Home Blog Page 84

आझाद समाज पार्टी( कांशीराम )च्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी रामदास कहाळे(buldhana )

0

 

 

Buldhana : सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा या गावचे माजी सरपंच तथा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम सातत्याने करत राहणारे पत्रकार रामदास कहाळे यांची खासदार चंद्रशेखर आझाद संस्थापक अध्यक्ष आझाद समाज पार्टी ( कांशीराम) या पक्षाच्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी निवड जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी जिल्हा सल्लागार पत्रकार सचिन खंडारे, यांच्या उपस्थितीत केली आहे.

रामदास कहाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आडगाव राजा या गावचे सरपंच, उपसरपंच राहिले असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहे.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाच्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी रामदास कहाळे यांची निवड जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी केली आहे.

Buldhana :सिंदखेड राजा तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम करून पक्षाला मजबूत करण्याचे जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे

नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी..(teacher )

0

 

teacher:सध्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या तीन संरचित आहार पद्धती सुरू झाल्या आहेत. मात्र याचा हिशेब कसा ठेवावा याबाबत शिक्षण विभागाचे ठोस मार्गदर्शन मिळत नसल्याने गुरुजींचा तणाव वाढला असून त्यांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने मेन्यूचे प्रकार ठरवून दिले आहेत.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक व मुख्याध्यापकांना दिले आहे.

मात्र यातून मुलांना पोषण आहार मिळत असला, तरी हा मेन्यू आता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून योजनेत वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.

teacher:विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला, तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ या सर्वांचा हिशेब शिक्षकांना ठेवावा लागणार आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याने हा हिशेब कसा ठेवावा, असा प्

एक देश एक निवडणुकीचा कोणत्या राज्यावर काय होणार परिणाम…(voter )

0

 

Voter :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर गठित उच्चस्तरीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला, जो एकमताने स्वीकारण्यात आला.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मार्चमध्ये हा अहवाल सादर केला होता. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवणे हा कायदा मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या अजेंड्याचा भाग होता.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

उच्चस्तरीय समितीने पहिली पायरी म्हणून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची आणि त्यानंतर 100 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे. समितीने 2029 मध्ये एक देश एक निवडणूक लागू करण्याची सूचना केली आहे.

एक देश एक निवडणुकीचा कोणत्या राज्यावर काय होणार परिणाम…(voter )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गेल्या वर्षी मोदी सरकारने ही उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करेल,

Voter :असे मानले जात आहे. सरकारला आशा आहे की त्यांचे मित्रपक्ष यासंबंधीचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात मदत करतील.

कोणत्या राज्यावर किती परिणाम?

जर हा कायदा मंजूर झाला आणि 2

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला, राहुल बोंद्रे यांनी चर्चा करून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर ( rahul bondre )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Rahul bondre :बुलढाणा,शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा आज चिखली महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा दिनांक १८/०९/२०२४ रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनात असंख्य शेतकरी आपले हक्क मागण्यासाठी एकत्र आले.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

या आंदोलनामागील उद्दिष्ट एकच होतं—शेतकऱ्यांच्या समस्यांना आवाज देऊन सरकारपर्यंत पोहोचवणे. शेतकऱ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत:

किमान ₹७,००० प्रति क्विंटल सोयाबीन दर, त्वरित पीक विमा निधी जमा, कर्जमाफी, आणि तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदानाची तत्काळ पूर्तता!भ्रष्टाचारामुळे सरकार मौन आहे, पण शेतकऱ्यांनी ठरवलं आहे की आता त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष थांबणार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यांच्या मेहनतीचं योग्य मोल मिळालं पाहिजे. शिवसेनेचे नरू भाऊ खेडेकर, आमदार सानंदाजी, हर्षवर्धन दादा सपकाळ, आद श्याम भाऊ ऊंबाळकर, नरेंद्र भाऊ शेळके, लक्ष्मणराव घुमरे, नरेंद्र कुमार गोरे ,मा ज्योतीताई खेडेकर, डॉ इस्रार, भाई प्रदीप अंभोरे, रफिक शेठ, संजू भाऊ गाडेकर ,शिवसेना युवकचे नंदू भाऊ कराळे, अमीन सेठ, डॉक्टर भुसारी, अडवोकेट सहजाद उपस्थित होते.

Rahul bondre :आजच्या आंदोलनातून शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते शांत बसणार नाहीत. त्यांच्या मालाला योग्य भाव आणि समर्थन मिळालं पाहिजे, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते

वसंतराव नाईक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड (cricket)

0

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

cricket:लोणार येथे शालेय अंडर नाईन्टीन तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झालेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये बीबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील क्रिकेट संघाने भरघोस विजय मिळवून जिल्हास्तरावर निवड झाल्याचा बहुमान मिळविला आहे.

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

लोणार येथे 18 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय अंडर नाईन्टीन क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट या खेळामध्ये बीबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये अजिंक्य आटोळे, गणेश खंडागळे ,रोहन आंधळे, तुषार मुर्तडकर, कृष्णा महाजन, आदित्य सरकटे ,रवी भोकरे, सुमित मोरे ,विवेक खार्डे ,ओम राठोड, शुभम राठोड, संकेत बनकर ,धीरज चव्हाण, धीरज फड ,अमित तांदुळे या

बातमी लाईव्ह  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावून घवघवीत यश मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळण्यासाठी निवड झाल्याबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय चव्हाण, प्राचार्य आर बी

cricket:राठोड, क्रीडा शिक्षक एस आर राठोड, व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या स्पर्धेचे नेतृत्व अरुण खरात, मस्के सर ,मिसाळ सर, यांनी केले.
सुर्य मराठी न्यूज साठी सय्यद जहीर/लोणार/बुलढाणा

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

0

 

ISRO ही अंतराळाचा अभ्यास करणारी भारतीय संस्था आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा यांच्याबाबत तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्हीही इस्रोमध्ये नोकरी करु शकता.

तुम्हाला अवकाशात रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कोणते शिक्षण घ्यायला हवे?

महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram)

या क्षेत्रासाठी कोणता विषय महत्वाचा आहे? यासाठी निवडप्रक्रिया कशी असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.

इस्रोमध्ये नोकरी कशी मिळवायची?

इस्रोमध्ये येण्यासाठी अभ्यासात हुशार असणे ही पहिली गरज आहे. तुम्ही चांगले गुण मिळवूनच येथे निवडले जाऊ शकता. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होते आणि नंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते.

ISRO:इस्रोमध्ये सामील होण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वप्रथम तुम्हाला 11वी 12वीमध्ये चांगले मार्कस मिळवावे लागतील.

ISRO:बारावीला गणित, भौतिकशास्त्र हे विषय असावेत. या विषयांमध्ये किमान 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

ग्रॅज्युएशन अनिवार्य

बारावीनंतर JEE पास करून ii Sc, IIT किंवा NIIT सारख्या संबंधित संस्थेत प्रवेश घ्या. भौतिकशास्त्र,इलेक्ट्रॉनिक

आहार पुरवठ्याबाबत मुकुंद जोशी यांनी आत्मपरीक्षण करुन शरण यावे. अनेक तक्रारी होऊनही मुकुंद जोशी मोकाट ??(mukund joshi )

0

 

आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचारी पुरवठा बाबत तक्रारींची दखल कोणी घेणार ???

mukund joshi:नागपूर/ प्रतिनिधी दि १८/९/२०२४:- नागपूर विभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळा , वसतिगृहे आणि जिल्ह्यातील अहेरी , भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आणि शासनाची आर्थिक फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

या प्रकरणी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कोणती कारवाई करण्यात यशस्वी होतात. याकडे विविध संघटनांचे लक्ष वेधले आहे. याबाबत महामहीम राज्यपाल , जिल्हाधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे संतोष तलांडी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली होती.

मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नेमके पाणी कुठे मुरत आहे याचा थांगपत्ता लागत नाही.

https://youtu.be/BZc_T7hdiu0

गडचिरोली येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मुजोर आचारी मुकुंद जोशी यांनी एका स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून बऱ्याच शासकीय रुग्णालयात भोजन पुरवठा केला आहे.

त्यात शासनाच्या तिजोरीला चुना लावला असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन आणि मिलिभगत करुन अवाढव्य बिले वाढवून
अवैधरित्या लाखो रुपये हडप केले असल्याची चर्चा सुरू आहे.

मुकुंद जोशी हे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत अनेक ठिकाणी शासकीय रुग्णालयात आहार , मनुष्यबळ, सुरक्षा रक्षक , धोबी , कक्ष सेवक , सफाई कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार होते. सर्व कंत्राट आपणालाच मिळावे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे कामही जोशी यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन वेळेत असलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेतल्यास दिवसभर कार्यालयात बसून राहाणारा लाचार आचारी फुकट शासकीय खुर्चीवर बसून राहत होता. याची गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाला प्रचिती येईल यात शंका नाही. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची नितांत गरज आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मुकुंद जोशी हे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि ईतर ठिकाणीही काम मिळेल अशी आशा बाळगुन ई .. निविदा सादर करित होते. परंतु सादर केलेल्या दरापेक्षा कमी असलेल्या ठेकेदाराला कंत्राट मिळाले तरी मुकुंद जोशी पिसाळून जाऊन माहिती अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्यासाठी माहिती मागण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.

mukund joshi:त्यामुळे संबंधित शासकीय विभागात कार्यालयीन कामकाज करतांना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मुकुंद जोशी हा खंडणी बहादुर असुन पिसाळलेला असल्याचीही चर्चा गडचिरोली शहरात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी मुकुंद जोशी हे खंडणीबाज आणि ब्लॅकमेलर असल्याचे मत व्यक्त करुन त्रस्त झाल्याचे सांगितले आहे. मुकुंद जोशी यांच्या मनमानी , मुजोरी आणि वारंवार होणाऱ्या पत्रव्यवहारामुळे शासनाच्या, प्रशासनाच्या अनेक आस्थापनेवरील कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेळ आणि पैशाचा अपव्यय होऊन नियमित काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांवर मानसिक तणावामुळे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुकुंद जोशी यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींचा लेखाजोगा जमा करून अटक करण्यात यावी अशी चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे पंजाबचे व्ही एम सिंग यांचेसह राज्यातील अनेक नेते उद्या संग्रामपूरात..( former )

0

 

कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा व बचतगट यासह विविध प्रश्नांवर उद्या फैसला..

Former :संग्रामपूर/ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यातील अनेक संघटना एकत्रित येऊन सर्व नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या शिव जनस्वराज्य मेळाव्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी संग्रामपूरात धडकणार आहेत.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

राष्ट्रीय अध्यक्ष व्ही एम सिंग,मा खा.राजु शेट्टी,मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे, सप्तखंजेरीवादक संदिपपाल महाराज, सप्तखंजेरीवादक डॉ रामपाल महाराज, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रा.प्रकाश पोफळे, मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे, यांच्या सह राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार

असुन कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा व बचतगट यासह विविध प्रश्नांवर काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, जाणिवपूर्वक पाडलेले शेतीमालाचे भाव, बि बियाणे व खतांचे वाढलेले भाव, नोकर भरतीमधे भ्रष्टाचार, महिलांवर होणारा अत्याचार, याला आळा घालण्यासाठी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मेळावा ऐतिहासिक व महत्त्वपुर्ण मानल्या जात आहे.

https://youtu.be/BZc_T7hdiu0

या मेळाव्याला येण्यासाठी गावा गावात जणमाणसांची उत्स्फूर्तपणे तयारी दिसुन येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बँकेचे पिक कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळवून घेण्यासाठी कर्जमाफिचे अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने शेतकरी पोहचणार असुन.

महिला बचत गटाचे रोखलेली व्याजाची रक्कम शासन निर्णयनुसार महिलांना परत मिळविण्यासाठी अंतिम स्मरणपत्र घेऊन उद्याच्या मेळाव्याला महिला बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे अर्ज व व्याजाची रक्कम परत मिळण्यासाठी महिलांसाठी अंतिम स्मरणपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संग्रामपूरमधे प्रत्येक झेरॉक्स दुकानवर उपलब्ध करून दिले आहेत.

Former :त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जीव कि प्राण असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुर्वनियोजीत जय्यत तयारी केली असल्याने राज्यसरकारला चांगलाच घाम फोडला आहे.

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची दिशाभूल शेतकऱ्याला मिळाला फक्त १०% टक्के पिक विमा ( pikvima )

0

 

Pikvima :संपूर्ण सिंदखेड राजा , देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप पिक विमा कपाशीचा अवघ्या फक्त १० ते २० टक्क्यांनी मिळत आहे खरीप जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळाला नाही जो काही मिळाला तोही शेतकऱ्यांच्या तोंडाला पान फुटल्यासारखा आणि शेतकऱ्याला व्यतीत आणणारे आहे.

26/ 11/2023 रोजी सिंदखेड राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अति नुकसान गारपीट झाली होती त्या गारपिटीची पाहणी करण्यासाठी बुलढाणा लोकसभेचे विद्यमान खासदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब पालकमंत्री ,श्री दिलीप वळसे पाटील साहेब हे सर्व सत्तेतले आणि विरोधक सर्व नेते मंडळी पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले.

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

आणि शेडनेट बीज उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि येथील संपूर्ण शेतकऱ्यांची १००% टक्के नुकसान झाली असे सर्वांनी जाहीर केले आणि त्या ठिकाणी ,जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, आणि पिक विमा जिल्हा प्रतिनिधी, हे सुद्धा उपस्थित होते अद्याप पीक विमा कंपनीने फक्त १० % ते २०% पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा देत आहे.

म्हणजे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान होऊन तर मदत मिळत नसेल तर पिक विमा कंपनी ही कोणासाठी जिल्ह्यात काम करत आहे या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला. याच प्रश्नसंदर्भामध्ये शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर साहेब व शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा व बळीवंश या संघटनेमार्फत श्री बालाजी सोसे, गजानन जायभाये यांनी अन्नत्याग आमरण उपोषण करून सुद्धा शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही.

https://youtu.be/BZc_T7hdiu0

आणि म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे शेतकरी योद्धा कृषी समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले पिक विमा ही कंपनी फक्त जिल्ह्यातील सत्ताधारी नेते मंडळींचा पोट भरण्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांचे आणि खासदारांचे पोट भरण्यासाठी आहे का मंग सर्व मंडळी का हा प्रश्न उपस्थित करत नाही.

आणि सरकारकडे का लावून धरत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ही पीक विमा कंपनी काम करत नाही ज्या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत जाहीर करून दिली ती मदत जवळपास सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यांमध्ये 50% पासून तर 98% पर्यंत ती नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारकडे प्राप्त झाला आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने मदत दिली मग पिक विमा कंपनी १० ते २० % टक्क्यांनी मदत का देती हा प्रश्न संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नेते मंडळींनी उपस्थित करायला पाहिजेत होता.

पण सर्व नेते मंडळी गप्प बसले आहे राज्य सरकारने ठरवल्यानंतर पिक विमा कंपनीला टक्केवारी ठरवण्याचा अधिकार नसावा आणि राज्य सरकारच्या नुकसान झाल्याचे टक्केवारीनुसारच पिक विमा मिळाला पाहिजेत होता, म्हणून आता शेतकऱ्यांनी जर निर्णय घेतला तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये जड जाईल कारण तुम्हाला शेतकऱ्याच्या पिक विम्याच्या प्रश्ना बद्दल जर बोलायचं नसेल तर सर्व सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या दारामध्ये मतदान माघाला यायचं नाही नाहीतर शेतकरी शेतकऱ्यांच्या दारामध्ये रूमनं घेऊन उभा राहील मग तुम्हाला पळती भुई कमी होईल.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणून सर्व राजकीय पक्षांना मी विनंती करतो शेतकऱ्याच्या पिक विमा बद्दल सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवा नक्कीच पीक कंपनीला जाग येईल आणि तसेच शेतकरी मित्र श्री दिलीप चौधरी व शेतकरी योद्धा कृती समिती समन्वयक श्री बालाजी सोसे यांच्या नेतृत्वाखाली ३० तारखेच्या आत दिलेल्या निवेदनामधील आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या पुकारलेलं आत्मदहन हे आंदोलन होणारच

Pikvima :शेतकऱ्याला न्याय मिळेल नाहीतर तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो शूट करण्यासाठी तुम्ही सर्व तुमचे दौरे असतात हे सर्व सामान्य शेतकऱ्याच्या लक्षात येईल असं मत शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी व्यक्त केलं

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती मोहीमेला उत्फुर्त प्रतिसाद( yaval )

0

 

यावल(प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yaval :कर्तव्य आहे. देश विकासासाठी व लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे, असे,

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

ईव्हीएम व विपॅट मतदान जनजागृती मतदार जनजागृती अभियान आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये यावल तालुक्यातील समाविष्ट असणाऱ्या साखळी भागातील सर्व गावांमध्ये मशीनद्वारे मतदानांची मतदान मतदारांची जनजागृती करण्यात आली यावेळी गावातील चौका चौकात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व समजून सांगण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच मशीनचे प्रात्यक्षिक मतदारांना करून दाखवण्यात आले यावेळेस यावेळी मंडळ अधिकारी सचिन जगताप, यांनी उपस्थित मतदारांना जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याबाबत आव्हान केले तसेच मशीनची तोंड ओळख मशीन द्वारे कशाप्रकारे मतदान होते.

Yaval :याबाबत मतदारांना समजावून सांगितले याप्रसंगी मंडळ अधिकारी सचिन जगताप ,तलाठी मिलिंद कुरकुरे , तलाठी मधुकर पाटील, तलाठी महेंद्र खुर्द ,तलाठी विजयसिंह पाटील ,तसेच कोतवाल गणेश महाजन, कोतवाल समीर तडवी , कोतवाल विजय भालेराव, कोतवाल रुपेश शंकर, कोतवाल विशाल राजपूत, गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते