Home Blog Page 79

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

0

 

Ravikanttupkar:मुंबई, मंत्रालयात कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांची भेट घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहलेल्या पात्र-अपात् शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा देण्यासाठी कंपनीला बाध्य करण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

आपण सातत्याने केलेल्या आंदोलन व पाठपुराव्यामुळे AIC पिकविमा कंपनीने सन 2023 च्या खरीप हंगामातील पात्र 2 लाख 24 हजार 482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 138 कोटी 51 लाख रु. पिकविमा जमा आहे. तर रब्बी हंगामातील पात्र 56 हजार 989 शेतकऱ्यांच्या खात्यावर 125 कोटी 22 लाख रुपये पिकविमा कंपनीने जमा केला आहे.

 

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

 

परंतु रब्बी हंगामात पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अद्याप कंपनीने पैसे दिले नाही, त्याचबरोबर खरीप हंगामातील 70 हजार 831 शेतकऱ्यांना कंपनीने काही कारणास्तव अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांना व रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग व अपात्र अशा 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पिकविमा जमा करावा, ही आपली मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे सरकारने कंपनीला उर्वरित रक्कम अदा करून तातडीने पिकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम अदा करण्यास बाध्य करावे, त्याचबरोबर पिकविमा देण्यासाठी विलंब करणाऱ्या AIC पिकविमा कंपनीवर कठोर कारवाई करावी,

Ravikanttupkar:अशी मागणी कृषी प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात उर्वरित रकमेसाठीचा अहवाल कृषी विभागाने वित्त विभागाला पाठविण्याच्या सूचना कृषी प्रधान सचिव जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

मातेने मुलाला जन्म दिला बसमध्ये नवजात बाळाचा मृत्यू ( Wardhanews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Wardhanews:हिंगणघाटकितीही आणि कोणतेही सरकार विकासाच्या नावाने कितीही बोबा ठोको, अखेर ग्रामीण जनतेच्या नशिबी लागलेले ग्रहण काही सुटत नाही ते नाहीच.
अशीच एक दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

समुद्रपूर तालुक्यातील धूम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रकृती दाखविण्या साठी येत असतांना हिंगणघाट जवळील नंदोरी चौका तिला प्रसव वेदना झाल्या.

व बस मध्येच तिची प्रसूती झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बसचे चालक विक्रम काटकर, वाहक शेषराव कांढरकर यांनी त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयात आणली. व महिलेला प्रसूतीगृहात दाखल केले.या ठिकाणी आईची व बाळाची तपासणी करण्यात आली असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सदर दुर्दैवी मातेवर उपचार सुरु आहेत. यावेळी आगार व्यवस्थापक श्री. शेंडे, बसस्थानक प्रमुख श्री.शेडमाके, प्रदीप शेंडे यांनी रुग्णालयात येऊन मातेची भेट घेतली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सूरज कुबडे यांनी घटनास्थळ गाठून सदर कुटुंबिना मदत केली.

रुग्णालयात ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती रुग्णांना योग्य वेळी उपचारासाठी मिळत नसून महिलांसाठी दोन एबूलन्स राखीव आहेत.

पण आळशी पणा वा कामचुकारपणा मुळे 102 या क्रमांकवर फोन केला तर चक्क ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सुरज कुबडे यांनी केला असून चार महिन्यापूर्वी वेळा येथील एका महिलेसाठी रुग्णालयातील 102 वर कॉल केला असता.

Wardhanews :ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती नाही असे खोटे सांगण्यात आली परिणामी सदर महिलेला खासगी ऍटोतून दवाखान्यात नेत असतांना ती ऍटो मध्येच प्रसूत झाली होती .त्यामुळे सदर एम्बुलन्सला जीपीएस ट्रॅकर लावण्यात यावा अशी मागणी रुग्णसेवक सूरज कुबडे, व वन्यजीवरक्षक राकेश झाडें यांनी केली आहे.

आखिव पत्रिकेचे वाटप करणे हा माझा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण -: आमदार समीर कुणावार (Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- आमदार समीर कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने महसूल विभाग तालुका प्रशासन हिंगणघाट व्दारे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत पट्टे वाटप,अखिल पत्रिका वाटप विविध लाभाचें वितरण कार्यक्रम स्थानिक निखाडे भवन येथे पार पडला.

राज्यातील कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय..(farmer)

या कार्यक्रमात मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत गोमाजी महाराज वार्ड,संत कबीर वार्ड इंदिरा गांधी वार्ड येथील जागेच्या पट्ट्याच्या प्रश्न सातत्याने प्रयत्न करीत सोडविला होता आता त्याच जागेचा एकुण ७९६ लाभार्थ्यांना अखिव पत्रिका वाटप करण्यात आले.

यावेळी त्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून व मी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे पाहून अत्यंत आनंद झाल्याची भावना आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली.

या अभियानातंर्गत विविध योजनेतील एकुण १०५१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला त्यातप्रामुख्याने नगरपरिषद  विभागाच्या सर्वांसाठी घरे योजनेतंर्गत एकुण ११० पट्टे वाटप
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने एकुण ७९६ आखिव पत्रिका वाटप

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी विभाग वतीने शेतकऱ्यांना एकुण ५० स्प्रे पंप वाटप
पंचायत समिती हिंगणघाट वतीने सर्वांसाठी घरे योजनेतंर्गत एकुण १४ पट्टे वाटप, एकुण ३१सिंचन विहीर,१२ गुरांचा गोठा,०७ मोहगणी वृक्ष लागवड,३१ पशू संवर्धन विभाग योजनेतील लाभार्थी असून असे एकुण १०५१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती आमदार कुणावार यांनी दिली यावेळी सर्व लाभार्थ्यांना आमदार कुणावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Hingnghat :शेवटच्या लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र देत पर्यंत आमदार कुणावार स्वतः उपस्थित होते हे विशेष* या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वंदना संवरपतगे, तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,नायब तहसीलदार सागर कांबळे,भूमी अभिलेखचे तांबाडे , पांडुरंग तुळसकर,किरण वैद्य, नगरसेवक सोनू गवळी, नगरसेविका वंदना कामडी,पदमाकोडापे सर्व विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

बुलढाणा अर्बन संस्थेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप( bhaijichandak)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

bhaijichandak:सहकार विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन चे संस्थेचे सर्वेसर्वा सामाजिक क्षेत्रात अग्रजन्य स्थान असलेले संपूर्ण क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याला

नावलौकिक मिळवून देणारे मिळवलेले आदरणीय राधेश्यामजी चांडक(भाईजी) यांच्या वाढदिवसानिमित्ताने सहकार विद्या मंदिर बीबी येथील शाळेतील मुख्याध्यापक

प्रकाश इंगळे आर जी राठोड सर व इतर सर्व कर्मचारी यांनी लोणार तालुक्यातील बीबी येथे ग्रामीण रुग्णालय  जाऊन शाळेमार्फत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

bhaijichandak:शाळेतील मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी यांनी अतिशय उत्साहाने भाजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

हिंगणघाट शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन नागरिकांचा जाणून घेत आहे समस्या…(Hingnghat

0

 

Hingnghat:हिंगणघाट – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून परिवर्तन जनसंवाद यात्रेचे आयोजन हिंगणघाट शहरात करण्यात आले आहे. परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात शहालांगडी देवस्थान येथून हनुमानजीचे दर्शन घेऊन करण्यांत आली.

शहरातील प्रभागातील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम या परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

सहा महिन्यांपूर्वी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात हीच परिवर्तन जनसंवाद यात्रा केली होती. आता या परिवर्तन जनसंवाद यात्रेचा हा दुसरा टप्पा हिंगणघाट शहरात सुरू झाला आहे.

अनेक प्रभागात विविध समस्या आहेत नागरिकांची काम देखील होत नाहीत यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून अतुल वांदिले निघाले आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परिवर्तन जनसंवाद यात्रेचे शहरात अनेक ठिकाणी महिला औक्षवंत करून स्वागत करीत आहे. शहरातील बेरोजगार युवकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, जेष्ठ नागरीक यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा शहरात निघाली आहे.

Hingnghat:यात्रेला शहरातील नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांच्या घरापर्यंत येऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.यामध्ये त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरातील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…

शिक्षक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत सतीश गौळकार यांचे सुयश(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- 2 ऑक्टोबर….
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ हिंगणघाट तालुकास्तरीय व्हिडीओ निर्मिती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

स्पर्धेत एस.एस.एम.विद्यालय,हिंगणघाट चे उपक्रमशील शिक्षक सतीश गौळकार यांच्या वर्ग 6 ते 8 च्या गटात गणित,सामान्य विज्ञान,सामाजिक शास्त्र या तीन विषयाच्या दर्जेदार व्हिडीओ निर्मितीला प्रथम क्रमांक तर इंग्रजी

विषयाच्या दर्जेदार व्हिडीओ निर्मितीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.तसेच भाषा विषयात तृतीय क्रमांक प्राप्त झाला .विशेष म्हणजे सर्व पाचही गटात क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच वर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेत भाषा व इंग्रजी या विषयाच्या व्हिडिओ निर्मितीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शिक्षक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत सतीश गौळकार यांचे सुयश(Hingnghat)

Hingnghat :विजयी शिक्षकाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेश धारकर, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संस्थेचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक खडतकर सर उपमुख्याध्यापक मद्दलवार मॅडम , पर्यवेक्षक चंदनखेडे सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

जिल्हा स्तरिय क्रिकेट टूर्नामेंट के लिए चयन.(Hingnghat)

0

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

3 ऑक्टोबर को पॅसिफिक क्रिकेट ग्राउंड हिंगणघाट में तालुका स्तरीय अंडर 19 गर्ल्स क्रिकेट मैच में महेश ज्ञानपीठ हाई स्कूल हिंगनघाट की अंडर 19 लड़कियों ने अपने फाइनल मैच विद्या विकास विद्यालय से जितकर जिल्हा स्तरिय के लिये क्वालिफाय कीया

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टीम के खिलाडी प्रतीक्षा गांजरे, स्वेता कामडी, पूर्वी गाडवे, श्रद्धा काटकर, ईश्वरी उभाड, भक्ती वाटमोडे, आर्या वकील, आर्या आडेपवार, पल्लवी ठाकरे, संस्कृती आत्राम, राशी भोयर, स्वराली निमजे, विधी वाटमोडे, सालेहा बक्ष, पूर्वा

Hingnghat :सुरकार, गायत्री भुजाडे ने मॅच जीता और उनका चयन जिल्हा स्तरिय प्रतियोगिता के लिए किया गया है। उन्होंने इस जीत का श्रेय संचालक मंडल के अध्यक्ष गिरधर राठी, संचालक मंडल के सभी सदस्यों, प्राचार्य वैशाली पोल, उपप्राचार्य दिगंबर खटी,जिला

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ता पदी गजानन गलांडे यांची नियुक्ती(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

Hingnghat:हिंगणघाट:- श्री. गजानन गलांडे यांचे राजकीय, सामाजिक योगदान पाहून तसेच जनसामान्यांमधील संपर्क व जनतेच्या अडचणींसाठी करत असलेल्या मदत कार्याची

दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या आदेशाने त्यांची श्री गजानन कलोडे यांची जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल तथा जिल्हा प्रवक्ता ओबीसी सेल पदी नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

हि नियुक्ती प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, पक्षाचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Hingnghat:यावेळीजिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, प्रशांत एकोणकर उपस्थित होते.

मेहकर लोणार तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करा नसता तीव्र आंदोलन छेडू(Menkar)

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Mehakar:मेहकर लोणार तालुक्यातील परतीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करा नसता आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उबाठा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरेंनी शासनास दिला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

उपविभागीय कार्यालय मेहकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व कृषिमंत्री यांना निवेदन देऊन गत 25 सप्टेंबर रोजी झालेल्या परतीच्या अतिवृष्टीने मेहकर व लोणार तालुक्याच्या सहा विभागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

त्या विभागातील पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अन्यथा शासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदनाद्वारे देण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Mehkar :याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या सह गजानन जाधव, लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, गजानन निकस, गजानन गीते, एकबाल कुरेशी, गोपाल वैद्य, शंकर कोकाटे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, कैलाश उबाळे, मंदाकिनी वैद्य, गोदावरी वैद्य, पंचफुला वैद्य, धुरपताबाई नरवाडे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

विजय विद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ विजयी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

हिंगणघाट तालुका संघाचा १४ गुणांनी पराभव

सिंदी रेल्वे ता.१: येथील विजय विद्यालयाच्या मुलींनी जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील कबड्डीच्या चुरशीच्या सोमवारी (ता.३०) ला झालेल्या अंतीम सामन्यात हिंगणघाट तालुका संघाचा १४ गुनानी पराभव करीत शालेय विभागीय स्पर्धेसाठी आपल्या संघाची निवड निश्चित केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशासाठी मोलाचे योगदान साहेबराव पाटोळे(Lonar)

……. कबड्डीचे माहेर घर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सिंदी रेल्वे शहराने कबड्डी या खेळात अनेक नामवंत खेळाडू दिले असुन आजही ही परंपरा कायम असुन आजही कबड्डी या खेळात सिंदी रेल्वे शहराचा दबदबा आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विजय विद्यालयाच्या १७ वर्षीय विजयी संघाचे नेतृत्व अक्षरा रहाटे हिने करीत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.शिवाय विजय विद्यालयाच्याच १४ वर्षीय मुलीच्या कबड्डी संघातील अक्षरा मेहरकुरे आणि तन्वी रहाटे या दोन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Hingnghat:सर्व यश प्राप्त खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय विजय विद्यालयाच्या प्राचार्य रेखा तडस(झिलपे),निलेश बहादे,अनिल डंभारे आदींना दिले असुन विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विजयी चमुचे अभिनंदन केले आहे.