस व दिवसाचे रात्र करून चाणक्य नीती वापरून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेत अवघ्या 400 मताने पराभूत झाला. स्थानिक आमदार खासदार यांच्या उमेदवाराला शह देत शिवसेनेचा उमेदवार तीन नंबर वर ठेवला,सुलतानपूर हे गाव लोणार तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून मुंबई नागपूर हायवे वरती वसलेले गाव आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

स्वातंत्र्यापासून ते 2019 पर्यंत मागासवर्गीय स्मशानभूमी मध्ये प्रेत यात्रा नेण्यासाठी रस्ता नव्हता या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक निवेदने मोर्चे उपोषण केले परंतु, निगरगठ्ठ प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही मार्ग निघला नाही. ही बाब नागवंशी संघपाल पनाड यांच्या जिव्हारी लागली.

त्यांनी हा विषय हातामध्ये घेऊन 2019 मध्ये त्यांचे वडील कचरू राघो पनाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांचा अंतिम संस्कार अग्नीडाव सुलतानपूर ग्रामपंचायत कार्यासमोर केला. त्यामुळे प्रशासनाला जाग आली त्याची दखल घेऊन .त्यानंतर त्या ठिकाणी अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांची सिमेंट रस्ता स्मशानभूमीचे काम करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांची गाजलेले आतापर्यंत आंदोलने शेतकऱ्यासंदर्भात महावितरण कारल्यासमोर आमरण उपोषण, शेतकऱ्यासंदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेने कर्जमाफी संदर्भात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आंदोलन, 2021-22 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी मुंबई-नागपूर हायवेवर्ती रस्ता रोको आंदोलन, पाणी प्रश्नासाठी शोले स्टाईल आंदोलन, घरकुलधारकाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण, अनेक रस्ते नाल्या विकास कामाच्या संदर्भात शेकडो आंदोलन करून, त्यांनी जिल्हाभर आंदोलन सम्राट म्हणून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली.

2006 पासून ते आजपर्यंत त्यांच्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वस्व मानून रेखाताई ठाकूर, अशोकभाऊ सोनोने,प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, साहेबराव तायडे,सविता ताई मुंडे, भिमराव‌ तायडे,निलेश भाऊ जाधव, प्रशांत भाऊ वाघोदे, विष्णू भाऊ उबाळे , प्रा.डॉ.के.बी.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. 2017 मध्ये तालुकाध्यक्ष असताना जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक लागली त्यामध्ये दोन जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार व चार पंचायत समिती सदस्य पदाचे उमेदवार रिंगणात उतरून त्यामध्ये सुलतानपूर सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार हा माळी समाजाचा देऊन त्यामध्ये अटितटीच्या लढतीमध्ये 2200 मतदान घेऊन तीन नंबर वर राहिला.

व पंचायत समिती सदस्य पदाचा उमेदवार मुस्लिम समाजाचा देऊन अवघ्या 200 मताने पराभूत होत दोन‌नंबर राहिला.2017 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुलतानपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून त्यामध्ये पॅनल उभे करून स्वतः सरपंच पदाचा उमेदवार म्हणून दोन नंबर वर राहिले अल्पशा मताने पराभूत झाले. त्यांच्यासह पाच सदस्य निवडून आणले. त्यानंतर 2022 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वता सह आठ सदस्य निवडून आणले. त्यानचा मतदार संघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्या पासून ते तळागाळातील माणसासोबत दांडगा जनसंपर्क आहे.

Lonar :जनतेने एक आपला आपल्या मधील आपला हक्काचा माणूस आपले दुःखदर्द जाणणारा तळागाळातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, विधानसभेमध्ये पाठवले तर नक्कीच मतदार संघामध्ये सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर,शोषित, पीडित, वंचित, अपंग, निराधार, विधवा, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन मतदारसंघ विकासाच्या उंबरठ्यावर नेतील.

अनेक जीवनादायी हाॅस्पिटल मध्ये योजनेतुन मंजूरी करून सुध्दा बिल आकारले जाते रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी मांडली मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाशजी शेटे यांच्या समोर व्यथा(mumbai)

0

 

mumbai:मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख श्री ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाअधिकारी कार्यालय येथे जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO श्री कुलदिप जगंम यांच्या उपस्थितत बैठकीवेळी रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी काही हाॅस्पिटल मध्ये MJPJAY योजनेअंतर्गत उपचार घेउन देखील रूग्णांच्या नातेवाईकाकडुन बिल आकारल जात आहे.

व त्या रूग्णांच्या नातेवाईकांना धमकावुन समाधानपञ घेतल जात असल्याचे रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख श्री ओमप्रकाश शेटे यांच्या समोर तक्रारीचा पाडा वाचला यावेळी ओमप्रकाश शेटे यांनी अश्या हाॅस्पिटलावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

पुर्व भागातील श्री मार्कंडेय सहकारी रूग्णालय महात्माफुले जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ठ करण्यासाठी रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी विनंती केली.

अनेक जीवनादायी हाॅस्पिटल मध्ये योजनेतुन मंजूरी करून सुध्दा बिल आकारले जाते रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी मांडली मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाशजी शेटे यांच्या समोर व्यथा(mumbai)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत च्या योजनांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत डॉ. शेटे बोलत होते.

mumbai:यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी, डॉ. दीपक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. मंजिरी कुलकर्णी जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थिती होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ?(relve)

0

 

Relve:मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही.

अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत. येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा असणार आहे.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

रेल्वेतील एका मालडब्याचे जेष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोकांना मुंबईतील गर्दीच्या लोकमधून व्यवस्थित आणि सुस्थितीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वेकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये सध्या चार मालडबे आहेत. यापैकी एक मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Relve:तर उर्वरित मालडबे कायम राहणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवर धावत असलेल्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये प्रत्येक डब्यात जेष्ठ नागरिकांसाठी ७ आसने राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रवासी संख्या लक्षात घेता ही सुवि

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ ताकदीने लढणार – रविकांत तुपकर( Ravikanttupkar )

0

 

कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत संग्रामपूरात झाली बैठक…ताकदीने लढण्याचा केला निर्धार

जळगाव जामोद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक वरवट बकाल (ता.संग्रामपूर) येथे आज २३ सप्टेंबर २०२४ रोजी शेतकरी नेते रविकांतजी तुपकर साहेब यांच्या नेतृत्वात आयोजित केली होती.

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

पण या बैठकीला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने या बैठकीचे रूपांतर मेळाव्यामध्ये झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही हे वास्तव आहे.

या अपयशाची जबाबदारी मी स्वतः माझ्यावर घेतो असे रविकांतभाऊ तुपकर म्हणाले. त्यावेळी राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतः जातीने या मतदार संघात ठाण मांडून लक्ष घालणार आहे. येणाऱ्या विधानसभेत जळगाव जामोद मतदार संघातून शेतकरी-कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार देऊन पूर्ण ताकदीने हा मतदारसंघ लढविणार असल्याची घोषणा यावेळी केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ ताकदीने लढणार – रविकांत तुपकर( Ravikanttupkar )

Ravikanttupkar :या भागात अजूनही शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, गेल्या वर्षी झालेल्या ढगफुटीच्या मदतीपासून ७००० लोकं वंचित आहेत, सोयाबीन-कापसाला भाव नाही, परंतु याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, त्यामुळे सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाईसाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारा, या प्रश्नी आपण लवकच आक्रमक लढा उभारणार आहोत, या होणाऱ्या आंदोलनात ताकदीने सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी केले.